दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाटतो जि. कमल हसन त्याच्या तरूणपणी हँडसम होता हे रीयाला माहीत नसावं. हे पटलं तर उसकी ना भी हां मे बदल जाएगी! Proud
बायदवे, रीया, अजय देवगणचा चेहरा उभट नसून कैवल्यचाच चेहरा उभट आहे. Lol

बायदवे, रीया, अजय देवगणचा चेहरा उभट नसून कैवल्यचाच चेहरा उभट आहे.
>>>>
म्या पामरानं कै बी म्हणलेलं नै जी Proud

कमल हसन केवढा, कैवु केवढा Proud

रियुडी... तेरा पत्ता कट..... ए ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए Rofl

अघोरी आनंद रीया Proud

रीया.... वन मोर सॅड न्यूज फॉर यू...

आज सुजा ची बहीण सगळ्यांना अ‍ॅना ताई रेश्मा ताई मिनल ताई आशू दादा आणि.....

कैवल्यला फक्त कैवल्य म्हणाली Proud

ए ढिंक चिका ढिंक चिका Rofl

दोन दिवस वेरी टची एपिसोडस.

सुप्रिया सर्वांना दादा ताई म्हणाली, कैवल्य सोडून. रिया मलापण तेव्हा तुझीच आठवण आली.

यावर रियाची reaction कशी असेल, असं आले मनात. Lol

ती आता कैवल्यची गफ्रे होणार आणि मानसिक स्थिती सुधारणार!
बादवे मिनल अ‍ॅना रेश्मा काय लहानपणीचे खेळ खेळतात.. अगदीच वेळ जात नाही बहुतेक सगळ्यांचा.

अंजूतै, मी कालचा एपिसोड पाहिलाच नाही Wink
भुंग्या, माझ्यासारखी असेल ती ताई दादा म्हणणारी.
मी पण कित्येकांना दादा म्हणत नाही म्हनून लगेच ते माझे बॉफ्रे थोडीच होतात Proud

काल काय झालं?

थोपुवर त्यांच्या पेजवर कमेंट्स आहेत कैवल्यने सॅक्रिफाईज केलं अ‍ॅण्ड ऑल :आओ:
काय केलं? गिटार बिटार विकली का?

सुजयच्या बहिणीसाठी डॉक्टरची अपॉईंटमेंट आणि पैसे देण्यासाठी कैवल्यने आपल्या वडिलांना फोन केला होता. त्यांनी त्या बदल्यात आई तुला चोरुन भेटते हे मला माहीत आहे, पण यापुढे माझ्या परवानगीशिवाय आईला भेटायचं नाही अशी मागणी केली ज्याला कैवल्यने होकार दिला आहे.

रीया..... सुप्+रियाने बाजी मारली Proud

तिची दोन अक्षरं भारी पडली तुझ्यावर Rofl

शूटिंग माझ्या घराजवळच आहे गं.... कधी आलीस गोरेगावला तर ये. भेटू तुझ्या कैवुला.

हो क्यूट म्हटलं गाणं दोघांनी!
सुजय सुप्रिया चं पण नातं किती छान दाखवलंय! किती मस्त वाटतं असा काळजी घेणारा मोठा भाऊ असेल तर!

कैवल्य चे डोळे मोठे असले तरी खूप बोलके आहेत. त्यातून सहजरीत्या भाव प्रकट होतात. सुजय ने दिलेले गिफ्ट पाहिल्यावर,सुप्रियाला पहिल्यांदा भेटल्यावर, हाॅस्पिटल मधून बाबांशी फोनवर बोलता ना खूप मस्त अभिनय .. आणि खूप बोलके डोळे..
हाॅस्पिटल मधला सुजय आणि कैवल्य चा सीन.. खूप टचिंग..

कालचा भाग मिसला. परवाच्या भागातले सुजय-कैवल्य-सुप्रिया यांच्यातले सगळे सीन्स मस्त जमले होते. पक्के मित्र म्हणून सुजय-कैवल्य मस्त शोभत होते.

मलापण आवडले मागचे दोन्ही भाग. कैवल्यचा अभिनय मस्त होता.
बसची वाट पहात सुप्रिया आणि तो उभे असतात तेव्हा तर गॉगल घातलेला केके कसला टवका दिसलेला.
नर्सच्या गेलेलेलेलेवरून त्याने सुप्रियाला हसवलं ते पण भारी होतं.

हळूहळू उताराला लागतेय शिरेल.. प्रचण्ड कंटाळवाणे होते, मागचे दोन भाग >>> +१०००००

खराच कंटाळवाणे वाटले मागील काही भाग. लेखकांना काही नविन सुचत नाहिये का?

काहीच नसेल तर निदान कैवल्य आणि सुप्रिया ची लव्हस्टोरी तरी पुढे न्या.

फ्रेंडशिप डे साठी रिमांडर लागतं तर मग ही कसली फ्रेंडशिप???? आणि तो मक्ता काय फक्त अ‍ॅनानेच घेतलाय का? रेश्माचं कॅरेक्टर मंद आहे, त्यामुळे तिचं सोडा, पण कैवल्य, आशु, मीनल यापैकी कोणालाच फ्रेंडशीप डे लक्षात येऊ नये ?

फ्रेंडशीप डे साठी रिमांइडर कशाला? मला तर वाटते बहुधा मालिका निर्माते च विसरले असावेत.ओढून ताणून तो भाग मध्येच आणला अस वाटतं. अन्यथा फ्रेंडशीप डे वर खुप छान काहीतरी , सेलिब्रेशन वैगेरे अपेक्षित होतं.
फक्त सुजय चा डायलॉग आवडला.. माझ्या साठी मैत्री म्हणजे श्वास!! व्वा.!

पात्रं कॅरीकेचर करायची की रीअल हा घोळ अजून स्पष्ट होत चालला आहे. वैयक्तिकरीत्या मला कैवल्य सुप्रिया हा ट्रॅक पहायला आवडेल. (बेस्ट फ्रेंडची बहिण आपली गर्लफेंड असणे हा हॅरी पॉटरपासून माझा फेव ट्रॅक आहे!!! असो.)

पण मध्येच हे अस्लं काहीतरी चिरकुटपणा करतात तो अजिबात बघवत नाहीये. एक तर सिटकॉम ठेवा, तुफान विनोदी ठेवा नाहीतर तव्यवस्थित इमोशनल फंडे दाखवून पात्रं पुढं न्या. एकदा चार एप्सिओड असे आणि चार तसे हे करू नका.

Pages