रामराम दोस्तांनो,
वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. " या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .
सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..
सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्यांचा मित्र असणार्या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.
वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.
त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
.. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
@ कांदापोहे. नाही. पण प्लीज
@ कांदापोहे. नाही. पण प्लीज विपु पहा..
वाचतेय, वाचतेय. थोडा वेळ
वाचतेय, वाचतेय. थोडा वेळ लागेल.
फोटो मस्त सगळे.
बापरे तीन पाने वाचुन काढलीत..
बापरे तीन पाने वाचुन काढलीत.. मस्त माहिती , प्र.ची
साप म्हणजे कुतुहलाचाच विषय, मला भीती जरी वाटत असली तरी क्रेझ आहे...
या दिवसात तर खुप निघतात..
गेल्या शनवारी, सुखद ला घरा शेजारच्या बगिच्यात घेऊन गेले होते, तो पाळण्या वर खेळत होता आणि मी जवळच एका झाडाखाली बाकड्यावर बसले होते..झाडावरुन अचानक एक साप जोरात खली पडला, आणि एका क्षणात दिसेनासा झाला.चांगला मोठा होता, निदान सहा फुट तरी.. करडा, धामण असावी बहुतेक.
आम्हा माय लेकाची जी घाबरगुंडी उडाली....
निरु वाईपर कीत्ती विषरी साप, कमाल आहे बाबा तुमच्या भावाची.. ----- /\ -----
हिरवा साप मस्त्च टिपलायत!
ताम्हण खुप सुरेख.. घरा शेजारी खुप लागली आहे.
मानुषी ताई पोपटाचा कीस्सा छानच ग ..
कसला गोड आहे तो बच्चा..
गेल्या शनवारी, सुखद ला घरा
गेल्या शनवारी, सुखद ला घरा शेजारच्या बगिच्यात घेऊन गेले होते, तो पाळण्या वर खेळत होता आणि मी जवळच एका झाडाखाली बाकड्यावर बसले होते..झाडावरुन अचानक एक साप जोरात खली पडला, आणि एका क्षणात दिसेनासा झाला.चांगला मोठा होता, निदान सहा फुट तरी.. करडा, धामण असावी बहुतेक.
.. म्हणुन साप हाताळण शिकायच आहे मला..)
आम्हा माय लेकाची जी घाबरगुंडी उडाली.... >>
सायली,
मी जवळच्या दोन कॉलन्या तर निव्वळ माझ्या किंचाळण्याने जागवल्या असत्या..असो..(असले प्राणी दिसले की किंचाळण तर दुरच पण माझे रिफ्लेक्सेस सुद्धा हात पाय गाळतात आणि खुळ्यागत मी त्यांना बघत बसते संमोहीत केल्यासारखी
परत त्या झाडाखाली बसु नको.. कारण साप एकाच जागी परत परत आढळत नै ना.. दुसर्या झाडावर मिळेल यावेळी.. रच्याकने एवढ्या मोठ्या धामणीचं बॅलन्स कस्काय गेल असाव..
अग काही सुचतच नव्हत, आम्ही
अग काही सुचतच नव्हत, आम्ही जरा भलत्याच वेळी गेली होतो, ४, सव्वा ४ ला.. सुखद आणि माझ्या शिवाय कोणीच नव्हत.. आणि तस बघितला तर तो आम्हा दोघांच्या मधोमध पडला म्हणजे अंतर होत म्हणा... धाप कन आवाज आला,बघते तर जाड जुड साप, सुखद पायानी पाळणा थांबवुन, दोन्ही डोळे पाण्यानी डबडबलेले, खालचे ओठ बाहेर काढुन केवीलवाणा बघत होता.. तो साप देखिल गोंधळला होता, पण लगेच दिसेनासा झाला.. मी सुखद ला कडेवर घेतल आणि धुम ठोकली घरा कडे...
बापरे सायली. टेक केअर. ह्या
बापरे सायली. टेक केअर.
ह्या दिवसात साप असतातना म्हणून मी खाली जाऊन अजून सोनटक्का लावून नाही आले. रान खूप वाढलंय, एरवी सोसायटी ते साफ करते पण अजून नाही केलेय म्हणून मी नाही गेले, साप असतात खाली.
येस अन्जु ताई,, एक मदत हवी
येस अन्जु ताई,,
एक मदत हवी आहे, लाल भोपळ्याची फुलं उमलतायत पण दुसर्या दिवशी गळुन पडतायत..
आत्ता पर्यंत ३ फुल अशीच गळाली,,, खुप वाईट वाटतय,,, आज एका फुलात मुंग्या दिसल्या होत्या..
काय कारण असेल?
मुंग्या आहेत तर बरेच आहे की.
मुंग्या आहेत तर बरेच आहे की. मुंग्यांच्या पावलांनी परागीभवन होईल. पण ही गळणारी फुले नर आहेत का? बहुतेक नर असावीत. भोपळ्यासकट एखादी कळी उगवेपर्यंत बिचारी नर फुले येऊन येऊन गळणारच गं.
आणि गळताहेत तर तु वाया जाऊ कशाला देतेय्स? भाजी कर की त्यांची.
आमच्या ऑफिसच्या कुंपणभिंतीला
आमच्या ऑफिसच्या कुंपणभिंतीला लागून बदामाचे झाड आहे. त्याच्या तळाशी आलेले मशरूम्स...
वरच्या मशरूमचा आकार भाकरी एवढा आहे..
नांव माहिती आहे कोणाला....?
दिसण्यावरुन Amanita muscaria
दिसण्यावरुन Amanita muscaria सरख वाटतयं का ?
पण त्यावर पांढरे स्पॉट्स असतात..
नाही नाही.. Lingzhi_mushroom
नाही नाही..
Lingzhi_mushroom आहेत ते..यावेळी मी ९९% शुअर आहे..
निरु, https://en.wikipedia.org/wiki/Lingzhi_mushroom बघा जुळतय का ते ?
हो... ९९% जुळतय... Almost
हो... ९९% जुळतय... Almost असेच आहेत....
साधना ताई, खास तुमच्या साठी
साधना ताई, खास तुमच्या साठी तुमचेच आंबोली बेडुक..
(सौजन्य : युवराज गुर्जर )
आंबोली बुश फ्राॅग (Crocking)
Malabar Gliding Frog - Male : Aamboli..
Malabar Gliding Frog - Female Shaping the Nest...
वॉव.. सिंपली ऑसम बेडूक...
वॉव.. सिंपली ऑसम बेडूक... ब्यूटिफुल
आणी ते मशरूम्स मोठ्या पॅनकेक सारखे दिस्ताहेत कंप्लीट विथ मेपल सिरप
सु प्र जागुले तुझा फोटोज चा
सु प्र
जागुले तुझा फोटोज चा प्रॉब सॉल्व झाला कि नै अजून
सायली ४ वर्षांपुर्वी असंच एका
सायली ४ वर्षांपुर्वी असंच एका झाडाखाली पाचोळा झाडत असताना वरून साप पडला होता. अगदी केसांना टच होवून खाली पडला. माझ्या पावलांपासून वीतभर अंतरावर साप पाहून मी पळून न जाता सन्मोहित का काय ते होवून पहात बसले होते. तो पण हबकला होता. मग भानावर येवून तो सरपटत आणि मी उड्या मारत विरुद्ध दिशांना पळालो.
निरू, माझ्या ऑफिसमधल्या बदामाच्या झाडाखालीही असेच भाकरीसारखे भूछत्र उगवले आहे.
Aabhar sadhana... Kadachit
Aabhar sadhana... Kadachit nar phule asavit
Niru supperb photo .
Ashwini bapare... Bhayankarach ...
Varshu di kay god phula...
निरू, फोटो मस्त. आंबोलीला
निरू, फोटो मस्त. आंबोलीला बुशफ्रॉग पाहायचा माझा चान्स हुकला.
हे साप वरुन पडण्याचे वाचुन
हे साप वरुन पडण्याचे वाचुन कर्णाच्या आयूष्यावरची मृत्युण्जय कादंबरी आठवली. कर्ण आणि अर्जुन पहिल्यांदा भेटतात तेव्हा त्यांच्यामध्ये गरुडाच्या चोचीतुन निसटुन साप पडतो.
नीरू ऑसम प्रचि.. मग भानावर
नीरू ऑसम प्रचि..
मग भानावर येवून तो सरपटत आणि मी उड्या मारत विरुद्ध दिशांना पळालो.>>
साधना, ते भविष्यात काहीतरी भयंकर घडणार असल्याचे रूपक आहे. तोच सीन ओंकारा मधे आहे, करीनाला हळद लावताना त्या हळदीत साप पडतो..
बहुतेक वेळा धामण वगैरे जड साप झाडावर चढुन खाणे झाल्यावर अजून जड होतात त्यामुळे फांदी वाकते आणि ते सरळ स्वतःला खाली झोकून देतात..
निगकर्स हेपण बघा प्लीज..
निगकर्स हेपण बघा प्लीज.. http://www.maayboli.com/node/55066
डावीकडून खालचा : तो बघ कसा
डावीकडून खालचा : तो बघ कसा एकटाच पोहतोय.. स्वत:ला रॉकेट समजतोय जसा..धुवा धुवा मागे बनवत..पाण्यावरचे तरंग आहेत नुसते.. शो ऑफ.
उजवीकडुन खालचा : हो रे..चल आपण पण त्याला कॉम्पीटिशन द्यायची का ?
उजवा वरचा : आज रविवार. मी सुट्टीवर आहे..
लातुर जिल्ल्हामधे चाकुर या ठिकाणचे प्रचि
फोटो सर्व सुंदर,
फोटो सर्व सुंदर, सुंदर.
अश्विनी, बापरे.
टीना.. गोड बदकं आणी डायलाक्स
टीना.. गोड बदकं आणी डायलाक्स
अश्वे..तो साप तुला अशीच आपली फ्रेंडली टपली मारून पळाला गं... नो वरीज...
सु प्र
सु प्र
सुदुपार नगकर्स! वर्षू सुप्र
सुदुपार नगकर्स!
वर्षू सुप्र करून कुठे गायबलीस........बादवे तुझं पेन्टिन्ग आणि सर्व फोटो मस्त.
निरूचे सर्व बेडूक सुंदर! आणि पॅनकेक विथ मेपल सीरपही मस्तच!
टिनाचे बदकू आणि त्यांचे "ड्वायलॉक" भारी.
माझ्या सिटाउटात काही टांगलेल्या कुंड्या आहेत फर्न इ.इ.
तर पालेभाज्या आणल्या की त्या बहुदा सुतळीने बांधलेल्या असतात. त्या सुतळ्या कात्रीने कापून फेकण्यापेक्षा मी त्या गाठ सोडून एका टांगत्या कुंडीला बांधून ठेवते............लागतात कशाकशाला....फांद्या बांधायला इ.इ.(कित्ती तो चिक्कूपणा!....आँ कोण म्हणलं ते???)
तर सध्या सकाळी फुलचुख्यांची एक जोडी या सुतळीचे धागे काढायला येते. पण ते इतके फास्ट करतात हे काम ...आले आले म्हणेपर्यन्त जातात. उद्या बघू नेम धरता येतो का...........फोटोसाठी:फिदी:
.
.
फुलचुख्यांची एक जोडी ? >>
फुलचुख्यांची एक जोडी ? >> म्हंजी ?
टिने ..फुलचुखे म्हणजे
टिने ..फुलचुखे म्हणजे तलवारीसारखी लांब चोच असलेले फुलात चोच घालून मध चोखणारे पक्षी.
(यांनाच सनबर्ड, शिंजिर म्हणतात का?)
एपिकवर लुटेरे मध्ये "धतुरिया"
एपिकवर लुटेरे मध्ये "धतुरिया" नावाच्या चोरांची कहाणी चालू आहे... हे धोत्र्याच्या विषाने धर्मशाळेत आलेल्या प्रवाश्यांना मारून त्यांची संपत्ती लुटायचे. बर्याच विषारी वनस्पती असून देखील ते धोत्रा वापरत कारण धोत्रा सहज कुठेही रस्त्याकडेला मिळायचे...
टिनाचे बदकू आणि त्यांचे "ड्वायलॉक" भारी.>>> +१
Pages