युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे वेट grinder आलेला आहे. ( इडली डोसे पीठ वाटण्यासाठी ) त्यात पीठ वाटण्यासाठी दगड असतो
.
पूर्वीचे दगडी रगडे, पाटे- वरवंटे, जाते तत्सम गोष्टी direct वापरात नसत कारण दगडाची कचकच अन्नपदार्थात जात असे . त्यासाठी बहुदा कुठले तरी धान्य त्यातून बारीक करत असत आणि ते फेकून देत असत
हि ऐकीव माहिती आहे.

तर आता मी काय करू
अशी भानगड ह्या नवीन पद्धतीच्या grinder ला लागू होते का ?
का
वापरायच्या आधी काही तरी वाटून फेकून देवू ? अस असेल तर काय वापरू ?

आधी कुठे तरी वेट grinder वर चर्चा झाली होती. कुठल्या बीबी वर ते आत्ता आठवत नाही

लले, सांबार पावडरीत काहीतरी थिकनिंग (चणाडाळ, उडीद ई.) असावं. रसम पावडरीत ते नसावं. एकदा करून पाहायला पाहीजे रसम मसाला घालून सांबारात. Happy

मृणाल १,

तुम्ही तो खरखरीत काथ्याने घासून धूवून काढा, मग तेलाने पूसून घेवून फेकायचे साठी असलेले कुठलेही धान्य वाटून काढा.
(किड लागल्याने खराब झालेले धान्य वाण्याकडून नाहितर घावूक बाजारात मिळतात. तिथे पोती खराब झाल्याने ते बाजूला काढलेले असते).

तेल ह्यासाठी की काही खडडे असतील तर त्यात हे खराब धान्य अडकू नये. मग पुन्हा घासून धूवून काढा.
असे तीन एक वेळा केले की अम्मा घेते वापरायला.

For new wet grinder, it is best to grind one small cup of soaked urad dal one or two times. The batter is fairly sticky and cleans up any loose bits of the stone or other extraneous particles left over from the manufacturing and polishing process. Urad dal has Been traditionally used to prepare ragda for regular use- either new ones or after they were re-chiseled following years of use.

पार्टीला पुदिनावाले आलु गोभी केले होते स्वप्नाच्या रेसिपीने .. वेळ वाचवायला म्हणुन बटाटा- गोभी उकडुन घेतले.. भाजी टेस्टी झाली प्ण थोडा लगदा.. उरलेली भाजी भरुन पराठे मस्त लागतील .. पण ती भाजी थोडी घट्ट करायला काय करु? लाटताना बाहेर येतेय..

पण ती भाजी थोडी घट्ट करायला काय करु? >> ब्रेड घालून मळून घेतले तरी चालेल. नाहीतर थोडे कॉर्नफ्लॉर घालून भाजी गरम केली तरी जमेल. डाळीचे पीठ पण चालेल पण चव जरा बदलेल.

चनस, त्यापेक्षा त्यात बेसन व अजून तिखट मीठ मसाला घालून कोबीच्या वड्या कर. मी आत्ताच कालच्या उरलेल्या भाजीच्या वड्या उकडून ठेवल्यात. गार झाल्यावर फ्रिजमध्ये टाकणार आणि संध्याकाळी शॅलो फ्राय करून गरम गरम खाणार.

असे ना का कुठलाही गोभी. अश्विनीच्या रेसिपी प्रमाणेच करायचे जमेल की!
(फक्त कोबीवडीला कोथिंबीर, तीळ, ओवा असलं मराठी वळण देतो. इथे गोभी असल्याने पावभाजी मसाला, चाट मसाला असे काय वाटेल ते टाक!!)

हापू सचा साखरंबा वर्षभराचा टिकवण्यासाठी काय काय करतात? मी फ्रिजमधे नाही ठेवला तर मग २ महिन्यात बुरशी येते. आत्ता पक्का पाक करून मग त्यात शि जवलेल्या आंब्याच्या फोडी घालून एक चटका देवून ठेवलाय गार करत. ह्यापूर्वी कधी प्रिझर्वेटीव घा लून केलेला नाहीये.

सुमेधाव्ही ते सांगायला आधी साखरांबा खाऊन बघावा लागेल Wink
घरातील पब्लिक कितीही बजावले तरी कोण ना कोण ओला चमचा घालतेच साठवणीच्या पदार्थात. मग बुरशी येते. कार जशी वन हँड ड्राईव्ह ठेवावी म्हणतात तसे हे पदार्थ अंडर वन पर्सन कस्टडी ठेवावे. (आमच्या घरी आजी कस्टोडियन असे. ती झोपली असेल तर आई, आत्या कुणाची हिंमत नाही साखरांबा घ्यायची Happy ) आठवड्याला लागते तेवढे लहान सटात काढून फ्रिज मध्ये ठेवावे.

सुमेधा, हे असे मोरांबा, छुंदा, लोणचं, जॅम इत्यादी पदार्थ वर्षभर पुरण्यासाठी तुम्ही काय प्रमाण घेता? Wink
आमच्याकडे यंदा दोन किलोचा मोरांबा केला, तो दोन महिन्यात संपला म्हणून पुढच्या वर्षी पाच किलोचा केला, तर आता जास्त केलाच आहे तर ह्याला वाटू त्याला वाटू करत दोन महिन्यातच संपतो. मग पुढच्या वर्षी सात किलो, पुन्हा हे ते वाढतातच Proud
त्यामुळे आता अर्धा किलोचाच हौस म्हणून करायचा, साधारण पंधरा दिवस पुरवायचा. मग ह्याच्याकडून त्याच्याकडून तुझा नमुना बघू, तुझी चव बघू करत गोळा केलेल्या बाटल्या पुढचे पंधरा दिवस पुरवायच्या असं ठरवून टाकलं आहे Wink

जास्त प्रमाणात मोरंबा केला तर किलो किलोच्या बरण्यातच भरायचा व सील करायचा ( त्या आधी बरण्या कडक उन्हात सुकवून घ्यायच्या ) एकावेळी एकच बरणी उघडायची.

कैर्‍या वर्षभर मिळत नाहीत हे खरे आहे पण साठवणीच्या लोणच्या मुरंब्यात जास्तच मीठ व साखर घालावी लागते. ताजे मोरंबे व लोणची केली ( अर्थात ज्या भाज्या, फळे उपलब्ध आहे त्यांची ) तर साखर मीठ कमी घालून चालते.

आता जास्त केलाच आहे तर ह्याला वाटू त्याला वाटू करत दोन महिन्यातच संपतो. >> पुढच्या वर्षी दहा किलोचा करा , माझा मुंबैतला पत्ता आहेच तुझ्याकडे Happy

फार चांगला प्रश्न विचारलास मंजुडी. घरातली सगळ्यात मोठ्ठी बरणी भरून पहिला साखरांबा होतो. शिवाय मोठ्ठा चपटा डबा भरून आंब्याच्या फोडी डीप फ्रिजमधे आधीच भरून ठेवते. पहिल्या भरामधे पब्लीक दनादन फोडी उडवते अन बरणीत रहातो फक्त केशरी रंगाचा पाक..मग फ्रीजातल्या फोडी शिजवून घेवून तो रिफिल करायचा. व्यवस्थीत खाल्ला तर २ कि चा खरच वर्षभर.

सुगरणींनो, मला पॉटलकसाठी पाणीपुरीच्या पुर्‍या न्यायच्या आहेत. विकतच आणणार आहे पण अंदाज हवाय. २५ मोठे आणि २ लहान यांच्यासाठी साधारण किती पुर्‍या लागतील? बाकीचा मेनु म्हणजे बरेच चाट प्रकार - रगडा पॅटीस, भेळ, पाव भाजी, फ्रुट चाट, कसल्या कसल्या वड्या अस सगळं आहे. शिवाय दही भात, एक डेझर्ट आणि त्याशिवाय केक असेल बहुतेक. तेव्हा माणशी १० पुर्‍या बास होतील का?

खूप झाल्या. डिनर ऐवजी पाणीपुरीच खायची असे ठरवले तर एक माणूस एक दीप पाणीपुरीचा पॅक संपवतो (२८-३० असतात त्यात). एवढा मेन्यू असल्यावर १० बास!!!! Happy
(वड्या, दहीभात कितीपण कमी आणा, नक्की उरतील Wink )

पन्हं, चटणी (फारच मोठ्या कैर्या असतील तर एक चटका देऊन टिकाऊ चटणी करून ठेवता येईल; ती मग ब्रेड-पोळीला स्प्रेड म्हणूनही वापरता येईल), लुंजी, मेथांबा इ Happy

Pages