युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्या दीप पाणी पुरी पण बनवतो? गुणाच्चा गं बाई सोन्या. सामोसे तळून लगेच फ्रीजात टाकून पाठ दुखत असेल त्याची.

नुसत्या पुर्‍या नै कै, पाणीपुरीसाठी लागणार्‍या गोड-तिखट चटण्या पण बनवतो. जिथे गल्लीगल्लीत देशीखाऊथांबे नाहीत तिथे राहाणार्‍यांसाठी खरंच गुणाचा ब्रँड आहे.

धन्यवाद मैत्रिणींनो. मी प्रत्येकी १० या हिशोबानेच ऑर्डर केल्यात. समजा उरल्याच तर नंतर घरी आणेन आणि पुढे काही दिवस एनजॉय करेन. Happy तिथे पार्टीला कमी पडू नयेत म्हणजे झालं.

अमा!smiley2.gif

लोकहो, office potluck साठी काहि चांगलि dish सुचवा प्लीज. एकिचे baby shower अस्ल्याने baby ही potluck theme आहे. मी सोडून सगळे non-indian पब्लिक आहे. शक्यतो भारतीय डिश हवी. main dish preferred.

p.s. हे सलाड already दुसरी एक जण आण्णार आहे. ते नको.
http://kitchentilesideas.com/baby-shower-favor-ideas-animal-theme/baby-s...

सत्यनारायणाच्या प्रसादा सारखा शिरा करा. शिरा करताना अगदी थोडं केशर घालुन तो साधारण स्कीन कलरचा करावा. तो एका बोल मध्ये शिगोशिग भरा आणि त्यावर काळ्या द्राक्षाचे डोळे, चेरीच नाक आणि लाल सफरचंदाच्या स्लाईसचे ओठ काढुन बाळ करा.

मनी मोहोर धन्यवाद. सत्यनारायणाच्या प्रसादा सारखा शिरा last potluck ला मिच नेला होता. त्या अधी एक्दा इडली पण नेली होति. बाकी काहिच नाही सुचले तर या दोन्हीतिल एक नेईन. puff pastry sheet मधे potato filling करुन ते दुपट्यातील गुंडाळ्लेल्या बाळासारखे दिसेल असे करायचे असा एक विचार करतिये.

स्टार्टरसाठी आयडियेची कल्पना - व्हाईट ब्रेड बिब च्या आकारात कापून घ्यायचा. थोडा टोस्ट करायचा. आवडत असेल त्या टॉपिंगने सजवायचा/ (डोश्यातील बटाटा भाजी, चटणीचे गोळे इ इ भारतीयीकरण करता येईल). किनारीला केचअप लावायचे. हवे असल्यास वरच्या टोकावर लेस्/दोरीचा लहान बो लावता येतो. त्याच्याशिवायपण व्यवस्थित बिब सारखे दिसते.

शिरा +१

अरे ब्लॅकबेरी उपलब्ध असताना डोळे अन जावळ दाखवता येऊ नये या लोकांना?!!
पण असं बाळ बनवून ते खायचं कसंतरीच वाटेल. >>> +१

अरे ब्लॅकबेरी उपलब्ध असताना डोळे अन जावळ दाखवता येऊ नये या लोकांना?!! >>> हो ना, कुठेही काहीही फळं वापरली आहेत Lol कदाचित नंतर ते बाळ खायला ( !! ) त्रास होऊ नये म्हणून मुद्दाम असे केले असेल

जे काही पदार्थ कराल ते बेबी फूड ट्रे सारख्या डिशेस मध्ये सर्व्ह करता येतील. फिंगर फूड ठेवता येईल. रंगीबेरंगी डिशेस, टेबलक्लॉथ, सर्विंग बोल्स वगैरे.
सलाड डेकोरेशन म्हणून कलिंगड कोरून बाळाचा पाळणा / क्रिब / बाबागाडी बनवता येईल. बटाटे, टोमॅटो, लाल मुळा, काकडी, गाजर वगैरे वापरून अॅनिमल कॅरॅक्टर्स बनवता येतील. सेंटरपीसही फळांच्या गराचे स्कूप्स / बॉल्स बनवून त्यांत लांब काड्या खोचून व त्या फ्रीज करून त्यांचा बनवता येईल. (फळांच्या 'लॉलिपॉप्स'चा गुच्छ). पाण्याचे किंवा पेयांचे ग्लासही बेबी थीमला साजेसे ठेवता येतील.

चेरी टोमॅटोज्, बेबी पोटॅटोज्, बेबी कॅबेजेस्, बेबी कॅरट्स् वापरूनही सलाद डेकोरेशन वा मेनू ठेवता येईल.

बटाट्याचे चिंटू पापड तळून, मिनी इडली - चटणी - सॉस, मिनी बटाटेवडे तळून, मिनी सँडविचेस - इंडियन टच म्हणून पुदिना चटणी वापरून बनवलेले, चिंटू समोसे यातलं काहीही मेनूसाठी ठरवू शकता. मिनी उत्ताप्पे, आप्पे, मिनी उडीदवडे, आकाराने छोटी थालिपीठे, साबुदाणा वडे वगैरे.
किंवा चांदकीच्या आकाराचे स्टफ्ड पराठे / आलू पराठे - चटणी.

आणखीही बरेच पर्याय आहेत. हे झटकन् सुचले म्हणून लिहिले.

सिमंतीनी,अकु,सिन्डरेला धन्यवाद. माझ्या पहिल्या पोस्ट मध्ल्या लिंक मधे ते फळांचे बाळ च आहे. ते नको आहे. बिब च्या अकारातिल bread किंवा मिनी उत्तप्पे नेईन. thanks again.

नारळाच्या वड्या करतेय खूप वेळ मिश्रण आटवलेय आत्ता ताटात घातलेय तरी गिच्गिचित वाटतेय. वड्या पडतील असं समहाऊ वाटत नाही. मँगो पल्प मुळे झालं का असं? आता वड्या नाही पडल्या तर पुन्हा हाच गोळा आटवू का? (देजाव्हू होतंय आधी विचारलंय की काय :अओ:) प्लीज लवकरच हेल्प

Pages