पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम
पुणे - दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदुषणाच्या भीषण समस्येच्या पार्श्वभूमीवर सायकलचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या हेतूने पुण्यातील काही सायकलप्रेमींनी पुणे ते कन्याकुमारी अशा सायकल मोहीमेचे आयोजन केले आहे. ही मोहीम सारसबाग येथून २१ फेब्रुवारीला प्रस्थान करणार असून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांतून प्रस्थान करत १६५० किमी प्रवास करून विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी येथे सांगता करण्यात येईल.
या मोहीमेचे नेतृत्व उपेंद्र शेवडे यांच्याकडे असून वेदांग शेवडे, आनंद घाटपांडे, सुह्रुद घाटपांडे, ओंकार ब्रम्हे, उमेश पवार, नंदू आपटे, चंद्रशेखर इती, अद्वैत जोशी आणि आशिष फडणीस हे या मोहीमेत सामील असतील.
मोहीमेचा मार्ग - पुणे - कराड - निप्पाणी - हुबळी - अंकोला, मरवंथे - सुरथकल - पय्यानुर - कोझीकोडे - गुरुवायुर - कोची - चावारा - थिरुवनंतपुरम - कन्याकुमारी.
- आशुचँप.
या कार्यक्रमाबद्दलचे अपडेट्स मी इथे टाकेन.
मायबोलीकरांच्या वतीने, पवन
मायबोलीकरांच्या वतीने, पवन तानवडे चँपला टाटा करायला गेलेले.
(छायाचित्र - पवन यांच्या सहयोगाने.)
आशु, खुप खुप शुभेच्छा!!!
आशु, खुप खुप शुभेच्छा!!!
अपडेट्स देत रहा.
वाह, बहोत खूब ... अनेकानेक
वाह, बहोत खूब ...
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....
अपडेट्स देत रहा. >>> +१००
शुभेच्छा अपडेट्स देत रहा
शुभेच्छा
अपडेट्स देत रहा
जबरदस्त.... खूप शुभेच्छा....
जबरदस्त....
खूप शुभेच्छा....
हार्दीक शुभेच्छा.. यशस्वी
हार्दीक शुभेच्छा.. यशस्वी होणारच ... वृतांत कधी येतोय त्याचीच वाट बघतोय.
हार्दीक शुभेच्छा......
हार्दीक शुभेच्छा......
छान उपक्रम. हार्दिक शुभेच्छा
छान उपक्रम. हार्दिक शुभेच्छा .....
हाती आलेल्या वृत्तानुसार
हाती आलेल्या वृत्तानुसार मंडळी कराडमध्ये पोचली आहेत.
ब्राव्हो..
अरे वा.. लगे रहो!!
अरे वा.. लगे रहो!!
हार्दिक शुभेच्छा सर्वांना
हार्दिक शुभेच्छा सर्वांना .....
पुणे ते कन्याकुमारी, सायकल
पुणे ते कन्याकुमारी, सायकल मोहीमेला हार्दिक शुभेच्छा!
२१-०२-२०१५ मावळ्यांनी काल
२१-०२-२०१५
मावळ्यांनी काल तळ्यातल्या गणपतीचं (सारसबाग) दर्शन घेउन सर्वा च्या घरच्या मंड ळींच्या आणि मबोकरांच्यावतीने पवन कडुन शुभेछ्या स्विकारुन पहाटे ५ वाजता वाजता प्रस्थान केले. त्यांच्याकडुन मिळालेल्या माहीती नुसार, सकाळ्च्या गार हवेमुळे अपेक्षीत वेगाने आगे कुच करता आले, पण कात्रज घाट तेवढा त्रासदायक ठरला. वाटेत छोटे छोटे ब्रेक घेत ९:१५ ला खंबाटकी घाट पायथा गाठण्यात यशस्वी झाले.
चँपला गुडघ्याचा त्रास सुरु झाल्याने, त्याने निकॅप घालुन पार केला. जेवण न करण्याचे आधीच ठरल्याने थोडे थोडे फुड रिफ्युलिंग करत पुढे जात रहीले.
उन्हाचा त्रास वाढल्याने एकंदरीत ग्रुपचा वेग मंदावला. त्यांना वाटेत केदार भेटला, तो ४०० किमी BRM (पुणे - कोल्हापुर रिटर्न) राईड करत असल्याचे कळाले. चँप्या आणि केदार सारखे माणसं पाहीली की साला आपण काय करतो हेच कळत नाही.. हॅट्स ऑफ यांच्यासाठी... असो...
दुपारी २ सुमारास सातारा क्रॉस केले आणि ५ च्या सुमारास उंबरज. आणि तिथुन तासाभरात कराड.
अश्या प्रकारे मावळयांनी पहिला दिवस लढवला. बर्यापैकी त्रास झालेला तरी त्यांच्या बोलण्यात पहिला दिवस जि़ंकल्याचा आनंद जाणवत होता.
२२-०२-२०१५ आज सुद्धा कालच्याच
२२-०२-२०१५
आज सुद्धा कालच्याच उत्साहात सुरवात केली. कालच्या १६५ किमी पल्ल्याच्या मानाने आजचा पल्ला थोडा लहान होता. त्याचं कारण असं की उद्या १७० किमीचा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे आज सगळं निवांत मोड मध्ये होतं. कराडच्या पंकज होटेल वरुन पहाटे ५:३० ला निघाले तेव्हा बरीच थंडी होती म्हणे. ज्याचा त्रास टोळ नाक्यावरच्या गरमा गरम चहा बिस्कीट शिवाय काय कमी झालाच नाही. जसजसे उन्ह वाढायला लागले तसतसे, सगळे सायकल्स्वार केजरीवालच्या वेशभुषेतुन सलमानच्या वेषभुषेकडे पराव्रुत होत होते. कानपट्टी वगैरे बॅगेत जाउन गॉगल आणि सनक्रीम बाहेर आले.
आजच्या ठळ्क बातम्यांमध्ये मुख्य बातमी म्हणजे घाटपांडे काकांची सायकल खराब झालेली. ती रिपेअर करण्यात बराच वेळ गेलेला. सकाळी १० च्या सुमारास कोल्हापुर ओलांडले. तिथे भेटायला आशुचँपच्या घरचे मंडळी आलेले. आजचा प्रवासपल्ला लहान असल्याने, तिथे घरच्यां सोबत घमाल करुनच पुढे गेले.
आजच्या प्रवासात कागलचा पॅचने सॉलीड दम काढला असं कळालं. वर प्रचंड उन, त्यात वारा. ओआरस चे घोट घेत १ च्या सुमारास कागल टोळ नाका ओलांडला. टोळ नाक्या नंतरच्या १८ किमी ने तर जास्तच दम काढला अस चँप म्हणत होता. कॅमल हंप सारखे चढ उतार होते त्यामुळे भलताच त्रास झाल असे कळाले. जिवाची मर मर करत ३ वाजता एक्दाचे निप्पाणी मुक्कामाला पोचले :फिदी:.
प्रवासासाठी अनेक शुभेच्छा !!
प्रवासासाठी अनेक शुभेच्छा !!
अनेकानेक शुभेच्छा
अनेकानेक शुभेच्छा
हार्दीक
हार्दीक शुभेच्छा......!
(रच्याकने हा 'टोळ' नाका म्हणजे काय?)
खुप छान. मोहिमेवर गेलेल्यांना
खुप छान. मोहिमेवर गेलेल्यांना शुभेच्छा..
शुभेच्छा प्रवास सुखाचा होवो
शुभेच्छा
प्रवास सुखाचा होवो
खुप खुप शुभेच्छा , एक वेळ
खुप खुप शुभेच्छा , एक वेळ चालत जाणं इतकं कठीण नसेल जितकं सायकल वर जाणं आहे, हॅट्स ऑफ यु, उन्हाचा खुप त्रास होतो या दिवसात तुम्हाला माहीतच असेल काय काय खावं प्यावं पण तरीही उन्हात पित्त टाळण्यासाठी जोडीला कोकम सरबत आणि सब्जा असु द्या खुप फरक पडतो त्याने.
आशु, ओंकार आणि ग्रूप २१ ला
आशु, ओंकार आणि ग्रूप २१ ला निघणार होता आणि माझी गोव्याची BRM बदलून पुण्याला झाल्यामुळे वाटेत आशु अन ओंक्याला गाठू हे माहित होते. ती लोकं साडे चारला निघणार होती आणि मी ६ ला.
पावणेआठ च्या सुमारास वाजता मी आशुला गाठले. त्याच्याशी थोडावेळ बोलून मग ओंकारला गाठण्यासाठी श्रीराम वडापाव गाठले कारण हा ग्रूप तिथे ब्रेक घेणार होता. मात्र त्याच्याशी बोलून मी पुढे गेलो कारण मला "रेस अगेन्स्ट टाईम" वेळेआधी पूर्ण करायची होती.
त्यांना असे सी ऑफ करायला मिळाल्यामुळे मलाही बरे वाटले.
गो गाईज !
भन्नाट लाँग राईड आहे -
भन्नाट लाँग राईड आहे - सर्वांना शुभेच्छा, आणि सलाम
मनःपुर्वक शुभेच्छा.
मनःपुर्वक शुभेच्छा.
चँपच्या ग्रुपने आता पर्यंत
चँपच्या ग्रुपने आता पर्यंत ७०४.४ किमीचा पल्ला गाठला आहे.
२३ तारखेला मोठं अंतर कापल्याने २४ चा पल्ला लहान ठरवलेला. आणि त्यामानानं २५ तारखेचा पल्ला १४५ किमी होता. रुट अपेक्षेपेक्षा अवघड निघाला असं जाणवलं. चँप म्हणत होता तानवडी घाटाने तर पहाटे सुद्धा घाम काढला. पुढे शंकेश्वर मार्गे बरेच चढ-उतार मागे टाकत सायकल दामटत राहीले. त्या सुनसान रोडवर सोबतीला फक्त कोरडं रान आणि अंगचटीला येणारं भयंकर उन. त्यात हेडविंड, समोरुन वाहनारा वारा. या सगळ्यामुळे थकवा लगेच जाणवायला लागलेला. त्या वार्यामुळे, घाटात जेवढी शक्ती लागते तेवढी शक्ती सपाट रोडवर लागल्त होती. बेळगावच्या आधी लागणार्या घाटाने सुद्धा जाम दम काढला. चँपचा एक नातेवाईक बेळगावला सगळ्यांन्साठी शाल घेउन आलेला. नमस्कार चमत्कार झाले, सत्कावगैरे झाल्यावर ग्रुप पुढच्या प्रवासला लागले.
पुढचा प्रवास, बेळगाव-धारवाड तर अतिशय त्रासदायक झाला. पुर्ण प्रवासभर सोबतीला फक्त निर्मनुष्य असा रुक्ष रस्ता आणि भयानक उन एवढेच. त्यात चँपचा स्पिड्कमी होउन इतरांपेक्षा जवळ जवळ तो ४५ किमी मागे पडला. मग त्याच्यासाठी एकजण थांबुन, त्याला सोबत केली. दोघे मजल दर मजल करत गेले. चँप म्हणतो मानसिक खच्चीकरणामुळे हा प्रवास तो पुर्ण करेल की नाही असे वाटत होते. अंधार पडला तेव्हा ते धारवाड पासुन अजुन १५ किमी लांब होते. गावात पोचले तसे ट्रॅफिकचा सामना करत कसे बसे ८ वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोचले.
बाकी प्रवासात कोणाकोणाचे काय काय सोलुन निघाले याचं सविस्तर वृतांत चँप स्वतः टाकेलच आल्यावर.
आजच्या ताज्या खबरी नुसार सकाळी १०:१५ ला ते उडपीला पोहचले होते.
वृत्तांत लिहित रहा. आम्ही
वृत्तांत लिहित रहा. आम्ही वाचतोय. संपूर्ण वाटचालीकरता शुभेच्छा.
मित +१
मित +१
१६५० सायकलिंग ग्रेट!
१६५० सायकलिंग ग्रेट!
वृत्तांत लिहित रहा. आम्ही
वृत्तांत लिहित रहा. आम्ही वाचतोय. संपूर्ण वाटचालीकरता शुभेच्छा.
+१
ग्रेट.... सर्वांना शुभेच्छा
ग्रेट.... सर्वांना शुभेच्छा !
इथे वृत्तान्त देत असल्याबद्दल मल्याला धन्यवाद
केदारचे अभिनंदन (४०० पूर्ण केलिच असेल, वृत्तान्त येऊद्यात)
नुकत्याच मिळालेल्या माहीती
नुकत्याच मिळालेल्या माहीती नुसार सगळे मंगळुरु ला सुखरुप पणे पोचले.
६ दिवसात ८११ किमी.
Pages