दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा एपि उगाचच काढल्यासारखा वाटला. मला अजुनतरी रस्त्यावर कचरा करणार्‍यांकडुन दंड वगैरे वसुल करत असल्याच स्मरत नाही.. आणि तो माणुस कोणत्या हक्काने आशुला दंड भरायला लावत होता? पोलिस वगैरे वाटत नव्हता तो.

तो मनपाचा माणूस होता असं पाहीलं आज रिपिट भागात, कधी कधी बळचं दाखवतातं. निदान सुजय आणि अ‍ॅना ह्या २ना तरी सतत घरी दाखवू नये. रेश्मा, आशु ठीक आहेत घरीचं असतात ते Wink

मिनलच्या आयुष्यात १ महिना अमेरिकेत गेला. तोच रेश्माच्या आयुष्यात बहिणीचं लग्न अजूनही तितकंच लांब आहे.. ती बहुतेक म्हातारी झाल्यावर लग्न करणार आणि राकेश-रेश्मा ट्रॅक चालू रहाणार आहे..

मुग्धा, मंगळवारचा एपिसोड कॉलेजमध्ये फ्रेशर्सचं raging होतं त्याविरोधात होता. तो स्कॉलर प्रद्युम्न, तो ragingला घाबरून कॉलेजमध्ये न जाता ह्यांच्याकडे येत असतो. त्याला लढा कसा द्यायचा शिकवतात.

आजच एपिसोड मस्त होता! जम धमाल ,मिनल आली परत आणि गिफ्ट पण मस्त आणलीत !
सुजय ला गिफ्ट दिल्यावर कैवल्य भारी चिडतो ! Happy

प्लीज त्या रेश्माला कोणीतरी ' इतका वेळ स्वयंपाकघरात असतेस, तर डबे बनवून देण्याच्या बिझनेस करायला तरी एनकरेज करा रे.... निदान भाड्याचे चार पैसे सुटतील' ...
आणि तिच्या त्या बहिणीचं लग्न म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का ? Lol

आणि ते सगळे वरकरणी एकाच खोलीत/ठिकाणी आसपास असताना- म्हणजे कोणी दोघे हॉल मधे आहेत, पण इतर कोणी दोघी तेथून १०-१२ फुटांवर त्यांच्याच बद्दल बोलत आहेत, तर -त्यांचे बोलणे व मेजर हालचाली एकमेकांना दिसतात, ऐकू येतात की नाही हे ही एकदा ठरवा. यांचा कोणाचाही पेरिफेरल व्हिजन वर विश्वास नाही असे कधी दिसते. तसेच आवाजही बाजूला बोलत असलेल्यांचा त्यांना ऐकू येत नाही असेही कधी. तर कधी नॉर्मल व्यक्तींसारखे यांना दिसते व जाणवते Happy

सुजय व आशू - नवरा बायको टाईप नक्कल करतात तो सुरूवातील संथ होता पण नंतर जमला. आशू चे "अजून मंत्रिमंडळ तयार नाही झाले, आणि तुम्ही घोटाळे डिक्लेअर करून राजीनामा मागताय" हे जबरी, व रेश्मा चा "सुजय आशू शिवलकर" डॉयलॉग चे टायमिंग ही चांगले. मात्र या सगळ्यामधे उगाच लांबवत बसतात.

सुजय च्या डायलॉग डिलिव्हर्या भारी च असतात.
रवा डोसा खतरनाक Proud
आशू सुजय एपि मधे आशूने चक्क तेल लावून एक साईड भांग पाडला होता Rofl

रिया अग आशूने जाळीचा बनियन घातला असतो त्यावर सुजय ची ही प्रतिक्रिया होती रवा डोसा अंगावर घेऊन फिरतोयस असं वाटतंय Proud

Yuckkk Lol

Pages