रामराम दोस्तांनो,
वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. " या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .
सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..
सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्यांचा मित्र असणार्या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.
वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.
त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
.. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
टिने ........बदकूला झब्बू
टिने ........बदकूला झब्बू



मानुषी, त्यानं त्याची मान
मानुषी, त्यानं त्याची मान इतकी लपवून का ठेवली ?
आवडेश
तु मानगुट दाबणार अस वाटलं असणार त्याला नक्की
झब्बू भारी हं
लपवली नाही, तो खाते पीते घरका
लपवली नाही, तो खाते पीते घरका आहे (अमरीका बहुतेक)
हाहाहा.. मानुषी आणी टिनाचे
हाहाहा.. मानुषी आणी टिनाचे डायलाक्स पण मस्तयेत
बदकांसारखेच
आज दिवसभर भटकायला गेल्ती नं मानु.. म्हणून सुप्र करून गड्डप!!!
हा माझा झब्बू....
हा माझा झब्बू....
आणी हा माझा झब्बू.. चिउ चाय
आणी हा माझा झब्बू.. चिउ चाय कौ ला भेटलेले बदक
प्रचि ०२...
प्रचि ०२...
प्रचि ०३...
प्रचि ०३...
फोटो भारी सुंदर
फोटो भारी सुंदर सर्वांचे.
हाहाहा.. मानुषी आणी टिनाचे डायलाक्स पण मस्तयेत बदकांसारखेच. मम वर्षुताई.
बाणगंगेच्या कुंडातले बदक.
बाणगंगेच्या कुंडातले बदक.
सगळ्या बदकांची सभा भरलेली
सगळ्या बदकांची सभा भरलेली दिसतेय इथ..
सर्वांचेच बेस हाये..
निरु तुम्ही तुमचे प्रचि का गायब केलेत ?
प्रचि ०४...
प्रचि ०४...
सगळ्यांची बदक एकसे बढकर एक.
सगळ्यांची बदक एकसे बढकर एक.
भारीच!
भारीच!
सु प्र या मांसाहारी प्लांट
सु प्र
या मांसाहारी प्लांट चं नांव माहीत आहे का कुणाला??
वर्षू, यांना तु बागेत लावलं ?
वर्षू,
यांना तु बागेत लावलं ? कै का..
बघीतलय यांना..नाय नाय प्रत्यक्षात नाय कै..बहुतेक अॅनिमेशन पटात
बदके एकदम खाण्यालायक
बदके एकदम खाण्यालायक दिसताहेत, गुबगुबीत.
वर्षू, कार्निवोरस प्लान्ट्स म्हणुन सर्च कर. हे बहुतेक .व्हिनस फ्लायट्रॅप असावे. मध्ये हेअरपिन ठेऊन बघ लगेच ट्रॅप बंद होतो का ते. मात्र बोट मध्ये ठेऊन बघु नकोस हा....
मस्त फोटो बदकांचे मांसाहारी
मस्त फोटो बदकांचे
मांसाहारी प्लांट चे प्रॅक्टिकल घेउन पाहिलेस का ते कसे मांसाहार करते याचे
या गुलाबाला महिन्यातून एकदाच
या गुलाबाला महिन्यातून एकदाच तिन ते चार फुले येतात. कळी उमलताना फिकट गुलाबी रंगाची असते तर ५-६ दिवसांनी पुर्ण लाल रंगाचे फुल होते . हा तिसर्या दिवसाचा फोटो
या गुलाबाला जवळपास वर्षभर छोटी पुले असतात मला त्यांचा रंग खुप आवडतो.

हा पाहुणा घरात आला आणि खुर्चीवर बसला, मग खुर्चीसकट त्याला टेरेस वर नेले.
अमरीका
अमरीका बहुतेक..........>>>>>>>>>>> आत्मधून !०० पैकी १००!

तु मानगुट दाबणार अस वाटलं असणार त्याला नक्की
चला बै.......बदकूंच्या निमित्ताने सगळे सापनागसुसरमगरीतून बाहेर आले.
चिउ चाय कौ ला भेटलेले बदक>>>>>>>>>>>> वर्षो तुझं ते शिंक देऊन म्हणायचं "क्वान्ग चौ" आठवतय बै....आता चाय पिणारे चिऊ काउ कुठले गं?
साधना.............बदके एकदम खाण्यालायक दिसताहेत,>>>>>>>>>> काहीही हं साधना!
वर्षू, ते वीनस फ्लायट्रॅप
वर्षू, ते वीनस फ्लायट्रॅप आहे. एवढं हुशार आहे की त्याला सजीव/निर्जीव ओळखता येतं. माश्या, कीडे वगैरे आत गेले की ते काटे बंद होतात आणि कीटक चांगला अडकला की त्याची किनार फुगून तिथल्या तिथे त्याला डायजेस्ट करते
व्वा सगळ्यांची बदके खुप
व्वा सगळ्यांची बदके खुप सुंदर..
पीचर प्लांट भारीये वर्षु दी...
हे एका बॉटेनीकल गार्डन मधे टिपलेले..

तिथेच हा पांढर्या लीलीचा बाफ...

ससा गुलाब सुरेख.. तो शेवटचा
ससा गुलाब सुरेख.. तो शेवटचा फ्लोरी आहे, खुप फुलं देत असेल ना वर्ष भरच पण सुवास नसणार...
स_सा गोड आहेत फुलं,, मी पण
स_सा गोड आहेत फुलं,,
मी पण पहिल्यांदाच कार्नीवोरस प्लांटस इथल्या बोटेनिकल गार्डन मधे पाहिली.. .. खूप वरायटी होती पण सध्या
लागवडच सुरुये , त्यामुळे नावं नव्हती लिहिलेली.. काही तर इतकी इनोसंट दिसत होती कि आपण ,'त्या' गावचे
नाहीच मुळी असा भाव पांघरून उभी होती.. जवळ जाण्याची रिस्क कुणी घेताना दिसलं नाही..
मानु.. तू मेरा चिउ चाय कौ भूल गई???
हे घे.. गृहपाठ, पक्का कर
अननोन चायना -भाग १ - http://www.maayboli.com/node/48666
अननोन चायना -भाग २- http://www.maayboli.com/node/48669
unknown china part 3 http://www.maayboli.com/node/48684
unknown china part ४ http://www.maayboli.com/node/48706
मानुषी सश्याची फुले गोड
मानुषी
सश्याची फुले गोड आहेत.
ओक्के वर्षू टीचर :स्मितः आज
ओक्के वर्षू टीचर :स्मितः
आज हे बागेत पडलं होतं. मधमाश्यांचं पोळं. पण या ठिकाणी वर लटकलेलं कधी लक्षात नाही आलं.

कोणत्या पक्षांनी आणून टाकलं असेल का?
आणि सकाळी २ फुलचुखे बरोब्बर कालच्याच वेळी आले होते...माझ्या सुतळ्या न्यायला. पण मी बाहेर जायला लागले तर उडून गेले. आधीच ते अत्यंत अस्थिर! त्यामुळे जाळीतूनच फोटो काढलेत.




सगळ्यांचे फोटो खुप सुंदर.
सगळ्यांचे फोटो खुप सुंदर.
वर्षूताई नाही ना ग सुटला अजुन पिकासाचा प्रॉब्लेम. आता घरून फोटो टाकण्याशिवाय पर्याय नाही.
सर्वच फोटो सुंदर, सुंदर.
सर्वच फोटो सुंदर, सुंदर.
माझं पण बदकं.
माझं पण बदकं.




मानुषी ताई, चीक्कु पणा वगैरे
मानुषी ताई, चीक्कु पणा वगैरे काही नाही ह.. उलट व्यवस्थीत पणा..
आणि ते फोटोज कीत्ती गोड.
ही माझ्या कडुन (फोटो जुना आहे).

Pages