दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भेळेचा भाग ओढून ताणून केलेला जाणवला. मजा नाही आली.
बेस्ट फ्रेंडची बहिण आपली गर्लफेंड असणे हा हॅरी पॉटरपासून माझा फेव ट्रॅक आहे>>> 'स्पर्श' वाचतानाच कळलं Happy

रेश्माच्या बहीणीचं लग्न विसरले का ? (जसं तिकडे जानी प्रेग. आहे ते विसरले आहेत लेखक Wink )

सुप्रिया पुण्याला गेल्याचा / ज्या डॉ. साठी कैवल्यने आईशी भेटणं बंद करणं मान्य केलयं त्याचाही उल्लेख नाही. का फक्त मैत्री ही थीम आहे म्हणून बाकीची नाती तोंडी लावायला ?

रेश्माच्या बहीणीचं लग्न विसरले का ? <<< मागे कुणीतरी लिहिल्याप्रमाणे ती पंचवार्षिक योजना आहे.. Proud

रेश्मा तेवढी ताकदीची वाटत नाही बाकी लोकांएवढी...वशिल्याने आल्यासारखी वाटते. तिला एवढा अभिनय का करायला लावला काल? बोअर केले.

कालचा आणी परवाचा एपि जाम वैतागवाणा वाटला. सुजयने कैवल्य नसताना पार्टी का दिली? हे लोक त्याला मिस करतायत असे पण नाही दिसले. काही उल्लेखच नाही.

आणी काल रेश्माने वात आणला. ओव्हर करत होती. चेहेरा पाडल्याचा अभिनय बरा केला. पण बहुतेक स्वयम्पाक नाही केला तर आपला कसा इथे टिकाव लागेल, कुठे रहायचे? असे तिला वाटले असेल.

काल रेश्माने वात आणला.
>>
+११११

कसल्या उड्या मारत होती येडी Uhoh
कोणी माझ्या ताब्यातून असं किचन स्वतःकडे घेतलं तर मी पण अशाच वेड्या सारख्या उड्या मारेन पण आनंदाने Wink

गेले काही इपिसोड अत्यंत बालीश आणी कंटाळवाणे भाग होत आहेत.>> +१..

किशोर कुमारचा अख्खा एपिसोड आशुच्या "किंजल" य अएकमेव पंचवर तोलला होता. तोही पंच आधी जाहीरतीमधेय दाखवून त्याची मजा घालवली.

हे झी मराठी आनि झी सिनेमाचे प्रोमोज नक्की बनवतंय कोण? फँड्रीच्या प्रोमोमध्ये सर्वात माह्त्त्वचा शॉट सतत दाखवत होते, तेच सेम एलिझाबेथ एकादशीच्या शेवटी जो सायकलचा क्लोजप आहे तो प्रोमोमध्ये सतत दाखवत राहून त्याची मजाच घालवून टाकली. दिग्दर्शकाने काहीतरी विचार करून मग तो शॉट सिनेमामध्ये सर्वात शेवटी ठेवला होता ना? मालिकांच्या जाहीरातीमध्येही तसंच.. जो पंच हमखास हसू मिळवणारा आहे तोच "कमिंग अप" मध्ये दाखवायचं, मग प्रेक्षक अजून काहीतरी मजेदार घडेल म्हणून बघत राहतो आणि वैतागतो. प्रोमोज हेउत्सुकता वाढवायल असतात की आधीच मजा घालवायला असतात ते कळत नाही.

गेले काही इपिसोड अत्यंत बालीश आणी कंटाळवाणे भाग होत आहेत. अनुमोदन.

रेश्मा डोक्यातच जाते हा. तिला कुठलीही acting जमत नाही. रडीच वाटते. नीट बोलताही येत नाही.

कालचा भाग मस्त.. आशूची सोफ्यावर उडी मारण्याआधीची अॅक्टिंग धमाल.. नो नो, एकंदर आशूच धमाल आहे.. Happy

सुप्रियाचे एपिसोड चांगले होते..
नंतरचे बरेच ओढुन ताणुन..

पण मधेच येणार्या एखाद्या चांगल्या एपिसोड साठी.. काही चांगल्या पंचेस साठी..त्यातल्या त्यात आशु.. सुजय.. कैवल्य च्या अभिनया साठी.. आणि रोजच्या अगदी ड्ब्बा मालिकांमधुन चेंज म्हणुन..
बघावी वाटते ही मालिका..

कैवल्य- दिग्दर्शकाचं आणि स्वतःचं किती मिक्स करायचं (करायचं की नाही) यात गोंधळ. आणि दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुळचे सुंदर डोळे काही प्रसंगात / शॉट्समध्ये भयंकर दिसतात. क्वचित वेडसर सुद्धा.
सुजय- नाटकी उत्स्फुर्तता. गुड गुड म्हणता म्हणता धडधडीत डोळ्यांसमोर शॉट गंडवतो. वागण्यात अनेक विसंगती. देहबोलीवर काम केलं पायजे.
मीनल- सुपर नाटकी उत्स्फुर्तता + रोलमधली शेड टिकवून ठेवण्याची अनावश्यक धडपड. कधी जमतं, कधी नाही. जमत नाही तेव्हा केविलवाणं.
किंजल, निशा- बर्‍या आहेत, पण मुळातच जास्त काम नाही. त्या तरी काय करणार.
रेश्मा- अनॉयिंग आवाज आणि संवादफेक. बाकी नो कॉमेंट्स.

अँड द फायनलिस्ट्स आरः आशू, अ‍ॅना.

पण सध्या बोअर होतेय पण मधेच एखादा चांगला पंच असतो, त्याने बरं वाटतं.

बाकी मी आशु, सुजय आणि मीनलसाठी बघते.

सखीच्या बाबांची मी fan आहे. लहानपणापासून त्यांचे काम आवडायचं. अगदी लहानपणी सूर्याची पिल्ले हे नाटक टीव्हीवर बघितलं तेव्हापासून. पण बाबांचे काहीच अभिनयाचे गुण उतरले नाहीत तिच्यात, तिला खूप मेहेनत घ्यावी लागणार.

वासरात लंगडी गाय अशी अवस्था झालिये सध्या..... इतर पचपचित कौटुंबिक सिरियल्सपेक्षा ही बरी म्हणून तग धरून आहे. पण फक्त हा आठवडा कसा काढायचा एवढा विचार करून एपिसोड लिहितायत असं वाटत राहाते.

कुछ तडके की जरूरत है.

प्रगल्भा (रसिका वेंगुर्लेकर) मस्त करते अभिनय! अ‍ॅना म्हणून शोभली असती ? वाटतय अस! बाकी आशु (पुश्कराज चिरपुटकर) त्याची व्यक्तिरेखा कायम निट बजावतो.

पण मी मात्र सुजय(सुव्रत),कैवल्य(अमेय), रेश्मा (सखी) आणि मिनल (स्वानंदी) यांची पंखा आहे. Happy

आणि हो, ते बावरा मन गाण सुद्धा खुप भारी..... अमेय आणि सुप्रिया चा काय आवाज लागला होता!!! आहाहा...... ओरिजनल गाण पण फिक वाट्ट त्यापुढे. Happy

रच्याकने,

सुप्रिया म्हणून आलेली अभिनेत्री अमेयच्या 'दळण' नाटकात त्याच्यासोबत काम करते.

भुंग्या, खरच घरजवळ आहे ३D च शूटिंग???? नशिबवान आहात. हव तेव्हा जाउन भेटु शकाल त्यांना.

आणि हो, ते बावरा मन गाण सुद्धा खुप भारी..... अमेय आणि सुप्रिया चा काय आवाज लागला होता!!! आहाहा...... ओरिजनल गाण पण फिक वाट्ट त्यापुढे. >>

ते गाणं त्या दोघानी म्हटलेले ?? असं वाटलं नाही मला तरी ...रेकॉर्डेड गाण्यावर दोघ फक्त गाणं गाण्याची अ‍ॅक्टींग करत असावेत असं वाटलं.....पण जर खरच म्हटलं असेल तर मस्त्च आवाज

गेले ३-४ भाग मजा नाही आली. फक्त आशुनेच सांभाळून घेतले हे भाग. त्या सुतार काकांचा पंच भारी होता..
खिशात नाही मनी, आणि म्हणे माझं नाव सनी Biggrin

सुप्रिया म्हणून आलेली अभिनेत्री अमेयच्या 'दळण' नाटकात त्याच्यासोबत काम करते. >>ओह हो का? त्या दोघांची केमिस्ट्री छान जुळलिये.

आजकाल मी फॉरवर्ड करत बघते व्हिडीओज.
सोफा प्रकरण एका भागात बसले असते. दोन एपिसोड्सची गरज नव्हती.

आशू आणि अ‍ॅना दोघच खुप नॅचरल वाटतात मला.
अ‍ॅना ने बेअरींग घेतलय अस वाटतच नाही. किंवा ते कधीच बदललेलं दिसत नाही. आशा कायमच भारी.
बाकी सिरीयल ची वेळ एव्हढी भारी आहे की शनीवार रविवार मध्येच बघीतलेली बरी अस वाटतं.

Pages