दिवाळीचा फराळ दिवाळीत नकोसा होतो. पण काही दिवसांनी काहींना त्याची आठवण येऊ लागते. मैने प्यार किया, हम आपके है कौन नंतर ऐन दिवाळीत आलेल्या हम साथ साथ है चं प्रेक्षकांना अजीर्ण झालं होतं. नंतर नवा पदार्थ बनवून पाहण्यासाठी मै प्रेम की दिवानी हूं आणि विवाह हे प्रेमपट बनवूनही तोंडाला बसलेली मिठी काही सुटेना.मग पुन्हा जुनाच आयटेम नव्या पद्धतीने पण त्याच परंपरेत बनवून पाहण्याची खेळी या वेळी बॉक्स ऑफीसवर तरी चालली आहे.
सूरज बडजात्याचा सिनेमा हा पोस्टरवरूनच ओळखता येतो. त्यासाठी श्रेयनामावालीची गरज नसते. ते सर्वांचं अरुण गोविल छाप हसू ओठात खेळवणारा सलमान त्याहूनही गोड हसू असणारा आलोकनाथ हे पाहून सूज्ञ प्रेक्षक ताबडतोब ओळखतो कि बडजात्यांचा फराळ आला.
घरांचे भाव गगनात गेल्याच्या जमान्यात आख्खी स्कीम एकाच घरात मावेल एव्हढी भव्य घरं, डोळे दिपवून टाकेल अशी श्रीमंती आणि टचकन डोळ्यांत पाणी आणणारे कौटुंबिक प्रसंग हे याही सिनेमात आहेत. फक्त यावेळी चढत्या भाजणीप्रमाणे यातलं कुटुंब चक्क राजघराणं असल्याने एक नाही दोन नाही तर पाच सहा महाल आहेत. श्रीमंती इतकी की अंगवस्त्रासाठी दिलेलं सामान्य घर हे अॅपलचं कार्पोरेट ऑफीस स्वतःच्या थोतरीत मारून घेईल !
तर अशा या सिनेमाची कथा काय वर्णावी ?
अयोध्येसारख्या पवित्र ठिकाणी दिलवाले प्रेम हा नवतरुण राजश्रीच्या ध्वनीप्रदूषणाच्या दहा डेसीबल्सच्या मर्यादेत राहून रामलीला सादर करीत असतो. याच मर्यादेत त्याचे पुटपुटते संवाद प्रेक्षकांना कळत असतात. एकीकडे रामलीला सादर करत असताना तो एका राजकुमारीच्या सोशल वर्कला हातभार देखील लावत असतो. राजकुमारीला एक डाव डोळे भरून पहावं एव्हढीच त्याची इच्छा असते. त्याला समजतं की अयोध्येपासून बसने एक दिवसाच्या अंतरावर असणा-या प्रीतमपूर गावी राजकुमारी येणार आहेत. प्रेम दिलवालेला आगापिछा नसल्याने मित्रासोबत तो गावी जायला निघतो.
आणि आपल्याला राजकुमारीचं गंतव्य ठिकाण पडद्यावर दिसू लागतं. रियासतचा फैसला होऊन संभाव्य युवराजांचा राजतिलक व्हायचा आहे. हेच युवराज आपल्या पाहुण्या राजकुमारीचे वाग्दत्त वर असून त्यांचा साखरपुडा व्हायचा आहे हे आपल्याला कळतं. हा प्रसंग ज्या घरात घडत असतो तिथे कॅमेरा अगदी उंचावर टांगूनही घर त्यात मावलेलं नसतं. ते सुरू कुठे होतं नि संपतं कुठे हे शेवटपर्यंत समजत नाही.
कॅमेरा जस जसा युवराजांच्या चेह-यावर येतो तसे आपण सावरून बसतो आणि पाहतो अरेच्चा !
नियतीचा चमत्कार !! आश्चर्य !!!!
पूर्वी कधीही न पाहीले असं अघटीत ! नवल !!
युवराजांचा चेहरा थेट, हुबेहूब प्रेम दिलवालेसारखा. आपण मनात म्हणतो कसं काय ना ? दोघांचे आवाजही सारखे, केस सारखे उंचीसारखी, रंग सारखा आणि वयदेखील सारखं. प्रेक्षक थक्क ! एकाच तिकीटात डबल मनोरंजन ? बोनस शेयर ! पिक्चर चालणार म्हणजे काय दौडणार.
तर युवराजांना एक भाऊ असतो तो दिसायला युवराजांच्या मनात कॉम्प्लेक्स निर्माण करत असतो. त्याचे नाव नील नितीन मुकेश. त्यामुळे तलवारबाजीत युवराज भावाला हरवतात. मग तो आपला देखणा चेहरा घेऊन नवतरूण नायकास अपशकुन करायला वारंवार पडद्यावर येत नाही.
युवराजांना दोन बहीणी असतात. युवराज परंपराप्रिय असल्याचे पहिल्याच सीन मधे आपल्याला कळालेले असते. तर राजकुमारीस ठेसनात रिसीव्ह करायला बहीणीने जावं हे परंपरेप्रमाणे योग्य राहील असा निर्वाळा खानदानी पडीक दिवाणजी कम मुनीमजी कम पागनीस कम पोतनीस कम वाकनीस कम फडणवीस असलेले अनुपम खेर देतात. नायकाचा डबल रोल असल्याने एव्हढी कामे अनुपम खेर यांना एकट्याने करावी लागणार असतात. त्यामुळे अजित वाच्छानी, सतीश शहा, आलोकनाथ यांना नारळ मिळालाय हे आपल्या ध्यानात येतं. गुजराती बनियाचं बजेटवर किती काटेकोर लक्ष असतं हे ही शिकायला मिळतं.
या दरम्यान गाणं बजावणं होत असतं त्यातले शब्द काही लक्षात राहणार नाहीत याची दक्षता रविंद्र जैन यांच्या जागी गुजराती म्हणून आलेल्या हिमेसभाईने घेतलेली असते. पण त्याला गाण्याची संधी न देऊन सूरज बडजात्या आपल्याला संगीताचा कान असल्याचे सुचवून जातो.
बहीणीने ठेसनात जावं ही परंपरा किती शतकं पुरानी आहे हे आपल्याला कळत नाही. अशी काही परंपरा असते हे आपण राजघराण्यात जन्माला आलेले नसल्याने आणि कपाळकरंटे असल्याने आपल्याला कसं ठावे ? या परंपरेसाठी युवराज बहीणींच्या घरी जातात मात्र दारात बग्गी थांबताच वरून एक बहीण एक वस्तू फेकून मारते. त्याला घरात घेतले जात नाही आणि राजघराण्याचा वकील तिथे दाखल होतो. जे काही बोलायचं ते माझ्याशी आधी बोला मी ते त्यांना कळवीन. तुमचा प्रस्ताव योग्य असेल तर त्या तुम्हाला भेटतील. हा अपमान रिचवून युवराज तिला भेटायला घरात घुसतात पण त्यांना धक्के मारून बाहेर काढलं जातं.
त्यानंतर दिवाणजींना तिथेच सोडून रागारागाने युवराज आपल्या घरी , माफ करा महाली निघतात. आपण पडद्यावर पाहतो तो काय बग्गीचालक मळलेली वाट सोडून भलत्याच दिशेने बग्गी हाकू लागतो. युवराजांना झोप लागलेली असते. बग्गी आता अरुंद घाटरस्त्याने धावू लागते. चालक बग्गीचे सर्व दरवाजे बंद करून टाकतो आणि स्वतः आडव्या फांदीला लटकतो. इकडे युवराजांना जाग येते तो बग्गी विनाचालकाची धावतेय. युवराज काच फोडून बाहेर येऊन जीव वाचवू पाहतात पण हाय रे देवा, बग्गी हजारो फुटांवरून खाली कोसळताना दिसते . सोबत युवराज स्काय डाईव्ह करताना दिसतात. पण खाली दरी, दगड धोंडे, एक तालाब इ. इ. असतं आणि युवराजांकडे पॅराशूट देखील नसतं.
प्रेम दिलवाले बस थांबल्यावर राजकुमारीसाठी मिठाई खरेदी करत असताना त्यांना संस्थानातली एक कार दिसते. तो सिक्युरिटी अधिकारी असतो. प्रेम दिलवालेला पाहून तो अत्यंत आश्चर्यचकीत झालेला दिसतो आणि आपल्या कारमधे येण्याची विनंती करतो. प्रेम देखील विश्वास बसत नसताना त्याच्या कारमधे बसतो आणि युवराजांच्या संस्थानात दाखल होतो...
बाप रे बाप ! सुरुवातीलाच क्लायमॅक्स !!
सूरज बडजात्यांनी या वेळच्या फराळात देशोदेशींचे मसाले मिक्स केले आहेत. इतका दारुगोळा ठासून भरल्यानंतर सिनेमात नाती उलगडून दाखवण्यात प्रेम यशस्वी होतो का ? त्याला कुठली कामगिरी मिळते ? युवराजांचं काय होतं ? त्यांना कोण मारण्याचा प्रयत्न करतं ?
मुख्य म्हणजे डबल.रोलचं प्रयोजन काय ? सिनेमात दुसरी हिरॉइन आहे का ? मग सोनम कपूरचं काय होतं ? तिला युवराज मिळतात का की त्यांच्या जागी ड्यआयडी मिळतो या प्रश्नांची उत्तरं पडद्यावरच पहावीत.
सिनेमात आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याच अंदाज आलाच असेल बहुधा. बडजात्या पट म्हटल्यावर निरमाने दुतलेल्या स्क्रीनवर चित्रपट उलगडणार हे कळतंच. बडजात्यांच्या सिनेमातल्या नायिका स्वच्छ दिसतात पण त्या स्नान करतात की नाही हे इतर सिनेम्यांप्रमाणे आपणास कळत नाही. नायक बिना अंघोळीचा , पारोशी असला तरी चालेल पण नायिका कशी शुचिर्भूत असली पाहीजे हा सिनेसृष्टीचा दंडक आहे. त्याचा ढळढळीत पुरावा देण्याची पद्धत बडजात्यांकडे नाही. तरी देखील चित्रपटाने चाळीस कोटीचा डल्ला मारला आहे हे पाहून लिऑनपटांनी तोंडात बोटं घातली असतील.
फराळाचा अंदाज आल्यावर हा फराळ आवडत असेल तर एकदा चाखायला हरकत नाही. पण तोंडाची मिठी अद्याप सुटली नसल्यास वाकडी वाट देखील करू नये. रामायण मालिकेत ज्याप्रमाने हसले, रडले, उठले, बसले या सर्व क्रियांवर रविंद्र जैन यांच्या आवाजात एक अगम्य गाणं असायचं तशी गाणी हिमेसभाईंनी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या मर्यादा पाहता त्याने त्या उघड्या पडू नयेत म्हणून जो काही ढणढणाट केला आहे ते पाहता त्याला दिवाळी आणि दहीहंडीतला फरक ध्यानात आला नसावा असे वाटते. हॉलबाहेर आल्यावर डोकं जड का वाटतंय हे एक झोप काढून झाल्यावर ध्यानात येतं.
मायबोलीकरांनी डबल रोलचा रहस्यभेद सिनेमाहॉल मधे करू नये. सगळ्यांनाच ड्युआयडीचे फायदे तोटे माहीत असतील असे नाही. तुम्ही जर एव्हढे पथ्य पाळलेच तर येताना गुणगुणल्याशिवाय राहणार नाही कि
पायो जी मैने रामरहीम ड्युआय पायो !!
Thu 40.35 cr, Fri 31.05 cr,
Thu 40.35 cr, Fri 31.05 cr, Sat 30.07 cr, Sun 28.30 cr, Mon 13.62 cr.
वरच्या ओळीत याच उत्तर आहे . मुव्ही कसा आहे कळायच्या आत १०० कोटी गाठलेले असतात
त्यात तरन आदर्श सारखे यालाही ४.५ /५ देणारे पेड रिव्ह्युवरही असतातच (याची मिनिमम रेटींग ४ पासून सुरू होते )
काहींना हा सिनेमा बेहद्द
काहींना हा सिनेमा बेहद्द आवडला आहे. . शिरस्त्याप्रमाणे रविवार अखेरपर्यंत बहुतेकांनी पाहीला असेलच.
त्यामुळं आता पुढील पोस्टमार्टेम करणं चुकीचं ठरणार नाही.
त्यामुळं आता पुढील
त्यामुळं आता पुढील पोस्टमार्टेम करणं चुकीचं ठरणार नाही
कराच, आम्ही तसेही पाहणार नाहीच आहोत, आणि हा काही सस्पेन्स सिनेमा नाहीय. जो काही थोडाबहुत सस्पेन्स असेल/होता तोही वरच्या एका कमेंटमधुन फुटलाय....
आमीर, सलमान, शाहरुख, संजय
आमीर, सलमान, शाहरुख, संजय दत्त, याचे सिनेमे आम्ही बघत नसतो.
शिरस्त्याप्रमाणे रविवार
शिरस्त्याप्रमाणे रविवार अखेरपर्यंत बहुतेकांनी पाहीला असेलच.
>>
माझ्या हाती आज लागलाय, आणि येथील धमाल पाहून तो बघायचा मोह आवरत नाहीये.
तर मंडळी पुढे चालू.. हा आपला
तर मंडळी
पुढे चालू..
हा आपला लसूणमाळ आपलं सलमान खान दिवाणजींच्य पुढ्यात येऊन ठाकतो तिथेच युवराज उपचार घेत पहुडलेले असतात. पहुडलेले म्हणावं तर बँडेज बिंडेज दिसत असतं. त्यांनी इतका व्यायाम केलेला असतो की उंचावरून पडल्यावर देखील त्यांना खर्चटण्यापलिकडे काही होणार नाही. बहुधा स्टॅलोन नामक आंग्लवीरपुर्षाचा आदर्श त्यांनी घेतलेला असावा. शिवाय यांना आई वडील कुणी नाही. आलोकनाथ केजरीवालच्या व्हिडीओपासून राजेंद्रनाथ झालेले त्यामुळे थोडक्यात आटोपलेले पिताश्री तेव्हढ्यातही इतका घोळ घालून गेलेले असतात की युवराज जायबंदी अवस्थेतही विचारात पडलेले असतात की ब्वॉ, हे जर अजून जगले असते तर कसं ना ?
इकडे प्रेम दिलवाले मात्र राजघराण्यासाठी दिव्य करायला तयार होतो. मात्र त्याची अट असते की राजकुमारीला मी फसवणार नाही. तेव्हां राजघराणंच त्याच्या पाया पडते की बाबा काहीही कर पण आमच्या राजकुमारीसोबत रोमान्स कर. मग नाईलाजाने नवतरूण दिलवाले रोमान्स साठी तयार होतात. हे दृश्य पाहून आमच्यासारख्या वयोमान अवघे पाऊणशे असलेल्यांच्या हिरव्या देठांनाही पालवी फुटायला लागते.
असा का आवाज लावलाय पण त्यात
असा का आवाज लावलाय पण त्यात हिमेश ने!! लहानपणीचं गाणं दाखवलंय का ते ???? >>> हो!
अरे लोक्स, नक्की बघा पिक्चर. अफाट टाइमपासला मुकाल नाहीतर
बाकी पिक्चर भन्साळीच्या बाजीराव मस्तानीला सॉलिड टशन आहे. बडजात्या भन्साळीला म्ह्णाला असेल - तू एक राणी आणि एक प्रेयसी दाखवतोस? देख, मैं दो रानीयाँ और एक प्रेयसी लायो
इतक्या सगळ्या बायका (आणि पर्यायाने मुलं) मेरी कमजोरी थी वगैरे छाप राजाचं वाक्य ऐकून आपण धन्य होतो.
तुझ्या कडे दोन तर माझ्या कडे
तुझ्या कडे दोन तर माझ्या कडे तीन तीन - फुल ऑन टशन
सुरुवातीला दानधर्म करायला
सुरुवातीला दानधर्म करायला उडनखटोल्यात येणारी राजकुमारी, राजकुमाराला भेटायला ट्रेनमधेन येते. ते पण एकटीच. उडनखटोल्यातुन आल्यावर बहुधा राजकुमाराला कॉम्प्लेक्स येइल असे वाटले असेल बापडीला.
हा सिनेमा टाइमपासच असणार म्हणुन आम्ही खास टिंगल करीत बघायला गेलो होते. संपुर्ण सिनेमा हसत होतो.
सलमान आणि सोनम कपूर
सलमान आणि सोनम कपूर यांच्यातले प्रणय प्रसंग हा कळीचा मुद्दा आहे. सलमानला सोपं जावं म्हणून युवराज सलमानचं आणि सोनम कपूरचं वाजलेलं दाखवलंय तर दुस-या गाणं बजावणा-याला मौनव्रत धरायला सांगितलं होतं. त्यातून राजकुमारी कुणाची तरी अमानत आहे म्हणून त्याला अपराधबोच असते हे सांगायला दिग्दर्शक विसरलेला नाही. म्हणजे प्रणयप्रसंग खुलले नाहीत तर वयाच्या फरकामुळे सलमानला जमलं नाही यापेक्षा सोनमला जमतच नाही असा शिक्का मारायला सलमानचे मार्केटिंग मॅनेजर मोकळे !!
एखादा ब्रह्मचारी लाजावा तसा सलमान आपल्या शीलाचे रक्षण राजकुमारीपासून करताना पाहून थेटरात डोळे आणि इथे बोटं गहीवरली.
इतक्या सगळ्या बायका (आणि
इतक्या सगळ्या बायका (आणि पर्यायाने मुलं) मेरी कमजोरी थी वगैरे छाप राजाचं >>
मस्त खुसखुशीत लिहिलंय.
मस्त खुसखुशीत लिहिलंय.
बझफीड. कॉम साइट वर द विजिल
बझफीड. कॉम साइट वर द विजिल इडिअट नावाने एक जण रिव्यू लिहितो. ह्या सि नेमाचा जरूर बघा.
चित्रे व कमेंट असते. इथे लिंक दिलेली नाही कारण भाषा हपिसाला सुटेबल नाही.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=lCYjjB0JsHY
भाषा हपिसाला सुटेबल नाही.
भाषा हपिसाला सुटेबल नाही. >>>> ब-याच वेळाने ट्यूब लागली.
सॉल्लिड धमाल लिहिलंय. हा
सॉल्लिड धमाल लिहिलंय. हा चित्रपट पाहण्याचा पेशन्स नाहीये त्यामुळे बघणार नाही.
बाकी सगळं तर राहूच द्यात. हे जे वरचं चित्रं आहे त्यात दाखवलेल्या वळणदार सोफ्यावर हे असं झोपल्यावर सोनमच्या पाठीत उसण भरली असावी असं वाटून गेलं. त्या सोफ्याचं डिझाईन हे असं पहुडण्यासाठी ergonomically बरोबर नाहीये.
शिवाय हे असं झोपायला किती द्रविडी प्राणायाम करावा लागेल ते बघा - आधी त्या मधल्या खोलगट भागात बसायचं, मग कुशीवर वळून अॅडजस्ट व्हायचं, मग पुन्हा एकवार पोटावर झोपायचा प्रयत्न करायचा. पोट चांगलं सुटलेलं वगैरे असेल तर तिथे फिट बसेलही पण त्या सोनमचं पोट पडलं सपाट! म्हणजे मधे गॅप राहणार. ती भरून काढायची ठरवली की स्लिप डिस्क नाहीतर गेला बाजार उसण ठरलेली. नाही भरून काढावी तर सबंध वेळ सगळा तोल नडगीवर आणि हातांवर तोलावा लागणार. बरं एवढं करून झाल्यावरही एका हातानं तोल सांभाळत दुसर्या हातानं साडी व्यवस्थित अॅडजस्ट करायची. आणि मग चेहर्यावर मुग्ध का कायसं म्हणतात त्या टाईपचं हसू आणायचं. सोफा नाही सोपा हेच खरं.
मामी, असल्या सोफ्याचं काम
मामी, असल्या सोफ्याचं काम काही वेगळंच असतं हो.
अमितव, जिथे नीट बसता
अमितव, जिथे नीट बसता येण्याची मारामार त्या असल्या सोफ्यावर आणखी भलती कामं कोण काढणार?
मामी, असल्या सोफ्याचं काम
मामी, असल्या सोफ्याचं काम काही वेगळंच असतं हो <<<
आणी भलती कामं काढली तर
आणी भलती कामं काढली तर दोघानाही स्लिप डिस्क नाहीतर गेला बाजार उसण ठरलेली.
एक्झाक्ट्ली मामी ह्याच
एक्झाक्ट्ली मामी ह्याच कारणासाठी मी सोनम चा फोटो कितीतरी वेळा बघितला!!
मी पण बराच वेळ पाहिला (मामीची
मी पण बराच वेळ पाहिला (मामीची पोस्ट वाचल्यावर)
मामी, मी पण मामी पोस्ट
मामी,
मी पण मामी पोस्ट वाचल्यावरच सोफ्याकडे बघितलं.
माबोकर फारच स्पेसफिक होवुन
माबोकर फारच स्पेसफिक होवुन राहिलेत ह!
भाऊबीजेच्या दिवशी हा चित्रपट
भाऊबीजेच्या दिवशी हा चित्रपट पाहिला , आणी घरी आल्यावर 'धरमवीर' पाहुन उतारा पड्ला.
सोफा. मला पहिल्याच दिवशी
सोफा. मला पहिल्याच दिवशी जाणवलेला तो कर्व्ह.
पण आपल्याला प्रेम रतन नको व असली सोफारत्ने पण नकोत.
अमितव विकु
मला पहिल्याच दिवशी जाणवलेला
मला पहिल्याच दिवशी जाणवलेला तो कर्व्ह >>> मलाही. उपडी आणि त्यात पावलाकडून पायावर पाय टाकलाय तिनं. असं कुणीही सहजगत्या झोपूच शकत नाही त्या सोफ्यावर. मुद्दाम कुठल्यातरी आसनात (सोफासन) झोपल्यासारखं आहे ते. उपडं झोपायचा सोफा नाही तो. सोनम त्यावर मासा ठेवल्यासारखी दिसतेय.
सोफा. मला पहिल्याच दिवशी
सोफा. मला पहिल्याच दिवशी जाणवलेला तो कर्व्ह
>>
+१
पण मला समहाऊ आवडला तो सोफा
मासोळी दिसतेय त्यावर ती
तो सोफा च आहे का? मी आजवर
तो सोफा च आहे का?
मी आजवर त्याला सलमानचे व्यायामाचे भांडे समजत होतो
सोफा अवघड असला तरी अवघडलाय तो
सोफा अवघड असला तरी अवघडलाय तो सलमान खानच. मित्राच्या मुलीबरोबर प्रणयदृश्य करणं कठीण असल्याचं त्यानं म्हटलंच होतं एका मुलाखतीत. त्यामुळं कदाचित बरीच काळजी घेतल्याचं जाणवतंय. पाठीवर पिसाने चित्रं काढायच्या प्रसंगात पोट खराब आहे पण रोखून धरल्याचे भाव आहेत चक्क त्याच्या चेह-यावर !
सोनमचं जरा वाईटच वाटलं. त्रिफळा तरी द्यायचा..
Pages