Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा अंदाज चुकला त्यामुळे
माझा अंदाज चुकला त्यामुळे कालवलेली भेळ बरीच उरलीय. आता काय करता येईल त्याचं ?
( चटण्या मिसळण्यापूर्वी कोरडं मिश्रण बाजूला काढू असं ठरवलं होतं पण विसरले ! )
थोडं थोडं बेसन, तांदळाच पीठ
थोडं थोडं बेसन, तांदळाच पीठ त्यात घालुन उद्या थालिपीठं लावा. कांदा, मिरची, कोथिंबीर वैगेरे त्यात आहेच.
मनीमोहोर +१ किंवा बटाटा घालून
मनीमोहोर +१
किंवा बटाटा घालून टिक्की करता येइल.
मफिन पॅन मध्ये फायलो शीट च्या तुकड्यावर लावून बेक करता येईल.
(भेळ उरणे यह कानूनन अपराध है, इस्लिए अगो को कडी से कडी सजा सुनाई जाए.)
भेळ उरली?? मी येऊ का? मी
भेळ उरली?? मी येऊ का? मी उरलेली गिच्च भेळ देखिल आनंदाने खाऊ शकते! - तहहयात भेळ-पाणीपुरी क्लब मेंबर
सॅन्डविच मेकर वापरुन भेल
सॅन्डविच मेकर वापरुन भेल सॅंडविच. कुरकुरीत ब्रेडच्या मधे ओली भेळ छान लागेल.
धन्यवाद. थालिपीठ लावून बघते.
धन्यवाद. थालिपीठ लावून बघते. सकाळची कोबीची भाजीही उरल्याने त्याच्या टिक्क्या होणारच आहेत ;
जिद्न्यासा ( फोनवरुन टाईप होत नाही ) आता थालिपीठ खायला ये
स्वाती२, छान आयडिया. कसे
स्वाती२, छान आयडिया. कसे लागेल त्याचा अंदाज येत नाही मात्र. पुढच्या वेळी भेळ उरवण्याची बिशाद झाली तर करुन बघेन
स्वाती२, छान आयडिया. कसे
स्वाती२, छान आयडिया. कसे लागेल त्याचा अंदाज येत नाही मात्र. पुढच्या वेळी भेळ उरवण्याची बिशाद झाली तर करुन बघेन
भेळेवर किती अन्याय!!
भेळेवर किती अन्याय!!
पण भेळेचं थालीपीठ लावण्याची
पण भेळेचं थालीपीठ लावण्याची आयड्याची कपल्ना मस्ते
माझ्यामते नुसतं बेसन घातलं तर जाम तेल पितील ते थालीपीठं, अजून कुठलंतरी पीठ घालायला लागेल बहुधा...
मी येते, मलापण चालेल गिच्च
मी येते, मलापण चालेल गिच्च भेळ खायला
मी आजच भेळ खाल्ली. खाताना
मी आजच भेळ खाल्ली. खाताना अगोची आठवण काढत खाल्ली.
भेळेची त्यात उकडलेला बटाटा कुस्करून घालून टिक्कीही बरी लागेल असं वाटतं. आंबट-गोड-तिखट स्वाद तर असेलच.
अगो, फायनली भेळेचे भवितव्य काय ठरले?
मी गेले दोन रात्री
मी गेले दोन रात्री प्रोजेक्टच्या कुरुक्षेत्रात धुमाकूळ घालून धारातिर्थी पडले(च) होते. किंचित धुगधुगी आल्यावर माबोवर डोकावले.
(इथे प्रोजेक्टवर कुरुक्षेत्रंच असल्याने अनेक कृष्णं आहेत... येता जाता किमान चारतरी युक्तीच्या गोष्टी सांगणारे.. लढायला माणसं कमीच. त्यामुळे असणार... युक्तीच्या बाफंची वाफ दवडाय्ची बुद्धी सुचली....)
अगोने भेळ उरल्याचं सांगितलय... तिथेच तिथेच माझा पुनर्जन्मं झालाय..
युक्तीच्या अनंत गोष्टी सांगणार्या इथल्या सगळ्या 'कृष्णां'चा विजय असो...
दाद कृष्ण बनून देवत्व हवंय
दाद
कृष्ण बनून देवत्व हवंय कुणाला? पोट फुटेपर्यंत भेळ खाणारी मर्त्य मंडळी इथे अगो ची आठवण काढत एक किलो सुकी भेळ घेवून आले. उरते उरते म्हणतात बघू तरी कशी उरते
लोल सिमंतीनी, दाद. अगो, काय
लोल सिमंतीनी, दाद.
अगो, काय केलस शेवटी?
भेळेची थालिपीठं, टिक्क्या आणि
भेळेची थालिपीठं, टिक्क्या आणि सँडविचं!!!! देवा! अगो, प्लीज यातलं काहीही केलं नाहीस आणि भेळ ही भेळ म्हणूनच खाल्ली असं लिही गडे!
पण पौतै भिजवलेली भेळ दोन
पण पौतै भिजवलेली भेळ दोन तासांनी कंटाळवाणी होते.. दुसर्या दिवशी कश्या मिटक्या मारणार?
पूनम + १. मी अगोच्या जागी
पूनम + १.
मी अगोच्या जागी असते तर उरलेली कालवलेली भेळ टाकून दिली असती, कारण ती फ्रिजमध्ये ठेवणं शक्य नाही, कारण घट्ट झाकण लावून कडेकोट बंदोबस्तात ठेवली तरी कांद्याचा वास फ्रिजभर घमघमणारच आणि फ्रिजबाहेर ठेवण्याचा प्रश्नच नाही.
अगो, काय केलंस उरलेल्या भेळीचं?
मंजुडी व पूनम +१ सॉगी भेळ?!
मंजुडी व पूनम +१ सॉगी भेळ?!
दादची कमेंट लई भारी!!
दादची कमेंट लई भारी!!
अरे काय हे !!! पूनम तूच माझी
अरे काय हे !!!
पूनम तूच माझी समै गडे !
तर त्या दिवशी कानूनन अपराध घडता घडता राहिला नेमकं त्या दिवशी नवर्याने बॅक टू बॅक दोन पिक्चर टाकायचं ठरवलं. असे पिक्चर टाकायला बसलं की दोन तासांत परत भूक लागतेच ह्याची आयडिया असल्याने मी ती भेळ ओट्यावरच ठेवली होती. ती सॉगी भेळ नंतर कशी लागली काही कल्पना नाही. त्याने खाल्ली त्यातली बर्यापैकी.
मग थोडीच उरली होती आणि ती तो आत टाकायला विसरला त्यामुळे दुसर्या दिवशी ती ओल्या कचर्यात सत्कारणी लागली.
आता कुणीतरी कराच भेळेचं थालिपीठ किंवा टिक्की. कसं झालं होतं ते इथे लिहायला विसरु नका
ह्यापुढे भेळ कालवायच्या आधी सुकी भेळ काढून ठेवायला कधीही विसरणार नाही !
गो अगो!! पण खरंच, वाचून
गो अगो!!
पण खरंच, वाचून हुश्य झालं!!!
पण मंजूडी, सोललेला कांदा (
पण मंजूडी, सोललेला कांदा ( काहीजण कांदा चिरुनही ठेवतात. मी नाही ठेवत ) घट्ट झाकणाच्या डब्यात घालून मी नेहेमीच फ्रीजमध्ये ठेवते. पावभाजीसाठी चिरलेला कांदा उरला तर तोही ठेवते एक दिवसासाठी. पण नीट घट्ट बंद असेल आणि कांद्यावर किंवा मग झाकणाच्या वर पेपर टॉवेल ठेवला तर फ्रीजला वास लागत नाही.
कधी किंचित वाटला तरी कांदा बाहेर काढल्यावर तो वास जातो आणि दुसर्या पदार्थांनाही लागलेला नसतो.
चिरुन ठेवलेल्या खरबुजाचा मात्र एकदा सॉलिड वास लागला होता. विशेषतः दुधाला पेपरटॉवेल घालून थोडा फरक पडला असावा. नीट आठवत नाही कारण त्यानंतर खरबूज मात्र फ्रीजमध्ये ठेवणं टाळते ( पपई ठेवते मात्र )
अगो, माझं नाक जाम बेकार आहे
अगो, माझं नाक जाम बेकार आहे
त्यामुळे एक लिंबू अर्धं कापलेलं माझ्या फ्रिजात नेहमी असतंच. मानसिक समाधान
मला दूध नासायला आलं असेल तरीही आधी नाकाला जाणवतं.
कांदा - सोललेला/ चिरलेला फ्रिजात न ठेवण्याबद्दल मागे मायबोलीवरच चर्चा झाली होती.
कांदा - सोललेला/ चिरलेला
कांदा - सोललेला/ चिरलेला फ्रिजात न ठेवण्याबद्दल मागे मायबोलीवरच चर्चा झाली होती. >>> हो, वाचली होती मी ( आता शोधायची म्हटली तर कुठे हे मात्र आठवत नाही ! )
पेपरटॉवेलमध्ये सोलून ठेवलेला कांदा चालतो अशा निष्कर्षाला आले आहे.
पण खरंच, वाचून हुश्य
पण खरंच, वाचून हुश्य झालं!!!>> मलाही! आता मी कोणतंही व्हिजुअल न बघता सुखाने भेळ करू आणि खाऊ शकेन
हुश्श!!
हुश्श!!
(No subject)
अकुला हाणा!
अकुला हाणा!
मला पँट्री-क्लिनींग रेसिपीज
मला पँट्री-क्लिनींग रेसिपीज हव्या आहेत. मी रोज एक-दोन पदार्थ सांगेन मग त्यांचा वापर करून त्या त्या पदार्थाचा निकाल लावायचा आहे.
तुम्ही प्रतिसादात इथल्या रेसिपीची लिंक देऊ शकता किंवा थोडक्यात कृती द्या. यासाठी वेगळाच धागा काढावा का?
Pages