अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पण त्याने आउटकम बदलेल असं मला पर्सनली वाटत नाहीये. <<

हिलरीबाईंनी काहि विशेष छाप सोडलेली नाहि, व्हाइल शी वाज इन द ऑफिस. इमेल च्या बाबतीत तर एकदमच पोर्कटपणा.

बहुतेक पुढचा प्रेसिडेंट रिपब्लीकन असणार आहे. ओबामा जसा डब्लु बुशच्या मेहेरबानीवर निवडुन आला अगदि तसाच रिपब्लीकन उमेदवार ओबामाच्या पुण्याईवर निवडुन येणार.

मी काल बघत असताना विचार करत होतो की कॉमन माणूस म्हणून आपण हे डिबेट बघतोय आणि आपलं लक्ष कोण किती कॉन्फिडंटली बोलतय, बॉडी लँग्वेज काय आहे ह्यावरुन हा माणूस प्रेसिडेंट म्हणून कसा वाटेल/वागेल (नोट काय करेल असं म्हणत नाहीये मी कारण मनात आपण काय करेल असं म्हणत असलो तरी खरं तर आपण कसा वागेल ह्या बेसिस वरच खरं ठरवत असतो. कारण आपल्याला खरच ह्या कँडिडेट्सनी काय ठोस कामं केली आहेत ह्याची कितपत माहिती असते?)
मला वाटतं ह्यावर लेख ही आला होता जेव्हा ओबामा दुसर्‍यांदा प्रेसिडंट झाला तेव्हा. हे कँडिडेट ओवरॉल क्राऊड किंवा क्राऊडच्या अपेक्षा कशा वर्क करतात त्यावर बरीच मदार असते कोण प्रेसिडेंट होणार ह्याची.
माझं मत आहे हे डिबेट झाल्यावर जेव्हा "फॅक्ट चेक" केला जातो त्यात नेमका कोणता कँडिडेट सरस ठरतो हे बघितलं पाहिजे. काल क्रिस क्रिस्टी लै फॉर्मात होता पण मला खुप शंका आहे की फॅक्ट चेक मध्ये त्याची बरीचशी विधानं गळून पडतील.

हिलरीची जाहिर भाषणं मी बघितलेली नाही त्यामुळे सध्या मत राखून ठेवत आहे पण हिलरी ह्या सगळ्यांना पुरुन उरेल असं काही वाटत नाही. फार एलोक्वेंट आहे ती असंही एकलेलं नाही आणि इतरांप्रमाणे तिच्या नावावर ही थोडीफर स्कँडल्स, फ्लिप फ्लॉपिंग चार्जेस आहेतच.

हिलरी बोलताना मी प्रतेक्ष ऐकली सॅन फ्रान्सिस्कोला गेल्या वर्षी. ती अगदी प्रेसिडेन्शियल वाटते.

हौ का फा? देखना पडेगा.

बाकी काही नाही तर ट्रंपची पोलिटिकल करेक्टनेसबद्दलची कॉमेंट पटली आणि आवडली सुद्धा. Lol
आता तो त्याच्या नावाखाली वाट्टेल ते बोलतोय ती गोष्ट वेगळी पण आजकाल नुसता छळवाद सुरु आहे पिसी गोष्टींवरुन. त्यात फेसबूक आणि ट्विटर असल्यामुळे अक्षरश: वणव्यासारखे तुमची वक्तव्य सुसाट वेगात पसरतात आणि तुमची इमेजच काय पण करियर घर संसार सुद्धा बरबाद करु शकतात.

हिलरीबाईंनी काहि विशेष छाप सोडलेली नाहि, व्हाइल शी वाज इन द ऑफिस. इमेल च्या बाबतीत तर एकदमच पोर्कटपणा.>>> उलट आंतराष्ट्रीय स्तरावर तिच्या अनेक (बेनगाझी सोडून) भूमिकांचं कौतुक होत होतं. एकंदरीत "She did an awsom job" हा सूर वाचायला मिळतो. यात देशातले डेम्स किंवा रीप्ब्लीकन्स यांची मतं धरलेली नाहीत. एव्हन बेनगाझी प्रकरण जेव्हा सुरू होतं तेव्हा NPR वर अगदी रोज तासभर तरी चर्चा असायची तेव्हाही तिच्या बाजूने मत कलत असल्याचं जाणवत होतं. GOP वाले हा (आणि फक्त हाच) मुद्दा उचलून तिला धोपटायला बघणार. कारण या व्यतिरीक्त त्यांना तिच्याविरूद्ध एकदम प्रॉमिनंट मुद्दे मिळणार नाहीत असं वाटतंय (मला नाही, राजकीय पंडीतांना).
बाकी तिच्या बद्दल बोलायचं झालं तर ती अत्यंत कॅलक्युलेटेड बाई आहे. बिल क्लिंटनला डिव्होर्स न देण्याचं कारण तिच्या पुढच्या राजकीय प्रवासाचं भवितव्य हेही होतं. ती बुद्धीमान आहे, अ‍ॅग्रेसीव्ह आहे, व्हाईट हाऊसमधे असण्याचा तिला अनुभव आहे. व्हाईट हाऊसमधे असताना तिनं हेल्थ बिल आणण्याचा प्रयत्न केला होता. पण जे ओबामाला जमलं ते तिला जमलं नाही. यात तिच्या 'बाई' असण्याचा कितपत संबंध होता हे माहित नाही. का ते बिल एकदम कमकुवत होतं हे बघायला पाहिजे. पक्षात आजच्या घडीला तरी तिला मोठा स्पर्धक नाही. पण बायडनने निवडणुकीत उतरायचं ठरवलं तर तिच्यासाठी बरीच समीकरणं बदलतील. बायडनचे क्लिंटन कुटुंबियांशी अतिशय जवळचे संबंध आहेत. पण त्याच्या मुलाची (अंतिम) इच्छा त्यानं प्रेसिडेंशिअल निवडणुक लढावी अशी होती त्यामुळे तो काय निर्णय घेतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
निवडणुकांची समिकरणं वेगानं बदलत आहेत. मागच्या निवडणुकीत स्त्रिया, तरूण लोक आणि इमिग्रंटसकडे फारसे लक्ष न देणे रॉम्नीला चांगलंच भोवलं. ती चूक परत कुणीही करू नये. ट्रंपची सध्या करमणुकीची व्हॅल्यू जास्त आहे. GOP मधेही तो डोकेदुखी वाटतोय त्यामुळे त्याच्याबाबतीत काय होईल बघणं अजून एक करमणुकीचा विषय होईल.

हिलरीबाईंची कुठलीच फाॅरेन पाॅलिसी मला आठवत नाहि ज्यामुळे अमेरिकेचा आणि इतर देशांचा मोठा फायदा झाला आहे. नाॅर्थ कोरीया नुक्लीयर प्रोग्रॅम, पॅलेस्टाइन इशु, आयसिस प्रोलिफरेशन, इराण नुक्लीयर प्रोग्रॅम... लीस्ट मोठी आहे.

हर ॲप्रोच टु दिज इशुज हॅड बिन साॅफ्ट, डोसायल ॲंड स्टेइंग अवे फ्राॅम द कांट्रावर्सीज. नाउ धिस कुड बी ॲट्रिब्युटेड टु ओबामा ॲडमिनीस्ट्रेशन (ओबामा शाॅट डाउन हर रेकमेंडेशन्स कपल आॅफ टायम्स) आॅर हर प्लॅन्स टु रन फाॅर पोटस आॅफिस (हेन्स नाॅट गेटिंग हर हॅंड्स डर्टी); ओन्ली शी कॅन टेल... Wink

हिलरीबाईंनी इराकविरुद्ध पुकारलेल्या एकतर्फी, अकारण, खर्चिक, विध्वंसक, आयसीसचा भस्मासूर निर्माण करणार्‍या युद्धाला समर्थन दिले होते. तेव्हा तसे करणे राजकीयदृष्ट्या सोयीचे वाटले केले. आता परत यू टर्न.
बेनगाझी प्रकरणी कितीही दडपादडपी केली तरी लिबियातील वकिलातीला पुरेसे संरक्षण देण्यात हेळसांड, गुप्तचर खात्याच्या इशार्‍यांकडे दुर्लक्ष आणि शेवटी त्या स्टिवन्सचा हालहाल करुन झालेला मृत्यू. हा उघड अतिरेकी हल्ला असताना कुठल्याश्या युट्युबवरील फिल्मला दोष देण्याची केविलवाणी धडपड. परराष्ट्र खात्याची मंत्री ह्या नात्याने हिलरीकडे ती जबाबदारी येतेच.

एकंदरीत मुस्लिम अतिरेक्यांविरुद्ध बोटचेपेपणाचे धोरण ही बाई दाखवते की काय अशी शंका येते.

पत्रकारांशी बोलून त्यांना त्यांचे प्रश्न विचारण्याची संधी देत नाही. अगदी सोनियाबाईंसारखी!

भारतातले फुले आंबेडकर शाहूंचे नाव घेऊन गरीबांचा कैवार घेणारे नेते जसे अगडबंब श्रीमंत असतात तशी हिलरीबाई आहे. अस्सल लिबरलप्रमाणे गरीबांचा कळवळा दाखवते पण स्वतः अफाट श्रीमंत आहे. हा दुटप्पीपणा वाटतो.

सिनेटर म्हणून कारकीर्द अत्यंत सपक आणि निस्तेज.

अमेरिकेला काळा राष्ट्राध्यक्ष मिळाला. एक कलंक पुसला. आता लवकरच एक स्त्री राष्ट्राध्यक्षा बनायलाच पाहिजे. पण केवळ स्त्री पाहिजे म्हणून हिलरी? पटत नाही.

हिलरीबाईंची कुठलीच फाॅरेन पाॅलिसी मला आठवत नाहि ज्यामुळे अमेरिकेचा आणि इतर देशांचा मोठा फायदा झाला आहे.>>>> तुम्हालाच काय पण खुद्द हिलरीबाईंनापण आठवत नाही Proud . मॅनहॅटनमधे झालेल्या एका कार्यक्रमात (जिथे सगळा तिचा क्राऊड होता) तिला तिच्या 'सेक्रेटरी ऑफ स्टेट' म्हणून असतानाच्या 'अचिव्हमेंटस' बद्दल विचारलं तर सांगता आलं नाही. She actually fabled! And this was repeated at another occasion! Proud

If the point is that her track record is not spectacular enough to guarantee a victory in the 2016 Presidential election, I agree. But if the point is she does not have a track record, then disagree. I would say that she was not 'spectacular' but she was 'solid' as a Secretary of state. तुम्हाला दोन्ही बाजूने लिहीणारी अनेक आर्टीकल्स सापडतील. माझ्या मते तिनं केलेले प्रयत्न नक्कीच विचारात घ्यायला हवेत. ओबामा आणि तिचे संबंध तसे फार सुरळीत नसावेत. इराक, इराण, इतर अरब जगातील घडामोडींबातचे निर्णय व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनने घेतले. तिला त्या निर्णयांपासून दूर ठेवलं गेलं असं म्हणतात. सिरीयाबाबतीत तिची सजेशन्स डावलली गेली. बेनगाझी प्रकरणापर्यंततरी बर्‍याच रीपब्लिकन्सचाही तिला पाठिंबा होता आणि अगदी उघडपणे त्यांनी तिची स्तुती केली होती. जगात "Well respected, positive image" तिनं काळजीपूर्वक संभाळली.
हे आर्टीकल वाचण्यासारखं आहे.
"Despite her frustrations with a White House that often did not heed her advice, Clinton elevated this effort to levels unseen in previous administrations. Indeed, her most lasting legacy will likely be the way that she thrust soft diplomacy to the forefront of U.S. foreign policy. By speaking out about Internet freedom, women’s rights, public health, and economic issues everywhere she went, Clinton sought to transcend traditional government-to-government contacts. She set out to create -- or at least dramatically expand in scope -- a new kind of people-to-people diplomacy, one designed to extend Washington’s influence in an Internet-driven world in which popular uprisings, such as the Arab Spring, could quickly uproot the traditional relationships between governments."

Now having said that, I am not a Hillary supporter but I certainly like her. अमेरीकेच्या Male dominent राजकारणात तिनं स्वतःचं जे स्थान निर्माण केलं आहे, दॅट इज रीमार्केबल. She has been trying very hard for the White House, this is her last chance and it is certainly not easy for her.

शेंडेनक्षत्र, सॉरी पण पोस्ट 'काहीही' अशी वाटली.

एकंदरीत मुस्लिम अतिरेक्यांविरुद्ध बोटचेपेपणाचे धोरण ही बाई दाखवते की काय अशी शंका येते. >>>> फक्त भारताच्या दृष्टीनं विचार करू. पाकिस्तानात अतिरेक्यांचे अड्डे आहेत हे तिनं पहिल्यांदा मान्य केलं. त्यांना मिळणारी मदत भारताविरूद्ध वापरली जाते हेही तिनं ऑफिशयली मान्य केलं होतं. पाकिस्तानला मदत देऊ नका हे तिनं वारंवार सांगितलं होतं. आणि मदत कमी करत आणली होती. She was considered as India's friend. तिनं राजिनामा दिल्यानंतर आलेला जॉन केरी हा पाकिस्तानला झुकतं माप देतो किंवा त्यांचा मित्र मानला जातो. त्याच्या कारकर्दीत पाकिस्तानला मिळणारी मदत परत वाढली आहे. त्याचे परीणाम काय होत आहेत किंवा होतील हे कुणी सांगायला नको.

अमेरिकेला काळा राष्ट्राध्यक्ष मिळाला. एक कलंक पुसला. आता लवकरच एक स्त्री राष्ट्राध्यक्षा बनायलाच पाहिजे. पण केवळ स्त्री पाहिजे म्हणून हिलरी? पटत नाही.>>>> माझ्या १५ वर्षांच्या लेकीच्या मते "American democracy is a huge hypocrisy. I will believe that it is a true democracy when a capable Black, first generation immigrant, lesbian woman becomes a President of the United States of America". तिच्या मते कुठली बाई/पुरूष/ काळा/ गोरा बघून मत न देता लायक 'व्यक्तीला' मत मिळालं पाहिजे. ही अमेरीकेची पुढची पिढी आहे. म्हट्लं ना निवडणुकीची समीकरणं फार वेगानं बदलत आहेत.

डेमोक्रॅटस साठी अजून एक गोष्ट डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता आहे. मागच्या वर्षी Voting districts चे रीझोनींग झाले. प्रत्येक झोन पाहिला तर त्यात रीप्ब्लीकन डॉमिनन्स स्पष्टपणे दिसतो.

मुस्लिम दहशतवादाचा प्रश्न जगव्यापी असताना केवळ भारताकडे हिलरी मैत्रीपूर्ण नजरेने बघते हे पुरेसे नाही. तिच्या समर्थकांमधे मध्यपूर्वेतील अनेक लोक आहेत जे दहशतवादी संघटनाना मदत करताना दिसतात. बेनगाझी प्रकरणी अतिरेक्यांनी केलेले तितकेसे चूक नव्हते कारण आम्ही एक व्हिडीयो क्लिप बनवली होती. जवळजवळ क्षमायाचना म्हणता येईल अशी परराष्ट्र मंत्रालयाची वागणूक होती.

हिलरी बिल क्लिंटनच्या पुण्याईच्या जोरावर इथपर्यंत आलेली आहे असे माझे साफ मत आहे. कर्तृत्वापेक्षा वारसाहक्क (एंटायटलमेंट) हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो. कदाचित ह्याच राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी तिने घटस्फोट घेतला नसावा. पण तो त्यांचा व्यक्तिगत मामला आहे.

बिल क्लिंटन हाही बिन लादेन वगैरे लोकांच्या विरुद्ध कारवाई करायला फार उत्सुक नव्हता. येमेनजवळ यूएसएस कोलवर हल्ला झाला. तेव्हा एफ बी आयच्या तपास करणार्‍या लोकांना अमेरिकन वकिल बाईंनी जवळजवळ हाकलून लावले. ह्या हल्ल्यात ९/११ घडवून आणणार्‍या अतिरेक्यांचे धागेदोरे अत्यंत जवळून गुंतलेले होते. त्या प्रकरणाचा व्यवस्थित तपास झाला असता तर कदाचित ९/११ टळले असते. त्यामागेही राजकीय कारणे वा गणिते असतील. आता तोच गोतावळा हिलरीच्या भोवती जमला असला तर त्यांचाही दबाव मुस्लिम दहशतवादाकडे दुर्लक्ष करायला भाग पाडणाराच असणार.

अमेरिकन लोक प्रगल्भ आहेत आणि ते केवळ लायकी बघून मतदान करतात हे मला खरे वाटत नाही. अगदी प्रचंड प्रगती झालेली असली तरी अमेरिकेतही मूर्ख उथळ लोकांची संख्या भरपूर आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोक असे आहेत जे अत्यंत वरवरची कारणे देऊन मते देतात. उदा. ओबामा कृष्णवर्णीय आहे म्हणून त्याला मत देणारे प्रचंड संख्येने आहेत. हिलरीला स्त्री म्हणून मोठ्या प्रमाणात मते मिळणार आणि त्याला शह म्हणून विरोधक निदान उपराष्ट्रपतीपदाकरता तरी स्त्री वा अल्पसंख्य वर्गातील उमेदवार देणार असा कयास आहे.

डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पार्टीला बुडवूनच टाकणार असे एकदरीत दिसते. आज सकाळीच मेगिन केली बद्दल असभ्य शेरा मारला. रेड स्टेट परिसंवादाचे त्याला दिलेले आमंत्रण त्यांनी रद्द केले. तर त्याच्या समर्थकांनी कल्ला केला. त्याचा पाठिंबाही वाधतोच आहे. तो बिल क्लिंटन चा मित्र आहे आणी बिल नेच त्याला पाठवले या कॉन्स्पिरेस्य्य थिअरी त तथ्य वाटू लागले आहे Happy

हिलरी बद्दल अंजलीशी सहमत. मला तेव्हाही असे वाटले की यात यूएस गव्हर्नमेण्ट चे डायरेक्टिव्ह जास्त असणार. येथे ओबामा वि हिलरी तुलना जेवढ्या बघितल्या आहेत त्यात उलट हिलरी जास्त अ‍ॅग्रेसिव्ह आहे असेच वाचले आहे. बेनगाजी च्या वेळेस त्यामुळेच आश्चर्य वाटले होते.

Lol

मुस्लिम दहशतवादाचा प्रश्न जगव्यापी असताना केवळ भारताकडे हिलरी मैत्रीपूर्ण नजरेने बघते हे पुरेसे नाही. तिच्या समर्थकांमधे मध्यपूर्वेतील अनेक लोक आहेत जे दहशतवादी संघटनाना मदत करताना दिसतात. बेनगाझी प्रकरणी अतिरेक्यांनी केलेले तितकेसे चूक नव्हते कारण आम्ही एक व्हिडीयो क्लिप बनवली होती. जवळजवळ क्षमायाचना म्हणता येईल अशी परराष्ट्र मंत्रालयाची वागणूक होती. >>>>> धाकल्या बुशसाहेबांच्या समर्थकांमधे लादेनच्या कुटुंबातील लोक होते :फिदी:. तसंच मध्यपूर्वेतल्या अनेक लोकांचे (त्यात सौदी राजघराणं, लादेनचं कुटुंब इत्यादी हे ही लोक आलेच) इथल्या बर्‍याच राजकारण्यांशी आजही संबंध आहेत. ते का आहेत आणि किती खोलवर आहेत हे थोडं गुगल केलंत तर कळेल. मुस्लिम दहशवादच काय बाकी कुठल्याही प्रश्नांचा जोपर्यंत अमेरीकेशी थेट संबंध किंवा स्वार्थ येत नाही तोपर्यंत अमेरीका लांबून गंमत बघते असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष असला तरी या धोरणात फारसा बदल होत नाही. बाकी भारताचं उदाहरण नको देऊ म्हणताय? बरं तर भारताला वगळू. मग कुठल्या देशाचं उदाहरण द्यायचं?

हिलरी बिल क्लिंटनच्या पुण्याईच्या जोरावर इथपर्यंत आलेली आहे असे माझे साफ मत आहे. कर्तृत्वापेक्षा वारसाहक्क (एंटायटलमेंट) हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो. कदाचित ह्याच राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी तिने घटस्फोट घेतला नसावा. पण तो त्यांचा व्यक्तिगत मामला आहे.>>>> आता तिसरे बुश साहेब येत आहेत. पण तो वारसा हक्क नाही. ते फक्त कर्तृत्वच असावे, नाही का :फिदी:. ट्रंपला उमेदवारी मिळाली तर तीही कर्तृत्वच्या जोरावर असेल. बाकी घटस्फोटाबद्दलचं मत माझ्या पहिल्या पोस्टमधे लिहीलं आहे.

बिल क्लिंटनच काय बाकी दुसरं कुणीही असतं तरी हाच पावित्रा घेतला असता हो. स्वतःच्या सामर्थ्याबद्दल असलेला फाजिल गर्व, दुसर्‍यांना कस्पटासमान लेखण्याची प्रवृत्ती, युद्धखोरी इत्यादीचा मक्ता काय फक्त बिल क्लिंटननेच घेतला आहे का? ९/११ झालं नसतं तर कुठलाही अध्यक्ष असता तरी त्यात फार काही फरक पडला नसता.

ओबामा कृष्णवर्णीय आहे म्हणून त्याला मत देणारे प्रचंड संख्येने आहेत किंवा हिलरी स्त्री आहे म्हणून तिला मोठ्या प्रमाणात मते मिळणार ही अगदीच 'काहीही हं' टाईप विधानं आहेत.
बाकी अमेरीकन लोकांच्या प्रगल्भता आणि लायकीबद्दल झक्कींनाच विचारा. ते तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती देतील. इतकेच नव्हे तर मूर्ख आणि उथळ लोकांची टक्केवारीही देतील Proud

परत एकदा ही हिलरी सपोर्टर वगैरे म्हणून केलेली विधानं नाहीत. सध्या बरंच काही वाचनात येतंय त्यानुसार लिहीलं आहे.

तो बिल क्लिंटन चा मित्र आहे आणी बिल नेच त्याला पाठवले या कॉन्स्पिरेस्य्य थिअरी त तथ्य वाटू लागले आहे >>> विकु, ती काय कॉन्स्पीरसी थिअरी नै काई. मधे चैत्रातल्या हळदी कुंकवाला हिलरीची भेट झाली तेव्हा बिलच्या (लब्बाड कुठचा) या प्लानबद्दल सांगितले होते तिनं. त्याबदल्यात डॉनाल्डच्या ब्लाँड केसांबद्दल आणि पाऊटींग वाटणार्‍या ओठांबद्दल काही बोलणार नाही अशी मांडवली झालीय म्हणे. आहात कुठे...

Proud

आयला अमेरिकेतल्या निवडणूकीच्या बाफवर पण सोनिया गांधी आणली की लोकांनी.. चांगलं आहे.. Wink

त्या पोस्टी सोडून बाकीची चर्चा चांगली चालू आहे Happy

तो बिल क्लिंटन चा मित्र आहे आणी ............मांडवली झालीय म्हणे. आहात कुठे... Happy लैच Happy

तुम्ही ग्लेन बेकचा शो परत सुरु करा!

<<<<<अमेरिकन लोक प्रगल्भ आहेत ......................ओबामा कृष्णवर्णीय आहे म्हणून त्याला मत देणारे प्रचंड संख्येने आहेत. हिलरीला स्त्री म्हणून मोठ्या प्रमाणात मते मिळणार आणि त्याला शह म्हणून विरोधक निदान उपराष्ट्रपतीपदाकरता तरी स्त्री वा अल्पसंख्य वर्गातील उमेदवार देणार असा कयास आहे.>>>

यात थोडी अतिशयोक्ति आहे, पण तसे वाटावे हे काम मिडीया करेल.

ट्रंप ने जशी GOP मधे मजा आणली तशी आता झक्की इथे आणतील अशी माफक अपेक्षा बाळगूया. अंजली नि झक्की ह्यांनी इथे यायचे हि पण एक कॉन्स्पिरेस्य्य थिअरी असावी का ? Wink

>>मुस्लिम दहशवादच काय बाकी कुठल्याही प्रश्नांचा जोपर्यंत अमेरीकेशी थेट संबंध किंवा स्वार्थ येत नाही तोपर्यंत अमेरीका लांबून गंमत बघते असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे<<
सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने आंतरराष्ट्रिय राजकारणात, इतर देशांच्या अंतर्गत/बहिर्गत राजकारणात अमेरिकेचे हात गुंतलेले (वेस्टेड इंटरेस्ट) आहेत. जमेल तिथे उघडपणे नाहितर मागील दाराने हस्तक्शेप चालुच असतो.

पर्ल हार्बर सारख्या घटना होइस्तोवर गप्प बसण्याचे दिवस आत्ता राहिलेले नाहित...

बायदवे, कोणी सीएनेनवर स्टेट आॅफ द युनियन पाहिलं का?

परत परत तेच लिहिले, जरा शब्द बदलून, की खरे असते असे बहुतेकांना वाटते म्हणून वर लिहीलेलेच मी वेगळ्या शब्दात लिहीले होते पण आता संपादित केले.

ट्रंप ने जशी GOP मधे मजा आणली तशी आता झक्की इथे आणतील

कसचं कसचं!
कुठे ट्रंप. फॉक्स न्यूज, लिंबॉ, हॅनिटी, नि कुठे मी!
मी आपले एव्हढेच म्हणतो की ऑरेंज इज न्यू ब्लॅक असे ट्रंपने ऐकले, नि तो म्हणेल ब्लॅक प्रेसिडेंट झाला आता मी ऑरेंज, माझा हक्क.
मग बिल मार नवीन बर्दर चळवळ सुरु करेल - ट्रंप चा बाप ओरँग उटांग नव्हता हे सिद्ध करा - त्याने दिलेले बर्थ सर्टिफिकेट खोटे आहे!

मी आपले एव्हढेच म्हणतो की ऑरेंज इज न्यू ब्लॅक असे ट्रंपने ऐकले, नि तो म्हणेल ब्लॅक प्रेसिडेंट झाला आता मी ऑरेंज, माझा हक्क.
मग बिल मार नवीन बर्दर चळवळ सुरु करेल - ट्रंप चा बाप ओरँग उटांग नव्हता हे सिद्ध करा - त्याने दिलेले बर्थ सर्टिफिकेट खोटे आहे! >>> Lol

बिल मार नवीन बर्दर चळवळ सुरु करेल - ट्रंप चा बाप ओरँग उटांग नव्हता हे सिद्ध करा - त्याने दिलेले बर्थ सर्टिफिकेट खोटे आहे! >> Lol

अंजलीची मते जास्त पटली. पण सध्या जनरल इलेक्शनचा विचार करायला वेळच नाही. ट्रंप शोमुळे बाकी सगळे पूर्ण झाकोळले गेले आहे. जॉन स्टुअर्टने अजून ६ महिन्यांनी रिटायर व्हायला पाहिजे होते.

हो ना. हापिसात अडचण असेल तर निवृत्त झालेल्या व्यक्तीला दोन तीन महिने आणखी काम करायला लावतात तसे. किंवा 'हाइस्ट्स' मधून निवृत्त होउन चांगले जीवन जगू पाहणार्‍या चोराला पुन्हा एकदा 'एक शेवटची' हाईस्ट करायला भाग पाडतात तसे Happy

ट्रंप चे डीबेट मधले सुरूवातीचे भाग ऐकल्यावर मला १९८३ मधल्या वर्ल्ड कप मधल्या भारताची आठवण झाली. ३-४ मॅचेस जिंकल्यावर (बहुधा सेमीज मधेही जिंकल्यावर) सगळे खडबडून जागे झाले व 'च्यायला हे आता सिरीयस कंटेण्डर्स आहेत' अशी भीती निर्माण झाली. तसे ट्रम्प चे वाटले मला त्याची काही उत्तरे व जन्तेचा पाठिंबा पाहून. Happy

बिल मार नवीन बर्दर चळवळ सुरु करेल - ट्रंप चा बाप ओरँग उटांग नव्हता हे सिद्ध करा - त्याने दिलेले बर्थ सर्टिफिकेट खोटे आहे! >>> Lol

म्हटलं नव्हतं झक्की अगदी योग्य माहिती देतील Proud

हिलरीबद्दल माझे मत बदलणे अवघड आहे. तिचा आत्मकेंद्रित पाताळयंत्रीपणा स्वीकारणे जड जात आहे. पण डब्या (धाकला बुश) सारखे तिचे निवडून येणे दिवसेंदिवस अपरिहार्य होत आहे. डेमोक्रेटिक पक्षात तिला टक्कर देऊ शकणारा कुणी दिसत नाही.

ट्रंपबाबा कितीही उर्मट आणि शिवराळ वाटला तरी कायम मोजून मापून, छान छान बोलणार्‍या राजकारण्यांना जनता विटलेली आहे. अशा लोकांना जे मनात आहे ते स्वच्छ बोलणारा ट्रंप आवडतो हे त्याच्या लोकप्रियतेच्या आकड्यावरून उघड आहे. बेकायदा अमेरिकेत घुसखोरी करणार्‍या (प्रामुख्याने मेक्सिकन) लोकांना बाहेर काढावे आणि एक भिंत उभारून अशा लोकांना प्रतिबंध करावा हे म्हणणे कुणीतरी राजकीय नेता म्हणेल अशी लोकांना फार काळ आशा होती. आज ट्रंप ते म्हणत आहे. बाकी राजकीय नेते हा विषय आला की काहीतरी शर्करावगुंठित, निरर्थक काहीबाही बोलतात त्याला जनता कंटाळलेली आहे. एक भारतीय म्हणून अमेरिकेत वास्तव्य करण्याकरता ज्या कायदेशीर उठाठेवी करायला लागल्या होत्या ते बघून मेक्सिकन घुसखोरांना अकारण पायघड्या घालताना बघून क्लेष होतात. भारतातील कितीतरी लोक क्षुल्लक कारणांनी व्हिसा नाकारल्यामुळे अमेरिकेत येण्यापासून वंचित रहातात तिथे हे घुसखोर नाकावर टिच्चून नागरिकत्व मिळवतात हे योग्य नाही. अशा लोकांविरुद्ध असंतोष आहे आणि त्या जोरावर ट्रंप मुसंडी मारत आहे. पण आपल्या मनात जे येते ते बोलण्याची खोड ह्या माणसाला महाग पडेल असे वाटते.

ट्रंप चे पीआर, मीडिया अ‍ॅडव्हायझर वगैरे चांगले नसावेत, नाहीतर तो कोणाचेही ऐकत नसावा. काही गोष्टी त्याने कंट्रोल केल्या तर तो सिरीयस कन्टेण्डर आहे. कारण रिपब्लिकन मतदारांना रोकठोक, आक्रमक उमेदवार नेहमी जास्त आवडतो.

बाकी त्याच्या केलीबद्दलच्या बोलण्याबद्दल ओव्हररिअ‍ॅक्शन मीडियाने केली असे वाटते. तो पुरूषांबद्दलही असेच न विचार करता बोलला असता.

बाकी भिंत वगैरे तर सगळेच रिपब्लिकन्स म्हणतात की. आणि मेक्सिकन लोकांना कोठे पायघड्या घातल्या आहेत? माझ्या आठवणीत एकदा २००१ मधे एक अ‍ॅम्नेस्टी दिली होती - ती ही ग्रीन कार्ड करता. पण नागरिकत्वाचा मार्ग त्यांनाही अजिबात सोपा नाही.

Pages