"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १

Submitted by संयोजक on 19 August, 2009 - 23:29

एका पेक्षा एक

"तुमचा पिवळा गुलाब.. त्यावर आमचा केशरी गुलाब.. मग तुमचा लाल गुलाब.. आमचा पांढरा गुलाब..
तुमचा केशरी सूर्य आणि पांढुरके ढग.. त्यावर आमचा सोनेरी सूर्य आणि लालसर ढग..
तुमची राजगडावरची सुवेळा माची.. त्यावर आमची तोरण्यावरची झुंजार माची...
तुमचे डोंगर दुरुन साजरे.. आमचे ही डोंगरच, पण जवळूनच सुरेख...
तुमच्या बागेतल्या पपया.. आमच्या मंडईतले आंबे..
तुमचा अटलांटिक.. त्यावर आमचा पॅसिफिक... मग परत तुमचा अरबी समुद.. त्यावर आमचा हिंदी महासागर.. मग तुमचा... "

"अहो.. थांबा, थांबा, थांबा काय तुमचं आमचं करताय ??? हे सगळं तर निसर्गाचं देणं ना ???"

"निसर्गाचं देणं असलं तरी.. कॅमेर्‍यात तुम्ही आम्ही टिपलय ना !!!!"

"..."

चला मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया.... "एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू... !!

--------------------------------------------------------------------------------------

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

zabbu_coins.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा विस्मृतीत गेलाय, पण मराठी बोली भाषेमधे अजुन शिल्लक आहे
याच महत्व कोण जाणत नाही? हाच तो पैसा - एक
झक्कीन्नी गेल्या भारत भेटीत मला दिलेला Happy

तर घ्या तर हा पैशाचा झब्बू Proud

eka_paisaa-1.jpg

संयोजकांच्या नियमां प्रमाणे :
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.

वर पोस्ट केलेल्यां पैकी सगळे फोटो स्वत्: काढलेले आहेत ?

डिजे : मी पोस्ट केलेला फोटो मी स्वतः काढला आहे.
आणि तु ईथे तपास करण्या ऐवजी तिकडे एसटीवाय वर सुतकताई कर बरं जरा Happy

हा घ्या माझा झब्बू!

paisa.jpg

त.टी.: मीच काढलेत फोटो. आणि ते फोटोशॉपमधे एकत्र करून खाली सही पण ठोकलीये. Happy

पन्नास पैसे, पन्नास सेंट ची नाणी पाहीली होती, .....पण हाफ डॉलर... पहिल्यांदाच! Happy

लहान मोठ्या चा प्रोब्लेम इकडे ही आहेच!:)

दिपान्जली, तुजला अशी शन्का का बर यावी?
झक्कीन्नी खरोखरीचा पैसा दिला होता, पैशाचा फोटो नाही काही! Proud
फोटो आय मीन स्कॅनिन्ग मीच केल Happy पैसा आत्ता देखिल माझ्याकडे आहे, हव तर येऊन खात्री करुन घेऊ शकता Happy

३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
ही सूचना/नियम या पुढील नियमा बरोबर वाचावा Happy
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

हा आहे ऑक्टोपस मॅन. जवळ जवळ १००० वर्षापुर्वीचे आहेत अस म्हणतात.

Coin_Octopus Man 002b.jpg

हा फोटो मी स्वता: काढलेला आहे. कोणाला पहायचे असतिल तर मला येवुन भेटा. Happy

अमेरिकन सरकारने गेल्या काही वर्षात प्रत्येक राज्यासाठी एक अश्या क्वार्टर्स (२५ सेंटची नाणी) काढल्या. मी सगळ्या ५० राज्यांची नाणी जमवली आहेत त्याचा एक फोटो.

अधिक माहिती इथे वाचता येईल. http://en.wikipedia.org/wiki/50_State_Quarters

P1000157-1.JPGPenny collection

नात्या छान आहे कलेक्शन. माझ्याकडे ह्यातली ४९ आहेत, हवाईच नाणं फक्त नाहीये.

Coins चा उपयोग करावा तो असा.. बेली डान्सिंग च्या हिप स्कार्फ मधे गुंतवलेल्या coins बघा किती शोभून दिसतायेत.. हिप स्कार्फ असो किंवा wrap around चोली , coins ची किणकिण नाही झाली तर बेली डान्स, शकिरा स्टाइल हिप डान्स मधे मजा च येणार नाही ! Happy

scarf.jpg

(फोटो मी काढला आहे आणि नंतर एडिट स्टिच केलाय.)

... ... ... ...

लिंबु टिंबु,
मला वाटलं तुम्ही जोक म्हणून एक पैसा झक्कींनी दिलाय असं लिहिलं, नेट वर शोधून टाकला असेल असं वाट्ल तो फोटो Biggrin

महागुरु,
हा फोटो आहे का ?

डि़जे : हा फोटो आहे. walmart मधे असलेल्या 'convert coin into cash' मशिन वर असलेल्या स्क्रिनवरचा हा एक फोटो आहे. फोन मधील कॅमेरा वापरल्याने आणि त्या कॅमेर्‍यामधे चलत चित्र बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला.

नाण्यांचा अजुन एक ' कलात्मक' आणि श्रीमंत झब्बु !
दुबई च्या गोल्ड सुक मधल्या एका दुकानातले गोल्ड कॉइन डिझाइन चे हार , कोणा कोणाला हवेत ?
necklace.jpg

पुतळ्यांची माळ किंवा लक्ष्मीहार आहे का कोणाकडे? त्याचा टाका फोटो.
मी स्केच टाकू शकेन स्वतःचं म्हणून. टाकू?
पूर्वी 'जाणता राजा' च्या काळात तुळशीबाग क्वालिटी का होईना पुतळ्यांची माळ असायची माझ्याकडे. आता पुतळ्यांची माळ तुळशीबागेत पण क्वचित मिळते. त्यामुळे फोटो नाही जमणार.

>>>> मला वाटलं तुम्ही जोक म्हणून एक पैसा झक्कींनी दिलाय असं लिहिलं, नेट वर शोधून टाकला असेल असं वाट्ल तो फोटो <<<< Lol
म्हन्जे काय डीजे? झक्की एकही पैसा देणार नाहीत अस वाटल की काय तुला? Wink Proud

चम्पे, नुस्ते फोटो नकोत हां, चम्प्याबरोबर ती चिल्लर पाठवुन दे माझ्यासाठी Happy

क्या बात है ! मस्तच झब्बू आहेत एकेक.
माझ्या मोठ्या मेहुण्यांकडे मोठे कलेक्शन आहे जुन्या नाण्यांचे.. काही शिवकालीन नाणी वगैरेही आहेत. फोटो मिळाले तर टाकतो इथे.

लक्ष्मीहार आहे का कोणाकडे? त्याचा टाका फोटो.
<<< दुबईचे हे हार पाहून त्याचीच आठवण झाली होती :).
अर्थात दुबई च्या गोल्ड सुक मधेही बरेचसे सोनार भारतीय आहेत !

Pages