सह्याद्री धावती भेट (आहुपे बाईक ट्रीप)

Submitted by तन्मय शेंडे on 12 May, 2015 - 01:17

वीस एक दिवसाची भांडून घेतलेली सुट्टी, अजेंड्यावर असंख्य गोष्टी..मित्र, नातेवाईक, लग्न, सण ई. पण सर्वात पहिली नोंद केली होती ती जुन्या मित्राला भेटण्याची आणि तब्बल चार वर्षानंतर सह्याद्रीची प्रत्येक्ष भेट झाली.

हातात मोजकेच दिवस, त्यात फक्त तीन विकेंड्स त्यामूळे ट्रेक केला तर फक्त सह्याद्रीचा एकच भाग बघता येणार होता, त्यामूळे ट्रेक करण्याच्या तिव्र ईच्छेला आळा घालत, सह्याद्री बाईक ने भटकण्याचा निर्णय धेतला, जेणे करुन जास्तीत जास्त सह्याद्री डोळ्यात साठवता येईल.

मार्ग :
कल्याण - माळशेज घाट - खिरेश्वर - जुन्नर - घोडेगाव - आहुपे

आमच्या ह्या छोट्या भेटीचा हा धावता आढावा.

प्रचि १ : एकच ध्येय होतं या ट्रीपच : Travel Unlimited !!!
Ahupe_4.jpgप्रचि २ : सह्याद्री सकाळ
Ahupe_2.jpgप्रचि ३ : वसंतोत्सव
Ahupe_1.jpgप्रचि ४ : पिंपळ जोगे धरण
Ahupe_3.jpgप्रचि ५ : श्रद्धास्थान _/\_
Ahupe_5.jpgप्रचि ६ : परीक्षा
मार्च पहिना म्हंटल की लहान पणापासुन पोटात गोळा येतो...कारण परीक्षा !!
ही मुलगी पहाटे सहा-सात वाजता शेतात बसुन अभ्यास करत होती.
Ahupe_6.jpgप्रचि ७ : मासेमारी
मासे पकडण्यासाठी लावलेली जाळी
Ahupe_7.jpgप्रचि ८ : स्वागत
सह्याद्रीने आमच स्वागत पावसाने केलं ते देखिल विजेच्या कडकडासकट, पावसाची शुन्य तयारी करुन गेलो असल्याने समोर दिसलेल्या घरात घुसखोरी केली. त्या घरात आमच स्वागत या कोंबडीने केलं.

दोन अनोळखी अर्धवट भिजलेले भटके, घरात येउ का विचारतात आणि उत्तर मिळतं "चहा घेणार का ? फक्त दुध नाहिये" .. कितीते आदरतीथ्य. धन्य झालो तो चहा पिउन.
Ahupe_8.jpgप्रचि ९ : चित्र
ज्या घरात आम्ही आडोश्याला थांबलो होतो, त्यांच्या दारातून दिसणारं हे चित्र.
Ahupe_9.jpgप्रचि १० : Life on the Edge
When life is on the edge then only one option remains nothing but to fight back.

सह्याद्रीतल्या प्रत्येकाच आयुष्य असंच कडेवरचं, माणुस असो वा मांजर.
Ahupe_10.jpgप्रचि ११ : प्रवास
खड्डे आहेत म्हणुनच हा रस्ता सुंदर दिसत असावा... कदाचित आयुष्याचं पण असंच काहिसं असाव.
Ahupe_10.jpgप्रचि १२ : क्षण
हातात आलेले काही क्षण सुटले तरी देखिल छान दिसतात.
Ahupe_10.jpgप्रचि १३ : पाण्यासाठी दाही दिशा
१०-१२ कीमी अंतरावर दोन धरणं आहेत तरी देखिल...... पाण्यासाठी दाही दिशा पण कमीचं !!
Ahupe_10.jpgप्रचि १४ : सांजवेळ
Ahupe_10.jpgप्रचि १५ : आहुपे
देवराईतल्या मंदीरातल्या पडवीत पाणी साचलं होत, त्यामुळे रात्री गावातल्या एका घरात राहिलो.
आम्ही जेव्हा खाली पावसात भिजत होतो तेव्हा वर आहुपे गावात गारा पडत होत्या. सगळ्या पोरांनी गार पाणी प्यायलं होतं Happy मडक्यात साठवुन ठेवल्या गारांच पाणी देखिल आम्हाला दाखवुन झालं.

पोरा-टोरां बरोबर आम्ही पण पिठ्लं भाकरी खाउन झोपलो आणि थेट पहाटे उठलो आणि कडा गाठला.
Ahupe_10.jpgप्रचि १६ : सह्याद्री मधिल प्रत्येक पहाट ईतकीचं सुंदर असते
मच्छिंद्रगड आणि गोरखगड
Ahupe_10.jpgप्रचि १७ : वाघ
चांगलाच मोठा वाघ(बिबट्या) गावातल्या बकर्या उचलायला आला होता. पोरं, माणसं, बाया, आज्या, म्हातारे सगळे त्याला पिटाळून लावायला त्याच्या मागे. तो वाघ माझ्या समोरुन गेला साधारण ५०-६० एक मिटर लांबुन... माझ्या हातात कॅमेरा होता, कॅमेरा ऑन होता, पण काही कळायच्या आत तो नजरे आड झाला.
Ahupe_10.jpgप्रचि १८ : निष्पर्ण
Ahupe_10.jpgप्रचि १९ : देवराई
माणुस हा निसर्गा समोर कीती लहान आहे.
Ahupe_10.jpgप्रचि २० : देवराई
वानरांना हुसकुन लावण्याचा प्लॅन करत होती ही पोरं...
Ahupe_10.jpgप्रचि २१ : देवराई
कधी कधी वाटतं की अश्या देवराई आहेत आहेत म्हणूनच हे सुंदर जंगल टीकून आहे.
Ahupe_10.jpgप्रचि २२ : प्रतीबींब
कदाचीत पुढच्या वारीत ईकडे मोठा बंगला झाला असेल.
Ahupe_10.jpgप्रचि २३ : एक संध्याकाळ सह्याद्रीत, आजून काय हवं सह्याद्री भक्ताला
Ahupe_10.jpgप्रचि २४ : अमेझिंग सह्याद्री
Ahupe_10.jpgप्रचि २५ : सह्याद्रीची लाल राजकुमारी
Ahupe_10.jpgप्रचि २६ :
Four wheels move the body.
Two wheels move the Soul.

Ahupe_10.jpgप्रचि २७ : पुन्हा भेटु
Ahupe_10.jpg

धन्यावाद,
तन्यम शेंडे

Travel
...as long as you can
...as much as you can
...as far as you can

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान फोटो.. कॅप्शन्स पण मस्त.. फक्त काही फोटोत एक्सेस सॅच्युरेशन डोळ्याला थोडं खुपतं..
शेवटच्या फोटोत पॅनिंग इफ़ेक्ट मस्त साधलाय..

सुंदर फोटो आणि बर्‍याच फोटोंनां दिलेली कॅप्शन्स् फारच आवडली .. छान! Happy

खड्ड्यांचा रस्ता विशेषतः .. अजूनही बरीच कॅप्शन्स् आणि त्याबरोबरचे फोटो फारच छान ..

एक निरीक्षणः तुझे अमेरिकेतले फोटो जास्त चकचकीत, पॉलिश्ड् , वायब्रन्ट वाटले सह्याद्रीपेक्षा .. काय कारण असेल .. की तसं काहीच नाही आणि दोष माझ्या डोळ्यांत आहे? ह्या सह्याद्रीच्या फोटोंनां काही पोस्ट-प्रोसेसींग केलेलं नाही का?

अमेझिंग आहेत सगळे फोटो. एक मस्त ड्रीमी फील आहे फोटोज ना...वरती कोणीतरी म्हटलय तसच पेंटिंग पाहात आहोत असं वाटलं मधुनच.

धन्यवाद सगळ्यांचे Happy

सशल :
धन्यवाद !!
अमेरीकेत वातावरण स्वच्छ असतं त्यामूळे लांबचे डोंगर, ढग अगदी क्लिअर दिसतात. मी फक्त सह्याद्रीतल्या एकाचं भागात गेलो होतो...अमेरीकेतल्या बर्याच नॅशनल पार्क्स मी पालथी घातली आहेत त्यात प्रचंड विविधता आहे.

अवांतर :
अमेरीकेत आकाश जास्त निळ दिसत, लॅन्ड्स्केप मध्ये बर्याचदा हिरवं गवत असतं, अमेरीका उत्तरेला असल्याने संध्याकाळी आणि सकाळी मोठ्या सावल्या दमध्ये, ई... ह्या गोष्टी फारश्या महत्वाच्या वाटत नसल्या तरी फोटोत त्यांचा बराच फरक पडतो.

डीडी :
प्रतीक्रीयेबद्दल मनःपुर्वक धन्यवाद !!

माझ्या घरचा मॉनीटर कॅलीब्रेटेट आहे (I Used Datacolor Spyder Tool for calibration). बर्याचदा मॉनीटर कॅलीब्रेटेट नसला तर फोटो जास्त/कमी सूच्यूरेटेड दिसतात...आता माझ्या ऑफिसच्या कॉप्युटरवर देखिल नीट दिसत नाहियेत.
पण हो, मला फोटोत कलर आवडतात, ते कोणाला जास्त देखिल वाटू शकतात Happy

पराग :
मोठे फोटो कसे टाकायचे ? १५३ केबीचं लिमिट आहे, माझ्या मते जास्त मोठं रिझोल्यूशन्चे टाकले तर डिट्ल्स लॉस होतील. पुढच्या वेळी मोठे फोटो टाकायचा प्रयत्न करिन.

झकासराव :
हो, फोटो हुकला बिबट्याचा. फक्त ३-४ सेकंदचं दिसला असेल मला, तूफान वेगात तो देवराईत पसार झाला.

अवांतर :
वाईल्ड लाईफ फोटोग्राफर वेदवती पडवळ हिला मी प्रश्न विचारला होता "सर्वात कठिण प्राणी कोणता फोटो काढायला ?", ती म्हणाली मुंबईच्याच कुशित राहणारा "बिबट्या".

तन्मय, फोटोज जबरदस्त. आणि नुसता कॅमे र्‍याच्या समोरचं नाही , तर कॅमे र्‍यामागचं विचारविश्वही पण मस्त प्रगट झालंय.
अप्रतिम !

माझ्या घरचा मॉनीटर कॅलीब्रेटेट आहे (I Used Datacolor Spyder Tool for calibration). बर्याचदा मॉनीटर कॅलीब्रेटेट नसला तर फोटो जास्त/कमी सूच्यूरेटेड दिसतात...आता माझ्या ऑफिसच्या कॉप्युटरवर देखिल नीट दिसत नाहियेत.
पण हो, मला फोटोत कलर आवडतात, ते कोणाला जास्त देखिल वाटू शकतात
>> प्रचंड धन्यवाद.

तन्मय, पिकासावर फोटो अपलोड करून इथे इनलाईन देता येतात.
http://www.maayboli.com/node/43465

आता माझ्या ऑफिसच्या कॉप्युटरवर देखिल नीट दिसत नाहियेत.
पण हो, मला फोटोत कलर आवडतात, ते कोणाला जास्त देखिल वाटू शकतात >>>> दोन फोटो एकाच मॉनिटरवरून पाहिले असता एकातले रंग सुंदर दिसतात पण दुसर्‍यातले अनैसर्गिक. अश्यावेळी दोष मॉनिटरचा, फोटोंमधल्या मुळ रंगांचा, पोस्टप्रोसेसिंगचा की बघणार्‍याला नसलेल्या 'फोटोग्राफिक' दृष्टीचा ? (उत्तर अपेक्षित नाही.. जस्ट स्वगत.. Happy )

पराग :
धन्यवाद, पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करुन बघिन.

There’s no right or wrong in art !!

मला कॅलिब्रेशन बद्दल जे सांगायच आहे ते या लिंक मध्ये उदाहराणासकट सांगीतलं आहे.
https://fstoppers.com/product/ultimate-screen-calibration-guide-8009

सगळे फोटो आणि हटके कॅप्शन्स आवडली.
कमी वेळेत जास्तीत जास्त भाग पाहायची युक्तीपण आवडली. आमच्या ट्रिपा आधी भांडणापासून सुरु होतील पण भांडणं संपल्यावर काय याची दिशा मिळतेय Wink

Pages