Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/138136.html?1205759180
कृपेचं बक्षीस म्हणून
कृपेचं बक्षीस म्हणून मदतनीसालाच देऊन टाक मुग्धा.
कढीगोळे - हरभरा डाळ जिरं,
कढीगोळे - हरभरा डाळ जिरं, मिरची रवाळ वाटायची. पाणी न घातलेले चांगले पण गरज पडली तर शक्य तितक्या कमी पाण्यात. मीठ घालून हलक्या हाताने थोडी फेसायची. नेहेमीसारखी कढी करुन कढी उकळता उकळता हातानेच त्या डाळीचे गोलसर वडे करुन कढीत सोडायचे. पाच मिनिटात हलके होऊन वर तरंगायला लागले की शिजले असे समजावे. सोबत भात केला की वन डिश मील झाले.
आमच्याकडे सासरी हे वडे नुसते ताटात काढून, फोडून त्यावर चळचळीत फोडणी घालून खातात आणि मग कढी पितात
मसाला डाळ. जराशी पंख्याखाली
मसाला डाळ. जराशी पंख्याखाली सुकवून तळायची , मीठ, तिखट शिवारायच.
ओटी म्हणून आलेले ओले हरभरे
ओटी म्हणून आलेले ओले हरभरे बरेच आहेत..एकदा उसळ करुन झाली ..अजुन काय करता येइल?
ते हरभरे थोडे उकडुन मीठ,
ते हरभरे थोडे उकडुन मीठ, मसाला घालुन असेच खायला छान लागतात.
चण्याची डाळ जास्त खात नाही
चण्याची डाळ जास्त खात नाही तरी भिजलेल्या डाळीची उस्तवार करून ती स्वतःच्या पोटात ढकलायची असेल तर मृण्मयीची कर्माची फळं आहेत. आंब्याच्या कढीऐवजी नेहमीची कढी करता येईल.
ओटी म्हणून आलेले ओले हरभरे
ओटी म्हणून आलेले ओले हरभरे बरेच आहेत..एकदा उसळ करुन झाली ..अजुन काय करता येइल?>>> थोड्याश्या तेलाची फोडणी करून त्यावर भरपूर परतून घ्या हरभरे. मीठ आणि लाल तिखट घाला वरून. आम्ही 'फटफटे' म्हणतो या. कारण, ते परतताना फटफट असा आवाज येतो. (दुसरे काहीही कारण नाहीये, याची नोंद घ्यावी :फिदी:)
मस्त मस्त. काहीतरी करतेच. आणी
मस्त मस्त. काहीतरी करतेच. आणी सांगते इथे.
अवांतर- मदतनीस माझ्या सोबतच राहाते
ओले हरभरे उकडून कोरडेच फोडणीत
ओले हरभरे उकडून कोरडेच फोडणीत खमंग परतून एका बाऊलमध्ये काढायचे. मग त्यात भेळेच्या चटण्या घालून नीट ढवळायचं. त्यावर तुकडे केलेल्या शे.ब.पु.च्या पुर्या, कांदा-कैरी-टोमॅटोच्या फोडी पसरायच्या. त्यावर मीठ साखर घालून व्यवस्थित फेटलेलं थंडगार दही घालायचं. चाट मसाला, जिर्याची पावडर शिवरायची. शेव घालून हरभरा चाट खाऊन टाकायचं.
ओके..ही. चाट ची आयडीया भारी
ओके..ही. चाट ची आयडीया भारी आहे..प्राची तुमची रेसिपी पण करुन बघते...हरभर्याचे फलाफल करता येइल का??
( मूठभर भिजवलेले ) मूग जरा
( मूठभर भिजवलेले ) मूग जरा जास्तच मोड आलेले आहेत. नुस्ते खाण्यासाठी भिजवले होते. अजुन काय चविष्ट करता येइल का.
पेसरट्टू नावाने शोधा रावी.
पेसरट्टू नावाने शोधा रावी.
मंजूडी, अगं मी आजच मुगाचे
मंजूडी, अगं मी आजच मुगाचे सारण भरुन पराठे करायचे म्हणून मूग भिजत घालणार होते. काल अचानक तुझी रेसिपी आठवली. त्यात तू मोड आलेले मूगच वाफवून वापरले आहेस ना ? आता तुझ्या पा खु मध्ये त्याची रेसिपी चेक करते
रावी, थोड्याशा तेलात मोड
रावी, थोड्याशा तेलात मोड आलेले मूग परतायचे. वरून तिखट, मीठ (सैंधव किंवा पादेलोण असेल तर उत्तम!) शिवरायचं. आवडत असेल तर टोमॅटो, शेव, चाट मसाला. किंवा लिंबू पिळायचं. जाता-येता खायला / जेवणात साईड डिश म्हणून किंवा संध्याकाळचे स्नॅक म्हणून छान लागते.
हो अगो... हे मोड आलेल्या
हो अगो... हे मोड आलेल्या मुगाचे स्टफ्ड पराठे
मावे च्या धाग्यावर उत्तर ना
मावे च्या धाग्यावर उत्तर ना मिळाल्यामुळे प्रश्न इथे विचारते...कन्व्हेक्शन मधे स्टेनलेस स्टील चे ताट वापरले तर चालेन का? प्री-हीटेड अवन मधे 12-15 मिनिट बेक करायचा आहे.
कन्वेक्शन मोडवर शक्यतो काचेची
कन्वेक्शन मोडवर शक्यतो काचेची किंवा अॅल्युमिनिअमची भांडी वापरावीत. स्टेनलेस स्टीलला एकसंध उष्णता मिळत नाही असे म्हणतात. तुम्ही नेटवर इतरत्र शोधून अधिक माहिती मिळवून स्टेनलेस स्टील वापरावे की नाही हे तुम्ही ठरवा.
धन्यवाद मंजूडी..खरे तर नेट वर
धन्यवाद मंजूडी..खरे तर नेट वर शोधले, कुठेही स्टेनलेस स्टील वापरु शकता किंवा वापरु नका असा लिहिलेले नाही. म्हणून म्हटले कोणाला अनुभव असल्यास विचारावे.
समोसा चाट साठी भेळेच्याच
समोसा चाट साठी भेळेच्याच चटण्या करत्तात ना ? एक दिवस आधी करून ठेवता येतील का ?
हो आणि हो फक्त फ्रिजमध्ये
हो आणि हो फक्त फ्रिजमध्ये ठेव.
धन्यवाद मंजूडी.
धन्यवाद मंजूडी.
ट्युलिप, स्टीलची भांडी नका
ट्युलिप, स्टीलची भांडी नका वापरू कन्वेक्शनमध्ये. मला मावेसाठी डेमो द्यायला येतात त्यानेच सांगितलं.
मागच्या महिन्यात सज्जनगडावर
मागच्या महिन्यात सज्जनगडावर गेले होते. नाश्त्याला पोहे, उपमा असायचा त्यात कांद्यासद्रुष्य दिसत होते पण चव वेगळी पण चांगली वाटत होती. काय आहे विचारल्यावर कळलं की उपासाचा कांदा! उपासाचा कांदा म्हणजे पानकोबी ☺
उपासाचा कांदा म्हणजे पानकोबी
उपासाचा कांदा म्हणजे पानकोबी >>> हे एका जैन कलिगकडून ऐकलं होतं .
सरळ कोबीचा उपमा म्हणायच की
सरळ कोबीचा उपमा म्हणायच की मग! चिन्यांची भाजी बरी चालते पण ग्रीकांचा कांदा नाही चालत!! 'जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे' ह्यात स्वामींनी कोबी गृहित धरला आहे हे ठासून सांगून यायच होतस मंजूताई.
घरी पुजा आहे येणार्या २५ /
घरी पुजा आहे येणार्या २५ / ३० पाहुण्यांसाठी सकाळ संध्याकाळ फुल जेवण बाहेरुन मागवायचे आहे. जर कोणाला चांगला केटरर माहीत असेल तर सांगा. घरगुती केटरिंग सेवा व अंधेरीला डिलिव्हरी देणारा असेल तर बरे.
आसना, जवळपासच्या मराठी
आसना, जवळपासच्या मराठी लोकांचे व्यवस्थापन असलेल्या देवळात - मंदिरात विचारा. अनेकदा देवळांत प्रसादाचे जेवण बनवणारे आचारी बाहेरच्याही ऑर्डर्स (खास करून पूजा वगैरेंच्या जेवणासाठी) घेतात असा अनुभव आहे.
पंजाबी किंवा ग्रेव्ही
पंजाबी किंवा ग्रेव्ही टाईपच्या भाजीत टोमेटो जास्त झाला तर काय करावे? संपूर्ण भाजी जराशी आंबट होऊन जाते आणि मजाच जाते.
पंजाबी किंवा ग्रेव्ही
पंजाबी किंवा ग्रेव्ही टाईपच्या भाजीत टोमेटो जास्त झाला तर काय करावे?>> एक कांदा व अर्धी वाटी
सुके खोबरे तेला वर परतून( कांदा कापून) घ्या व मिक्सर मधून काढून ग्रेव्हीत मिसळा. बरोबरीने एखादा उकडलेला बटाटा.
Pages