युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाच मिनिटांसाठीही नाही.
>>
हे का? त्याच्या छपाईच्या शाई मुळे का?
मला अ‍ॅक्च्युअली वाटतेलं भाज्यांना वगैरे चाले Uhoh
पण नकोच बुवा

दुसरं काही रिझन आहे का?

मागे मी फरसबीच्या भाजीच काय करायच ? अस प्रश्न विचारला होता .
बर्याच सुचनाही आल्या Happy .धन्यवाद.
या रविवारी , फक्त हिंग मोहरीची फोडणी दिली .
आमचूर , पावभाजी मसाला घलून परतली . जरा ओलं खोबर घातलं.
जरा कच्ची वाटत होती . भाताबरोबर कूकरला लावून एक शिट्टी काढली .
चांगली लागली आणि व्यवसथित मिळून आली होती .

बेस्नच्या पिठात तिखट मीठ वगैरे घालुन छोटे गोळे करुन फरसबी , गव्हार अशा भाज्यस्त घालुन शिजवायचे.

भाजी शिजली की एक चमचा दही घालुन हलवावे. भाजी मिळुन येते

फरसबीच्या भाजीच >>>>>> फरसबी बारीक कापायची.. तेलात जिरं, मोहरी, लसुण खोबरं पेस्ट, थोडं तिखट टाकुन भाजी परतायची.. पाणी न घालता थोडा वेळच परता. वरतुन चीज खिसुन टाका.. मस्त क्रंची अन टेस्टी होते भाजी

मी विचार करतेय निवडलेली भाजी आशुडी ऑफिसला का घेऊन आली असेल?? मुंबईत बायका ट्रेनमध्ये भाज्या निवडतात दुसर्‍या दिवसासाठी तशी हिने ठवली असेल का निवडून काल आणि मग बॅगेतुन काढायला वगैरे विसरली असेल का.... Proud

पुण्यातल्या बायका ऑफिसच्या बसमध्ये भाजी निवडतात,
किंवा,
हिंजवडीच्या शेतातली ताजी भाजी आशूला मिळाली असेल. Proud

फ्रिजंमध्ये भाज्या ठेवण्यासाठी नेट्च्या पिशव्या मिळतात त्या चांगल्या असतात का?
कोणी वापरल्या आहेत का?
कुठल्या मटेरिअल च्या घ्यायच्या अस काही स्पेसिफिक आहे का?
ठाण्यात अशा पिशव्या कुठे मिळतिल?
हुश्श बरेच प्रश्न विचारले

आनंदी फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्याच्या नेट च्या पिशव्या मी वापरते. मला त्याचा उपयोग होतो. टोमॅटो, काकड्या, भेंड्या एकाच ठिकाणी निट राहतात. ट्रे उपसून सतरा वस्तू काढण्यापेक्षा या नेटच्या पिशव्या उचलून हवी ती वस्तू काढता येते. फ्रिज स्वच्छ करताना ही सोपं पडतं. फक्त त्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबिर किंवा पालेभाज्या मी ठेवत नाही. सुकतात थोड्या.

Lol सिरीयसली, एवढ्या वर्षांच्या हिंजवडी प्रवासात (वास्तव्यात?!) आज पहिल्यांदा सकाळी येतानाच पालेभाजी घेतली. रोज सकाळी ताजी भाजी घेऊन बसलेला असतो तो भाजीवाला जवळच. ताज्या भाज्यांच्या मी आजन्म प्रेमात. रोज रात्री आठसाडेआठला माझ्यासारखीच मान टाकलेल्या भाज्या घेववत नाहीत.आज अखेर "अच्छा जी मैें हारी चलो मान जाओ ना" म्हणत भाजी घेतली व मुंबईच्या बायकांसारखी प्रवासातच निवडली. पण घरी जाताना त्या ती भाजी निवडत असतील या विचाराची थोडक्यात चुकामूक झाल्याने इथे येऊन मुंबैच्या बायकांना विचारणे भाग पडले. Proud पण आज घरी गेल्यावर ताकातली चाकवताची भाजी होणार म्हणजे होणार! भाजी गडावर पोचली की तोफांचे बार उडणार. Lol

ऑफिसात जाताना आणि ऑफिसातून येताना भाजी घेण्याच्या, निवडण्याच्या आणि साठवणुकीच्या युक्या सुचवा युक्त्या सांगा Lol

जुन्या सुती / रेशमी / ओर्गॅन्झा च्या ओढण्या होत्या बर्‍याच. त्याचे काही तरी कर म्हणून मी त्या मिनोतीला पाठवल्या होत्या.

तिने त्याच्या सुरेख भाजीच्या ब्यॅगा अन वाइन बॉटल साठी वापरायच्या बॅगा बनवुन पाठवल्यात.
मी पालेभाजी, भेंडी/ तोंडली/ गवार/ फरसबी हे सर्व त्यात भाजीच्या बॅगांमधे घालून फ्रिज मधे ठेवते. हिरवी मिरची टपर वेअर मधे, कोथिंबीर पण एक टपर वेअर मधे पेपर टावेल घालून ठेवते.

आशुडी, भाजी कुठे घेतलीस अन गाडीतून येताना निवडलीस तरी कशी? कं च्या बसमधे निवडलीस?

>>
हो ना !
हे सगळं +१ म्हणजे मला पण तसं करता येईल

बसस्टॉपवरूनच घेतली आणि कं च्या बसमध्ये निवडली
>>
मला फार हेवा वाटतो गाडीत भाजी निवडणार्‍यांचा... आशुडी, प्लीजच नोट Proud मल्टीटास्कींग किती असतं त्यात...

आनंदी ही लिंक बघ
माझ्याकडे सेम अशाच आहेत.
मी पुण्यात तुलसी मधुन घेतल्या. ठाण्यात कुठे मिळतील माहित नाही.

http://www.amazon.in/Multi-purpose-Vegetables-Fridge-Storage-Washable/dp...

सध्या मुलींसह घरी यायला साडे सहा होतात. आल्यावर कुकर लावुन जेवायला बसायला उशीर होतोय. तर सकाळी साडेसातला डाळ तांदूळधुवून थोड़े जास्त पाणी घालून कुकरमध्ये ठेवले आणि आल्यावर फक्त गॅस सुरु केला तर चालेल का? वीकेंड ला वरण शिजवून फ्रीजर मध्ये ठेवत कधी कधी. पण भातासाठी कुकर लावला जातोच तर वरणही त्यात शिजेल असे वाटल्याने बरेचदा आल्यावर वरणभाताचा कुकर लावते...
(सध्या कामाच्या वेळा/प्रवासाचा वेळ/ हंगामी सिंगल पेरेंटिंग/ लेकी ११ तास बाहेर असणे अशी बरीच challenging situation आहे. तयामुळे आल्यावर कुकर लावायला लागणारा वेळही अतिशय महत्वाचा आहे!) वेळ वाचवण्याच्या
अजून काही युक्त्याअसल्यास सांगा!

मला वाटतं खूप वेळ राहील पाणी तांदूळात. त्यापेक्षा तांदूळ डाळ स्वच्छ धुवून वगैरे डब्यात भरून कुकरमध्ये खालीही पाणी टाकून ठेवू शकतेस. संध्याकाळी आल्यावर फक्त पाणी ओतायचं आणि gas सुरू कर. मुली करणार असतील तर त्यांना किती पाणी घालायचं सांगून ठेव. राईस कुकर असेल तर एक दिवस साध्सा कुकरमध्ये दोन दिवसांची डाळ व त्या दिवशीचा भात लावायचा. दुसर्या दिवशीचा भात राईसकुकर मध्ये.
योडी, पहिलीच वेळ आहे (बहुतेक) शेवटची नाही (सं: रिनची जाहीरात). त्यामुळे तूर्तास हेवा दूर ठेव.
रीया, दोन प्ला पिशव्यात काम होतंय. एकात पानं टाकायची आणि जिच्यात भाजीची गड्डी ठेवलीये त्यातच जागा करून वेगळ्या काड्या टाकायच्या.

डाळ तांदूळधुवून थोड़े जास्त पाणी घालून कुकरमध्ये ठेवले आणि आल्यावर फक्त गॅस सुरु केला तर >>> मी करते असं बरेचदा. टोकाची थंडी असेल तर सकाळीच शिजवून ठेवते. बाकी वेळी संध्याकाळी घरी आल्या-आल्या गॅस ऑन करते. डाळ-तांदूळ भिजलेले असल्यानं कमी वेळात शिजतात.

वत्सला, खालील युक्त्या आहेत -

१. सकाळीच डाळ तांदळाचा कुकर करून डाळभात तयार करून ठेवायचा. आल्यावर कुकरची शिट्टी काढून कुकरमध्येच वाफवायचा.
२. डाळ व भात एकत्रही (मिक्स करून) शिजवू शकतेस. शिजताना थोडे मीठ व तूप घालायचे. हा प्रयोग एकदा करून बघ. सुंदर चवीचा भात तयार होतो. मूगडाळ असेल तर औरही बढिया! अशा गरमागरम भातावर वरून तूप/दूध घेऊन छान लागतो. गार भात दह्याबरोबर छान लागतो. (अगोदर तयार करून आयत्या वेळी वाफवू शकतेस)
३. मूडाखिचे किमान २-३ वेळा पुरेल इतपत मिश्रण परतून फ्रीजात डब्यात ठेवून द्यायचे. आवश्यकतेनुसार त्यातील भाग घेऊन त्यात गरम पाणी घालून दणदणीत वाफ आणायची व खिचडी हादडायची.
४. वर आशूडीने सांगितलेली युक्ती आहेच!

इलेक्ट्रिक राइस कूकर टाइमर असलेला वपरता येईल . किंवा वेगळा टाइमर असेल ( ख्रिसमस इ दिव्यांसाठी वापरतो तसला) तर त्याला राइस कूकर प्लग करा .
राइस कूकर मधे वेगळ्या स्टीलच्या भांड्यात तांदूळ पाणी घालून ठेवले तरी मस्त भात होतो. डाळ मी तरी कधि केली नाही. एक दोन वेळा ट्रायल केले तर पाणी / वेळेचा अंदाज येईल.

वत्सला, डाळ तांदूळ एकत्र धुवून सावलीत वाळवायचे. मग तेलाची फोडणी करून त्यात हिंग हळद मीठ घालून परतून ठेवायचे ( कोरडेच ) काही वेळा त्यात गोडा मसाला वगैरेही घालून ठेवायचा. हे मिश्रण कोरडेच असल्याने फ्रिजबाहेरही टिकते. मग आयत्यावेळी थेट कूकरमधे हे मिश्रण दुप्पट पाणी घालून शिजवायचे. ५ मिनिटात शिजते. १० व्या मिनिटाला ताटात वाढू शकता.

बेसनही असे फोडणीत भाजून त्यात तांदूळ परतून ठेवता येतात. हे मिश्रणही असेच शिजते. तूरीची डाळ, राजमा, अख्खे उडीद असे सगळेच कूकरमधे शिजवून ठेवता येते. हे सर्व फ्रीज करायचे.

थेट कूकरमधे केलेले पदार्थ, डब्यात ठेवून केलेल्या पदार्थापेक्षा जवळ जवळ अर्ध्या वेळात होतात. छोटा कूकर असेल तर आणखीनच चांगले.

वत्सला, असा कितीसा वेळ वाचेल डाळ, तांदूळ आधी धुवायला? त्या पेक्षा इतरही बर्‍याच युक्त्या वापरता येतील. पाहा पटतंय का?

एक प्रयोग करून पाहा-
बाहेरून घरी आलं की पहिले फक्त हात; साबणानी धुवायचे.
लगेचच वेळ न घालवता डा, तां धुवून कुकरला लावायचे. मग कपडे बदलणं, व्यवस्थित हात, तोंड, धुणं/ आवश्यकता असेल तर आंघोळही करणं, हे कुकरच्या वेळेत होतं.
कुकर गार होईतो, दुसरंही काही करता येईल.

हे फक्त कुकरच्या बाबतीत झालं; तशी चर्चा वर आहे म्हणून.

बाकीही बरंच काही करता येऊ शकेल. इथे आस्वपू चे बाफ आहेतच.
- पोळ्या, पराठे जास्त करून ते वापरता येतील.
- भाजी एकावेळेस जास्त चिरून ठेवणे. त्यातलीच मग दोनदा करता येईल.
- नारळं खवून ठेवता येईल.
- कांदा कापून, परतून ठेवता येईल
- आलं, लसूणाची तयार पेस्ट वापरता येईल इ... Happy
बेस्ट ऑफ लक!

वत्सला स्लो कूकर (क्रॉकपॉट) घेतला तर चांगले जमेल. $६० ते $१५० घेऊ त्या रेंज मध्ये मिळतो आणि रोज रोज वरणभात वर लिमिटेड नाही राहणार. उसळ इ पण करू शकता.

फ्रीज बॅग साठी दक्शुताईला अनुमोदन .
एकदम काम की चीज .
भेंडया , गवारया, काकडी-टॉमेटो साठी अगदी उपयोगी . फ्रीजमधल सामान उपसण एक्दम सोप होतं , आणि बरीच जागा वाचल्यासारखीही होते .

ग्रुहपयोगी वस्तूंच्या दूकानात मिळाव्यात . अमेझॉनवर फार महाग वाटल्या .
मी एकेवर्शी हळदी-कुंकवाला वाटल्या होत्या . त्यावेळी ३५ रु. चा तीन चा सेट घेतला होता.
यापेक्शा थोड्या कमी क्वालिटीच्या असतिल पण ४ वर्श झाली अजून टिकल्या आहेत .

अलिकडे दोन मैत्रिणींनी असला कूकर घेतलाय अन त्यांचे दोघींचे एकदम चांगले रिव्ह्यू आहेत

http://www.amazon.com/Instant-Pot-IP-DUO60-Programmable-Generation/dp/B0...

7-in-1 Multi-Functional Cooker--Pressure Cooker, Slow Cooker, Rice Cooker, Saute/Browning, Yogurt Maker, Steamer & Warmer
Large, easy to use control panel with 14 built-in Smart Programs, Dual pressure, Automatic keep-warm and 3 temperatures for saute and slow cook

Pages