Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवे विषय मिळत नाहीत बहुतेक...
नवे विषय मिळत नाहीत बहुतेक... (लेले काय, दाढ काय.... ) शिरेल होणार आता..
रेश्माला भांडण शिकवण्याचा
रेश्माला भांडण शिकवण्याचा एपिसोड ठीक होता. पण आता पूर्ण फोकस ने बघण्याएवढे एंगेजिंग वाटत नाहीत एपिसोड्स.
Rama abhay, & admin, Ha dhaga
Rama abhay,
& admin,
Ha dhaga 'public' kara na.
सुजय बाहेर अडकतो उघडा तो
सुजय बाहेर अडकतो उघडा तो एपिसोड बोअर झाला. उगाच ओढूनताणून ताणलेले संवाद. शेजार्यांकडून्/ओळखीच्यांकडून एक शर्ट मागायला किती अवघड आहे. आणि भर मुंबईत कोणी उघडे असणे यात एवढे मोठे आश्चर्यही काय आहे. खूप कृत्रिम सीन्स्स.
कालचा सुजयचा उघड्या अंगाने
कालचा सुजयचा उघड्या अंगाने घराबाहेर अडकण्याचा एपिसोड आवडला. सुजयचं आधी लाजेने कशाही मागे शरीर लपवणे आणि शेवटी निर्लज्जासारखी पोझ देणे हे भारी होते.
शेजार्यांकडून्/ओळखीच्यांकडून
शेजार्यांकडून्/ओळखीच्यांकडून एक शर्ट मागायला किती अवघड आहे. आणि भर मुंबईत कोणी उघडे असणे यात एवढे मोठे आश्चर्यही काय आहे.>>
फारएण्ड त्याला अशी सवय नाहीये उघडा राहण्याची अगदी घरातही तो कधीच बनीयन वा शाॅर्टस् वर दाखवलेला नाहीये आतापर्यंत च्या भागांमध्ये. नेहमी पूर्ण कपड्यात असतो. अशावेळी तो जर घराबाहेर अडकला तर त्याला ऑकवर्ड वाटणारच. आणि अशा अवस्थेत शेजार्यांकडे जाणे अवघडच.
अरे एकदम उलट्या प्रतिक्रिया
अरे एकदम उलट्या प्रतिक्रिया दोन :). निधी - ओके त्याला लाज का वाटते ते पटले. शेवटी पोजेस देतो ते ही मस्त. पण ते सोसायटीत असलेले कोण ते त्याच्याशी बोलतात तेव्हा मी लॉक आउट झालो आहे थोडा वेळ एखादा स्पेअर शर्ट द्या असे तरी? त्यावेळचे संवाद हे उगाच विनोद निर्मीती साठी ताणलेले वाटले. अशा वेळेस दोन नॉर्मल माणसे जसे बोलतील तसे वाटत नाही.
त्यावेळचे संवाद हे उगाच विनोद
त्यावेळचे संवाद हे उगाच विनोद निर्मीती साठी ताणलेले वाटले. अशा वेळेस दोन नॉर्मल माणसे जसे बोलतील तसे वाटत नाही.>> हो तसंच वाटलं मलाही. पण मी जरा चालवून घेतलं ते. कारण मला या भागाची कल्पना आवडली.
माझी पण फेव सिरीयल
माझी पण फेव सिरीयल
Fa, society madhala to
Fa, society madhala to manushya ya mulanchya shatrupakshat ahe.
Tyachya muline sujay la anun dilela shirt pan to gruhasth gheun jato he dakhavalay ki
हो,नागावकर त्याचे नाव. आणी
हो,नागावकर त्याचे नाव. आणी त्याची कालच्या पार्टीतली मुलगी प्रगल्भा, जी कैवल्यकडे गाणे शिकायला आलेली असते, आणी सुजयला शर्ट देते. वर निधी म्हणते ते बरोबर आहे, सुजय कधी शॉर्ट्स वर पण नाही दाखवला, त्यामुळे त्याला असे उघडे बसणे लाजीरवाणे वाटते.
पण कालच्या पार्टीचा पण भाग मस्त होता. किन्जल भाव खाऊन गेली. मला आवडली. टिपीकल गुज्जु टोन. ही मुलगी खरच गुजराती असेल का?
हो नागावकर! आठवले. तुमचे
हो नागावकर! आठवले. तुमचे पॉइंट्स समजले मला पण पटत नाहीत. अर्थात सिरीयल लिहीणार्यांनी ठरवले आहे हे प्रसंग कसे लिहायचे, ते बरोबर की चुकीचे यावर आपण काय वाद घालणार. मला पाहताना कृत्रिम वाटले एवढेच.
Mala kashi hi asli tari hi
Mala kashi hi asli tari hi serial fakt aavadate jari kahi bhaag pata nasal tari jase ki,
family ki friends ashi jar ka nivad karayachi asel tar kaay karayachi...? Mi family nivaden reshma pramaane.
Tumhi kaay nivadaal.?. Mee sagalyana mat vicharate aahe.
कृत्रिम वाटले याला सहमत. पण
कृत्रिम वाटले याला सहमत. पण विषयांतील साधेपणा कधी कधी अती बालीशपणाही आवडून जातो तसा आवडला हा भागही! प्रगल्भा व किंजलचे काम करणारी पात्रे बर्याच सफाईने काम करतात पण इतक्या भागांनंतरही रेश्मा, कैवल्य ही पात्रे मात्र अजून आपापला सूर चाचपडतातच आहेत. मीनलचा या भागातील हसण्याचा अभिनय अती कृत्रीम वाटला.
आशू, सुजय आवडतात. अॅना ठीक ठीक.
हल्ली पंचेसही मंदावलेत त्यामुळे मधूनच कधीतरी केली तरी चालेल अशी रिफ्रेशमेंट आहे ही सिरीयल.
"हिला नवर्याने टाकली
"हिला नवर्याने टाकली आहे"????
हा जगप्रसिद्ध डॉयलॉग मारण्याची जुर्रत झालीच कशी यांची? या संवादाचे जागतिक हक्क माननीय श्री अशोक सराफ व तितकेच माननीय श्री लक्ष्या यांच्याकडे कायमस्वरूपी आहेत
https://www.youtube.com/watch?v=vLZ10sKlGgc
फा काल एपिसोड पाहताना हाच
फा काल एपिसोड पाहताना हाच सीन आठवला होता!
:ह:::::
:ह:::::
फा+१ नवर्याने टाकलंय
फा+१
नवर्याने टाकलंय म्हटल्यावर रेश्माने हृदयद्रावक की काय ती किंकाळी फोडली असती, तरच हक्कभंग झाला असता
हो पण रेश्मा शान्तच होती. काल
हो पण रेश्मा शान्तच होती.:फिदी: काल लोकसत्तात मुलाखत वाचली यान्च्याबद्दल. छान वाटले वाचुन. कैवल्यचा बॉडीगार्ड मस्त!:फिदी:
कैवल्यचा बॉडीगार्ड आवडला. आणि
कैवल्यचा बॉडीगार्ड आवडला. आणि रेश्माला सारखं डोन्ट फ्लर्ट विथ बॉडीगार्ड म्हणणंही
काल कट्यार काळजात घुसली मध्ये खांसाहेबांचा शागीर्द म्हणून कैवल्य होता! राहुल देशपांडे समोर गातो म्हणजे तयारीचाच असणार.
कैवल्यचा बॉडीगार्ड आवडला. आणि
कैवल्यचा बॉडीगार्ड आवडला. आणि रेश्माला सारखं डोन्ट फ्लर्ट विथ बॉडीगार्ड म्हणणंही >> +१
पुढे ते मुव्ह मुव्ह पण जबरी!
रेश्माला भांडण शिकवायचा एपिसोड पण धम्माल! मला फारच आवडला.
काॅलेजच्या दिवसांत माझ्या फ्रेंडसनी मला पण असंच भांडण्याची कला शिकवण्याचा प्रयत्न केला होता... पण काहीच उपयोग झाला नाही. त्याची खुप आठवण आली.
हा बाफ सार्वजनिक नव्हता का
हा बाफ सार्वजनिक नव्हता का आधी. मी आजच बघतेय.
मला आवडते ही मालिका. मी उशिरा बघायला सुरुवात केली.
मीनल, आशु आणि सुजय फार आवडतात, अगदी सहज काम करतात. वेरी natural.
रेश्मा फारच रडी बाबा, हसते
रेश्मा फारच रडी बाबा, हसते आनंदात असते तेव्हापण रडीच वाटते.
कालच्या एपिसोडमधलं अॅनाचा
कालच्या एपिसोडमधलं अॅनाचा टोन भारी होता. "अॅना अॅट युअर सर्विस" नंतरचं छोटा हत्ती पण भारी.
सीरीयल डेलि सोपाइअवजी साप्ताहिक केली तर अजून बरीच चांगली चालेल आणि ओव्हरडोस होणार नाही असं वाटतंय.
आशूडी, काल कैवल्य त्या नाटकंत पाहून माझी लेक मह्णे, आता रेश्मा येते आणि आशूपण येतो.
येस, साप्ताहिकसाठी +१. तुझ्या
येस, साप्ताहिकसाठी +१.
तुझ्या बाळीचं ठीके गं, आमच्या घरातल्या मोठ्यांनाही ती खांसाहेबांची मुलगी मीनल वाटली
दिप्ती माटे रडेल बिचारी हे
दिप्ती माटे रडेल बिचारी हे वाचून...
काल कट्यार काळजात घुसली मध्ये
काल कट्यार काळजात घुसली मध्ये खांसाहेबांचा शागीर्द म्हणून कैवल्य होता!>>>>>>>>
हो.मीही पाहिलं काल. थोडा फार गातही होता बहुतेक.
या मंडळीकडे अकोल्याला लग्न
या मंडळीकडे अकोल्याला लग्न होतं महिन्याभरात.. तत्पूर्वी तिकडे कळल्यास लग्नात विघ्न येईल म्हणून रडूबाई कळवत नव्हत्या.. ते बहुतेक ५/६ वर्षानी होईल.. आता प्रत्येक जण न्हाणीघरात जातो येतो पासून दाखवायला सुरुवात केल्यावर तेवढा वेळ लागेलच..
मला हि सिरियल बघायला ठीक
मला हि सिरियल बघायला ठीक वाटते . त्या जानी आणि श्री पेक्षा तरी फार बरी आहे .
रिफ्रेशिंग वाटत नवीन चेहरे बघून आणि हि सिरियल बघून .
मला मिनल ,आशु , कॆवल्य आवडतो ….
या सिरियल चे टायटल सोंग लागले कि माझी अडीच वर्षाची भाची नाचायला आणि उड्या मारायला लागते …
कैवल्य त्या नाटकंत पाहून माझी
कैवल्य त्या नाटकंत पाहून माझी लेक मह्णे, आता रेश्मा येते आणि आशूपण येतो.
>>>>>>
Pages