युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साखर घातल्यावर पातळ होतंय याचा अर्थ चक्का नीट होत नाहीये. दह्यातलं पाणी पूर्णपणे निघत नाहीये बहुतेक.
वजन रात्रभर ठेऊन पाहा.
तयार चक्क्याचं टेक्षर बाजारी चक्क्यासारखं होतंय का?

तयार चक्क्याचं टेक्षर बाजारी चक्क्यासारखं होतंय का? >> अगदी.
आता रात्रभर ठेवुन बघते. आंबट नाही ना होणार रात्रभर ठेवल्याने ?

हिरकणी, ती पध्दत फार नाजूक आहे - घरी पनीर केले तर एकदम उपयोगी आहे. 'चक्का' हा तसा दबंग असतो. त्याला सुकेपर्यंत फाशी म्हणून रात्रभर पंचात टांगून ठेवायचे. इतका खुटखुटीत पाहिजे की चक्का पुरणयंत्रातून काढावा लागेल.

http://veggiemania.blogspot.com/2011/04/starting-new-year-on-sweet-note.... इथे बघ कसं बांधलाय Happy

यशस्वी प्रयोगानंतर सांगतोय.
दही लागल्याबरोबर मलमलच्या फडक्यात बांधून ते गाठोडं सूप स्ट्रेनरमध्ये ठेवायचं. सूप स्ट्रेनर गाठोड्यासकट एका पातेल्यात ठेवायचं. गाठोड्यावर वजन ठेवायचं.
तीनेक तासात आंबट न झालेला चक्का तयार.
आता सूपस्ट्रेनरचा उपयोग पुरणयंत्रासारखा करून आधी नुसता चक्का आणि मग साखर +चक्का
सूपस्ट्रेनरमधून गाळून घ्यायचं.
हलकं, गुळगुळीत, चकचकीत श्रीखंड तयार. दही आणखी आंबट न झाल्याने साखरही कमी लागते.

धन्यवाद मयेकर आणी सिमंतीनी. आता पंचात टांगून बघते.
मयेकर मी असेच गाठोडं बांधुन एका चाळणीत ठेवत असे.त्यावर वजन. पण पुढे गाळायची स्टेप नाही केली कधी.
तेही एक्दा करुन बघते. सूपस्ट्रेनर आहे घरात पडुन. Happy

पुरणयंत्रातून फिरवा.

चक्क्याच्या पाउणपट साखरेत काम भागते.

तुम्ही साखर १ : १ घेतली असेल.

साबुदाणावडे टीपः

साबुदाण्याचे तयार मिश्रणामध्ये किंचित्त तेलाचा हात फिरवून ते एक ते दोन मिनिटं मायक्रोवेव्ह करायचं. (जास्त वेळ नका करू, नाहीतर खिचडीच तयार होइल) त्यात गरज असेल तर किंचित्त साबुदाण्याचं पीठ (उपवासाची भानगड नसेल तर तांदूळ पीठ) घालून चांगलं मळायचं आणी मग वडे बनवून तळायचे. मस्त कुरकुरीत वडे रेडी.

मी मोदकाच्या उकडमध्ये चुकून पाणी जास्त झालं, मग ते नीट करायला पीठ मोडलं आता माझे मोदकच मोडतायत. उकड परत वाफवू कां??

नको नको - घट्ट करायला तांदुळाचं पीठ लागेल तितकं घालून उकड नीट मळून घ्या.
हवंतर एकदम सगळ्या उकडीत घालू नका, म्हणजे कमी-जास्त अ‍ॅडजस्ट करणं सोपं जाईल.

मनींचा मधला मेसेज वाचलाच नाही. नंदिनीच्या पोस्टीनंतर डायरेक्ट स्वातीचं पोस्ट वाचून 'आता साबुदाणावड्यांसाठी उकड कशाला' हा प्रश्न पडला. Proud

साबुदाणावडे टीपः आणखी एक टिप.
बटाटे उकडून गार झाले की कमीतकमी तासभर तरी फ्रिजमध्ये ठेवायचे. आलं, मिरची, जिरं वाटून ते उकडलेल्या बटाट्यात घालून, बाकी मीठ तिखटपूड वगैरे घालायचं ते घालून हे मिश्रण भरपूर मळून घ्यायचं. भिजवलेला साबुदाणा घातल्यावरमात्र अजीबात जास्त मळायचं नाही. हलक्या हातांनी साबुदाणा मिसळून, वडे थापून तळायचे. हलके आणि कुरकुरीत होतात.

साबु आप्पेपात्रात कसे कराय्चे? जसं आप्पे करतो तसचं ना? पण नीट शॅलो फ्राय होतात का?

साबुदाणा वडे करताना शिजवलेले वरी तांदूळ उरले असतील तर ते घालायचे. वडे शक्य झालं तर १-२ तास अगोदरच थापून ठेवायचे. वरीतांदळमुळे हलके, आणि अगोदर थापून ठेवल्यामुळे फुलतात छान वडे. व तां असले की बटाटा कमी चालतो. तळताना फरक जाणवतो. तेल बटाटा जास्त घालून केलेल्या वड्यांपेक्षा कमी लागतं. प्लीज नोटः अगदी कमी वगैरे नाही, पण अगदी तेलकट-तळकट लागत नाहीत वडे.

साबु आप्पेपात्रात कसे कराय्चे? जसं आप्पे करतो तसचं ना? पण नीट शॅलो फ्राय होतात का? >>>

अगदी मस्त होतात . कमी तेलात .
आप्पेपात्रात केल्याने त्यांचा आकार कमी असतो , म्हणून पोटात कच्चे रहात नाहीत .

रच्याकने , मध्यंतरी खाना खजाना चॅनेलवर एका प्रेक्शकाने खीर दाखविली होती.
खायचे पान आणि गुलकंद थोडेसे दूध घालून वाटून घेतले .
तांदाळाच्या खीरीत थंड झाल्यावर मिक्स केले .
असे करायचे कारण ?
- एकदा खीर करताना ती लागली .
त्याचा जळका वास जाईना आणि टाकूनही देववेना .
म्हणून फ्रीजमध्ये पान आणि गुलकंद सापडला तो मिक्स केला .
कोणाला कळलं ही नाही की खीर लागली होती आणि नविन चव ही आवडली .

सांगायचे कारण , ईछुकानी युक्तीचा लाभ घ्यावा Wink

स्वस्ति, मी हे करुन पाहिले नाही. पण जळक्या दुधाचा वास या जग्गात कशानेही जात नाही असा माझा अनुभव. गुलकंदा मुळ सुरुवातीला चांगली लागेल खीर पण शेवटी तो जळका वास येणारच.

सीमाताई , मी मुळातच खीर खात नाही .
पण हा सगळा प्रकार एकंदरित मजेशीर वाटला .
खीर , खीरीसारखी बनवावी , द्राविडी प्राणायाम कशाला
म्हणून कानावर घातला .

गिटस चे गुलाब जाम करताना आतमधे पाक मुरत नाही. रसरशीत गुलाबजाम होण्यासाठि काय करावे? आतमधे एक गुठळि सारखे राहते. प्लीज उपाय सुचवा.

तेजु... गिट्स चा ऐवजी चितळ्यांचे गुलाब जामून मिक्स घ्या. एकदम मस्त गुलाबजाम होतात.

Pages