अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाहीतर तो कोणाचेही ऐकत नसावा>>>>>>> +१. केली बद्दल पण +१. मुद्दाम तसा अर्थ काढण्यात आला असं मलाही वाटतं.

<<<<एक भारतीय म्हणून अमेरिकेत वास्तव्य ..........घुसखोर नाकावर टिच्चून नागरिकत्व मिळवतात हे योग्य नाही. >>>>
बर्‍याच भारतीयांना असे वाटणे साहाजिकच आहे.
विशेषतः नुसते व्हिजिटला सुद्धा उगाचच व्हिसा नाकारणे हे फारच.
मी ऐकले की नुसता अर्ज करायला ५ हजार रु. घेतात नि तेहि नॉन-रिफंडेबल! आजकाल व्हिसाचा इंटरव्ह्यू म्हणे दोन दिवस असतो. नुसता नालायकपणा. भारत सरकार काही करू शकत नाही, नि अमेरिकन लक्ष देत नाहीत!

खरोखरच भारतीय नागरिकांना अमेरिका अगदी वाईट रीत्या, पुरेसा मान न देता वागवतात!
माझ्या मते सगळ्यात सज्जन भारतीय. बाकीच्या देशातले लोक इथे येऊन काय वाट्टेल ते बेकायदेशीर धंदे करतात!

मला तर वाटते भारतीयांनी म्हणावे खड्ड्यात गेली अमेरिका, भारतच लवकरच अमेरिकेहून चांगला होईल, विशेषतः सर्व प्रकारची कामे करायला स्वस्त लेबर! अमेरिकेत फुकटच महागाई! त्या मानाने भारतीयच जास्त मजेत रहातात.
आमच्यासारखे जे अडकले ते रहातील इथे.

Trump चे रोखठोक बोलणे ज्यांना आवडते त्यांनाही तो पूर्णपणे झेपणार आहे का ? बिझनेस वगळता governess चा त्याला कितपत अनुभव आहे ? ह्या गोष्टी शेवटी मह्त्वाच्या ठरणार आहेत.

governess >>> लोल असाम्या, तुला गव्हर्नन्स म्हणायचे आहे का? नाहीतर तुझी ही पोस्ट पिक करून त्याच्या विरोधातील लोक मीडिया मधे काही तरी उठवून देतील Happy

भारतियाना विमानानेच अमेरिकेत येता येते, मेक्सिकन पब्लिकला तेवढ करायची गरज नाही,...भारत-अमेरिकेच्या बॉर्डर वर असता तर? निम्मा पन्जाब आणी गुजराथ अमेरिकेत असता... टाको बेल्च्या जागी ढाबे दिसले अस्ते सगळिकडे.

भारतियाना विमानानेच अमेरिकेत येता येते, >> साफ चूक. अती अवांतर, पण भारतीय पब्लिक मेक्सिकोहून ट्रक, फुलांची गाडी आणि अशा सर्व अगम्य प्रकारे अमेरिकेत बेकायदा ही शिरते. एकदा शिरलं की बाहेर जात नाही. अशा सुरस आणि चमत्कारिक वाटतील अशा अनेक कथा प्रत्यक्ष असं केलेल्या व्यक्तीकडून ऐकल्या आहेत. मोठ्या शहरात कॅश जॉब करणारे कित्येक सापडतील.

उमेदवाराला राज्यकारभार हाकण्याचा अनुभव असावा ही अपेक्षा कालबाह्य होते आहे. ओबामा राष्ट्रपती झाला तेव्हा त्यालाही काही अनुभव नाही वगैरे म्हटले जात होतेच. अशा अननुभवी माणसाची कारकीर्द अगदी दैदीप्यमान नसली तरी अमेरिकेचे वाटोळे करणारी तरी नक्कीच नव्हती.
उलट टेक्ससचा राज्यकारभार हाकण्याचा गव्हर्नर म्हणून भक्कम अनुभव असणारा जॉर्ज डब्या बुश! हा माणूस मी पाहिलेल्या अमेरिकन अध्यक्षांपैकी (माझ्या मते) सगळ्यात नालायक म्हणता येईल. मॅकेन, हिलरी ह्या मुरब्बी, अनुभवी लोकांनी इराक युद्धासारख्या अव्यापारेषू व्यापाराला मान्यता दिली होती हे विसरता कामा नये.

अनेक नेते ज्यांची हयात निव्वळ राजकारण करण्यात गेली ते लोकांना फारसे आवडत नसावेत. त्याऐवजी एक बाहेरचा, असल्या अस्सल गोतावळ्यात न गुंतलेला माणूस बरा वाटत असावा.

मॅकेनसारख्या युद्धबंदी असणार्‍या आणि ज्याचे महानायकत्व हे वादातीत आहे असा सार्वत्रिक समज धुडकावून, मला (मॅकेनसारखे) शत्रूच्या तावडीत सापडणारे सैनिक फारसे आवडत नाहीत असे बिनधास्त म्हणणारा ट्रंप आणि तसे म्हणूनही लोकप्रियतेत फार घट नाही उलट वाढच. एकंदरीत ट्रंप इतक्या सहजासहजी दुर्लक्षिण्याजोगा प्रकार वाटत नाही.

ट्रम्प ची केली बद्दलच्या वक्तव्याबद्दलची 'अपॉलॉजी'. पुढे जरा ताणलाय, पण पहिली एक दोन वाक्ये - विशेषतः ते म्हंटलोच नव्हतो म्हणताना जे काही सांगतो ते ऐकून मेलो हसून.
https://www.youtube.com/watch?v=ks_240VM1WI

ट्रम्प मस्त उभा केला आहे.

ट्रम्प साहेबांनी बिल ओ'रायली ला दिलेली मुलाखत.

चीनचे अध्यक्ष अमेरिकेत येणार आहेत. तेव्हा 'स्टेट डिनर' आहे. तू अध्यक्ष झालास तर त्याला तूही स्टेट डिनर देशील का विचारल्यावर 'मी एक मॅक्डॉनल्ड हॅमबर्गर देइन...' म्हंटला. बिल ने 'सिरीयसली?' विचारल्यावर 'डबल साईझ हॅमबर्गर देइन' असे उत्तर दिले.

http://www.foxnews.com/politics/2015/08/25/two-state-gop-leaders-reporte...

सध्या ट्रम्प पुढे आहे व जेब बुश दुसर्‍या नंबर वर आहे. त्यावर बिल मार म्हंटला की त्याला दुसर्‍या नंबर वर असणेच प्रेफरेबल असेल कारण त्याचा भाऊ तसाच निवडून आला होता Happy

पाहताय का कोणी? The gloves are off Happy

ऑलरेडी पहिल्या १० मिनीटांत फिओरिना आणि रॅण्ड पॉल वर हल्ला करून झाला ट्र्म्पचा. तसेच जॉर्ज पटाकी वर ही Happy

मी पहातेय ! ट्रम्प ला काय चिंताच नाही कसली . सुटलाय नुस्ता. :). किमान शब्दात कमाल अपमान. इथे किमान शब्दात म्हणजे शब्दशः! त्याची व्होकॅब इतकी पुअर आहे, सगळ्याला गुड थिंग, बिग मनी, बॅड पीपल इतपतच अ‍ॅडजेक्टिवज झेपतात त्याला Lol रॉन पॉल म्हणाला तसा हायस्कूल लेवल "नो आय डोन्ट! " "येस यू डू" टाइप अर्ग्युमेन्ट्स Happy

अजून कोणीच खास भारी वाटत नाही. डॉ कार्सन रिस्पेक्टेबल वाटतो पण प्रेसिडेण्ट जेवढा अ‍ॅसर्टिव्ह पाहिजे तेव्हढा वाटत नाही.

आत्तापर्यंत ख्रिस्टी बर्‍यापैकी बोलतोय पण आपला पिक रॉन पॉल सो फार. बाकी कोणी उठून दिसत नाहीत.

सगळे मात्र उठसूठ रेगन ला आणत आहेत मधे. फक्त ट्रम्प सोडून. त्याला तेवढ्यापुरतेही दुसर्‍या कोणाचे नाव डिस्कस करायचे नसेल Happy

अजून एक म्हणजे सगळे ट्रम्प वर हल्ला करतील असे वाटले होते. पण तसे होत नाहीये. कार्ली व रॅण्ड पॉल सोडले तर त्याच्याविरोधात डायरेक्ट कोणी बोलत नाहीये. उलट जपून पावले टाकत आहेत. बहुधा त्याच्यावर हल्ला केला तर आपल्याविरोधात 'बेस' जाईल अशी भीती असावी.

(चुकून रॉन पॉल लिहीले होते Happy )

कार्लीबाईने मार्क मिळवले की ट्रम्प विरुद्ध. क्रिस्टी पण बारीकसा स्कोअर करून गेला .बाकीच्या कुणाकडे काही मुद्देच नाहीत.

अखेर कार्ली फिओरिना आणि जेबबाबाची बायको, दोघीही ब्युटीफुल आहेत ह्यावर ट्रंपकडून शिक्कामोर्तब झालं. Lol

बाकी आजचे एकमेकांना आपआपसात भिडवायला विचारलेले बरेच प्रश्न बघून इथल्या काड्याघालू आयडीचीच आठवण झाली. Lol

<<सिरियसली ? "आय विल गेट अलाँग विथ वर्ल्ड लीडर्स" ही फॉरेन स्ट्रॅटेजी आहे ?>>
कडक आहे ही फॉरेन पॉलिसी... बघतानाच पटली. Lol
कार्लीबैंची फॉरेन पॉलिसीसुद्धा मस्त आहे. 'बोलणारच नाही त्या पुतीनशी ज्ज्ज्जा!!!' बायकोला एकदम पटल्यासारखी झाली थोडा वेळ!!!! Wink Lol Biggrin

इराक युद्धाबद्दल रॅण्ड पॉल व ट्रम्प सोडून सर्वांनी विषय टाळून अफगाणिस्तान वर नेला. फक्त या दोघांनी ते चुकीचे होते हे सांगितले.

गे मॅरेज मात्र आवर्जून आणले नाही कोणीच चर्चेत (बहुधा फक्त हकबीने उल्लेख केला).

काशीश (??) एकटाच होता जो काहीतरी पॉलीसीबद्दल बोलू म्हणाला. बाकीची सगळी मजाच होती. सुट्टीमधे पोरे एकत्र जमून वाह्यात पणा करतात तसा प्रकार वाटला.

ज्या जनतेने २००० साली बहुमत नसताना जॉर्ज बुशला मान्य केले नि २००४ मधे परत निवडून दिले ती जनता ट्रंपला पण मते देईल.
अगदी हिलरी सारख्या विरोधी पक्षाच्या प्रमुख विरोधकानी सुद्धा बुशच्या इराक हल्ल्याला मान्यता दिली!

कुणाच्या शहाणपणाचा भरोसा धरायचा!!

कार्ली ने मस्त मुद्दा मांडला - तिने ट्रंपला म्हंटले, तू चारदा धंद्याचे दिवाळे काढलेस, ते सुद्धा लोकांचे पैसे घेऊन.

नि आता ट्रंप स्वतः किती श्रीमंत आहे अश्या बढाया मारतो. मग राष्ट्राध्यक्ष झाल्यावरहि जनतेच्या पैशाचे असेच दिवाळे काढून स्वतः श्रीमंत होणार का?

बाकी काही असो - हा बाबा राष्ट्राध्यक्ष झाला तर सरकारला एकहि पैसा टॅक्स देऊ नका कारण हा राष्ट्राध्यक्ष चक्क चोर, लुटेरा आहे असा प्रचार मी स्वतः करीन.

रिपब्लिकन उमेदवारांपैकी काही लोक ओबामा केअर हा एक कलंक असल्यासारखे बोलत होते. जसे बुशचे इराक युद्ध तसे ओबामाचे ओबामाकेअर! काय हे? लोकांच्या आरोग्याकरता, औषधोपचारांकरता काही मदत करणे हे गुन्हा आहे? अमेरिकन संविधान पायदळी तुडवण्यासारखे आहे? काय वाट्टेल ते! अमेरिकेतील गरीब लोकांमधे आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत त्यातले अनेक हे औषधोपचार परवडत नाहीत म्हणून निर्माण झालेले आहेत. ओबामा केअर हे माझ्या मते योग्य दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे. आम्ही ओबामाकेअरचा समूळ उच्छेद करू हे रिपब्लिकन लोकांना आवडेल पण बाकीच्यांना पटेल काय?

कार्लीबाई बोलल्या चांगल्या पण त्यांचा भूतकाळ काय आहे? एच पी चे वाटोळे करणे. हजारो लोकांना कामावरून काढून टाकणे, कॉम्पॅकसारखी कंपनी विकत घेऊन दोन्ही कंपन्यांची वाट लावणे. जेव्हा ह्या बाईंना कामावरून काढले तेव्हा एच पी च्या अनेक भागात आनंदोत्सव साजरे झाले! ह्याला काही यशस्वी औद्योगिक कारकीर्द म्हणता येत नाही. पण एकमेव स्त्री उमेदवार असल्याचा त्यांना फायदा होणार हे नक्की.

निवडणुकीच्या प्रचारासाठी माझ्याकडे मजबूत पैसा आहे आणि मला लॉबिस्टांचे पाय चाटावे लागणार नाहीत हा ट्रंपचा मुद्दा मला आवडतो. बाकीच्या उमेदवारांकडे ह्यावर फारसे चांगले उत्तर नसेल.

ट्रंप आणि रँड पॉल हे दोघेच इराक युद्धाविरुद्ध बोलले. बाकीचे लोक कसेबसे त्या अनावश्यक, खर्चिक आणि आपत्तीजनक युद्धाचे समर्थन करत होते. बुश धाकली पाती हे थोरल्या बुशचे लोढणे गळ्यात बाळगून कसे निवडले जाणार ते देवच जाणे! माझ्या भावाचे करणे मला पटत नाही असे म्हटले असते तर जेब बुशला गोष्टी सोप्या झाल्या असत्या.
हिलरी आणि ट्रंप समोरासमोर आले तर डेमोक्रॅटने इराक युद्धाला पाठिंबा दिला होता आणि रिपब्लिकनने त्याला विरोध केला होता असे काहीतरी विपरित चित्र दिसेल.

हिलरी आणि ट्रंप समोरासमोर आले तर डेमोक्रॅटने इराक युद्धाला पाठिंबा दिला होता आणि रिपब्लिकनने त्याला विरोध केला होता असे काहीतरी विपरित चित्र दिसेल. >> >:) हो हे इंटरेस्टिंग आहे.

कार्ली वि हिलरी असे होऊ शकेल का? Happy फॉक्स व इतरत्र कार्लीनेच जास्त गेन केले डीबेट मधे असे म्हणत होते. मला तरी काही खास वाटली नाही. टीपिकल सीईओ सारखी हातभर लांबून बोलत होती असेच वाटले. फक्त ट्रम्प च्या कॉमेन्ट बद्दल तिचे उत्तर जबरी होते.

Pages