वीस एक दिवसाची भांडून घेतलेली सुट्टी, अजेंड्यावर असंख्य गोष्टी..मित्र, नातेवाईक, लग्न, सण ई. पण सर्वात पहिली नोंद केली होती ती जुन्या मित्राला भेटण्याची आणि तब्बल चार वर्षानंतर सह्याद्रीची प्रत्येक्ष भेट झाली.
हातात मोजकेच दिवस, त्यात फक्त तीन विकेंड्स त्यामूळे ट्रेक केला तर फक्त सह्याद्रीचा एकच भाग बघता येणार होता, त्यामूळे ट्रेक करण्याच्या तिव्र ईच्छेला आळा घालत, सह्याद्री बाईक ने भटकण्याचा निर्णय धेतला, जेणे करुन जास्तीत जास्त सह्याद्री डोळ्यात साठवता येईल.
मार्ग :
कल्याण - माळशेज घाट - खिरेश्वर - जुन्नर - घोडेगाव - आहुपे
आमच्या ह्या छोट्या भेटीचा हा धावता आढावा.
प्रचि १ : एकच ध्येय होतं या ट्रीपच : Travel Unlimited !!!
प्रचि २ : सह्याद्री सकाळ
प्रचि ३ : वसंतोत्सव
प्रचि ४ : पिंपळ जोगे धरण
प्रचि ५ : श्रद्धास्थान _/\_
प्रचि ६ : परीक्षा
मार्च पहिना म्हंटल की लहान पणापासुन पोटात गोळा येतो...कारण परीक्षा !!
ही मुलगी पहाटे सहा-सात वाजता शेतात बसुन अभ्यास करत होती.
प्रचि ७ : मासेमारी
मासे पकडण्यासाठी लावलेली जाळी
प्रचि ८ : स्वागत
सह्याद्रीने आमच स्वागत पावसाने केलं ते देखिल विजेच्या कडकडासकट, पावसाची शुन्य तयारी करुन गेलो असल्याने समोर दिसलेल्या घरात घुसखोरी केली. त्या घरात आमच स्वागत या कोंबडीने केलं.
दोन अनोळखी अर्धवट भिजलेले भटके, घरात येउ का विचारतात आणि उत्तर मिळतं "चहा घेणार का ? फक्त दुध नाहिये" .. कितीते आदरतीथ्य. धन्य झालो तो चहा पिउन.
प्रचि ९ : चित्र
ज्या घरात आम्ही आडोश्याला थांबलो होतो, त्यांच्या दारातून दिसणारं हे चित्र.
प्रचि १० : Life on the Edge
When life is on the edge then only one option remains nothing but to fight back.
सह्याद्रीतल्या प्रत्येकाच आयुष्य असंच कडेवरचं, माणुस असो वा मांजर.
प्रचि ११ : प्रवास
खड्डे आहेत म्हणुनच हा रस्ता सुंदर दिसत असावा... कदाचित आयुष्याचं पण असंच काहिसं असाव.
प्रचि १२ : क्षण
हातात आलेले काही क्षण सुटले तरी देखिल छान दिसतात.
प्रचि १३ : पाण्यासाठी दाही दिशा
१०-१२ कीमी अंतरावर दोन धरणं आहेत तरी देखिल...... पाण्यासाठी दाही दिशा पण कमीचं !!
प्रचि १४ : सांजवेळ
प्रचि १५ : आहुपे
देवराईतल्या मंदीरातल्या पडवीत पाणी साचलं होत, त्यामुळे रात्री गावातल्या एका घरात राहिलो.
आम्ही जेव्हा खाली पावसात भिजत होतो तेव्हा वर आहुपे गावात गारा पडत होत्या. सगळ्या पोरांनी गार पाणी प्यायलं होतं मडक्यात साठवुन ठेवल्या गारांच पाणी देखिल आम्हाला दाखवुन झालं.
पोरा-टोरां बरोबर आम्ही पण पिठ्लं भाकरी खाउन झोपलो आणि थेट पहाटे उठलो आणि कडा गाठला.
प्रचि १६ : सह्याद्री मधिल प्रत्येक पहाट ईतकीचं सुंदर असते
मच्छिंद्रगड आणि गोरखगड
प्रचि १७ : वाघ
चांगलाच मोठा वाघ(बिबट्या) गावातल्या बकर्या उचलायला आला होता. पोरं, माणसं, बाया, आज्या, म्हातारे सगळे त्याला पिटाळून लावायला त्याच्या मागे. तो वाघ माझ्या समोरुन गेला साधारण ५०-६० एक मिटर लांबुन... माझ्या हातात कॅमेरा होता, कॅमेरा ऑन होता, पण काही कळायच्या आत तो नजरे आड झाला.
प्रचि १८ : निष्पर्ण
प्रचि १९ : देवराई
माणुस हा निसर्गा समोर कीती लहान आहे.
प्रचि २० : देवराई
वानरांना हुसकुन लावण्याचा प्लॅन करत होती ही पोरं...
प्रचि २१ : देवराई
कधी कधी वाटतं की अश्या देवराई आहेत आहेत म्हणूनच हे सुंदर जंगल टीकून आहे.
प्रचि २२ : प्रतीबींब
कदाचीत पुढच्या वारीत ईकडे मोठा बंगला झाला असेल.
प्रचि २३ : एक संध्याकाळ सह्याद्रीत, आजून काय हवं सह्याद्री भक्ताला
प्रचि २४ : अमेझिंग सह्याद्री
प्रचि २५ : सह्याद्रीची लाल राजकुमारी
प्रचि २६ :
Four wheels move the body.
Two wheels move the Soul.
प्रचि २७ : पुन्हा भेटु
धन्यावाद,
तन्यम शेंडे
Travel
...as long as you can
...as much as you can
...as far as you can
सुरेख फोटो!
सुरेख फोटो!
सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद
सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद
तन्मय खत्री फोटो पण भेंडी
तन्मय खत्री फोटो पण भेंडी आम्हाला भेटला नाहीस
थॅक्स यो !! फारच कमी वेळ होता
थॅक्स यो !!
फारच कमी वेळ होता रे..माझ अनिरुद्धशी बोलणं झालं होतं पण बाहेर जायचा प्लॅन नाही होउ शकला...परत आल्यावर नक्की भेटूयात.
लय भारी .. झकास
लय भारी .. झकास ...
सह्याद्रीची ओढ लागलेय आता.. कधी माझ्या सख्याला भेटतोय अस झाल..
सुरेख आहेत सगळेच फोटो.
सुरेख आहेत सगळेच फोटो.
सुरेख फोटो.४,५,११,२४,२५ झकास.
सुरेख फोटो.४,५,११,२४,२५ झकास.
रोहित ..एक मावळा , सिंडरेला
रोहित ..एक मावळा , सिंडरेला आणि देवकी धन्यवाद
खूपच खूपच सुंदर
खूपच खूपच सुंदर
अप्रतिम , अति सुंदर , नयनरम्य
अप्रतिम , अति सुंदर , नयनरम्य , फाडू , लय भारी .......... तुमच्या फोटोज ना द्यायला उपमा कमी पडतील ..............
Four wheels move the body.
Two wheels move the Soul.
आणि वरील वाक्य तर नादच खुळा .
१
१
खूपच सुंदर..... एतक्या सुंदर
खूपच सुंदर.....
एतक्या सुंदर जागा आहेत सह्याद्रि मधे माहितिच नह्वत....
ह्याला म्हणतात
ह्याला म्हणतात 'फोटोग्राफी'....
ज ब र द स्त
निव्वळ अ प्र ति म !!! तुम्ही
निव्वळ अ प्र ति म !!!
तुम्ही काढलेले फोटोज नेहेमीच अतिशय आवडतात. त्यातल्या रंगांमुळे तर विशेष आवडतात
सुंदर....!!!
सुंदर....!!!
अफाट प्रकाशचित्रं. हे फोटो
अफाट प्रकाशचित्रं. हे फोटो पाहून अचानक तिथे जायला हवं असं वाटायला लागलंय.
निष्पर्ण अतिशय सुंदर
निष्पर्ण अतिशय सुंदर
धन्यवाद प्र-साद , विश्या ,
धन्यवाद प्र-साद , विश्या , cha, निसर्गवेडा, अगो , manuruchi , दक्षिणा आणि prafullashimpi !!
सुंदर....जबर......झकास..अप्रत
सुंदर....जबर......झकास..अप्रतिम फोटोज!!!!!!!!!!!!
Four wheels move the body.
Two wheels move the Soul.>>>>+१००००००००००००००००००००००००००००००००००
तन्मय. खूप सुन्दर फोटो...
तन्मय.
खूप सुन्दर फोटो...
धन्यवाद महेश्कुमार आणि
धन्यवाद महेश्कुमार आणि स्वच्छंदी
<<खड्डे आहेत म्हणुनच हा रस्ता
<<खड्डे आहेत म्हणुनच हा रस्ता सुंदर दिसत असावा... कदाचित आयुष्याचं पण असंच काहिसं असाव.>> खुपच छान...! हे मी face book वर टाकू का ?
जय धन्यवाद, टाका फेबवर फोटो
जय धन्यवाद, टाका फेबवर
फोटो शेअर करायचा असल्यास ही लिंक
क्लास आलेयत प्रचि
क्लास आलेयत प्रचि
Pages