निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तराखंडमध्ये, द्रोणागिरी गावाकडे जाताना एक लँडस्लाईड पॅच (भूघसरण टप्पा??) लागतो. अगदी अरुंद पायवाट आहे. सांभाळून चालावे लागते.
त्या वाटेवर घसरून एक याक मरून पडला होता Sad तिथून त्याला वर काढणे शक्य नसल्याने वनखात्याच्या लोकांनी त्याला तिथेच जाळून टाकले होते:

yak.JPG

साधना फोटो मस्तच..
अदिजो, अरेरे..तो याक बघुन कसतरीच वाटल.. महान लोक आपले..जाळून तसाच ठेवुन दिला..त्या जळलेल्या शरीराची विल्हेवाट वगैरे नै लावली..तसच..व्वाह रे बहाद्दर लोक..

तसं नाही गं टीना..त्या याकपर्यंत पोचून त्याला जाळणंही जोखमीचं काम होतं. विल्हेवाट लावणं लांबची गोष्ट. कुजून वास पसरू नये म्हणून त्यांनी असं केलं.
खरं तर त्या भागात रोजचं जगणंच इतकं अवघड आहे ना..

हो अदिजो, हिमालयाच्या आजुबाजुला जाऊन आल्यावर कळ्तं तिथे राहणं किती कठिण आहे ते. मी जेव्हा लदाखमध्ये फिरत होते तेव्हा सकाळी निघताना मनात विचार यायचा, संध्याकाळी परत परतेन ना मी? की कुठल्यातरी दरीत चिरविश्रांती?

हे असे रस्ते असतात तिथे

मानव तर सोडाच, त्याने तयार केलेले जगही खुजे आहे तिथल्या निसर्गासमोर. तिथे चुकीला माफी नाही. चुक पहिली जरी असली तरी बक्षिस थेट स्वर्गप्राप्ती Happy

अगदी खरं आहे.
आम्ही फिरलो त्या भागात अगदी ३०-३५ उंबर्‍यांची छोटी छोटी गावं होती. वीज नाही, संपर्काची साधने नाहीत, रस्ते नाहीत. द्रोणागिरीत कोणाला फोन करायचा असेल तर आठ किमीवरील 'कागा' गावत जाऊन फोन करावा लागतो. नोव्हेंबर-डिसेंबर मधे कडाक्याच्या थंडीत ते लोक खाली 'चमोली' गावात जाऊन राहातात. मे मधे गावात येतात आणि बटाटा, राजमा,लसूण वगैरेची शेती करतात.
जे रस्ते आहेत ते तयार करण्याचं आणि सांभाळण्याचं काम म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची कमाल आहे.

ब्रम्हकमळ मस्तच..
साधना ते घर कीत्ती सुंदर आहे... बोगनवेलेनी आच्छादिलेले.
लद्दाख जेवढ सुंदर आहे तितकच तीथल जिवन कठीण आहे..
बिच्चारा याक..

ओह, याक बिचारा!!!

ट्रू, हिमालयातील जीवन खरोखरीच खडतर आहे.. घराबाहेर पडल्यापासून घरी पोचेस्तोवर जीव मुठीतच धरून प्रवास
करायचा.. एक्स्ट्रीम वेदर शी चाललेला सतत झगडा.. तिकडले लोकं असुविधांबद्दल काहीच खिन्नता दर्शवताना दिसत नाहीत , हेच आपलं प्रारब्ध आहे म्हणून स्वीकारलेलं दिसतं.

वोव...
कसले रोड्स आहेत..
मागे डिस्कव्हरी कि आणखी कशावर तरी सिरीयल यायची ना रोड्स बाबत..
सर्वात उंचीवरचे कि सर्वात धोकादायक म्हणुन काहितरी..

वर्षूचा २ नंबरचा फोटो पाहिल्यावर झोझिला पास आठवला :).

तिथले लोक शांतपणे सांगतात, कार पडली पास क्रॉस करताना. आपल्याला ऐकुन काटा येतो.

मस्त वर्षुताई.

दोन गाणी आठवली फोटो बघुन, 'ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा' आणि ' इस मोडसे जाते है'. Happy

आय व्ही म्हणजे काय सायली.

ओह ते होय...
कळल कळल..माझ्याकडे पण होता..भिंतीवर चढवलेला..पण मग विंचुकाट्याच्या भितीने काढून टाकला..खिडक्यातुन काही घुसायची भिती म्हणुन..कॉलनीमधे एका घरावर आहे अजुन..पुर्ण भिंत खाल्लीय वेलीने Wink
पण मला तरी ते भिंतीवर चढवण म्हणजे डेंजरस वाटत Sad
आम्ही याला वॉल क्रिपरच म्हणतो Happy

Pages