.
AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.
असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.
या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.
आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.
हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.
खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,
पण आज मात्र धागा काढला याची कारणे -
१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.
तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !
खालील लिंकवर पोल सापडेल -
http://www.maayboli.com/node/52621
लिंबु, वविला येणं ही इतकी
लिंबु, वविला येणं ही इतकी वर्षं माझी वैयक्तिक गरज होती. इथून पुढे ती कदाचित राहणारही नाही.
बाकी मी कुठेही देहबोली/चेहरा/वर्तनातलं अश्लीलपण, बीभत्सपण, क्रौर्य इ.चं समर्थन केलेलं दिसलं नाही, त्यामुळे तुझी त्या उल्लेखापुढची पोस्ट मी वाचली नाही.
>>>> त्यामुळे तुझी त्या
>>>> त्यामुळे तुझी त्या उल्लेखापुढची पोस्ट मी वाचली नाही. <<<<
अनुल्लेखाच्या बादशहांकडून (किंवा एक्का/गुलाम/दश्शी/नव्वी/दुर्री... काही म्हणा) यापेक्षा वेगळी माझी अपेक्षाही नव्हती साजिरामहाराजा...
लिम्बुभाऊ मी साजिरा यान्च्या
लिम्बुभाऊ मी साजिरा यान्च्या पोस्टचा अर्थ लावायचा प्रयत्न करतेय, पण तुम्ही वविला मध्ये का आणले? वविला कित्येक जण सहपरीवार पण येतात/ येऊ शकतात. कुठल्याही ववि मध्ये असे झाले नाही आणी होणार नाही. हे तुम्हालाही माहीत आहे. तुमच्या असल्या पोस्टमुळे तुमच्या चान्गल्या लिखाणाचा सुद्धा अनुल्लेख होतोय, हे प्लीज लक्षात घ्या. मी असहमत आहे तुमच्याशी निदान या ववि पोस्टशी तरी.
रश्मी, बर्याच अंशी मी
रश्मी, बर्याच अंशी मी तुमच्या वरील मताशी सहमत आहे.
मात्र एखादा माणूस शिव्या देणे/नदेणे याच्यात काहीच अर्थ उरत नाही असे ठामपणे म्हणतो व त्याचे समर्थनार्थ/वा आड लपण्यास जेव्हा देहबोलिचे उदाहरण देतो तेव्हा ते प्रत्यक्ष बघण्या/अनुभवण्यावाचून पर्याय उरत नाही की अशा कोणत्या देहबोली आहेत, ज्या शिव्यांपेक्षाही काकणभर सरस तर आहेतच, शिवाय त्या देहबोली केल्या की मग शिव्या दुय्यम ठरून त्या द्या वा नका देऊ काही फरक पडत नाही.
वविचा उल्लेख केवळ निमित्तमात्र कारण असे मत देणारी व्यक्ति व मी भेटलो तर तेव्हाच भेटू शकतो, अन्य वेळेस तशी शक्यता नाही. वविचा उल्लेख गाळून मग ती पोस्ट विचारात घेतलीत तर बरे होईल.
बघा, एकीकडे, एका पोस्ट मधे मी निव्वळ वविचा उल्लेख केला की त्यावेळेस भेटाल तेव्हा उदाहरण दाखवा, तर आपण इतके संवेदनशील आहोत, त्याच वेळेस इतक्या हिडीस कार्यक्रमाचे समर्थनार्थ मात्र कित्येक आयडीज अहमहमिकेने सरसावताहेत. याचा अर्थ आपण काय काढायचा?
लिम्बुभाऊ. तरी वविचे उदाहरण
लिम्बुभाऊ.:स्मित: तरी वविचे उदाहरण नाही पटले. देहबोली काय किन्वा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष शिव्या काय, दोन्ही असभ्य आणी वाईटच.
दुसर्या पर्यायातून सार्या
दुसर्या पर्यायातून सार्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. मात्र माझ्या आजूबाजूच्या समाजाची, त्याच्या प्राधान्यक्रमाची आणि त्याच्या गरजांची जाण मला १००% आहे- असं मला जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत मी स्व्तः ती देणार नाही. >>>
पटले नाही.
शंभर टक्के जाण नसेल आणि सत्तर, ऐंशी टक्के असेल तर बोलायचे नाही का म्हणजे?
माझ्या मुलांनी मोठं झाल्यावर आणि माझ्या ओळखीच्या सज्ञान पुरुषांनी जाहिर समाजात ही भाषा वापरू नये असे वाटत असेल तर या गोष्टीला इतर अनेक प्रश्नांची शंभर टक्के जाण नाही म्हणून विरोधच करायचा नाही?
कमाल आहे.
आपण इतके संवेदनशील आहोत,
आपण इतके संवेदनशील आहोत, त्याच वेळेस इतक्या हिडीस कार्यक्रमाचे समर्थनार्थ मात्र कित्येक आयडीज अहमहमिकेने सरसावताहेत. याचा अर्थ आपण काय काढायचा?
>>>>
याचा अर्थ सनी लिओन जन्माला यावी, पण शेजारच्या घरात!
स्पष्टी - आम्ही पॉर्न शो बघणे एंजॉय करू, पण आमच्या घरातील कोणी त्यात भाग घ्यावा अशी इच्छा नाही ठेवणार.
आणि मला नेमकी हिच भिती आहे, उद्या हि घाण आपल्या घरात यायला वेळ नाही लागणार.
साती
साती +१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
साती, ऋन्मेष, अनुमोदन. (आता
साती, ऋन्मेष, अनुमोदन.
(आता बराच काळ मी मायबोलिवरुन गायब असणार आहे.)
याचा अर्थ सनी लिओन जन्माला
याचा अर्थ सनी लिओन जन्माला यावी, पण शेजारच्या घरात!
स्पष्टी - आम्ही पॉर्न शो बघणे एंजॉय करू, पण आमच्या घरातील कोणी त्यात भाग घ्यावा अशी इच्छा नाही ठेवणार.
आणि मला नेमकी हिच भिती आहे, उद्या हि घाण आपल्या घरात यायला वेळ नाही लागणार.>>>>>>>>>>>>>>
हा कुठला अर्थ काढलाय आणि कुठल्या ए आय बी चं समर्थन करणार्या लोकांच्या पोस्टी बघून काढण्यात आलाय?
बुवा, जाऊ द्याना. आपला शो
बुवा, जाऊ द्याना. आपला शो बघून झालं, हसून झालं. विसरलोसुद्धा. यांचंच अजून चालू आहे!!!!!
आता विसरालच हो. पण तुमची
आता विसरालच हो. पण तुमची पुढची पिढी हेच अस्सच वागतील बोलतील तेव्हा जाण येईल.
खरंच येईल का? हाही प्रश्न आहेच म्हणा. कदाचित तेही तुमच्या आवडींमधे खपुन जाईल. कारण शिव्या तुम्हाला कॉलेजात अस्ताना माहित झाल्या आनि त्या तुम्ही आताही देता हे कबुल केलेच आहे. तेव्हा तुमच्या मुलांनी (वैयक्तिक होतंय खरंतर. त्यबद्दल सॉरी.) शिव्या दिल्या त्याचं तुम्हाला वाईट वाटेलच असं नाही. नै का?
पण एक खरंय. चारचौघात अशी भाषा वापरायला, असलं वर्तन करायला हिम्मत लागते असं आपलं मला वाटतं. काय करणार संस्कारच तसे बॅकवर्ड मिळालेत ना घरुन.
>>>>>> तुलना ईंटरेस्टींग
>>>>>> तुलना ईंटरेस्टींग वाटली.
१२ वर्षाच्या मुलाचे बसमध्ये पुर्ण तिकीट घेतात तर त्याला बीअर प्यायला दिली तर काय हरकत आहे... असे काहीसे <<<<
झक्कास ऋन्मेष, अगदी अचूक!>>
लिंबूटिंबू, सिरीयसली? तुमच्याकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. इथे कुठेही मी अंडरएज मुलांसाठी हे योग्य आहे असे म्हटले नाहीये. मात्र १८ वर्षावरची व्यक्ती हे पाहून बिघडेल म्हणून ओरडा करण्यात काहीच हशील नाही . जो काही अंकूश ठेवायचा तो स्वतःच्या मुलांच्या युटुब, सेलफोन, फेसबुक वापरावर. १८ वर्षाची व्यक्तीला एकीकडे सज्ञान आहे असेही म्हणायचे आणि एकीकडे समज नसलेले मुलही म्हणायचे असे दुटप्पीपण नाही पटत. त्यातुन वय वाढवुन हवे असेल तर जनहितयाचिका आहेच.
बाकी १२ वर्षाच्या मुलाला बियर . - त्याला Contributing to the Delinquency of a Minor म्हणतात.-हे लॉजिक हास्यास्पद!
बाकी स्वतः शो बघून तो मराठी मुलीने बघितला तेव्हा आता संस्कृती बुडणार म्हणून गळे काढणे म्हणजे मागल्या दाराने पुन्हा मुलींसाठी काय योग्य ते आम्ही ठरवू .
स्वाती२ - तरी त्या
स्वाती२ -
तरी त्या आंग्र्यांचं पोस्ट वाचलंं की नाही ? ..... "नेटवर हल्ली बायकांच्या प्रतिक्रीया फारच इरीटेटींग होत चालल्या आहेत. बायकांनी एक काय तरी भूमिका घ्यावी. " ......
"नेटवर हल्ली बायकांच्या
"नेटवर हल्ली बायकांच्या प्रतिक्रीया फारच इरीटेटींग होत चालल्या आहेत. बायकांनी एक काय तरी भूमिका घ्यावी. " >>
मैत्रेयी, ते आंग्रे आजमितीला
मैत्रेयी, ते आंग्रे आजमितीला तीन दिवसांचं बाळ आहे.
त्या बाळाकडे लक्ष देऊ नका.
तेव्हा तुमच्या मुलांनी
तेव्हा तुमच्या मुलांनी (वैयक्तिक होतंय खरंतर. त्यबद्दल सॉरी.) शिव्या दिल्या त्याचं तुम्हाला वाईट वाटेलच असं नाही. नै का?<< तुम्ही अतिच वैयक्तिक टोमणे मागच्या दोन तीन पोस्टीमधून मारत आहात. चांगल्या संस्कारांच्या व्यक्तींकडून असले टोमणे छान वाटतात हां ऐकायला!! मस्त चालू द्यात. मी तरी अनुल्लेख करणार आहे. (मागे केलाच होता, पण ते तुमच्या अद्याप लक्षात आलेलं दिसत नाही म्हणून मुद्दाम सांगतेय)
१६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी
१६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी जिथे लिहीली जाते तिथे आयडीचं वय काय पाहता ?
>>> जो काही अंकूश ठेवायचा तो
>>> जो काही अंकूश ठेवायचा तो स्वतःच्या मुलांच्या युटुब, सेलफोन, फेसबुक वापरावर <<<
स्वाती२, अहो इथेच फरक आहे ना....,
तुम्ही केवळ स्वतःच्या मुलांच्यावर अंकूश ठेवायला सांगताय.
अन आम्हि असली शिव्याशापाची घाण जाहीररित्या पसरविणार्यांवर अंकूश ठेवायला हवा असे सांगतोय.
असो.
पुरूषांना स्पष्ट भूमिका घेणं
पुरूषांना स्पष्ट भूमिका घेणं नेटवर दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. या विनोदाच्या संदर्भातच सांगायचं तर..
१. जर तुम्ही अशा विनोदांना विरोध केला की लगेचच तुम्ही बुरसटलेले ठरता. मग वाढलेल्या नख्यांनी बोचकारत त्या बाइचा-या पुरूषाला अगदी रक्तबंबाळ केलं जातं. बायकांच्या हल्ल्याला उत्तर देणं सुसंस्कृत समजलं जात नसल्याने मुकाट्याने दुसरा गाल पुढे करावा लागतो.
२. जर तुम्ही अशा विनोदांचं समर्थन केलंत आणि या बायकांच्या ब्लॅकलिस्टीत असाल तर मग तुमची एकंदरच आवड, संस्क्रुती इथपासून सुरुवात होते, मधमाशांचं पोळं उठावं त्याप्रमाणे वाट्टेल तसे चावे घेत तुमच्या घरातल्या महिलामंडळींना कोनकोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागू शकतं याची जाणीव करून दिली जाते.
इतर उदाहरणांवर विशेष टिप्पण्या कालबद्ध पद्धतीने करण्यात येतील,
http://rbk137.blogspot.in/ind
http://rbk137.blogspot.in/index.html
आंग्रे, तुम्हाला अमुक एक
आंग्रे,
तुम्हाला अमुक एक गोष्ट आवडलीच पाहिजे असे थोडेच आहे. आवडली नाही ठिक आहे. त्यात पुढारलेले, बुरसटलेले असे काही नाही. 'अशा प्रकारचे विनोद' असा उल्लेख तुम्ही केलाय म्हणून तर न वाचणे तुमच्या हातात आहे. मला असे विनोद पाठवू नका असे सांगणे तुमच्या हातात आहे. व्यक्ती म्हणून ते स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. त्यात कठीण काहीच नाही. आपल्या पुरती आपली भुमिका स्पष्ट आणि सुसंगत हवी. नेट वरच्या स्त्रीयां कशा रिअॅक्ट करतील याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय ठिक वाटते ते निवडणे महत्वाचे नाही का?
स्वाती २ एआयबीच्या निमित्ताने
स्वाती २
एआयबीच्या निमित्ताने या धाग्यावर निमित्त झालेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की काही बायकांचा पुरूषांना झोडपणे हा आंतरजालीय टाईमपास बनू पाहत आहे. त्यासाठी काही बळीपुरुषांच्या पोस्टस पडलया की त्याच्या विरोधात भूमिका घेऊन सुया टोचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. समजा त्याने किंवा दुस-याने विरुद्ध अर्थाचे लिहीले की त्याच्याही विरोधात भूमिका घेतली जाते. हा अनुभव आता कॉमन झाला आहे त्यामुळं उदाहरणांची गरज पडू नये. पाण आग्रहच असेल तर ठीक आहे.
>> तुम्ही केवळ स्वतःच्या
>>
तुम्ही केवळ स्वतःच्या मुलांच्यावर अंकूश ठेवायला सांगताय.
अन आम्हि असली शिव्याशापाची घाण जाहीररित्या पसरविणार्यांवर अंकूश ठेवायला हवा असे सांगतोय.>>
नाही. मी कायदेशीर मार्गाने जा , हवेतर कायद्यात बदल घडवून आणा असे सांगतेय.
अनुल्लेख करतेय हे प्रतिसाद
अनुल्लेख करतेय हे प्रतिसाद देउन सांगितलेत ते बरे केलेत.
वैयक्तिक टोमणे??? टोमणे? सिरीयसली???
तुम्ही स्वतःच कबुल केलेत ती गोष्ट. तीच इतरांनी रीपीट केल्यावर टोमणे होतात का?
ही पोस्ट लिहिताना त्यात वैयक्तिक होतय म्हणुन सॉरी ही म्हणुन झालय. अजुन कुठे वैयक्तिक टोमण्याची(?) पोस्ट मी लिहिली असेल तर दाखवुन द्या. सॉरी म्हणायची तयारी आहे.
आत्ता कुठेतरी वाचलं की
आत्ता कुठेतरी वाचलं की हाफपँटीमुळे कुणाला तरी फेफरं आलं. ही पोस्ट इसवीसनापूर्वीची असू शकते. त्यावरून अजूनही त्या बळीराजाला हजारो पिसवा डसवण्याचा अनुभव देण्यात येत असेल तर दुर्दैव आहे. हाफ पँट बद्दल या पुरूषाने जे मत व्यक्त केलं त्याच्या बरोबर विरोधात मत वाचनात आलं होतं.
एका ठिकाणी टॉपलेस डे बद्दल वादंगा माजलं होतं. ज्याने या कल्पनेला विरोध केला त्याला पुरूषी विचार, पुरूषसत्ताक, बुरसटलेले, मनुस्मृती असे ठेवणीतले चावे घेण्यात आले. त्याचा पुरता मानभंग करण्यात आला. दुस-या एकाने तिथेच इथे भारतात साजरा होणार आहे का हा डे, नाही म्हणजे आधीच जागा धरून ठेवायला अशी मार्मिक टिप्पणी केल्यावर लगेचच १८० च्या कोनातून यू टर्न घेऊन त्याच्या घरच्या स्त्रियांचा उद्धार झाला. त्यांना भाग घ्यायला पाठवावे असे सल्ले देण्यात आले.
यावर मत देण्याची गरज वाटत नाही.
धन्यवाद. आता मी ही अनुल्लेख
धन्यवाद. आता मी ही अनुल्लेख करावा म्हणते.
मी कायदेशीर मार्गाने जा ,
मी कायदेशीर मार्गाने जा , हवेतर कायद्यात बदल घडवून आणा असे सांगतेय.
तुम्हाला खरच अस वाटत की कायदा अस्तित्वात आहे
कायद्यात बदल घडवून आणेपर्यंत इथले सगळे लोक भूतकाळात जमा झालेले असतील
कायद्याचा धाक असता तर या देशाची परिस्थिती फार वेगळी असती
आंग्रे , त्या दोन्ही
आंग्रे , त्या दोन्ही बाप्यांची विचारसरणी एकच असल्यामुळे दोन्हीला चावेच घेतले गेले ना ? १८० चा यू टर्न कुठे दिसला तुम्हाला ? मज्जाय बुवा आता
काय होतं की इथे असताना सणवार
काय होतं की इथे असताना सणवार करणारे, इतरांसारखीच मतं असणारे जरा म्हणून पोटापाण्यासाठी देशाटन करून गेले की आपण किती चुकीचे होतो, आहोत याचे साक्षात्कार तिथे होऊ लागतात. बरं, तिथल्या वातावरणात जुळवून घेण्यावाचून गत्यंतरही नसते. यातले काही जण भारतात परतल्यानंतर पुन्हा पूर्वीसारखे होताना पाहीलेले आहेत. काही बदललेल्या स्टेटमधेच राहतात. त्यांचं डिफ्युजन पुन्हा होत नाही. काहिंच्या मतांचं पुन्हा पुन्हा रिसायकलींग होत राहतं. हे परिस्थितीजन्य असू शकतं. असे लोक त्या त्या परिस्थितीत असताना आपल्या आधिच्या अवस्थेला हसणे अशक्य असल्याने त्या अवस्थेत असणा-या देशी लोकांना हास्यास्पद ठरवत असतात. वर एका ब्लॉगची लिंक दिली आहे.
Pages