युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दही नीट फेटायला पाहिजे, तसेच त्याला थोडे बेसन लावायला पाहिजे ( दह्याला बेसन लावायचे म्हणजे त्यात बेसन घालून, चमच्याने ते नीट घोटून घ्यायला पाहिजे. ) ते आंबट असेल तर थोडी साखरही घालावी लागते.

घरचे ताजे दही असेल तर सहसा असे होत नाही पण विकतच्या दह्यात कधी कधी काही रसायने मिसळलेली असतात, त्याने असे होऊ शकते.

मुंबई / ठाण्यात कुठल्या कंपनीचे तोफु आणता?
मला आणि घरात सगळ्यांनाच तोफु अतिशय आवडते पण इथले अजिबात खाववत नाही.
इथे मी दोन तीन प्रकारचे आणुन बघितले पण खरोखरच भिजवलेला कार्डबोर्ड खाल्ल्यासारखे लागते Wink

चांगले स्मुथ सिल्कन तोफु असेल तर नुसते किक्कोमान सोया सॉस आणि अगदी किंचीतशी आल्याची पेस्ट / बारिक चिरलेली पात इत्यादी टॉपिंग म्हणुन घालुनही मस्त लागते. हा असा किंवा असा
अधिक रेसिपी इथे

टोफुचे चौकोनी तुकडे करुन ईटालियन ड्रेसिन्ग मधे मॅरिनेट करायचे त्यात मिठ आणि थोडि लसुण बारिक चिरुन टाकायच मग ब्रॉइल कराय्च... तुलामला होईल.

मला रंगीबेरंगी करंज्या करायच्या आहेत. मी आवरणाचे ३-४ भाग करुन मग चिरोट्यांप्रमाणे पारी लाटुन आत सारण भरून तळते. परंतु त्यांचा रंग आधिसारखा ताजा न दिसत काळपट तपकिरी दिसतो. रंग आधिसारखाच ताजा दिसण्यासाठी काय करावे?

माझ्याकडे सिल्कन टोफू आहे. अगदीच मऊ आहे. त्याचे काय करून संपवता येईल?
स्टिर फ्राय करून पहिला पण अगदीच पानचट लग्ले. वर टोफू तुकडे राहिलेच नहित.

पावसाळ्याच्या दिवसांत गायीच्या दुधाचे विरजून लावलेले दही अनेकदा कवकवीत होते. अगदीच बेचव. अशाच एका दह्याचा नि:पात कसा करावा (म्हणजे त्याला कुठे व कसे खपवावे) या विचारांत असताना एका बहिणीने सांगितलेली युक्ती : असे दही पंच्यात किंवा सुती हातरूमालात घट्ट बांधून रात्रभर टांगून ठेवावे. त्याचा घट्ट चक्का झाल्यावर त्याची चव, वास घेऊन पाहावे. ठीक वाटला तरच पुढची प्रक्रिया करावी. मी तयार केलेल्या चक्क्याचा एक टिपिकल कवकवीत वास काही जात नव्हता. चक्का अगोदर मोकळा करून घेतला. त्यात साखर मिसळली. व्यवस्थित कालवून घेतला. मग त्यात वेलदोडे व वेलदोड्याची साल घालून ठेवली. झाकून फ्रीजात ठेवून दिले. दहा-बारा तासांनी बाहेर काढून रूम टेंपरेचरला आणले. बर्‍यापैकी डिसेंट श्रीखंड तयार होते! Proud

इथे मी दोन तीन प्रकारचे आणुन बघितले पण खरोखरच भिजवलेला कार्डबोर्ड खाल्ल्यासारखे लागते
>>
पण तू भिजवलेले कार्डबोर्ड का खाऊन पाहिलेत ते कळालं नाही मला Proud Light 1
अवांतराबद्दल सॉरी ! अगदीच रहाववलं नाही

आर्चना भुर्जी करा, नाहीतर ते टोफु बारिक किसुन्/स्मॅश करून त्यात तिखट मिठ मसाला घालून त्याचे पराठे होऊ शकतील.

सिल्कन टोफु भुर्जी करते मी. गाजर, सिमला मिरची बारिक चिरुन तेलावर परतवुन घ्यायचे त्यात तिखट मीठ आणि टोफु घालायचे. कोथिंबीर घालायची. छान लागते.

सहसा कुठलेही ब्रँडेड प्रॉडक्ट वापरण्याची रेसिपी हवी असेल तर त्याची वेबसाईट उत्तम रिसोर्स असतो. तुमच्याकडे असलेल्या टोफूच्या फर्मनेस नुसार रेसिपी निवडता येईल ह्या लिंकवरः

http://www.morinu.com/en/recipes/

माझ्याकडे उकडलेली तीन-चार रताळी आहेत. खिरीकरता खूपच होतील आणि फारशी आवडतही नाही खिर कुणाला. काय करता येईल त्याचं? गोड असल्याने थालिपिठातही बरी लागणार नाहीत असं वाटतं.

ओके. हे चालेल. आजच करते. माझ्याकडे थोडं पनीरही आहे घरगुती,, तेही ढकलता येईल त्यात.

उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसारखी उकडलेल्या रताळ्याची भाजी होते. पिवळी किंवा दाण्याचं कूट घालून उपासाची भाजी, आपल्या आवडीप्रमाणे. मायबोलीवर शक्करकंद की चाट पण आहे. किंवा रताळी साल काढून मॅश करून पिठीसाखर+वेलची किंवा आलं लसूण मिरचीचं वाटण घालून मावेल तितकी कणीक घालून आवडीप्रमाणे गोड किंवा तिखट पराठे.

माणिकमोती, करंज्या बेरंगी तर होतच आहेत की! Proud Light 1 हलके घ्या. मला वाटतं तुम्हाला उत्तर रूचिरा किंवा स्वयंपाक या आद्य पाकग्रंथात सापडेल. किंवा कुणाकडे असेल तर पटकन वाचून सांगा बरं इथे.

मामो-
रंग काळपट तपकिरी होतोय ते तळल्या नंतर असेल..तर याचा अर्थ रंग जळतोय. रंग पाण्यात नीट विरघळला जातोय याची खात्री करुन ते पाणी आवरणाच्या पिठात घालावे व नीट मिक्स करुन घ्यावे. रंगाचे न विरघळलेले कण रॅन्डमली पसरत असतील व ते जळुन तपकिरी रंग येत असावा.
अंदाज आहे हा.. चुभुदेघे.

मंजुडी, रताळी जरा जास्तच उकडली गेलीत म्हणून भाजीचा बेत कॅन्सल केला, आईनेही तेच सुचवलेलं. पराठ्यांची आयडिया आवडली. आता नेक्स्ट टाइम याकरता मुद्दाम रताळी उकडते. मऊ रहातात का पराठे? डब्यात द्यायला?

पराठे मस्तच होतात. आलूपराठ्यासारखे मऊ होतात छान.
पण आलूपराठ्यासारखं स्टफ नाही करायचं, लाटायला येत नाही.कुस्करलेल्या रताळ्यांत मावेल तितकी कणिक मिसळून लाटायचे.

रताळं गोडूस असल्याने टिक्क्या कशा लागतील अंदाज येत नाहीये. मंजूडीचे गोड पराठे मस्त.
मला एकदम हीच रेसिपी आठवली. रताळ्याचे शाही गुलाबजाम. भरपूर उकडलेले रताळे खपवायला वाव आहे. त्याच्यात जे ड्राय व्हर्जन दिले आहे तसे केल्यास आप्पेपात्रात तळूनही स्वीट बॉल्स म्हणून ठेवता येईल असे वाटतेय. तळणाचा खटाटोप नको असेल तर.

मदतनीस कृपा- म्हणुन जवळ जवळ पाव किलोच्या वर भिजवलेली हरभरा डाळ, आणि मुग डाळ उरली आहे. (वेगवेगळी)
मुग डाळीचे वरण करेन. पण चणा डाळीचे काय करु? आम्ही जास्त खात नाही.

Pages