Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>फिरणी खाताना लेकीनं बाबाला
>>फिरणी खाताना लेकीनं बाबाला "मी आईला हेल्प केली" असं सांगितलं!! >> भारी आहे हेल्पर!
सही.
सही.
मावे मधे रवा किती वेळ आणि कसा
मावे मधे रवा किती वेळ आणि कसा भाजायचा?
म्हणजे समजा २ मिनिटे भाजायचा असेल तर सलग २ मिनिटे का एक मिनिट भाजून एकदा हलवून मग परत भाजायचा असे?
एकेक मि. नी हलवत भाजायचा
एकेक मि. नी हलवत भाजायचा
ओके मंजूताई
ओके मंजूताई
ज्वारीच्या पिठात नाचणीचं पिठ
ज्वारीच्या पिठात नाचणीचं पिठ घालून त्यात बारिक चिरलेली लसूण, कांदा पात, कोथिंबिर, गाजराचा किस, मेथीची पाने घालून भिजवायचं, भिजवताना थोडं दही घालायचं. भिजवायच्या सैल, घट्ट, पातळ कन्सिस्टन्सी नुसार वेगवेगळे पदार्थ करायचे. उदा. थालिपिठ, धिरडी, आप्पे इत्यादी.
ज्वारीचे पीठ पालेभाजी परतून
ज्वारीचे पीठ पालेभाजी परतून करताना त्यात भाजी मिळून येण्यासाठी व भाजीचा व्हॉल्यूम वाढण्यासाठी भाजीला लावायचे. बेसनाची खमंग चव नाही येत. पण चांगली मिळून येते भाजी. इतर पीठ पेरून करायच्या भाज्यांमध्येही बेसनाच्या जोडीला ज्वा पी वापरू शकता.
माझ्या फ्रीजमध्ये २५
माझ्या फ्रीजमध्ये २५ सप्टेंबरला केलेलं श्रीखंड आहे. मस्त बदामाचे काप, जाफळ, वेलदोडे आणी केशराच झकाअस रंग आलेलं. शेजारणीला त्याच दिवशी दिलं. मी नंतर २-३ दा खाल्लं तरी वाटी-दीड वाटी असेल अजून.
उद्या खाउन बघणार आहे , चव खराअब असेल तर प्रश्नच नाही सरळ कचर्यात जाइल ते पण चांगलं राहिलं असेल त्याचं काय करता येइल?
वडी करतात. मला आवडत नाही.
वडी करतात. मला आवडत नाही. श्रीखंड चांगले असेल तर तसंच खायचं (फार फार तर स्ट्रॉबेरी फ्लेवर किंवा आमरस घालायचा.)
श्रीखंड जनरली भरपूर टिकतं
श्रीखंड जनरली भरपूर टिकतं कारण चक्का करताना पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं असतं आणि चक्क्याच्या बरोबरीने साखर असते. वाटी-दीड वाटीच श्रीखंड राहिले असेल तर रोज चमचा चमचा खाल्लं तरी आठ-दहा दिवसात संपेल.
तसं संपवायचं नसेल तर पियुष करता येईल. श्रीखंडात पातळ ताक घालून चांगलं एकजीव होईपर्यंत ब्लेंड करायचं. चवीला आवश्यक असेल तरच किंचीत मीठ घालायचं, अगदी थोऽडंसं जायफळ लावायचं, थंडगार पिऊन टाकायचं.
पियूष करायची आयडिया भारी!! मी
पियूष करायची आयडिया भारी!! मी नक्की करून बघणार
शर्मिला, ज्वारीच्या पीठाच्या
शर्मिला, ज्वारीच्या पीठाच्या आप्प्यांच्या कल्पनेसाठी धन्यवाद. लेकाला आप्पे हल्ली खूप आवडायला लागलेत. आज सकाळी डब्ब्याला ज्वारीचं पीठ+ थोडं तांदळाचं पीठ्+ थोडं बेसन + थोडा रवा घेवून ताकात भिजवला. त्यात किसलेलं गाजर आणि ठेचलाला लसूण + मीठ घालून आप्पे केले. खूप आवडले त्याला. (मला जरा धाकधुक वाटत होती डबा तसाच येतो की काय)
डब्ब्याला ज्वारीचं पीठ+ थोडं
डब्ब्याला ज्वारीचं पीठ+ थोडं तांदळाचं पीठ्+ थोडं बेसन + थोडा रवा घेवून ताकात भिजवला.>>>>>>>कितीवेळ भिजवलं?
पियुष ची आय्ड्या भारी आहे.
पियुष ची आय्ड्या भारी आहे. कधीच घरी केलं नाही तेव्हा करून बघायचा उत्साह आहे
अल्पना मला ही आप्पे आयड्या पण आवडली. किती वेल भिजवायचं सगळं आणी सर्व जिन्नस समप्रमाणात का?
मी ५-७ मिनीटच भिजवलं होतं.
मी ५-७ मिनीटच भिजवलं होतं. भिजवताना भरपूर फेटून घेतलं. ज्वारीचं पीठ दोन-अडीच चमचे घेतलं आणि बाकी पीठं एक-दीड चमचा, रवा टेक्शरसाठी अर्धा-पाऊण चमचा. त्यात अर्धं गाजर आणि एक लसणीची पाकळी घातली.
या प्रमाणात आठ आप्पे झाले होते.
उद्या मुलीची फिल्ड ट्रीप आहे.
उद्या मुलीची फिल्ड ट्रीप आहे. bag lunch आणायला सांगितला आहे. sandwich वगैरे.
मुलीला कोरडे खायला अजिबात आवडत नाही . गिळताना त्रास होतो म्हणते . दिवसभर पुरेल असे काय देता येईल? व्हेजी पहिजे.
व्हेजी रॅप (पनीर घातलत तर मऊ
व्हेजी रॅप (पनीर घातलत तर मऊ होईल तिला हव तस). सोबत सावर क्रीम छोट्या डब्यात दिलत तर त्यात डिप करून खाईल. म्हणजे गिळताना त्रास नाही होणार.
किंवा मफिन पॅन मध्ये मॅकरोनी चीज घालून त्याचे बाईट्स. फोर्क आणि स्पुन न वापरता मफिन सारखे खाता येतात. (रेसीपी : ब्रेड क्रम्स तळाशी घालून त्यावर मॅक्रोनी चीज ,त्यावर परत ब्रेड क्रम्स आणि चीज. बेक ३५० ला १० मिन)
आर्चना, मुलीला केसडिया आवडतात
आर्चना, मुलीला केसडिया आवडतात का? सालसा, बीन्स / मीट/ ग्रिल्ड भाज्या आणि चेडर किंवा पेपरजॅक घालून, पालक-टॉर्टियात घालून केलेले केसडिया अजीबात कोरडे लागत नाहीत. हवंतर छोट्या स्नॅपलॉकडब्यात डिपिंग सॉस देता येईल.
मफीन व कसेडिया दोन्ही पर्याय
मफीन व कसेडिया दोन्ही पर्याय आवडीने खाईल . धन्यवाद .
माझ्याकडे ऑलमोस्ट अर्धा किलो
माझ्याकडे ऑलमोस्ट अर्धा किलो सो कॉल्ड चॉकोलेट फ्लेवरचं कॉम्प्लॅन आहे. मला अन योकिणीस दोघांनाही त्याची चव अजिबातच आवडलेली नाही. दुधात घालून एक वेगळीच चव + अरोमा आहे. सॉर्ट ऑफ लापशी, पातळ खीर प्यायल्यासारखं वाटतं. अगदीच कैच्याकै. सील्ड पॅकच होता रिसेंट डेट मॅनिफॅक्चरचा सो, ते खराब आहे असंही नाही. तर आता त्या पावडरीचं काय करता येईल?
फेकणं अगदीच उदार होऊन करावं लागेल. कामवालीला विचारलं तर ती म्हणे आमचे पोट्टे चहाच पितात
रच्याकने सगळ्यात चांगलं शेवटी बोर्न्व्हिटाच आहे हे पटलं. हॉर्लिक्सही नाही तेव्हढं चांगलं.
अल्पना फ्रुट सॉल्ट किन्वा
अल्पना फ्रुट सॉल्ट किन्वा सोडा घातला होतास का ?
योकिणी , योकु, बिस्किट /
योकिणी :फिदी:, योकु, बिस्किट / कुकीज, केक किंवा आईस्क्रिम बनव.
योक्या, गूगल (ways to use
योक्या, गूगल (ways to use complan) केलंस तर कॉम्प्लानचे गुलाबजाम पण मिळतील. पण मूळात कॉम्प्लानचीच चव आवडले नाहीये तर त्यापासून बनवलेले पदार्थ आवडणंही कठीण आहे.
इथे बघ - http://www.complan.com/top-tips/
नाही अमीदीप. फ्रुट सॉल्ट
नाही अमीदीप. फ्रुट सॉल्ट /सोडा/बेकींग पावडर यातलं काहीच घातलं नव्हतं. फक्त ताकात भिजवलं आणि भिजवताना भरपूर फेटलं. जाळी नव्हती पडली अर्थात, पण बर्यापैकी हलके होते आप्पे. धिरड्याच्या जवळ जाणारी चव होती.
मुलाच्या बर्थडे पार्टी साठी
मुलाच्या बर्थडे पार्टी साठी वेजी बर्गर करायचे आहेत. बर्गर पॅटीज आदल्या दिवशी करून चालतील का? ऐनवेळी कसे गरम करता येतील? काही युक्ती आहे का?
तसच पोटॅटो चीज बॉल्स आधी करून ठेवले आणि नंतर ओवन मध्ये गरम करून चालेल का?
बर्गर पॅटीज आधी करून
बर्गर पॅटीज आधी करून फ्रीजमध्ये टाकता येतील. ऐनवेळेला, तव्यावर शॅलोफ्राय करता येतील. डीप फ्राय करायच्या असतील तरी होतील.
पण बर्यापैकी हलके होते
पण बर्यापैकी हलके होते आप्पे.>>>>>> मी रात्रभर थोडे दही+पाणी यामधे भिजवले. जरा आंबट झाले आणि आप्पे उलटवायला त्रास झाला.
मला पडवळाची कोशिंबीर कशी
मला पडवळाची कोशिंबीर कशी करतात हे कुणी सांगू शकेल का? धन्यवाद.
पडवळाचं रायतं :- पडवळाचा
पडवळाचं रायतं :- पडवळाचा तुकडा बिया काढून कूकरमध्ये शिजवायचा. थोडा चुरुन त्यात दही, मीठ, किंचित साखर घालून तेल, मोहरी, हिंग, मिरचीची फोडणी ओतायची. कालवून त्यावर कोथिंबीर घालायची.
गरगट्ट नका हो शिजवू
गरगट्ट नका हो शिजवू केश्विताई... गरगट्ट शिजवल्यावर चुरायला काय शिल्लक राहणार मग?
Pages