अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

औंदा 'नॉट हिलरी' आणि 'नॉट जीओपी' असे असणार बहुधा. >>> Lol

रिक पेरी तीन गव्हर्न्मेण्ट एजन्सीज बंद करेन सांगताना तिसरी कोणती ते विसरला ती क्लिप लक्षात आहे का? Happy
https://www.youtube.com/watch?v=ZCyTQEANlmM&t=1m

क्लोजिंग रिमार्क्स कार्सन चे मस्त होते. उठून दिसले. हाफ अ ब्रेन जोक जबरी :). ट्रंप चे कायच्या काय - जपानी गाड्या अमेरिकेत येत आहेत? हा बिझिनेसमन आहे? मिसूरी, टेक्सास वगैरे चे प्लांट्स बघितले नाहीत का याने?

प्रायमरीमधे प्रत्येक रिपब्लिकन उमेदवार जास्तीत जास्त कडवा उजवा असल्याचा आव आणतो. कारण मगच उमेदवारी मिळते असा समज आहे. एकदा मला निवडून द्या मी सगळे मध्यपूर्वेतील सगळ्या रानटी राष्ट्रांचा निकाल लावतो पहा! पण एकदा का नामांकन झाले की मग मुसंडी मारुन डावीकडे धाव घेतली जाते आणि आपण कसे मध्यावर आहोत असा आव आणला जातो. कारण तसे केले की दोन्ही बाजूची मते मिळतात असा समज आहे.

अर्थात लोकशाही म्हटली तरी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत कॅलिफोर्निया वा न्यू यॉर्क कडे ढूंकून पाहिले जात नाही. कारण तिथले लोक कुणाला मत देणार ते जगजाहीर असते. सगळा पैसा हा ओहायो, फ्लोरिडा, इंडियाना असल्या निर्णायक समजल्या जाणार्‍या राज्यात ओतला जातो. कॅलिफोर्नियाकडे फक्त फंड मिळवण्याकरता जातात.

हिलरी ही अत्यंत पाताळयंत्री आणि कावेबाज बाई वाटते. ती निवडून आली नाही तर बरे!

पहिल्या दोन पॅरांशी सहमत. हिलरी मात्र त्यामुळेच यावी असे वाटते. ओबामापेक्षा ती जास्त अ‍ॅग्रेसिव्ह आहे.

ओबामा वर होणारी टीका ऐकली की ओबामा हा अमेरिकेचा नेहरू आहे असेच वाटते :). म्हणे युद्ध केले नाही सीरियाविरूद्ध. दोन्ही सभागृहे ऑल्मोस्ट यांचीच आणि तरीही ठामपणे कर युद्ध म्हणून सांगू शकले नाहीत. कारण जनता विरोधात आहे हे माहीत होते.

इराकशी युद्ध ही चूक मान्य करतात का रिप? तशा टाईपचा प्रश्न जेफ बुशला विचारला असं आठवतं. मग ताबडतोब युद्ध करू टाईप अग्रेशन कस्काय बोलतात? जनतेला युद्ध नकोय असं मला पण वाटतं, पण रिप व्होटरना पण नकोय का? हा त्यांना हवंय?

विकु म्हणतायत तसं abortion चा मुद्दा आजही बनतो ऐकून वाईट वाटलं.
कालच, कॅनडात डिबेटपण होती. ती अर्थात ४ वेगळ्या पार्टीच्या लीडरमध्ये होती. ती डिबेट खूपच सिरीयस आणि इकोनोमी, डेमोक्रसी, रीसेशन, सिरीया आणि इतर ठिकाणी अमेरिकेला पाठींबा द्यावा का, पर्यावरणबदलाबद्दल काय पॉलिसी इ. मुद्यांना धरून होती. खूपच structured वाटली. अर्थात अमेरिकेची प्रायमरी मधली निवड होण्यापूर्वीची एका पार्टिची होती, पण नकळत तुलना झालीच.

तशा टाईपचा प्रश्न जेफ बुशला विचारला असं आठवतं. >>> हो आधी मान्य करून मग सारवासारव केली होती त्याने. माझ्या आठवणीत फक्त रॉन पॉल उघडपणे म्हणतो. रॅण्ड पॉल चे माहीत नाही.

अनेक रिप. वोटर्सचा ही विरोध आहे हे त्यांना माहीत आहे. पण प्रायमरीज मधे उजवेपणा शक्य तितका दाखवायचा हा जर जुना रिवाज असेल (मला गेल्या ८-१० वर्षातले माहीत आहे, पण वाचले आहे त्यावरून असेच दिसते) तर तो बदलायचा धोका पत्करला नाही कालच्या लोकांनी.

>>>>>ख्रिस्टी ने वजन उतरवले आहे का गेल्या काही महिन्यांत?

काल कोणत्या तरी कॉमेडियन ने म्हंटले - they want to bring a balance to the debate. so they are going have Chris Christie on one side and everybody else on the other

प्रेसिडेन्शिअलकँडिस्डेटचं वजन हा देखिल त्याची लायकी ठरवणारा मुद्दा होऊ शकतो हे हकबीमुळे कळलं. क्रिस्टीचा सध्याचा आकार बघता बॅलन्स करायला माइक द मायटीमॅन आहे असं नाही का वाटत?

अबॉर्शनचा मुद्दा आला की ह्यांना पाच आणि चौदावं अमेंडमेंट आठवावं हा भाग विनोदी वाटतो.

ट्रंप छा गया. पण ही इज अ‍ॅन **होल हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत गेलं! मेगन केली कधीकधी आवडून जाते ती ह्या अश्या प्रसंगी!

हिलरी ह्या सगळ्यांना पुरून उरेल. आत्ता ह्यांनी स्वतःच्या बेसला खुष करायला केलेली अतीउजवी वक्तव्य तेव्हा बुडाचा चावा घ्यायला येतील.

ट्रंप पण म्हणाला ना की त्यानी २००४ मध्ये विरोध केला होता इराकला.

ण प्रायमरीज मधे उजवेपणा शक्य तितका दाखवायचा हा जर जुना रिवाज असेल (मला गेल्या ८-१० वर्षातले माहीत आहे, पण वाचले आहे त्यावरून असेच दिसते) तर तो बदलायचा धोका पत्करला नाही कालच्या लोकांनी. >> फा अरे शेवटी डिबेट चे प्रश्न फॉर्म केले होते फॉक्स नी. आणि ते आपला प्रेक्षकवर्ग सोडणार आहेत का? हफ पोस्ट (लिबरल आहे) च्या मते खरा विनर फॉक्स न्युज होता. कारण सगळ्या गोंधळामध्ये पॉलिसी ठरवणार कोण - तर फॉक्स !! हे अधोरेखीत झाले कालच्या डिबेट मध्ये. मला पण ते थोडे पटले कारण बघतानाच मला काही काही प्रश्न खटकत होते. तुम्ही उगीच ते फार राईट चे प्रश्न विचारायचे मग उत्तर तसेच मिळणार ना!

>>रॅण्ड पॉल चे माहीत नाही.>> त्याच्यासाठी मी तेव्हा सेनेटर नव्हतोच ही पळवाट आहेच. जोडीला मी असतो तर वोट केले नसते असे म्हणत हिलेरीने वोट केले हेही सांगायला तो विसरत नाही.

फा अरे शेवटी डिबेट चे प्रश्न फॉर्म केले होते फॉक्स नी >> हो ते ही खरेच.

प्रेसिडेन्शिअलकँडिस्डेटचं वजन >>> इव्हन त्या कॉमेडी शो मधे लोकांची प्रतिक्रिया this one has gotten old अशीच होती त्या विनोदाबद्दल. बिल मार ने सुमारे दहा एपिसोड्स मधे यावर जोक करून झाले. आता लोकांनी सोडून द्यायला हवे. मात्र न्यू जर्सीचा पूल बंद करण्याचा प्रकार कायम भोवणार त्याला :). जॉन ऑलिव्हर ने ही जबरी मारला होता त्याबद्दल.

पण अती राईट राहून गेल्यावेळेला (रोम्नी) पुरेसं तोंड पोळलं नाही का? का अजूनही तितका चक्रम व्होटबेस आहे?

त्याच्यासाठी मी तेव्हा सेनेटर नव्हतोच ही पळवाट आहेच. >>> पण रॉन पॉल जितक्या उघडपणे इराक युद्धाला विरोध करायचा (मला २००८ चे असेच प्रायमरी डीबेट लक्षात आहे. तो एकटाच सर्वांविरूद्ध उभा होता), तसा रॅण्ड पॉल करतो का?

बाय द वे, डेम्स च्या बाजूने ती एलिझाबेथ वॉरेन आहे का? तिला फंडिंग कसे मिळणार हा प्रश्नच आहे. कारण जो कोणी फंडिंग देउ शकेल त्याच्याविरूद्ध ती बोलते Happy

हो ते अ‍ॅबॉर्शन वरून जे तारे तोडत होते स्कॉट वॉकर, इ. ते ऐकून पंच मारावासा वाटत होता तोंडावर एकेकाच्या.
ट्रम्प आणि स्त्रियांविषयी स्टेटमेन्ट्स पण तशीच. अन हे टॉप १० !! हे एवढेच चॉइसेस ? असा प्रश्न पडला सगळा डम्बनेस बघून.

हिलरी ही अत्यंत पाताळयंत्री आणि कावेबाज बाई वाटते. >>>> Proud

मी जितकं पाहिलं त्यात तो रुबियो की कोण आहे, तो चांगला बोलत होता. तो कँडीडेट व्हायचे चान्सेस किती आहेत ?

फा,निव्वळ विनोदासाठी नव्हे, बाप्याचं वजन हा आधीच्या इलेक्शन्समध्ये सिरियस मुद्दा होता. त्याच्या पर्सनल इंटर्व्ह्यूजमध्ये त्यावर प्रश्न असायचे. धावून १०० पाउंड उतरवले त्याचा कँडिडेट म्हणून कसा फायदा होईल, नंतर पुन्हा काही पाउंड वाढले त्याचा तोटा ह्या पॉइंट्सवर मुलाखतीत चर्चा ऐकलीय. जॉन मकेन ह्यांचं वय, कॅन्सर सर्व्हायवर असणं ह्यांच्याइतका उचलून धरलेला मुद्दा नव्हता बहुतेक.

फॉक्स, ट्रंपला कोपच्यात घ्यायच्या इराद्यानेच आले होते. पहिलाच प्रश्न फक्त आणि फक्त ट्रंपलाच उद्देशुन होता. त्या पठ्ठ्याने हि अगदि न डगमगता हात वर करुन आपला गट्सीपणा सिद्ध केला. सुरुवातीला त्याची मस्त फटकेबाजी चालु होती, पण क्लोजिंग रिमार्क्स मध्ये त्याने काहि प्रभाव टाकला नाहि.

माझ्यामते माइक हकबी आणि टेड क्रुज डिड वेल. दे मेंटेन देअर पॉश्चर, आर्टिक्युलेटेड पॉइंट्स विदाउट अ‍ॅटॅकिंग एनी वन ऑन द स्टेज. मार्को डिड गुड टू, जेब सिम्ड नर्वस...

बेनगाझी, इमेल इश्यु हिलरीबाईंना बराच महाग पडणार आहे... Happy

वॉरेन चांगली आहे पण जरा जास्तच सोशॅलिस्ट वाटते. त्यात पॉलिसीज वरची भाषणे सर्वसामान्य मतदारांच्या दृष्टीने खूप हेवी वाटतात. त्यात अमेरिकन सरकारला, पब्लिक ला वेठीला धरू शकणार्‍या कोणत्याही बिग बिझीनेस, बिग फायनान्स वगैरे च्या विरोधात बोलत असल्याने फंडिंग कसे मिळणार हा ही प्रश्न आहे. "लोकांनी वर्गणी काढून" छाप काहीतरी छोट्या मोठ्या स्थानिक निवडणुकांत होऊ शकेल. प्रेसिडेन्शियल लेव्हल ला अवघड आहे. त्यात अशा तात्त्विक लोकांची जुनी किरकोळ अंडीपिल्ली नंतर मीडिया स्कृटिनी मधे बाहेर येतात तेव्हा त्यावर 'तयार' प्रतिक्रिया देणे अशांना जमत नाही. अनेक तयार राजकारणी "I was young and stupid/I was young, I needed work" वर चालवून नेतात Happy

>> बेनगाझी, इमेल इश्यु हिलरीबाईंना बराच महाग पडणार आहे...
महाग इन द सेन्स त्यावरून ग्रिल केलं जाईल एव्हरी स्टेप ऑफ द वे. पण त्याने आउटकम बदलेल असं मला पर्सनली वाटत नाही.

शेवटी गाडी नेहमी थोडक्या अनडिसायडेड वोटर्सवर येते. बाकीचे पार्टीजना वोट करत असतात - कॅन्डिडेट कोणीही असो. तेव्हा फा म्हणतो तसा 'लाइकेबिलिटी फॅक्टर' मेजर रोल प्ले करतो. अ‍ॅल गोअर बुशपेक्षा हुशार होता हा त्याचा ड्रॉबॅक ठरला तो त्यामुळेच.

सुरुवातीला त्याची मस्त फटकेबाजी चालु होती, पण क्लोजिंग रिमार्क्स मध्ये त्याने काहि प्रभाव टाकला नाहि. >>> हो मलाही तसेच वाटले.

हिलरी चे बेनगाझी प्रकरण एवढ्यात आले होते का परत चर्चेत? त्या यू ट्यूब क्लिप च्या वेळेस ही तिच्या पहिल्या प्रतिक्रिये वर खूप टीका झाली होती. मलाही ती पटली नव्हती प्रतिक्रिया.

डॉक्टरसाहेब किती शांतपणे बोलत होते. बाकीच्यांच्या ठणाणा उत्तरांमध्ये अगदी कच्च्चं लिंबू वाटत होते. ते स्टेजवर आहेत हे पार विसरून गेल्यासारखे बापड्यांना प्रश्नही कमी विचारले. एक वॉटर बोर्डिंग मुद्दा सोडून बाकी जे काही चार दोन प्र्श्नांचे तुकडे समोर टाकले त्यावर त्यांनी स्मार्ट उत्तरं दिली असं वाटलं. त्यांच्या क्लोजिंग रिमार्कनंतर जॉन स्ट्युअर्टची भेट असल्यामुळे बाकीच्यांचे रिमार्क्स बघायचे राहिले.

वॉरेन प्रोफेसर होती. तिला हॅरी रीड नी सिनेट मध्ये आणले. तिची लाईफ स्टोरी खरच भारी आहे. मिळाली तर वाचा. तिनी सिनेट कमिटी मध्ये घेतलेले इंटर्व्ह्युज पण चांगले आहेत. त्यातुन तिची तयारी दिसते. प्रत्यक्षात ओबामा च्या कँपेन मध्येही वर्गणी काढू डोनर्स मोठे भाग होते. आता यावर्षी मात्र पी ए सी मुळे सगळे बदलले आहे.

वॉरेन मुळे निदान हिलरी ला आपला टोन बदलावा लागेल.

मला पण ईमेल्स इ. ने निर्णायक फरक पडेल असे वाटत नाही. काल मार्को रुबियो आणि त्यानंतर मग जेब बुशच त्यातल्या त्यात "लेस अनॉयिंग" वाटले!! मला बिग बँग आठवलं , त्यात क्रिप्की पेनीशी फ्लर्ट करायचा प्रयत्न करतो त्यानंतर हावर्ड येऊन तिला म्हणतो "सडनली आय्म लुकिंग मच बेटर, डोन्ट आय ?" असं म्हणतो ते आठवलं Lol

Pages