होमस्टे एक संकल्पना

Submitted by आरती. on 7 July, 2015 - 05:07

स्वतःच होमस्टे सुरु करताना तसेच दुसर्‍याच्या होमस्टे मध्ये राहताना येणार्‍या अडचणी, तसेच फायदे तोटे ह्याबद्दल चर्चा करू या.

नीधप, शिर्षकासाठी धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कूर्गच्या एका होमस्टेमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो. घरातल्याच दोन खोल्या आणि स्वयंपाकघर मिळून त्यांनी पाहुण्यांच्या रहाण्याची सोय केली होती. जेवायला यजमान आमच्याबरोबर बसले होते. मुलीसाठी गरम मऊभात आणि घरातलच दुध/तूप वगैरे काढून दिलं. जेवण अगदी रुचकर होतं. त्यांचं घरही अगदी दाट झाडीत, कॉफी प्लँटेशनपाशी होतं. आम्हांला तिथे रहायला आवडलं असतं पण आधी अंदाज येत नव्हता कसं असेल वगैरे. तश्याप्रकारच्या होमस्टेमध्ये रहायला आवडेल.
कोकणात दिवेआगरला बापटांच्या घरी राहिलो आहे. तिथे त्यांच्या घराच्या मागे वेगळे दोन हॉल बांधले आहेत. रचना वर ललिताने लिहिली तशी. ते ही खूप आवडलं होतं. त्यांच्याकडचं नाश्ता, जेवण खूपच सुंदर होतं.
तारकर्लीला अजगावकरांकडे राहिलो होतो. ते अगदी कूर्ग सारखं होतं. ते वरचा मजला भाड्याने देतात. त्या काका काकूंनी जेवणाची सोय होणार नाही असं आधीच सांगितलं होतं. पण तिथेही मुलीसाठी खीर, भात वगैरे काकूंनी करून दिला. आमच्या जेवणाची सोय समोरच्यांकडे केली होती. दोन तीन दिवसांकरता रहायला ते ठीक होतं, पण त्यांचं राहतं घर असल्याने फार सोई नाहीयेत.

मला पटेल रुचेल अश्या होमस्टे ची व्याख्या करायची झाल्यास ती रिसॉर्ट वा हॉटेलला स्वस्तातला पर्याय अशीच असेल.

तर या अंतर्गत, ईंटरनेट, टीव्ही, ईंटरकॉम वगैरे तंत्रज्ञान, स्विमिंग पूल, एसी डायनिंग, ईनडोअर गेम्स, हॉटेलचा साबण, टॉवेल, टूथपेस्ट, टिश्यूपेपर, न मागता येणारा ईंग्लिश न्यूजपेपर, कॉम्प्लिमेंटरीच्या नावावर रूममध्ये ठेवलेले खायचे पदार्थ.... वगैरे फारश्या गरज नसलेल्या किंवा कमी वापरल्या जाणार्‍या, वा आहेत म्हणूनच वापरल्या जाणार्‍या वस्तू कटाप करत त्या बदल्यात पैसे कमी आकारले तर उत्तम.

जेवणाचे पैसे जेवू तसे ताटानुसार घेण्यात यावे.

शक्य तेव्हढी प्रायव्हसी घरातल्यांपासूनही हवी तसेच ईतर गिर्हाईकांपासूनही हवी.

रात्री ऊशीरा कधीही घरी परतायची सोय हवी, तसेच यामुळे कोणाला त्रास होतोय हि फिलिंगही न आल्यास उत्तम.

.....
क्रमश:

अवांतर - एक मस्त झोपाळा असल्यास उत्तम Happy

असे होमस्टे मुंबईत खूप आहेत.

ग्रँड मराठा
ताजमहाल
ओबेरॉय वगैरे

पुण्यातही बरेच आहेत.

कशाला कोकण आणि कूर्गला जायचे?

मला असे आवडेलः
१. निसर्गाच्या सान्निध्यात, नैसर्गिक / पारंपारिक साहित्यापासून बांधलेले छोटे घर/ बंगली. शक्यतो यजमानांच्या घराहून वेगळी पण जवळ. किंवा घरातच असेल तरी खाजगीपणा जपता येईल अशी. उदा. कोकणात कौलारू घर; जवळ समुद्र/ नदी, झाडे/ बाग.
२. नेटकेपणा + स्वच्छता.
३. उत्साही, (तात्पुरती) मैत्री करायला उत्सुक यजमान. Happy
४. अगदी वीज नसली तरी चालेल (इंटरनेट वगैरे लांबची गोष्ट) पण काय आहे, काय नाही हे आधीच स्पष्ट केलेले असावे. तिथे पोचल्यावर 'अमुक एक्ष्ट्रा' असे सांगू नये.

आणि रात्री काहितरी चावलं की वीज नसल्याने मस्तं साप होता की विंचू ते पण कळणार नाही.
अगदी गावातला ओरिजिनल अनुभव मिळेल.
Wink

वीज नसणे हा प्रचंड मोठा आनंद असू शकतो काही विशिष्ट ठिकाणी आणि काही विशिष्ट वेळी! विशेषतः कोकणात वगैरे (किंवा ट्रेकला / ग्रामीण भागात वगैरे) गेल्यावर वीज नसली तर जो जोर चढतो गप्पांना!

भेटलेली, न भेटलेली सगळी भुते त्या गप्पात येऊन जातात. Happy

रॉबीनहूड - अनुमोदन

पण मला वाटते साधारणपणे एक महिन्याच्या सुटीवर येणार्‍या लोकांसाठी हॉटेल, किंवा नातेवाईकांची छोटी घरे इथे राहण्यापेक्षा होमस्टे मस्त होत असावा. परवडतो की नाही हा जरा मोठा प्रश्न आहे.
मी माझा रास्तापेठेतील फ्लॅट असा होमस्टे करता द्यावा असा विचार हा धागा वाचून करते आहे.

नावालाही वीज नसताना संध्याकाळनंतरच्या रात्रीच्या पहाटेची सकाळ होताना मारलेल्या गप्पा आठवतात. हे ह्या धाग्याशी सुसंबद्ध नसेल कदाचित, पण आय हाय,

बेस्ट थिंग्ज इन नेचर आर फ्री

मग तो होम स्टे बाकी कसाही असो.

Happy

सर्व्हिस अपार्टमेन्ट आणि होम स्टे ह्यात फरक आहे ना?

व्यावसायिक कारणांसाठी सहसा सर्व सुखसोयींनी युक्त असे घर / सर्व्हिस अपार्टमेन्ट पाहिली जाते.

खरा आनंद घ्यायचा असेल तर व्यवसाय मधे न आणणे उत्तम!

Happy

एखाद्या ठिकाणी आपण जातो तेव्हा आपला मोबाईल चालला पाहिजे, त्यावरचे आंतरजाल उपलब्ध असायला हवे, रूममध्ये इन्टरकॉम हवा वगैरे अपेक्षा ठेवून जाणे हे 'आपलेच शहर' अठ्ठेचाळीस तासांसाठी तिकडे हलवण्यासारखे' आहे.

बाकी व्यवसायामुळे केवळ बिझिनेस क्लासने येणारे-जाणारे लोकही अश्या ठिकाणी गेल्यावर सगळ्याच अपेक्षा तश्याच ठेवतात आणि नंतर त्या त्या रचनेला नावें ठेवतात हे मजेशीर आहे,

तेथील सौंदर्य वेगळे असते. ते कोण किती कमवतो ह्यावर अवलंबून नसते. Happy

होम स्टे मधे माझ्या अपेक्षा पूर्ण करणाणारीरे ऑलरेडी आहेच आहे. शिवाय आमच्या होम स्टेमध्ये उत्तम जेवण, हव्या त्या वेळी चहा याखेरीज शोफर गाडी वगिरे सर्व काही असतं (बंधुराजांनी हे वाचू नये म्हणजे मिळवली!)

ऑन अ सीरीयस नोट, माझ्या दृष्टीनं होम स्टेचे दोन प्रकार! पहिल्यामध्ये साईट सीइंग करायचे आहे, त्यासाठी रात्री पाठ टेकायला आणि सकाळची आवराआवरी करायला सर्व उपलब्ध असावे. यात रात्रीचे, लंच पार्सल, नाश्ता, अंघोळीचे पाणी, इतर सोयी सुविधा आल्याच. थोडाफार लॉजिंगसारखाच प्रकार पण जरा आडगावात असल्यानं आटोपशीर.

दुसरा प्रकार म्हणजे जिथं निवांतपणे जाऊन चार दिवस रीलॅक्स व्हायचे आहे. त्यासाठी बर्‍याच सोयी हव्यात. जेवण उत्तम हवे. निवांतपणा हवा. लिहावाचायचे असल्यास तशी सोय हवी. इंटरनेट हवे की नाही हे व्यक्तीपरत्वे ठरेल. जवळ्पास फिरण्यासाठी समुद्र नदी वगैरे असे काहीतरी हवे. यजमानांची लुडबूड नको.

ह्या धाग्यावरून सचिन कुंडलकरच्या 'निरोप' सिनेमाची आठवण झाली. सुंदर सिनेमा आहे.

असे होमस्टे मुंबईत खूप आहेत.

ग्रँड मराठा
ताजमहाल
ओबेरॉय वगैरे

पुण्यातही बरेच आहेत.

कशाला कोकण आणि कूर्गला जायचे?>>>>>:फिदी:

त्या वाडीमध्ये, वाडीतल्या लोकांसारखे राहणे >>> 'होम'स्टे हे नाव त्यासाठीच आहे ना?>> +१००

मला नाही पटले अमांचे. कोकणात अनेक ठिकाणी फक्त आणी फक्त बिएसएनेल आहे अजून. ८-८ दिवस लाईट जाऊ शकतात व नेटवर्क डाऊन होते. तिथे ब्रॉडबँड वगैरेची अपेक्षा धरणे म्हणजे टु मच वाटले मला. म्हणजे ३ स्टार हॉटेलच हवे की. आराम करायचा असेल तर उत्तम दर्जाच्या हॉटेलातच रहावे. होमस्टे म्हणजे मला तरी आपण आपल्या कोकणातल्या नातेवाईकाकडे रहायला गेल्यावर जसे रहातो तसा असावा असे मला वाटते. उदा: घरगुती जेवण, सकाळची न्याहारी, शेतात त्यांच्यासोबत जाऊन नुसतेच उनाडक्या करणे व जमल्यास मदत करणे. आंब्याचा मोसमात आंबे काढणे, पाणी शिपणे, काही सामान हलवाहलवी असेल तर तिला मदत करणे, आरामात समुद्रावर जाऊन येणे व नंतर बिहीरवर पाटाला जाणार्‍या थंडगार पाण्याखाली बसणे वगैरे. असो. प्रत्येकाची वेगळी अपेक्षा असते म्हणा.

मृदुला +१०१

होमस्टे म्हणजे मला तरी आपण आपल्या कोकणातल्या नातेवाईकाकडे रहायला गेल्यावर जसे रहातो तसा असावा असे मला वाटते. >>> +१

प्रत्येकाची वेगळी अपेक्षा असते म्हणा.>>> ह्यालापण +१

हे फक्त कोकणातल्या होमस्टेविषयी चाललेले नाहीये बहुतेक.

पर्यटनासंदर्भात होमस्टेचा अर्थ स्थानिक लोकांच्या घरात पैसे देऊन राहणे जेणेकरून स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ, आदरातिथ्याची ओळख होईल असा आहे.

घरचे लोक आणि पर्यटक दोघांचीही प्रायव्हसी जपली जाणे ही अपेक्षा याबाबतीत चुकीची ठरत नाही. आपल्या नातेवाइकांकडेही आपण फारशी ओळख नसेल तर कंफर्टेबल नसतो. इथे तर अनोळखी लोक आहेत.

नातेवाइकांच्या घरातलीही सगळी व्यवस्था आपल्या जाण्याने तात्पुरती का होईना बदललेली असते. घरात एकच बेडरूम असेल तर सर्व बायकापोरे बेडरूममधे आणि पुरूषमाणसे हॉलमधे किंवा गॅलरीमधे अशी झोपायची व्यवस्था केली जाते. एकच बाथरूम वगैरे असते त्यात सगळे नंबर लावून आपले काम उरकून घेतात. इत्यादी. असा होमस्टे अनोळखी लोकांच्या घरात हवाय का? का? आहेत त्या नातेवाइकांकडे जा ना राहायला मग.

नेट कनेक्शन, टीव्ही हवे असणे नसणे हा ज्याचा त्याचा चॉइस आहे. आणि होमस्टेमधे तो देणे न देणे हा होमस्टेच्या मालकाचा चॉइस.

पर्यटनासंदर्भात होमस्टेचा अर्थ स्थानिक लोकांच्या घरात पैसे देऊन राहणे जेणेकरून स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ, आदरातिथ्याची ओळख होईल असा आहे. >>
घरचे लोक आणि पर्यटक दोघांचीही प्रायव्हसी जपली जाणे ही अपेक्षा याबाबतीत चुकीची ठरत नाही>> याला अनुमोदन.

पण तसे करत असताना २४ तास ब्रॉडबँड इंटरनेट सेवा, केबल टीव्ही, २४ तास गरम पाणी वगैरे अपेक्षा असल्या तर कशी कळणार स्थानीक संस्कृती, आडचणी व रहाणीमान.

या बेसिक गोष्टींची अपेक्षा नक्कीच असावी.
१. प्रायव्हसी असावी
२. बुकिंगची सोप्पी सोय असावी
३. सुरक्षा व पार्कींग असावे
४. स्वच्छता असावी
५. चांगल्या व अनलिमीटेड जेवणाची व्यवस्था असावी.

सॉरी पण अडचणी समजून घ्यायला नाही जात कुणी पर्यटनाला. तेव्हा काही सुविधांची अपेक्षा केली तर चुकीचे नाही.

अनलिमिटेड जेवण हे फसवे प्रकरण आहे. रेस्टॉरंटमधे ते एकवेळ चालू शकते कारण पसारा मोठा असतो. होमस्टेमधे तेवढा पसारा नसताना अनलिमिटेडची सोय करणे, ती व्यवस्था हे कसे शक्य होईल?
मग कश्या कळणार तुम्हाला अडचणी आणि राहणीमान?

प्रायव्हसी, कधीही बाहेर जाणे/येणे ह्यासाठी मोकळीक असावीच पण हॉटेलमध्ये राहिल्यासारखं त्या घराशी तात्पुरता आणि काही गोष्टींपुरता देखील काही संबंध नसल्यासारखंही नसावं. त्यांच्या घरी आपण पैसे देवून का होईना, पाहूणे म्हणून राहत आहोत इतपत समोरा समोर येणे होणारच. पैसे देवून जेवण, राहणे हे घरपण असलेल्या ठिकाणी असणे म्हणजे होम स्टे म्हणता येईल का? 'घरपण' ह्या संज्ञेत घराच्या पडवीत किंवा ओटीवर असलेल्या झोपाळ्यावर बसून ५-१० मिनिटे युनिफॉर्ममध्ये नसलेल्या पण तुमचा आपुलकीने पाहुणचार करणार्‍या घरातल्या मेंबर्सशी मैत्रिपुर्ण (तात्पुरत्या) बोलू शकणे हे पण येईल. म्हणजे तद्दन व्यावसायिक दृष्टीकोन असलेल्या हॉटेल्स आणि नातेवाईकांचं घर ह्या मधील एका पॉइंटला हे होमस्टे असावेत.

अनलिमीटेड यासाठी की अनेकदा एवढेच मिळेल, आधीच सांगा असे बजावले जाते. एकीकडे काही ठिकाणी लाईटपण नसताना ब्रॉडबँडची व्यवस्था हवी म्हणताना दुसरीकडे 'तेवढा पसारा नसताना अनलिमिटेडची सोय करणे, ती व्यवस्था हे कसे शक्य होईल?' असे म्हणणे परस्परविरोधी वाटत नाही का? तसेच 'मग कश्या कळणार तुम्हाला अडचणी आणि राहणीमान?' व 'अडचणी समजून घ्यायला नाही जात कुणी पर्यटनाल'

असो. ..

अरेरे सगळी संत्री सोलावी लागतात.
केप्या तुझ्याच लॉजिकमधला फ्लॉ सांगत होते तुला.
कुणाला ब्रॉडबॅण्ड हवे असेल तर कुणाला अनलिमिटेड जेवण. दोन्हीसाठी अडचणी कश्या कळणार तुम्हाला असे म्हणता येईल.
मेरी अपेक्षा उसकी अपेक्षासे ज्यादा व्हॅलिड याला काही अर्थ नाही.

ब्रॉडबॅण्ड, टिव्ही, एसी हवा असे म्हणल्यावर सगळे इतके तुटून पडलेत पण त्यांना तसं हवं असेल तर शोधतील तशी व्यवस्था. मिळेलही. उगाच याला काय अर्थ त्याला काय अर्थ काय करत बसायचं?

धन्यवाद सर्वांना खूप छान माहिती मिळत होत आहे.

स्वतःच होमस्टे सुरू करण्यासाठी माझी संकल्पना

१. मँगलोरीअन कौलारू घर -
फायदे - नैसर्गिक ताजी हवा खेळती राहते. भरपूर प्रकाश असतो प्रत्येक खोलीत कारण कौलांच्यामध्येच काच लावलेली असते. घरात थंडावा राहतो.

तोटे - मांकडांपासून त्रास, चोरांपासुन असुरक्षितता.

२. पूर्ण घरात शेणाने सारवणे पण ही शक्यता कमीच आहे कारण स्वतःची गाय, बैल, म्हैस असेल तर शक्य आहे. गुर सांभाळण्यासाठी, शेण सारवणे ह्या साठी बाहेरील व्यक्तीची मदत.

३. घरातील सुविधा - प्रत्येक बेडरुम अॅटॅच बाथरुम, जेवणाची सोय डायनिंग हॉलमध्येच कारण रुम सर्विस दिली कि रुम्स खराब करतात. नो टी.व्ही., नो एसी, बाहेर कडीवाला लाकडी झोपाळा, इनव्हर्टर कारण पावसाळ्यात वीजेचा लपंडाव त्यामूळे ते गरजेच आहे. वाय फाय सुविधा. हल्ली सुट्टितही ऑफिसच काम कराव लागत त्यामूळे ही गरज मान्य आहे. विहिरीचा वापर ज्यांना करायचा असेल त्यांना ती सोय उपलब्ध होईल.

४. निसर्गाचा पुरेपुर आस्वाद घेता येईल. आजूबाजूला संपूर्ण डोंगर-जंगल. कारने १/२ तासाच्या अंतरावर समुद्र. पण नो स्मोकिंग, नो ड्रिंक्स.

येणार्‍या पर्यटकांकडून काही अपेक्षा.

१. होमस्टेचे मालक काही नियम किंवा अटी देतात त्या पाळा.

२. जिथे होमस्टेच्या दृष्टीकोनातून काही त्रुटी जाणवत असतील तर नक्की सल्ला द्या.

क्रमश:

कुणाला ब्रॉडबॅण्ड हवे असेल तर कुणाला अनलिमिटेड जेवण. दोन्हीसाठी अडचणी कश्या कळणार तुम्हाला असे म्हणता येईल. <<<<< होमस्टे फक्त भारतिय पर्यंटकांच्या दृष्टीकोनातून नाही कंसिडर करत आहोत. इथे परदेशी नागरीकसुद्धा येतात. माझ्या मामेबहिणीकडे एक परदेशी पर्यटक १ महिना होते त्यामुळे ब्रॉडबॅण्ड ही गरज आहे. काही होमस्टे अनवट जागी आहेत, बहिणीचासुद्धा. त्यामूळे पर्यंटकांना ब्रेफा, जेवण काय हव हे विचारून सर्व लागणार्‍या वस्तू मार्केटमधून अगोदर घेऊन याव्या लागतात काहीवेळा बाजाराच्या दिवशीच अमुक तमुक मिळत. त्यामूळे कोण किती जेवणार ह्याचा अंदाज घेऊन जेवण बनवाव लागत. एखादा पदार्थ संपला तर १५ मि. पुन्हा मिळेल ही अपेक्षा करू नका.

मानसि साळुंखे<<<< मेल करते तुम्हाला.

आरती मी कुठे अनलिमिटेड जेवणाचा आग्रह धरलाय?

माझे म्हणणे कुणाच्याच अपेक्षांना इनव्हॅलिड ठरवू नये असे आहे. चालवणार्‍याने त्याचे काय करायचे हे त्याच्यावर आहे.

ओक्के नीरजा. होमस्टेत अस कसं असे वाटले ते लिहीले मी. त्यानंतर 'प्रत्येकाची वेगळी अपेक्षा असते म्हणा' हे पण लिहीले की मी.

आरती कल्पना मस्त आहे. मी नक्की येईल तुझ्याकडे. लवकर अमलात आण ही कल्पना. घरच्या घरी अशी सोय करणे फार वेळखाऊ काम असू नये. एक दोन ठिकाणी कुठे जाऊन राहून ये जिथे होम स्टे असेल म्हणजे तुला त्यातून काही माहिती मिळेल.

मी ईंडोनेशियाला ज्यांच्याकडे राहलो तिथे तर त्या काकूंनी मला दिवानखान्यात एक पलंग दिला. सून आणि मुलगा आतल्या खोलीत. किचनमधे जे केल ते मला दिल पण मी ते खाल्ल नाही कारण ते मासाहारी होत. मी तिथे एकच दिवस थांबलो फक्त एक अनुभव घ्यायचा होता. खास अशी कुठलीच सोय नव्हती. टिव्हीवर आपल्याचसारखे सास बहुचे किस्से लागले होते. एक गोष्ट लक्षात येत होती की आपल्याकडे कुणी भारतिय पाहुणा आला होता हे त्यांच्या जराही वागण्यातून वाटत नव्हते. सर्व जण आपल्याच तालात मग्न होते. त्याच घरात एक जर्मन म्हणे सलग एक महिना राहिला. माझा मुख्य प्रश्न खाणे पिणे नाहणी रेस्टरुम नीट असाव्यात. इथे मी तडजोडीला टाळतो. बाकी नेट, कुलर, वारा, पाणी, डास वगैरे बाबतीत मी इतका तंतोतंत नाही. मी बालीला गेलो होतो तिथे तर डासच्या डास होते. मग काढली मच्छरदाणी बाहेर. पण तो चाफ्याचा सुंगध इतका फिरत होता की ते डास आणि तो गंध एकसंध आठवण आहे उराशी.

Pages

Back to top