Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बकवास बेगल्सशी बदला << भारिये
बकवास बेगल्सशी बदला
<<
भारिये हे
कांदा भजी कुर्कुरीत,आत पर्यंत
कांदा भजी कुर्कुरीत,आत पर्यंत तळलेली, खमंग, चविष्ट, सोनेरी होण्यासाठी टिप्स हव्या आहेत.
डाळीचं पीठ कुठलं वापरायचं ?
१. भज्यांचं पीठ भिजवताना पाणी
१. भज्यांचं पीठ भिजवताना पाणी कमीत कमी वापरणे
२. गर्रम (प्लिज नोट रफार ) तेलाचं मोहन पीठात आवश्यक
३. नाजूक भजी तळणीत सोडणे, ढबुरडी भजी नकोत.
४. तेलाचं योग्य तापमान आवश्यक.. मोठ्ठा गॅस नको, अतिमंद आचही नको.
सचित्र माहिती, टीपा इथे मिळतील - http://www.maayboli.com/node/32547
मंजुडी+१ (रफारासहीत) जागुच्या
मंजुडी+१ (रफारासहीत)
जागुच्या रेस्पीत तेलाचं गर्रम मोहन नाहीये.
इतके करण्यापेक्षा भजी
इतके करण्यापेक्षा भजी एखाद्या कळकट हाटिलातून विकत आणण्ने.
उभा कांदा टोकेरी व सळईसारखा व
उभा कांदा टोकेरी व सळईसारखा व एकसारखा चिरल्यास नाजूक भजी तेलात सोडता येतात.
पाणी घालतच नाही मी. कांदे उभे
पाणी घालतच नाही मी. कांदे उभे चिरून घ्यायचे आणि मीठ चोळून थोडा वेळ ठेवायचे. त्याला व्यवस्थित पाणी सुटलं की त्यात बसेल तेवढं डाळीचं पीठ आणि इतर जिन्नस घालायचे आणि वरती लिहिल्याप्रमाणे नाजूक भजी घालायची
जागू ची रेसिपी बघितलीच नव्हती
जागू ची रेसिपी बघितलीच नव्हती मी तिने तेच लिहिलंय
पाणी घालतच नाही मी. कांदे उभे
पाणी घालतच नाही मी. कांदे उभे चिरून घ्यायचे आणि मीठ चोळून थोडा वेळ ठेवायचे. त्याला व्यवस्थित पाणी सुटलं की त्यात बसेल तेवढं डाळीचं पीठ आणि इतर जिन्नस घालायचे आणि वरती लिहिल्याप्रमाणे नाजूक भजी घालायची >>>> अगदी अगदी अगदी ! हेच सान्गायला आलेले. माझ्या बाबांची एक्दम हीट रेसिपी आहे .आईच्या हातची कांदाभजी आवडतच नाहीत .
हरभरा डाळ बाजरातून विकत आणून,
हरभरा डाळ बाजरातून विकत आणून, निवडून, ड्ब्यात घालून, डबा कडेवर घेऊन, गिरणीत जाऊन पीठ आणायचं की
मॉल मधे जाऊन ब्रँड न बघता, ढकल गाडीत टाकून आणायचं ?
(र्र्फार नोटेड)
ह. डाळीचे अजून जास्त लाड (
ह. डाळीचे अजून जास्त लाड ( प्लीज नोट - लाडू नव्हे, लाड) करावेसे वाटत अस्तील तर, निवडून टिपून झाल्या नंतर जरा भाजून मग दळून आणावी. पिठ चांगले टिकते व खमंग लागते
काल रात्री अर्धवट झोपेत
काल रात्री अर्धवट झोपेत इडलीचं पीठ वाटताना तांदुळ खुप रवाळ वाटले गेलेत. रात्रभर पीठ व्यवस्थित आंबलंय. इडली मध्ये मध्येच कणी जाणवत होती. दोसा तर अजिब्बात घालता आला नाही.
तर आता काय करावं?
अवनी, डबा कडेवर नेण्याला +१
अवनी, डबा कडेवर नेण्याला +१
डाळीचे पीठ काही ब्रँडचे रवाळ येते. ट्रान्स्परंट पिशवी असेल त्यातून बघून घेणे.
अल्पना, त्या पिठात भाज्या
अल्पना, त्या पिठात भाज्या (गाजर, मटार इत्यादी) मिक्स करुन किंवा नुसतेच (आलं, मिरची घालून) आप्पे कर.
ओके. हेच सजेशन आयामनी पण दिलं
ओके. हेच सजेशन आयामनी पण दिलं होतं मला आज संध्याकाळी.
पण इडली आणि आप्प्यांत असा काय
पण इडली आणि आप्प्यांत असा काय फरक? की सढळ तेलाचा वापर केल्याने पीठाच्या रवाळ टेक्स्चर ची एज् कमी होईल?
आप्पे शॅलो फ्राय कॅटेगरी आणि
आप्पे शॅलो फ्राय कॅटेगरी आणि इडली वाफवणं हा फरक. त्यामूळे कदाचीत रवाळ पीठ चालू शकेल. करून बघितल्यावरच कळेल. उद्या वेगवेगऴ्ए प्रयोग करुन बघेन थोड्या प्रमाणात. जमलं तर ठीक नाहीतर सोडून देणार.
अल्पना, ते आंबलेलं पीठ (
अल्पना, ते आंबलेलं पीठ ( थोडंसं) ब्लेंडरमधून फिरवून काढ. मग त्याचे अप्पे वा इडली करुन बघ हलके होतात का.
ओके. हे पण करुन बघते.
ओके. हे पण करुन बघते. अॅक्चुअली इडली हलकी झाली होती, पण कण कण लागत असल्याने खाताना तितकीशी चांगली लागली नाही.
अवनी, ह.डाळीचा डबा कडेवर नाही
अवनी, ह.डाळीचा डबा कडेवर नाही घ्यावा लागणार, हातातून/ पिशवीतून आणता येईल कणकेएवढी बेसनाची क्वांटीटी नक्कीच नसते आपली.
अल्पना, ते कण कण कच्चट लागत होते का? रवाळ इडली का नाही आवडली?
आमच्याकडे खरंतर रवाळ इडलीच आवडते. त्यामुळे इडल्या करायच्या तर इडली रव्याच्याच अशी आता स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे. कधी शॉर्टकट म्हणून इडलीचं पीठ बाहेरून आणलं तरी त्याचे डोसे/ उत्तप्पे/ आप्पेच होतात.
इडलीसाठी मंजूला मोदक
इडलीसाठी मंजूला मोदक आमच्याकडेपण रवाळच आवडते इडली
अल्पना, आहे त्या पिठात किती
अल्पना, आहे त्या पिठात किती इडल्या होतील साधारण ? जर बेताच्या इडल्या होणार असतील तर इडल्या करुन ठेव आणि फ्रीजमध्ये ढकल. दुसर्या दिवशी नाश्त्याला त्या कुस्करुन फोडणीच्या इडल्या कर. उपमा करतो तशीच कृती - कांदा, आलं, मटार, कढीपत्ता, मिरची फोडणीवर परतून इडल्यांचा कुस्करा घालून पाण्याचा हबका मारुन वाफ आण. वरुन कोथिंबीर-लिंबू किंवा चटणी पोडी-तूप
आमच्या एक वहिनी कानडी आहेत. त्यांच्याकडे हा कुस्करा इतका आवडतो की मुद्दाम त्यासाठी इडल्या करतात
ते सर्व पीठ परत एकदा मिक्सर
ते सर्व पीठ परत एकदा मिक्सर मधून काढून घेता येइल. बाकी रवाळ इडली बद्दल अनुमोदन.
टोफु चे काय कसे खाता
टोफु चे काय कसे खाता येइल?
अज्ञानी जीवांना मदत करावी.
ते सर्व पीठ परत एकदा मिक्सर
ते सर्व पीठ परत एकदा मिक्सर मधून काढून घेता येइल.<< मग परत फर्मेंट करावेलागेल. अन्यथा इडल्या दडतील.
सध्या ढोकळ्यासरखे एका प्लेटमध्ये वाफवून मग त्याचा चुरा करणे आणि फोडणीत घालून इडली उपमा करता येईल.
दुसरा अजून एक उपाय: इडल्या खाताना रस्सम किंवा सांबारात चांगल्याच बुचकळा. न रहेगा कोरडा इडली, न लगेगा रवाळ रवाळ.
मुग्धा, ज्यात त्यात पनीरऐवजी
मुग्धा, ज्यात त्यात पनीरऐवजी टोफू वापरता येईल.
टोफू पालक
टोफू घालून फ्लॉबचा रस्सा
टोफू खीमा
टोफू पराठा - टोफू किसून थेट कणकेत मिसळायचं - चवीला मीठ, कलौंजी, जिरं पावडर. बाकी हेल्दी पौष्टिकपणा वाढवायचा असेल तर कोथिंबीर पालक, मेथी, गाजर, कोबी, दुधी, बीट इत्यादी लाड. टोफू असल्याने कणकेत मोहन/ पाणी कमी घालावं लागेल. पराठा लाटून भाजून खायचा. टोफू शरीरात व्यवस्थित अॅब्झॉर्ब होण्यासाठी पराठ्यासोबत सोबत टोमॅटोची चटणी खाण्याचा सल्ला माझ्या डाएटीशियननी दिला होता.
विविध प्रकार करायचा कंटाळा येऊ लागला तर टोफूचा स्लाईस नुसताच खायचा.
धन्स मंजुडे..
धन्स मंजुडे..
टोफू स्टरफ्राय. विविध भाज्या
टोफू स्टरफ्राय. विविध भाज्या (गाजर, कांदा, श्रावणघेवडा, कोबी, कॉलीफ्लॉवर, कांदापात वगैरे) आकर्षक आकारांत चिरून (उभ्या, आडव्या, सळीसारख्या, नाजूक इ.) त्यांना नॉन-स्टिक पॅनमध्ये थोड्याशा तेलात जिर्याची फोडणी करून पटापट परतायचे. भाज्या जरा परतल्या गेल्या की त्यात टोफूचे तुकडे घालायचे. स्वादासाठी चिलीफ्लेक्सपासून ते गरम मसाला, आमचूर पावडर, मिक्स हर्ब्ज, मिरपूड जे काही आवडते ते त्यात घालू शकतो. लसणाची एखादी पाकळी ठेचून घालू शकतो. आवडीनुसार टोमॅटो सॉस / चिली सॉस वगैरेही घालू शकतो. चवीनुसार मीठ. शक्यतो गरमच खायचे. गार झालेले टोफू थोडे चिवट लागू शकतात.
टोफूचे जालफ्रेजी चांगले होते.
टोफूचे जालफ्रेजी चांगले होते.
टोफु मीठ, तिखट लावुन तेलावर
टोफु मीठ, तिखट लावुन तेलावर परतून घ्यायचा. मग फ्राईड राईस मध्ये घालायचा किंवा तसाच चटणीबरोबर खायचा.
Pages