मलई बर्फी

Submitted by सायो on 15 March, 2009 - 13:07
malai burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२,१३ वड्या.
अधिक टिपा: 

इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो का.. मग १४ औंझ कंडेन्स्ड मिल्क आणि नॉन फॅट पावडर असं ट्राय करू का? मग बरोबर जमेल कदाचित..

बायदवे मी पहिल्यांदाच वड्या/बर्फ्या प्रकरण केले. त्यामुळे ते ताटात नक्की पसरायचे कधी व कापायचं कधी यात फार कन्फ्युजन झाले. मायक्रोवेव्ह मधून काढल्यावर थांबायचे का काही वेळ? प्रकाश पाडा प्लीज!

१४ औंझ कंडेन्स्ड मिल्क आणि नॉन फॅट पावडर आणि अर्धी स्टिक बटर.

(डबल चीज बर्गर आणि डाएटकोकसारखं झालं. :P)

प्रकाशः मायक्रोव्हेवमधून काढल्याकाढल्या थापते. गार करून कापते.

(डबल चीज बर्गर आणि डाएटकोकसारखं झालं. फिदीफिदी)>> Biggrin हो ना..अगदीच!

चालेल तू हे वर लिहीलेस तसं करून पाहीन आता या विकेंडला.. Happy

फारच भयंकर झाली आहे Sad मी १०० ml चा अमूल मिठाई मेट घेतला होता. नेसले मिल्क पाऊडर साधारण १ कप. गॅसवर बनवली. वड्या चांगल्या पडल्यात पण अगदी चिवट आहेत आणि गोड मिट्ट झाल्या आहेत. मिल्क पाऊडर ची टेस्ट येते आहे फक्त. दाताला चिकटते देखील आहे. काय करू?? मी डार्क चॉक्लेट मेल्ट करून कोट देण्याच्या विचारात आहे. Sad

(अगदी दु:खी बाहुली)

स्नू, बर्फी चिवट झाली म्हणजे मिल्कमेडचा गोळीबंद पाक झाला. काय काय जिन्नस घेतले होते आणि काय प्रमाणात?

भारतातल्या सामुग्रीसाठी पुढील प्रमाण ट्राईड अँड टेस्टेड आहे -

एक कप मिल्क पावडर
पाव कप कन्डेन्स्ड मिल्क
अर्धा कप दूध
दोन टेबलस्पून पातळ केलेले तूप

माझ्याच रेसिपीवर माझीच शंका Uhoh
मी नेहमी बर्फीच केली आहे ती ही वरच्या रेसिपीप्रमाणेच. आज पेढे ट्राय करावेत म्हणतेय. फक्त फेल जाता कामा नयेत कारण लोकांकडे घेऊन जायचा प्लॅन आहे. तर वरचं प्रमाण सेमच ठेवून करू का? मिल्क पावडर साधीच घेऊ मी दीपची मावा पावडर घेऊ?

मिल्क पावडर साधीच घेऊ मी दीपची मावा पावडर घेऊ?>> घे! मी त्याने २-३ वेळा पेढे, मोदक केलेत, पण मी रिकोटा वापरते ह!

ही कॄती वापरुन मी पण केले काल केशर पेढे आणि मोदक. पण ३-२-१ मधे काही झाले नाहीत. मग घबरुन मधेच सिंडरेलाला हाक मारली. मग ५-३-२ , ५-३-२ असे पाच पंचवीस वेळा केल्यावर गोळा तयार झाला. Happy

बटर थोडे अजुन कमी केले तरी चालेल असे वाटते आहे. कंडेस्डमिल्क मध्येच केशराच्या काड्या टाकल्याने रंग चांगला आला. पण बाकी सगळ्यांसारखे ते मलई बर्फीचे टेक्शर नाही आले माझे Sad
.
pedhe.jpg

सायो, एव्हाना तू पेढ़े केले असतील पण माझे पेढयाचे हिट प्रमाण: कंडेंस्ड मिल्क कैन एक + thickened cream दोनशे पंचांणव ची कैन + एक कप मिल्क पावडर.
माइक्रोवेव करणे दोन दोन मिनिट चार पाँच वेळा मग एक एक मिनिट एक दोन वेळा...

मी पेढे करावेत म्हणून वळायला घेतले पण टेक्स्चर खूप रवाळ वाटलं मग काय बर्फीच परत.
५-३-२ असं पाच पंचवीस वेळा? माझं बरोब्बर ३-२-१ मध्ये तयार होतं.

सायो, मावेची पावर कमी ठेवली असेल तर जास्त वेळ लागतो. मला पण २०-२२ मिन. कमीत कमी आणि आंब्याचा पल्प घातला असेल तर आणखी ५ मिन. लागतातच.

काय? २०,२२ मिनिटं? मला आजवर कधीच एवढा वेळ लागलेला नाही. माझी मावे पावर जास्त असावी कारण ३-२-१ मध्ये खरंच तयार होतं थापायला.

सायो,
मी दरवर्षी गणपतीला लोकांना हातात प्रसाद द्यायच्ला म्हणून मिल्क पावडरचेच मोदक / पेढे करते. २ कप मिल्क पावडर, १ बटर स्टीक, १ टीन कंडेन्स्ड मिल्क. पिठीसाखरेची गरज नाही. साधारण ५-६ मिनीटे मायक्रोवेव करून मोदकाच्या साच्यातून गरम असतानाच मोदक किंवा हाताने वळून पेढे करायचे. कुठलाही आवडीचा फ्लेवर - केशर, वेलची, आंबा घालून मस्त होतात. यावर्षी गुलकंद घालून केले होते. माझं मिश्रण फारसं रवाळ होत नाही. जो काही रवाळपणा राहतो तो छान होतो. पेढांसाठीही किंचीत रवाळ छान वाटले खाताना. मी वॉलमार्टमधे मिळणारी ग्रेट व्हॅल्यूची मिल्क पावडर वापरली. ६ कप मिल्क पावडर, ३ टीन्स कंडेन्स्ड मिल्क मधे २१० मोदक झाले. मोदक अगदी थोडेच उरलेत, फोटो टाकते जरावेळाने.

आंब्यचा पल्प घालते. त्यावेळेस कंडेन्स्ड मिल्क अर्धा टिन आणि उरलेला अर्धा टिन पल्प असं प्रमाण असतं. पण पल्प आधी आटवून घेते. त्यामुळे मोदक करताना वेळ कमी लागतो.
बाकी ते २१० मोदक मी एकटीनं केले नाहीत. दोन मैत्रिणी मदतीला होत्या. त्यामुळे ४५ मिनीटात झाले. पुढची १० मिनीटे साफ सफाई असं १ तासात काम तमाम.

मला वाटतं जर पावडर फुल फॅट मिळाली तर जमतील पेढे. अनफॉर्च्युनेटली यावर्षीचा म ब कोटा गेल्या विकेंडला गाठण्यात आल्याने पुन्हा कधी योग येईल काय माहित. Wink

हा एक मला न जमलेला पदार्थ आहे. Proud
(असं म्हटलं की न जमलेला असा एकच आहे असं उगाचच इम्प्रेशन पडतं. शिवाय ऑनेस्टी वगैरे! :P)

मी फॉर अ चेंज म्हणून लाजोच्या रेसिपीने बर्फी केली, पहिल्यांदाच करूनही चुकली नाही :). स्वाती, ती रेसिपी ट्राय कर.

येस. संपदा इज राइट.

मी लाजोच्याच रेसिपीने दीडशे मोदक केले यावर्षी. लोकांनी खूप आवडीने खाल्ले. मुलांनी तर हातोहात उडवले.

विकेंडला मैत्रीणीकडे न्यायला ही रेसीपी वापरुन मोदक केले होते. पहिल्यांदाच केले तेही आयत्या वेळी म्हणून नवर्‍याला टेंशन! पण झटपट आणि मस्त झाले. मी १ टीन कंडेन्स्ड मिल्क, नीडोची होल मिल्क पावडर पावणे तीन कप आणि अर्धी स्टीक बटर वापरले. स्वादासाठी केशर आणि वेलची २ चमचे गरम दुधात खलून घातली. साखर घातली नाही.

म ब ने आमच्या धाकल्यावर गारूड केलंय अस दिसतंय. काल उ.मो. सोडून त्याने आई ते मागे इनसाईड आउट मोदक केले होते ते मला आवडतात म्हणून शिक्कामोर्तब केलंय. मला इनसाईड आउट मोदक म्हणजे काय हे समजावं म्ह्णून नीट आठवण करून दिली कसे दिसतात वगैरे. आता करावे लागणार एकदा.

Pages