युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कढीगोळे - हरभरा डाळ जिरं, मिरची रवाळ वाटायची. पाणी न घातलेले चांगले पण गरज पडली तर शक्य तितक्या कमी पाण्यात. मीठ घालून हलक्या हाताने थोडी फेसायची. नेहेमीसारखी कढी करुन कढी उकळता उकळता हातानेच त्या डाळीचे गोलसर वडे करुन कढीत सोडायचे. पाच मिनिटात हलके होऊन वर तरंगायला लागले की शिजले असे समजावे. सोबत भात केला की वन डिश मील झाले.
आमच्याकडे सासरी हे वडे नुसते ताटात काढून, फोडून त्यावर चळचळीत फोडणी घालून खातात आणि मग कढी पितात Happy

चण्याची डाळ जास्त खात नाही तरी भिजलेल्या डाळीची उस्तवार करून ती स्वतःच्या पोटात ढकलायची असेल तर मृण्मयीची कर्माची फळं आहेत. आंब्याच्या कढीऐवजी नेहमीची कढी करता येईल.

ओटी म्हणून आलेले ओले हरभरे बरेच आहेत..एकदा उसळ करुन झाली ..अजुन काय करता येइल?>>> थोड्याश्या तेलाची फोडणी करून त्यावर भरपूर परतून घ्या हरभरे. मीठ आणि लाल तिखट घाला वरून. आम्ही 'फटफटे' म्हणतो या. कारण, ते परतताना फटफट असा आवाज येतो. (दुसरे काहीही कारण नाहीये, याची नोंद घ्यावी :फिदी:)

ओले हरभरे उकडून कोरडेच फोडणीत खमंग परतून एका बाऊलमध्ये काढायचे. मग त्यात भेळेच्या चटण्या घालून नीट ढवळायचं. त्यावर तुकडे केलेल्या शे.ब.पु.च्या पुर्‍या, कांदा-कैरी-टोमॅटोच्या फोडी पसरायच्या. त्यावर मीठ साखर घालून व्यवस्थित फेटलेलं थंडगार दही घालायचं. चाट मसाला, जिर्‍याची पावडर शिवरायची. शेव घालून हरभरा चाट खाऊन टाकायचं.

ओके..ही. चाट ची आयडीया भारी आहे..प्राची तुमची रेसिपी पण करुन बघते...हरभर्याचे फलाफल करता येइल का??

( मूठभर भिजवलेले ) मूग जरा जास्तच मोड आलेले आहेत. नुस्ते खाण्यासाठी भिजवले होते. अजुन काय चविष्ट करता येइल का.

मंजूडी, अगं मी आजच मुगाचे सारण भरुन पराठे करायचे म्हणून मूग भिजत घालणार होते. काल अचानक तुझी रेसिपी आठवली. त्यात तू मोड आलेले मूगच वाफवून वापरले आहेस ना ? आता तुझ्या पा खु मध्ये त्याची रेसिपी चेक करते Happy

रावी, थोड्याशा तेलात मोड आलेले मूग परतायचे. वरून तिखट, मीठ (सैंधव किंवा पादेलोण असेल तर उत्तम!) शिवरायचं. आवडत असेल तर टोमॅटो, शेव, चाट मसाला. किंवा लिंबू पिळायचं. जाता-येता खायला / जेवणात साईड डिश म्हणून किंवा संध्याकाळचे स्नॅक म्हणून छान लागते.

मावे च्या धाग्यावर उत्तर ना मिळाल्यामुळे प्रश्न इथे विचारते...कन्व्हेक्शन मधे स्टेनलेस स्टील चे ताट वापरले तर चालेन का? प्री-हीटेड अवन मधे 12-15 मिनिट बेक करायचा आहे.

कन्वेक्शन मोडवर शक्यतो काचेची किंवा अ‍ॅल्युमिनिअमची भांडी वापरावीत. स्टेनलेस स्टीलला एकसंध उष्णता मिळत नाही असे म्हणतात. तुम्ही नेटवर इतरत्र शोधून अधिक माहिती मिळवून स्टेनलेस स्टील वापरावे की नाही हे तुम्ही ठरवा.

धन्यवाद मंजूडी..खरे तर नेट वर शोधले, कुठेही स्टेनलेस स्टील वापरु शकता किंवा वापरु नका असा लिहिलेले नाही. म्हणून म्हटले कोणाला अनुभव असल्यास विचारावे.

ट्युलिप, स्टीलची भांडी नका वापरू कन्वेक्शनमध्ये. मला मावेसाठी डेमो द्यायला येतात त्यानेच सांगितलं.

मागच्या महिन्यात सज्जनगडावर गेले होते. नाश्त्याला पोहे, उपमा असायचा त्यात कांद्यासद्रुष्य दिसत होते पण चव वेगळी पण चांगली वाटत होती. काय आहे विचारल्यावर कळलं की उपासाचा कांदा! उपासाचा कांदा म्हणजे पानकोबी ☺

Sad सरळ कोबीचा उपमा म्हणायच की मग! चिन्यांची भाजी बरी चालते पण ग्रीकांचा कांदा नाही चालत!! 'जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे' ह्यात स्वामींनी कोबी गृहित धरला आहे हे ठासून सांगून यायच होतस मंजूताई. Sad Wink

घरी पुजा आहे येणार्‍या २५ / ३० पाहुण्यांसाठी सकाळ संध्याकाळ फुल जेवण बाहेरुन मागवायचे आहे. जर कोणाला चांगला केटरर माहीत असेल तर सांगा. घरगुती केटरिंग सेवा व अंधेरीला डिलिव्हरी देणारा असेल तर बरे.

आसना, जवळपासच्या मराठी लोकांचे व्यवस्थापन असलेल्या देवळात - मंदिरात विचारा. अनेकदा देवळांत प्रसादाचे जेवण बनवणारे आचारी बाहेरच्याही ऑर्डर्स (खास करून पूजा वगैरेंच्या जेवणासाठी) घेतात असा अनुभव आहे.

पंजाबी किंवा ग्रेव्ही टाईपच्या भाजीत टोमेटो जास्त झाला तर काय करावे? संपूर्ण भाजी जराशी आंबट होऊन जाते आणि मजाच जाते. Sad

पंजाबी किंवा ग्रेव्ही टाईपच्या भाजीत टोमेटो जास्त झाला तर काय करावे?>> एक कांदा व अर्धी वाटी
सुके खोबरे तेला वर परतून( कांदा कापून) घ्या व मिक्सर मधून काढून ग्रेव्हीत मिसळा. बरोबरीने एखादा उकडलेला बटाटा.

Pages