Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टिपापा वर आज खालील चर्चेने
टिपापा वर आज खालील चर्चेने विषयाला सुरुवात झाली (पोस्ट्स मी कॉपी केली आहेत, पण कुणाची हरकत असल्यास उडवेन)
धनि | 5 August, 2015 - 10:38
मला तर ट्रंपचे रेटिंग्स पुर्ण फेक वाटतायत. >> बुवा तसे नाहीये. एक जो मतदार आहे ज्याला सगळे पक्ष फेक वाटतात त्यांना ट्रंप जवळचा वाटतो आहे. त्यामुळेच तर तो ३ र्या पार्टीचा उमेदवार म्हणून पण लढेल असे म्हणातो आहे.
टण्या | 5 August, 2015 - 10:41
मी ज्या गावात राहतो तिथे ८-१० घरांच्या बाहेर तरी मी ट्रम्प चे बॅनर (ते बागेत गवतात खोचतात ते) बघितले. ट्रम्पः मेक अमेरिक द ग्रेट इट वॉज असे काहितरी लिहिले आहे त्यावर.
धनि | 5 August, 2015 - 10:42
टण्या, तू तर फुल कॅन्सास मध्ये रहातोस. तिकडे तो तुमचा गव्हर्नर पण परत निवडून आला म्हणजे काहीच विशेष नाही हे हाहा
अमितव | 5 August, 2015 - 10:43
३ र्या पार्टीचा उमेदवार >> म्हन्जे चाय पार्टी का? मग टीपापा चा फुल सपोर्ट पायजेल.
वैद्यबुवा | 5 August, 2015 - 10:43
धनि, हा विचार नवीन आहे. नेवर थॉट अबाउट इट दॅट वे. स्मित
धनि | 5 August, 2015 - 10:46
बुवा, ट्रंप चे फक्त वाईट गोष्टींची हाईप झाली आहे. पण त्याचे गेटींग इकोनोमी बॅक , जॉब्ज टू अमेरिकन पिपल हे सध्याच्या घडीला खुप पॉप्युलर मुद्दे आहेत. त्यात तो सोशल सिक्युरिटी डी फंड वगैरे पण म्हणत नाही (जे इतर रिप म्हणातात)
maitreyee | 5 August, 2015 - 10:52
आता टिपिकल रिपब्लिकन मतदार काय ट्रम्प चा फुल्ल अजेन्डा वाचतात थोडेच, ते तर टिव्ही / मिडिया बघूनच वोट करणार की. ते जॉब्ज, एकॉनॉमी वगैरे मुद्दे (असलेच तर) पोहोचताय्त तरी का त्यांच्यापर्यन्त ?? अन जर मिडिया मधे वाईट गोष्टीच दिसतायत तर रिपब्लिकन्स त्याला काय बघून सपोर्ट करताय्त नक्की ?!! असा प्रश्न पडलाय मला.
संपादन
धनि | 5 August, 2015 - 10:54
अहो आपण किती फॉक्स न्युज बघतो ?? (निदान मी तरी नाही बघत) त्यामुळे त्याचे मुद्दे जे रिप मतदारांकडे पोचतात ते आपल्याकडे नाहीच पोचणार
वैद्यबुवा | 5 August, 2015 - 10:56
भौ, तो मला टोटली आउट ऑफ टच वाटतो. त्यामुळे असतीलही काही चांगल्या गोष्टी पण ओवरॉल तो आजिबात फिट वाटत नाही प्रेझ बनण्याकरता. मी एकदा पुर्वी लिहिलं होतं मोदी निवडून येत होते तेव्हा.
बारिक बारिक गोष्टींमध्ये तुम्ही किती टच मध्ये आहात आणि किती फक्त दांभिकपणा करत आहात हे दिसून येतं. दर वेळेस पोलिटकली करेक्ट बोलायची गरज नाही आणि माणूस चिडू शकतो हे लोकांना समजतं पण सातत्याने वेड्यासारखं बोलण्यावर तुमची कॅम्पेन बेस करु शकत नाही.
धनि | 5 August, 2015 - 11:02
मी काय त्याचा सपोर्टर नाही. फक्त त्याला असलेला जनाधार इतकाही लल्लु नाही असं म्हणायचं आहे मला. तो अजुन काही दिवस असा अक्रस्थाळा राहिला तर रेटिंग कमी होईल. पण जर त्यानी या डिबेटचा उपयोग त्याचा चांगला प्लॅट फॉर्म मांडण्याकरता केला तर रेटिंग वाढेलही. तो उत्तम बिझनेस्मन आहे. आपली स्वतःची संपत्ती कशी वाढवायची हे त्याला बरोबर कळाते. (भांडवलशाही ओ )
अर्थात हा सगळा मार्केटिंग आणि जर तर चा खेळ आहे. २ दिवसांत सगळे कळेलच
बॉबी जिंदाल पण आहे ना रेस मधे
बॉबी जिंदाल पण आहे ना रेस मधे GOP कडून??
>>बॉबी जिंदाल पण आहे ना रेस
>>बॉबी जिंदाल पण आहे ना रेस मधे GOP कडून??<<
येस, बट हि डिडंट मेक द कट फाॅर प्राइमटाइम डिबेट. तो आणि उरलेले ५ इस्टर्नला हॅपी अवर डिबेटला आहेत.
ट्रंप बहुतेक गाजवणार उद्याची डिबेट...
आवाज कुनाचा, डोनाल्ड
आवाज कुनाचा, डोनाल्ड ट्रम्पचा
जिंकुन जोरात येणार कोण, ट्रम्प शिवाय आहेच कोण
ईट इज हाय टाइम, अमेरिका नीड्स प्रेसिडेंट लाइक ट्रम्प. अँड मार्को रुबिओ वीप.
फिलिप रॉथने रुझवेल्टच्या ऐवजी चार्ल्स लिन्डबर्ग निवडून येतो अश्या कल्पनेवर द प्लॉट अगेन्स्ट अमेरिका नावाची कादंबरी लिहिली आहे. तिचे खर्या आयुष्यातले वर्जन ट्रम्प निवडून आला तर दिसेल.
हे घ्या वातावरण निर्मितीकरता
हे घ्या वातावरण निर्मितीकरता
https://www.youtube.com/watch?v=8vkxvyM3v7k
ट्रंप येवु नये असे मला
ट्रंप येवु नये असे मला वैयक्तिक वाटते. फार जास्त अॅरोगंट वाटतो. बाकी लोकांचा किती विचार करेल आणि मी म्हणेल तेच असा जास्त विचार करणारा वाटतो.
हिलरि परवडेल
हे मा वै म
फा ते भारी आहे. सकाळीच
फा ते भारी आहे. सकाळीच पाहिले. हार्ड बॉल मधले डुज अँड डोण्ट्स पण बघ ते पण मस्त आहेत.
हॅपी अवर डीबेट फार ड्रॅमॅटिक
हॅपी अवर डीबेट फार ड्रॅमॅटिक नव्हतं पण मला वाटले की त्यातल्या त्यात कार्ली फिओरिनाने लक्ष वेधून घेतले.
देसी चेहर्याच्या माणसाकडून ( जिन्दाल) तो सदर्न अॅक्सेन्ट बघून मजा वाटत होती.तेवढंच एक लक्षात राहिलं.
चला आता मेन डीबेट बघा.
फॉक्स च्या वेबसाईट वर नीट
फॉक्स च्या वेबसाईट वर नीट चालत नाहीये. क्रोम वर व्हिडीओ दिसतो पण आवाज येत नाही. बाकी ब्राउझर वर व्हिडीओ सुद्धा दिसत नाही. अॅप वरूनही नाही.
ट्रंप ने पहिल्याच बॉल ला
ट्रंप ने पहिल्याच बॉल ला सिक्स मारला !
फॉक्स वर दिसतय मला. हि लिंक
फॉक्स वर दिसतय मला. हि लिंक बघ ट्राय करुन
http://video.foxnews.com/v/2553193403001/fox-news-channel/?#sp=watch-live
Mala disatay and Trump is
Mala disatay and Trump is killing it.
अरे सही, धन्यवाद मीपु. तेथे
अरे सही, धन्यवाद मीपु. तेथे बघता येत आहे.
ट्रम्प इज किलिंग द डिबेट! हा
ट्रम्प इज किलिंग द डिबेट!
हा इराण फोबिया किती वर्षं राहणार आहे अमेरिकेत? ९/११ केलं सौदींनी तालिबानच्या मदतीने. इराण आणि इराकने मदतीची तयारी दाखवली अमेरिकेला तर इराकची वाट लावली आणि इराणला अजून शिव्या घालताहेत. भारतापेक्षा इल-इन्फॉर्म्ड लोक आहेत. आमच्या वड्डीतला शेतकरीसुद्धा जागतिक घडामोडींवर अधिक सजग असतो.
ट्रम्प चे बँकरप्सी बद्दल चे
ट्रम्प चे बँकरप्सी बद्दल चे उत्तर अॅज अ सीईओ एकदम किलर आहे. पण जेथे प्रायव्हेट बिझिनेस सारखी क्लॅरिटी नसते - जेथे तुम्ही सर्वसामान्य जनतेला उत्तरदायी आहात तेथे हे चालेल असे नाही.
५ च्या डीबेट च्या क्लिप मधे
५ च्या डीबेट च्या क्लिप मधे कार्ली इराण चे डील रद्द करेन म्हणताना स्वतःच इराणी दिसत होती :). तो सॅण्टोरम होता का - जो म्हंटला २४ वर्षांपूर्वी इराण हॉस्टेज सिच्युएशन ची आठवण करून मी डील रद्द करेन म्हणत होता? मधल्या २४ वर्षांत काय झाले यांना माहीत नसावे.
किती विखारी बोलतायत सगळे
किती विखारी बोलतायत सगळे !!
इराण डील फाडणार म्हणे पहिल्या दिवशी आणि ओबामा केअर पण रद्द करणार...
हो रिपब्लिकन सगळे इराण डील
हो रिपब्लिकन सगळे इराण डील विरूद्ध बोलणार, इस्त्रायलशी जवळीक हा कॉमन फॅक्टर आहे. इव्हन रॅण्ड पॉल सुद्धा 'पोश्चर' जास्त दिसतोय आज.
पण समजा रिपब्लिकन्स आले तर
पण समजा रिपब्लिकन्स आले तर खरच असं करतील का? म्हणजे मी आधीची फारच कमी डिबेट पाहिलेयत आणि ती रिप वि डेम. सो त्यात असं नसायचं.
सुदैवाने यातले कुणीही
सुदैवाने यातले कुणीही हिलरीसमोर टिकणार नाहीत. अमेरिकेत अजून अॅबॉर्शन निवदणूकिचा मुदा असू शकतो हेमजेशीर आहे. ट्रम्प बहुदा अमेरिकेचे दिवाळे काढणार ! आपापले डोलर्स भारतात पाठवून द्या रे !
पण समजा रिपब्लिकन्स आले तर
पण समजा रिपब्लिकन्स आले तर खरच असं करतील का? >> हो करतीलही. इस्त्रायल लॉबी ला सपोर्ट म्हणून. पण इथे कोण जास्त कॉन्झर्वेटिव्ह, कोण जास्त राईट विंग आहे याची स्पर्धा चालू असते. पोश्चरिंग चालते खूप.
बुश व मॅकेन हे उत्तम उदाहरण आहे. मॅकेन २००८ च्या निवडणुकीत कॉन्झर्वेटिव वाटला ओबामाच्या तुलनेत. पण आधीच्या निवडणुकीत रिपब्लिकन डीबेट मधे बुश ने तो जास्त लिबरल आहे असे प्रोजेक्ट करून त्याला हरवले होते.
मॅकेन ला मी २००८ मधे हसलो पण 'गेम चेंज' वाचल्यावर पूर्ण मत बदलले.
दुसर्या टर्मसाठी
दुसर्या टर्मसाठी प्रेसिंडेटला परत इंटर्नल डिबेट करावी लागतात का?
आणि हे लोक म्हणतात ओबामा
आणि हे लोक म्हणतात ओबामा जास्ती डिव्हिजिव्ह आहे
नाही फक्त कोणी अपोझिशन असेल
नाही फक्त कोणी अपोझिशन असेल तरच. त्यामुळे मागच्या वेळॅस पहिल्या डिबेट मध्ये ओबामा खुप रिलेक्स दिसला कारण प्रॅक्टीस नव्हती ना
दुसर्या टर्म ला पार्टीचा
दुसर्या टर्म ला पार्टीचा विरोध नसेल तर आख्खी इंटर्नल प्रोसेसच होत नाही बहुधा. यावेळेस दोन्ही कडे होत असल्याने जास्त मजा आहे.
सगळे जीओपी कॅन्डिडेट्स येडपट
सगळे जीओपी कॅन्डिडेट्स येडपट दिसतात.
अमेरिकेन निवडणुक पहिल्यांदाच
अमेरिकेन निवडणुक पहिल्यांदाच follow करत आहे. आमच्या गावातच हा डिबेट असल्याने आणि ओहायोचा उमेदवार नव्याने स्पर्धेत उतरल्याने आमच्या कंपनीत रिपब्लिकन्स लोकाचीच चर्चा चालु होती.
रॅण्ड पॉल एरवी बरा असतो
रॅण्ड पॉल एरवी बरा असतो ना?
आत्ता तो कोण बोलला? जॉन स्टुअर्ट लेव्हलचा भन्नाट कोट होता - हिलरी च्या मेल्स बद्दल कॉंग्रेस च्या लोकांपेक्षा चायजीज हॅकर्स ना जास्त माहिती आहे! खलास. right on target!
ख्रिस्टी ने वजन उतरवले आहे का
ख्रिस्टी ने वजन उतरवले आहे का गेल्या काही महिन्यांत?
काल कोणत्या तरी कॉमेडियन ने म्हंटले - they want to bring a balance to the debate. so they are going have Chris Christie on one side and everybody else on the other
जॉन स्टुअर्टने एवढी निवडणूक
जॉन स्टुअर्टने एवढी निवडणूक संपवून जायचं! ही विल बी मिस्ड.
(पण ट्रेव्हर मस्त आहे. )
गेल्या वेळी कोल्बेर 'या वेळचे मतदार नॉट ओबामा आणि नॉट रॉमनी अशा गटांत विभागले आहेत' असं म्हणाला होता.
औंदा 'नॉट हिलरी' आणि 'नॉट जीओपी' असे असणार बहुधा.
Pages