.
AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.
असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.
या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.
आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.
हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.
खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,
पण आज मात्र धागा काढला याची कारणे -
१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.
तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !
खालील लिंकवर पोल सापडेल -
http://www.maayboli.com/node/52621
आय यम म्येसेन्जर आफ गाड्ड
आय यम म्येसेन्जर आफ गाड्ड
तुम्हाला ढ काढता येत नाहीये
तुम्हाला ढ काढता येत नाहीये का आंग्रे? शिफ्ट दाबून डी दाबायचा आणि पुढे एच म्हणजे ह दाबायचा. ढ होतो.
गाढव असं लिहिता येइल.
(अगदीच नवीन आहात म्हणून सांगतोय बाकी काही नाही)
यन्ना रास्कला. जळ्ळं ते
यन्ना रास्कला. जळ्ळं ते पोस्टं..
यत्ता पयली. तुकडी ढ
वैद्यबुवा तुम्ही काय स्वतःला
वैद्यबुवा
तुम्ही काय स्वतःला समलान खान समजता का ?
सलमान खान शर्ट काढून विनोद करतो तो कौतुकास्पद असतो. युनूस परवेझनं केला तर आंबटशौकीन, असभ्य, अश्लील इत्यादी इत्यादी
तुम्ही तो शब्द लिहीलाच आहात तर.. समजेलही
तुम्ही पण लागले का त्या
तुम्ही पण लागले का त्या बेफिकिरांसारखे बोलायला? मी नेमका कसा दिसतो हे कळायला तुम्ही माझं थोबाड कधी बघितलय का?
बरं ते जाऊ द्यात, तुम्ही शर्ट घालून, तुमच्या मारुती वॅन मधून येऊन प्रश्न विचारायच्या एवेजी असे विनोदी झगा घालून गाढवाच्या मेसेजेसची ने आण का करत आहात?
अर्रर्र, लैच पांचट निघाले
अर्रर्र, लैच पांचट निघाले बुवा.
तुमचं चालू द्या हंबरणं. आपलं खाखका.
आंग्रे, त्यांना माफ करा.
आंग्रे,
त्यांना माफ करा.
(No subject)
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत महानुभाव टग्या यांच्या समर्थनात येणार्या पोस्टींच्या प्रतिक्शेत...
Pages