रामराम दोस्तांनो,
वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. " या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .
सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..
सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्यांचा मित्र असणार्या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.
वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.
त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
.. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
वॉव, मानुषी च्या सिमला
वॉव, मानुषी च्या सिमला मिर्च्यांमुळे इथे अजून नवीन नवीन माहिती मिळणारे..
साधना सांग ना काय फरक आहे ग्रीन हाऊस आणी शेड नेट मधे??
रीया.. हीही यू नॉटी गर्ल
ग्रीन शेड नेट हे पिकाचे
ग्रीन शेड नेट हे पिकाचे अतिरिक्त उन्हापासून संरक्षण करते. गारवा तयार करते. ह्यासाठी हिरव्या रंगाची पॉलिइथिलीनची नेट वापरली जाते. जी लवकर फाटत कींवा कुजत नाही.
पॉलीहाऊस आणि ग्लास हाऊस म्हणजेच ग्रीन हाऊसमधे तापमान आणि आद्रता वाढते. ग्रीन हाऊसमधे इतर आणखी बाबी नियंत्रित केलेल्या असतात.
ह्यासाठी उभारणीचा खर्च असतो त्यात शासनाकडून सवलत मिळते, पण सर्व खर्च आधी स्वतः करावा लागतो. शासनाकडून मिळ्णारी सवलत हि ठराविक क्षेत्रासाठीच असते, त्याहून अधिक क्षेत्रासाठीचा सर्व खर्च स्वतःच करावा लागतो. पाणी व्यवस्थापनासाठी ड्रीप कींवा स्प्रिंकलरचा वापर करावा लागतो.
मशागतीचे साधनेही बदलतात. नेहमीचा मोठा ट्रॅक्टर वापरून चालत नाही.
साधना, मानुषी अधिक माहिती देतीलच.
थांकु नलिनी ग्रीन शेड नेट
थांकु नलिनी
ग्रीन शेड नेट अजून पाहण्यात नाही आलीत माझ्या.. पण लहान लहान पॉली हाऊसेस, शेकड्यांनी पाहिली हिमाचलात!! इथे एक्झॉटिक वेजीटेबल्स पिकवली जातात.
थायलँड बद्दल म्हणून रिक्षा
थायलँड बद्दल म्हणून रिक्षा ऐवजी माझी टुकटुक ..( थ्री व्हीलर ला तिथे टुकटुक म्हणतात
)
http://www.maayboli.com/node/55948
मृणाल १ आणि व्हिटी खुप सुंदर
मृणाल १ आणि व्हिटी खुप सुंदर फोटो.
मृणाल प्रचि मस्तच... नवा भाग
मृणाल प्रचि मस्तच...
नवा भाग कधी ?
नलिनी, साधना शेडनेटच्या
नलिनी, साधना शेडनेटच्या माहितीबद्दल धन्यवाद!
ह्या गोष्टींबद्दल मी इथेच मायबोलीवर पहिल्यांदा वाचतेय... माझ्यासारख्या जन्म शहरात गेलेल्या, शेतीची केवळ शालेय पुस्तकात आलेली तितकीच माहिती असलेल्यासाठी हा हल्ली एक-दोन वर्षापासून होणार्या गारपीट, अवकाळी वृष्टी वगैरेसाठी व्यवहारी उपाय वाटला.
अर्थात गहू, तांदूळ, ज्वारी वगैरे मुख्य धान्याला उपयुक्त नसणार असेच वाटलेले... what about pulses?
पण खरच हे अवकाळी वृष्टी, गारपीट गृहीत धरून काहीतरी नवीन उपाय शोधलाच पाहिजे!
मृणाल फोटो खूप सुंदर आहेत. दुसर्या फोटोतले गुलाबी फुल कुठले?
Pages