पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम
पुणे - दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदुषणाच्या भीषण समस्येच्या पार्श्वभूमीवर सायकलचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या हेतूने पुण्यातील काही सायकलप्रेमींनी पुणे ते कन्याकुमारी अशा सायकल मोहीमेचे आयोजन केले आहे. ही मोहीम सारसबाग येथून २१ फेब्रुवारीला प्रस्थान करणार असून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांतून प्रस्थान करत १६५० किमी प्रवास करून विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी येथे सांगता करण्यात येईल.
या मोहीमेचे नेतृत्व उपेंद्र शेवडे यांच्याकडे असून वेदांग शेवडे, आनंद घाटपांडे, सुह्रुद घाटपांडे, ओंकार ब्रम्हे, उमेश पवार, नंदू आपटे, चंद्रशेखर इती, अद्वैत जोशी आणि आशिष फडणीस हे या मोहीमेत सामील असतील.
मोहीमेचा मार्ग - पुणे - कराड - निप्पाणी - हुबळी - अंकोला, मरवंथे - सुरथकल - पय्यानुर - कोझीकोडे - गुरुवायुर - कोची - चावारा - थिरुवनंतपुरम - कन्याकुमारी.
- आशुचँप.
या कार्यक्रमाबद्दलचे अपडेट्स मी इथे टाकेन.
व्वा... भले शाब्बास.... आशू
व्वा... भले शाब्बास.... आशू चॅम्पचे काय? तो स्टेबल आहे ना?
चॅम्प द ग्रेट!!! Hats off
चॅम्प द ग्रेट!!! Hats off
मस्त आहे मोहीम! हार्दिक
मस्त आहे मोहीम! हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छा !शुभेच्छा !
शुभेच्छा !शुभेच्छा !
सध्याची खबर काय आहे?
सध्याची खबर काय आहे?
शारिरिक थकवा जाणवायला लागला
शारिरिक थकवा जाणवायला लागला की मानसिकतेची खरी कसोटी असते. चँपा निभावून नेईल याची खात्री आहे
मध्ये १-२ दिवस शरिराला पुर्ण आराम देण्याकरिता मोकळे दिवस सोडले असावेतच.
अगागा! मल्ल्या, अपडेटस्
अगागा!
मल्ल्या, अपडेटस् भारीच!
२५ तारखे नंतरचे रुट सगळे जरा
२५ तारखे नंतरचे रुट सगळे जरा हेक्टीकच गेले.
२८ तारखेला ठरल्या प्रमाणे आठ दिवसात १०५२ किमीचा पल्ला झाला. धारवाड वरुन अंकोलाल जाताना २५ किमीचा घाट उतरले, ज्याच्या भन्नाट अनुभव चँपच्याच शब्दात ऐकण्यात मजा आहे. समुद्र किनारपट्टीच्या भागातुन जाताना तर बसल्या बसल्या घामेघुम व्हायचे तिथे ७-८ तास ९ किलो सामान घेउन सायकल चालवल्यावर काय झाले असेल. नुसतं शहाळं, कलिंगड आणि ओआरएस वर तग धरले सगळे.
गेल्या काही दिवसात रोज याच वातावरणात १००-१२५ किमी प्रवास घडतोय.
वाटेत दोन किल्लेही सर केले. लुंगी घालुन देव दर्शनही झाले. लुंगीचे फोटोज विना परवाना इथे टाकन्यास बंदी आहे, तरी ज्याना पहावयाचे आहे त्यांनी वैयक्तीक संपर्क साधावे.
आजच्या अपडेट नुसार कोचीला पोचलेत आणि अजुन ३०० किमी बाकी आहे.
सायकल सफर
सायकल सफर मित्रांनो,
विश्रांतीच्या काळात अरुण वेढीकरांच्या मुंबई ते काश्मीर एक्कलकोंडा सायकल सफर नामा वाचा. कथा जरा जुनी १९७९ मधील आहे. तुम्हाला आमच्या शुभेच्छा...
मित्रांनो ही घ्या मुंबई ते
मित्रांनो ही घ्या मुंबई ते काश्मीर भाग १ धाग्याची लिंक
ताज्या बातमी नुसार आजच्या १२०
ताज्या बातमी नुसार आजच्या १२० किमीच्या प्रवासा नंतर चँप मंडळी चवरा ला पोचले आहेत. त्यांच्या शेवटच्या स्टॉपला तिथुन फक्त १७० किमीचं अंतर बाकी आहे. प्रवासा दरम्यान चँपला भेटलेल्या एका सायकलींग क्लबच्या व्यक्तीने चँपच्या ग्रुप साठी उद्या एक रिसेप्शन ठेवले आहे.
आता फक्त (?) १७० किमी....
आता फक्त (?) १७० किमी....
ह्या मोहिमेच्या खबर-बाता वेळोवेळी पोचवल्याबद्दल धन्यवाद मल्ली
ग्रेट... अन हो, मल्लीला
ग्रेट... अन हो, मल्लीला धन्यवाद.
कधी पोहतायेत आपले सायकलस्वार
कधी पोहतायेत आपले सायकलस्वार कन्याकुमारीला , तिथे एक झेंडा गाडून फोटो टाका रे
ग्रेट गोईंग
सही....आज पार्टीचा दिवस
सही....आज पार्टीचा दिवस असेल. अभिनंदन आशुचँप आणि टीम
मल्लीणा धन्यवाद. मस्त वाटत वाचायला.
"पुण्याला आलो तर हिलस्टेशन ला
"पुण्याला आलो तर हिलस्टेशन ला आल्याचं फिल होईल, एवढं उकडतंय." - इती चँप.
कॉल केला तेव्हा तमिळ मुलीने कैच्या कै बडबड ऐकवली. म्हंटलं "चांदी की सायकल...." म्हणत चँपने कोणाला लिफ्ट वगैरे दिली की काय? नंतर त्याच मुलीने इंग्रजी मध्ये चँप बिझी असल्याचं कळवलं. म्हंटलं ही बेनी (बेनंचं स्त्रिलिंगी असंच ना? :अओ:) तर कस्टमर केअर वाली आहे तर.
पुन्हा एक्दोन्वेला ट्राय केल्यावर लगला एक्दाचा फोन. आजचा ९० किमीचा प्रवास संपवुन सगळे सुखरुप पणे तिरुअनंतपुरम ला पोचलेत. आजवर झाला नाही एवढा ट्राफिकचा त्रास झाला असं कळलं. आज का कुणास ठाउक चँपचं बोलणं क्लियर येत नव्हतं, मला निट कळतच नव्हतं. कदाचीत तमीळभाषेचा परिणाम झालेलाच दिसतोय. सारखं सारखं 'काय?' म्हणुन विचारावं लागायचं.
संध्याकाळची रिशेस्प्सन पार्टी, विविध देवस्थान (केलेल्या पापांची गोळाबेरीज म्हणुन हा लगे हातो पुण्य कमवतोय ) वगैरे वगैरे करनार आहेत.
चँपच्या संमंतीने त्याचे फोटो इथे टाकत आहे.
यन्ना रास्कल्ला.....
आमच्या राज्यात या सर्व
आमच्या राज्यात या सर्व सायकलस्वारांचं उद्या हार्दिक स्वागत करणार.
व्वा व्वा व्वा... मस्त
व्वा व्वा व्वा... मस्त फोटो.... च्याम्प्या लुन्गीत अगदि केरळी/मद्रासी हिरोच वाटतोय... !
शुटिंग चालू अस्ताना हे तिथे पोचले तर चुकून कुठल्या शिनुमात गेस्ट हिरो म्हणुन घेतलनी नै म्हणजे मिळवली. अजुनही काय काय चुकून होऊ नये असे यादीत आहे.
व्वा व्वा व्वा... मस्त
व्वा व्वा व्वा... मस्त फोटो.... च्याम्प्या लुन्गीत अगदि केरळी/मद्रासी हिरोच वाटतोय... !
याला फक्ट थोडं डांबर फासावं लागेल.
यन्ना रास्कल्ला..... >>
यन्ना रास्कल्ला..... >>
मंडळी तुमच्या सर्वांच्या
मंडळी तुमच्या सर्वांच्या पाठींब्यामुळे आणि शुभेच्छांच्या जोरावर पुणे ते कन्याकुमारी अशी सायकल मोहीम यशस्वीरित्या पार पडली. बरोबर १३ दिवसात आम्ही १५६५ किमी अंतर पार करून भारताचे दक्षिण टोक गाठले.
पुण्यात आल्यावर सर्व मित्रपरिवार आणि कुटुंबियांनी भरघोस स्वागत केले. आणि आता लवकरच हा तपशील डोक्यात असतानाच वृत्तांत टाकावा अशा विचारात आहे.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आणि विशेषत मल्लीला धन्यवाद...ज्याने मेहनत घेऊन हे अपडेट टाकण्याचे काम केले.
आशूचॅम्प, तू अन तुझ्या सहकारी
आशूचॅम्प, तू अन तुझ्या सहकारी संघाचे हार्दीक अभिनंदन.... ग्रेट.
तुझा वृत्तान्त/रोजनिशी लौकर येऊदे.
आशुचँप अतिशय मनापासुन अभिनंदन
आशुचँप अतिशय मनापासुन अभिनंदन रे.
सगळ्या टीमचे हार्दिक अभिनंदन
सगळ्या टीमचे हार्दिक अभिनंदन
डिटेलवार वृत्तांत (फोटोसकट) येऊ देत
अभिनंदन सर्व टीम
अभिनंदन सर्व टीम चे.
डिट्टेलवार वृतांत येवु देत.
अभिनंदन..
अभिनंदन..
अभिनंदन... डिट्टेल वृ हवाय...
अभिनंदन... डिट्टेल वृ हवाय...
Pages