Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रत्येक पदार्थासाठी वेगळा
प्रत्येक पदार्थासाठी वेगळा धागा काढ. मायबोलीकर नवीन धाग्यांबाबत फार सोशिक झालेत
विनोद बाजूला - इथे प्रश्न टाकले तरी चालेल की.
देसी ग्रोसरीवाल्या बाईने फार
देसी ग्रोसरीवाल्या बाईने फार कौतुक केलं म्हणून पर्ल टॅपिओका नावाचा साबुदाण्याचा प्रकार आणला. हा साबुदाणा भिजवायची काही वेगळी पद्धत आहे का? मी नेहेमी प्रमाणे भिजवला.पण हा लवकर भिजतो वाटतं. मस्त गोळा झालाय.
प्रॅडी, बहुधा तू या
प्रॅडी, बहुधा तू या प्रकारातला काही प्रकार आणला असाव...
prady हा साबुदाणा ,खिचडी
prady
हा साबुदाणा ,खिचडी करायच्या आधी १-२ तास भिजवावा.
प्रॅडी! हा ईन्स्टट साबुदाणा
प्रॅडी! हा ईन्स्टट साबुदाणा किवा सिनिअर सिटीझन साबुदाणा(चावायला बरा असतो नेहमिच्या साबुदाण्यापेक्षा)
ग्रोसरी स्टोरवाली बाई सांगत
ग्रोसरी स्टोरवाली बाई सांगत होती आजकल ईंडिया मे यही चलता है. रात्री सरळ ते प्रकरण फ्रीजमधे टाकलं. अत्ता काढून पाहिलं तर बराच मोकळा झालाय. खिचडी ठेवली आहे वाफायला. बघू काय होतंय.
मला नुकतीच एका पदार्थाची
मला नुकतीच एका पदार्थाची आउडिया मिळाली आहे पण दोन्ही मेन गोष्टी आत्ता घरात नाहीत त्यामुळे करता येत नाही असा उलटा प्रॉबलेम आहे
मोड काढलेले मूग + गरम पाण्यात मस्त २-३ तास भिजवलेला दलिया + हिरवी मिरची + आलमीठ+ मीठ आणि काय मनात येइल ते असं एकत्र भरड वाटून त्याचे आप्पे करायचे आणि खायचे.
माझ्याकडे मोड आलेली मटकी आहे
माझ्याकडे मोड आलेली मटकी आहे संध्याकाळसाठी. दलिया भिजवायला रिसोर्सेनना सांगू शकते पण ती रिलायबिलीटी नसेल तर मला सांग, न भिजवता (किंवा कमी वेळ भिजवलेला) दलिया असेल तर काय फरक पडतो?
पोरांना जनरली आप्पे आवडतात हे व्हर्जन आवडलं तर एक वन डिश मिल मिळेल.
आयड्या भारी आहे पण या
आयड्या भारी आहे पण या अप्प्यांना जो रंग येइल त्याची कल्पना करता आमचं शिंगरू आधीच नाही म्हणेल. ओळखीत १-२ कुटुंबात एंजल किड्स जन्माला आलीत त्यांना सांगेन मात्र
ओळखीत १-२ कुटुंबात एंजल किड्स
ओळखीत १-२ कुटुंबात एंजल किड्स >> आपलेच रत्न नाखट का? हा प्र्श्न आम्ही एकमेकाना विचारुन हे नाखट जिन्स काना कडूनच आलेत अस प्रतिपादन करतो.
आलमीठ+ मीठ >> मिठ जास्त नाही
आलमीठ+ मीठ >> मिठ जास्त नाही का होणार ! (सॉरी, फाको चा मोह आवरला नाही!)
प्रॅडी, आमच्या इथे विन्को
प्रॅडी, आमच्या इथे विन्को नामक दुकानात अश्या टाईप्स साबुदाणा मिळतो. आणि इथल्या पब्लिक मध्ये लैच पाप्युलर पण आहे. हा साबुदाणा पाण्यात भिजवायचा नाही म्हणे. नुसता पाण्याचा हबका मारून १०-१२ मिनिटं झाकून ठेवायचा. आणि खिचडी करायची. पण ती खिचडी अगदी गरम गरमच छान लागते.
वेका मी केले नसल्याने चव
वेका मी केले नसल्याने चव माहित नाही पण मटकीच्या चवीपेक्षा मूगाचे जास्ती चांगले लागतील असं मला वाटतय. पण तू कर मटकीचे बिनधास्त.
दलिया भिजला की मला वाटतं पटकन शिजेल.
सिंडे, मी दुष्ट आई असल्याने गप खा नाहीतर उपाशी राहा असा रूल नीटच सेट केलेला आहे घरी. मी न सांगता एखाद दिवशी लेकीने डबा न खाता परत आणला तर गुपचुप घरी आल्यावर स्नॅक टाइमला तोच खाते
आता पुरे, मै खुद अपनी तारीफ कैसे कर सकती हू भला
बर मग?
बर मग?
तुम्ही पडलात प्रेमळ आई तेव्हा
तुम्ही पडलात प्रेमळ आई तेव्हा स्वतः करा आणि खा . शिंगरांना घालू नका.
मी प्रेमळ आहे/नाही त्याच्याशी
मी प्रेमळ आहे/नाही त्याच्याशी या टॉपिकचा किंवा तुझा सुद्धा काही संबंध आहे असं मला वाटत नाही.
बरं.
बरं.
बिल्लो उरलेल्या साबुदाण्यावर
बिल्लो उरलेल्या साबुदाण्यावर हा प्रयोग करून बघण्यात येईल. सकाळचं प्रकरण लईच गिच्च गोळा झाला. काही केल्या खाव्वेना.
इन्स्टंट आप्पे - दही-ताकात
इन्स्टंट आप्पे - दही-ताकात रवा+ओट्स भिजवुन पण होतात..
गोड आप्पे - रवा+दुध्+तुप्+साखर्+केळ
१५-२० मिन भिजवलं तरी चालतं
दलिया नाही भिजवला तरी
दलिया नाही भिजवला तरी चालतो.
आयत्यावेळी भिजवून आलं-मिरची कोथिंबीरीबरोबर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्यात खडबडीत वाटलेले मूग घालून आप्पे/ घावन/ पेसरट्टू घातलेले चालतात. सुंदर होतात.
पण या अप्प्यांना जो रंग येइल
पण या अप्प्यांना जो रंग येइल त्याची कल्पना करता आमचं शिंगरू आधीच नाही म्हणेल>>इत्का वाइट रंग नाही येणार. कोथिंबीर मिरची असेल तर हिरवे पांढरे असे दिसेल. पेसरटू, आप्पे छान होतात मात्र.
पण या अप्प्यांना जो रंग येइल
पण या अप्प्यांना जो रंग येइल त्याची कल्पना करता आमचं शिंगरू आधीच नाही म्हणेल>>>> सिंडे, कोकणात एक म्हण आहे.. अळवाची खाज अळकुडीलाच ठाऊक!!
मंजू,
मंजू,
सोमवारी ऑफीस पॉटलकसाठी बटाटे
सोमवारी ऑफीस पॉटलकसाठी बटाटे वडे (फर्माईश!) न्यायचे आहेत. रविवारी रात्री तळून ठेवलेले वडे मा वे मधे गरम करुन चांगले लागतील का? अजुन काही युक्ती करता येईल का? ऑफीसमधे ओवन नाही. मी सकाळी ५:४५ ला घर सोडते त्यामुळे सकाळी तळून नेता येणार नाही.
बटाटे वडे समोसे शिळे चांगले
बटाटे वडे समोसे शिळे चांगले लागत नाहीत
हो, चांगले लागतील.
हो, चांगले लागतील. मायक्रोवेव्हमध्ये ठेवताना झाकण ठेवू नका म्हणजे वाफ धरणार नाही.
फ्रिजमधून काढलेले बटाटेवडे
फ्रिजमधून काढलेले बटाटेवडे मायक्रोवेव्ह अव्हनमध्ये गरम करून, इलेक्ट्रिक ग्रिडलवर लो टेंपरेचरवर ठेवून मऊ झालेलं कव्हर खरपूस करू शकता. किंवा खायला घेण्यापूर्वी तासभर आधी फ्रिजमधून काढून थेट ग्रिडलवर गरम करता येतील. ग्रिडल वापरणार असाल तर कुणालातरी बटाटेवड्यांच्या देखभालीला बसवावं लागेल.
बटाटे वडे समोसे शिळे चांगले
बटाटे वडे समोसे शिळे चांगले लागत नाहीत>> +१०० पण ऑफीसमधील देसी आणी नॉन देसी जनता (सो कॉल्ड मुंबई रिटर्न्ड !!) फार मागे लागली आहे. त्यामुळे बटाटेवडे तर न्यायचेच आहेत.
धन्यवाद मृण्मयी,
धन्यवाद मृण्मयी, स्वाती_आंबोळे मा वे वापरणे जास्त सोयीचे आहे.
या अश्या प्रकारच्या बॅग्ज
या अश्या प्रकारच्या बॅग्ज वापरता येतात मायक्रोवेव्हमध्ये.
Pages