मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमळी, ६ तास ४७ मि वा वा.

माझ्या मनात त्यामुळेच फुल मॅरॅथोन ची तयारी होत नाहिये अजुन Lol

हाफ २ तासांच्या आत संपवता आली की मग पुढच्या ट्रेनिंगला लागणार. कमळी पुन्हा काही भानगडीत पडणार नाही बुवा असे म्हणू नका. बघा काही दिवसांनी तुम्हालाच वाटेल नविन कुठे तरी पळावे. थोडे जास्ती ट्रेनिंग घ्या म्हणजे वेळ सुधारेल. आणि लाँग डिस्टन्स मध्ये काय काय करायचे ते पण प्रॅक्टिस करता येईल.

टण्या, गार्मिन ला आमच्या तलसा मधून बरेच लोक येणार आहेत. मॅरॅथॉन ग्रुप चे काही कोच पण ती पळणार आहेत. तुला शुभेच्छा.

धन्यवाद सगळ्या अभिनंदन कर्त्यांचे.

धनि, अगदी योग्य बोललात. असं कितीही ठरवलं तरी पुन्हा पुढच्या वर्षी हाफ साठी आधिच नाव नोंदवुन झालेलं आहे.
व्यवस्थित ट्रेनिंग आणि कुठलाही खंड पडु न देता पुरेपुर प्रॅक्टीस हे दोन फॅक्टर नीट घासुन पक्के केले की नक्कीच साध्य होतं... पुढे ही होइल.
एक तर माझी ही पहिली फुल मॅरॅथॉन होती, त्यामुळे स्वःताला इजा न करुन घेता पूर्ण करायची हेच एकमेव लक्ष्य होतं. कारण साधारण १८ मैल नंतर विशेषतः हिली रस्त्यांवर पायात खुप तीव्र पेटके यायला सुरुवात होते. आणि हे सरसकट सगळ्या धावपटुंचे होते, त्यामध्ये नवखा किंवा प्रो असा भेदभाव नाही.
म्हणुन जास्त आगाउपणा न करता, Respect the Distance and Slow & steady completes the race
असं घोकतच पूर्ण केली. त्यामुळे नंतर रिकव्हरी ही त्यामानाने पटकन झाली.
पुढे कधीतरी आर्यन मॅन ट्रायथॉलॉन करायाचा विचार आहे. जरा जास्तच मोठा पल्ला गाठायचा आहे, पण बघुया प्रयत्न करुन.

ह्या ग्रुप वरच्या सगळ्या धावपटुं ना शुभेच्छा.

-कमळी.

अहो, वैद्यबुवा जोरदार टायमिंग कसलं आलयं.. हळु हळु टुकु टुकु आजीबाईंच्या गतीने केलं खरं. खरतरं बरोबर चालणारे वयस्क (म्हणजे ६५ वर्षांच्या पुढचे) मंडळी एका तालात चालुन पूर्ण करत होती. खरचं कौतुक वाटलं.
प्लस पॉईंट्स- घरातली मंडळी ठीकठीकाणी गाडी पार्क करुन सकाळपासुन चिअरींग साठी आले होते. म्हणजे तसं आमचं आधीपासुन ठरलं होतं. सगळ्यात जास्त मुलांनी एन्जॉय केलं. धावणार्‍या कोणालाही चिअर करायचे, पाणी द्यायचे, मी दिसल्यावर तर नाचायला सुरुवात केली.

मायनस पॉईंट्स- आधी कितिही ठरवुन ठेवलं होतं तरीही.. एक गोष्ट सतत मनात होती..७ तासांत ते सगळं आवरुन बंद करुन निघुन जातात, आपण उशीरा पोहोचलो तर नो मेडल.. कुठल्याही परिस्थीतीत मेडल मिळालं पाहीजे.. त्या साठी सगळा अट्टाहास. त्या नादात एन्जॉय करायाचं राहुनच गेलं, दडपण एवढं होतं की फिनिश लाइन ला पोहोचले तेव्हा आधी ती मेडल देणारी बाई कुठे गेली तिच्या पर्यंत जीव घेउन धावत गेले... काय हा बालीशपणा होता खरतरं... पण त्या वेळेस ही सारासार बुध्दी गुंडाळुन ठेवली होती..

असो.

-कमळी.

कमळी आणि रार, अभिनंदन. रनिंगवाल्यांचा अपार आदर वाटतो मला खरंच. कसं काय जमवता? मला ५के वॉक/रन जेमतेम झेपतेय अद्याप.

रार, कमळी, अभिनंदन!

हाफ, फुल मॅरथॉन पूर्ण करणं खरंच फार भारी प्रकरण आहे!

कमळी, Lol किती प्रामाणिक आहात! बालिशपणा काय? 'मेडल' हा प्रोत्साहन देणारा फॅक्टर असावा ना! Happy

कमळी तुम्ही अगदी बरोबर केले. मी अगदी निर्लज्ज पणे सांगत असतो I run for medal. जर रेस मध्ये मेडल मिळणार नसेल तर पळून काय फायदा Lol

हाहाहा...
बालिशपणा ह्यासाठी होता कि जेव्हा फिनिश लाइन ला पोहोचले तेव्हा बरेच लोकं निघुन गेलेले होते. तिथे जवळपास आवरायला सुरुवात केलेली होती.
फक्त आमच्या नंबर बीब्स ला एक इलेकट्रॉनीक ट्रॅकर असतो त्यावरुन मॅरॅथॉन च्या अ‍ॅप वर ते तुम्हाला ट्रॅक करत राहतात, त्याच प्रमाणे ते तुमची वेळ सांगु शकतात.
मी शेवटचा माइल तर अंगात ताकद नसताना केवळ ह्या भितीपोटी धावले, तर फिनिश लाइन वरची बाई म्हणते ..'अहो थांबा आता धावयच्या, लाइन क्रॉस केलेली आहे...मी म्हंट्ल ए बाई मला आधि सांग मेडल कुठे मिळेल्.मग आपण गप्पा मारु.. मग तिने अजुन पुढे असलेल्या बाई कडे बोट दाखवलं... मग मी तिथे धावत गेले. आधि मेडल घालुन घेतलं मग जीवत जीव आला....
माझ्या नंतर ही बरेच जणं आले, तेव्हा कळलं की इतकं काय घाबरायचं काम नव्हतं.
पण हे भरल्या पोटी आलेले विचार होते...नॉट अ‍ॅट दॅट टाइम.

-कमळी.

हारुकी मुराकामीचं What I talk about when I talk about running वाचलं नुकतंच...हा इतका भारी लेखक, इतका भारी आणि प्रो- मॅरॉथॉन रनर असेल असं वाटलं नव्हतं. मजा आली वाचायला, शिवाय खूप काही रीलेट पण करु शकले. शिवाय मुराकामीचे आणि माझे रनिंग बद्दलचे बरेच विचार बरेच मिळतेजुळते आहेत हे वाचून खासच भारी वाटलं..लोल !! Happy

मुराकामी माझा खरं तर आवडता लेखक... पण कधी मुद्दाम उचलून हे पुस्तक वाचले गेले नव्हते. आता जेव्हा पळायला सुरुवात केलीये, तेव्हा आपोआप हे पुस्तक उचललं गेलं , वाचलं गेलं.. मलाही खूप आवडलं. ह्या पुस्तकाचा फ्लो खूप मस्त जमलाय, रनिंग करताना पेस, रिदम , एनर्जी, विचार सगळ्याचा बॅलन्स जमून जावा तसं.
त्याने रनिंग बद्दल काही शॉर्ट एसेज पण लिहिलेत, शोधून वाचण्याची इच्छा आहे. बहुधा ट्रान्सलेशन्स असतील मिळण्याजोगी.

अरे वा! वाचायला पाहिजे. घेण्यात आलेले आहे. वाचून मग सांगण्यात येईल Lol

मी फायनली फारगावातल्या हाफ चे पैसे भरले. ती हळू होईल बहुतेक कारण इतर मित्र असतील बरोबर. आता ११ तारखेला इथेच तलसा जवळ एक हाफ आहे ती पण करून टाकतो आहे. त्यामुळे जरा टाईम इंप्रुव्हमेंट झाली आहे का ते कळेल.

वा ! रार आणि कमळी अभिनंदन. रारचे परत, फेसबुकवरचे मेडल भारी होते. Happy

कमळी सब ७ तास, अभिनंदन - मै मैराथान पुरी करूंगी तब मै कमळी कहलावांगी !! Lol

आता एप्रिल येतो. खूप सार्‍या मॅराथॉन असतात.

पुढच्याच्या पुढच्या शनिवारी आयुष्यातली पहिली पूर्ण मॅराथॉन. पूर्ण होइल अशी आशा आहे (आत्मविश्वास नाही). तीन दिवसांपुर्वी एक मोठं सराव सत्र केले - २० किमीचे, दोन तास. त्यात तरी पाय फार भरून वगैरे आले नाहीत. अजून तासभर पळता आले असते वाटत होते. तेव्हा ६ तासाच्या लिमिटला फिनिश लाइनला धडकेन असे वाटते आहे.

टण्या, तुझ्या फुल साठी शुभेच्छा! आरामात पळशील. २० झालेत मग काय पुढे फार शिल्लक नाहीत Lol

मी अजुन त्या फुलच्या वाट्याला गेलो नाही. मी शनिवारी एक हाफ करतो आहे. मग २५ तारखेला अजुन एक आणि ९ मे ला फारगावात.

मित्र ट्रेनिंग सुरू करताहेत फॉल मध्ये फुलचे त्यामुळे माझ्यावर भरपूर पिअर प्रेशर आहे Wink पाहू काय होतय ते. तुझा अनुभव लिही म्हणजे उपयोगी पडेल आम्हाला.

धन्यवाद अमितव, धनी.

लेख वगैरे जरा फार होइल, पण तुम्हांला मी अशी प्रतिक्रियां मधुन माहीती नक्की देउ शकेन.
मॅरॅथॉन ट्रेनिंगची सुरुवात किंवा कुठल्याही तत्सम गोष्टींची सुरुवात कमी अंतरानेच केली होती. तुम्हाला स्वःताच्या शारीरिक मर्यादांचा अंदाज यायला हा वेळ खुप म्हणजे खुपच महत्वाचा असतो.
निदान मला तरी होता. आधी एकतर स्वःताविषयी असलेले बरेच गोड गैरसमज दूर व्हायला मदत होते,
एकदा ठरवलं किंवा मी म्हणेन एकदा का मॅरॅथॉन साठी रजिस्टर करण्यासाठी पैसे भरले की ते माझ्या साठी पर्फेक्ट मोटीवेशन होतं(आता पैसे भरलेत आणि ते परत मिळणार नाहीत)

हायड्रेशन- धावण्याच्या दोन ते तीन दिवस आधी खुप पाणी पिउन स्वःताला हायड्रेड ठेवा. हे म्हणजे आपण आधीच जरा बँक बॅलन्स ठेवुन दिल्यासारखं आहे. धावताना शरीरातुन घामाद्वारे खुप पाणी आणि क्षार निघुन जातात, त्याची लवकरात लवकर भरपाई होईल ह्याची काळजी त्याच दिवशी व पुढे दोन तीन दिवस न विसरता,न कंटाळता घ्यावी.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे शुज. त्यासाठी सर्व धावपटुनी प्लिज विषेश लक्ष द्या. दोन वर्षांपूर्वी जेव्हा हाफ साठी तयारी करायला सुरुवात केलेली तेव्हा मी बरेच दिवस ह्याच तंद्रीत होते की माझे आहेत ते स्पोर्ट्स शुज चालुन जातील....
पण I-T band दुखापती चा एवढा त्रास झाला की एकदम स्पेशलाइज स्पोर्टस शुज दुकानातुन नविन, कस्टम फिटेड शुज घेउन आले. तेव्हा कुठे हळु हळु फरक पडत गेला.
धावल्यानंतर शास्त्रशुध्द स्ट्रेचींग केलंच पाहीजे. सवयच लावुन घ्या ती. जसं जसं अंतर वाढवत जाल तसं तसं फास्ट रिकव्हरी हवी असेल तर स्ट्रेचींग ला पर्यायच नाही.
I-T band साठी लाटण्याचा मसाज अतिशय उपयोगी पडला होता.

धावयला सुरुवात करायच्या अर्धा तास आधी ब्रेड्-बटर एखादा स्लाइस किंवा थोडं दुध असं घेउ शकतात. धावताना आपलं शरीर सगळी उर्जा कार्बोदकं वापरुन पुरवठा करत असतं,
काही अंतरा नंतर माझं डोकं दुखायला लागायचं, तेव्हा हे कारण आणि हा उपाय समजला होता.

--कमळी.

या शनिवारी ओक्लाहोमा अ‍ॅक्वेरिअम हाफ पळालो. २ तास १४ मिन ३३ से पूर्ण केली. या सिजन मध्ये २:१५ मध्ये हाफ पुर्ण करण्याचे उद्दीश्ट होते ते पूर्ण झाले.

अजुन दोन हाफ पळणार आहे. २५ तारखेला तलसा मध्येच गोल्डन ड्रीलर आणि ९ मे ला फारगावात फार्गो हाफ Happy

टण्या अरे २ तास हा खुप अवघड पॉईंट आहे. आता माझा पेस अराऊंड १०:१६ मिन पर माईल होता. दोन तासात मारायची म्हणजे ९:०९ करावा लागतो. १ मिनीट पर माईल कमी होते जे इतक्या अंतरासाठी खुप आहे.

आमची बरेच दिवस तीच चर्चा चालली होती. माझे मित्र ट्राय करत होते. त्यांनी २ तास ५ मिनीटात पूर्ण केली. ते ५ मिन पण खूप कष्ट दायक असतात Lol

फारगाव = फार्गो नॉर्थ डाकोटा

खरय. तुम्ही ज्या वेगाला सरावलेले असता त्यातला एक एक मिनिट कमी करणे पण बहुतेक त्रासदायक असेल. मी हाफ मॅराथॉन २:१० मध्ये पुर्ण केली होती. आता पूर्ण मॅराथॉनसाठी ५ तासाचे टार्गेट आहे. ८.४ किमी प्रति तास किंवा ५.२५ मैल साधारण. देखते है क्या होता है.
ऐनवेळची अ‍ॅन्ग्झायटी की अजून काय ते माहिती नाही पण रविवारी पळायला गेलो ते २० मिनिटात पायात गोळे आले. काल तसेच. आता दोन-तीन दिवस काही करणार नाहिये. फक्त पाणी पिणार भरपूर. Sad
ओलेथला पाउस आहे शनिवारी सकाळी आणि १०-१५ सेन्टिग्रेड तापमान. कुडकुडणार बहुतेक भिजल्यावर

मी पण बरीच वर्षे १० मिनिटांच्या फेर्‍यात अडकून होतो.
पहिल्या मॅराथॉन मध्ये माझा २:०६ चा टायमिंग होता,
पहिले पाच मैल्स थोडा जास्त (म्हणजे ७ पर्यंत ) वेग ठेवत, ऊतारावर स्ट्राईड लेंग्थ वाढवून, म्युझिक पहिल्यापासून न ऐकता सहा मैलांनंतरच चालू करून, शेवटचे अडीच मैल बाकी असतांना जेल ची एक गोळी चघळून (ज्यातली शुगर शेवटचा मैल किक देते) मी १:५६ पर्यंत टाईम कमी करण्यात य्शस्वी झालो होतो.
हे टार्गॅट पार करण्यात अजून जर कश्याने सर्वात मोठी मदत केली असेल तर ती म्हणजे ट्रेड मिल वर शेवटचे पाच मिनिटं आठ साडे आठ चा स्पीड ठेवत तासाभरात कसेही करून ७.५ मैल किंवा त्यापेक्षा एखादा पॉईंट जास्तीचे टारगेट पूर्ण करणे.

Pages