युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कलिगड चा ज्यूस रोज पिणे चालू आहे. पण बिया काढणे वैतागवाणे काम आहे त्यामुळे गाळून घेतले तर गर पण जातो काय युक्ती करता येइल

चुकून अति हेल्दी बेगल्स आणले गेलेत. काय ते होल ग्रेन, ग्लुटन फ्री वगैरे. बकवास लागताहेत, अतिशय कोरडे. कुणीही तोंड लावायला तयार नाहीये. कशात खपवता येतील? विकेंड मील म्हणून पोटात ढकलता आलं तर चालेल असा किंवा कुठलाही खपणेबल आयटम सुचवा.

ठ्यांक्स इन अ‍ॅडव्हान्स.

प्रॉसेसर मधून फिरव .. चीज, भाज्या, तिखट, मीठ, आलं, लसूण इत्यादी इत्यादी घालून टिक्की कर .. ( किती आहेत कल्पना नाही पण ही एक आयडीया आहे .. खूप असतील तर चार-पाच वेळा कर .. Wink

बकवास बेगल्सशी बदला
धारदार सुरी घे, कौन मधल्या उर्मिलाचे स्मरण कर आणि पाहिजे तशी हॉरिझाँटल किंवा व्हर्टीकल प्लेन मध्ये सपकन मारून पातळ पातळ चकत्या कर. त्या चकत्यांवर अजिबात दयाबुद्धी न ठेवता कापले तिथेच मीठ चोळ. उचल त्या चकत्या आणि त्यांना ओव्हनरूपी नरकाच्या आगीत २५ मिनीटे होरपळू दे!
बेगल्स जाऊन चिप्स आले. शत्रु संपला कि शत्रुत्त्व संपले असे तत्त्वज्ञान स्वतःला ऐकव आणि मस्तशा डिप मध्ये त्यांना बुडवून सुखाने खा. Wink

Lol सी. बघ माझी आठवण होते का हे राहिलं Wink

टिक्की करुन पाहिली, मस्त संपली. अजून दोन आहेत कदाचीत चिप्स ट्राय करेन Happy

वा सीमंतिनी...........मस्त बदला.
याहीपेक्षा एकदम इन्डियन(!!) बदला घ्यायचा असेल तर याच बेगलचे बारीक तुकडे करून चक्क मिक्सरमधेच अगदी बारीक खिमा करून चक्क फोडणीचे बेगल करायचेन्काय! कांदा मिरची कढिलिंब इ.इ. घालून त्याच्या अमेरिकन अवताराचा अगदी नायनाटच म्हणानात!
फोडणीच्या पोळी/ब्रेडसारखं.

प्राची. धन्यवाद.

पाककृती आहारशास्त्रमधले पाककृतीव्यतेरीक्त माहिती देणारे अशा सर्व बीबींसाठी विषयवार यादीमधेय अजून एखादा रकाना अ‍ॅड करता येऊ शकेल का? बाफचे नाव नक्की आठवत नसल्यानं सर्चमध्येही सापडेना, आणि एक एक बीबी उघडत बसणे फार जिकीरीचे आहे.

Pages