.
AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.
असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.
या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.
आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.
हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.
खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,
पण आज मात्र धागा काढला याची कारणे -
१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.
तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !
खालील लिंकवर पोल सापडेल -
http://www.maayboli.com/node/52621
इट टेक्स समथिंग टू बी लिस्ट
इट टेक्स समथिंग टू बी लिस्ट टॅलेण्टेड इन द फॅमिली व्हीच हॅज संजय अँड सोनम !!!!! >> हो जबरी हसलो ते वाचून
मी पाहिलाय, पण तमाशाला देखील
मी पाहिलाय, पण तमाशाला देखील भयानक विरोध झाला होताच समाजात. त्यातुनच अभिजन आणि बहुजन वर्ग निर्माण झाले होते हे विसरलात काय
>>>वैयक्तिक आयुष्यात आम्ही
>>>वैयक्तिक आयुष्यात आम्ही शिव्या घालणार पण त्याचे प्रकटीकरण झाले कि असुरक्षित वाटणार. त्यात शरीरसंबंधाच्या संदर्भाने काहीही बोलले गेले कि मने लगेच बंद होतात व असुरक्षित होतात. नैतिकतेचे फिल्टर लागतात. <<<
व्वा व्वा!
मस्त!
वैयक्तिक आयुष्यात लोक काय काय करतात ह्याची एक लहानशी यादी बघूयात का?
१. जातीवाचक उल्लेख करून शिव्या देणे
२. धार्मिक उल्लेख करून शिव्या देणे
३. राष्ट्रीय थोर व्यक्तिमत्त्वांनी सत्यानाश केला असे म्हणत त्यांच्या नावाने शिव्या देणे
४. आपल्याला जो आवडत नाही त्याच्या नावाने शिव्या देणे
हे सगळे भरपूर वॉर्निंग देऊन, लेखी आगाऊ नोटिसा पाठवून, निव्वळ मनोरंजनासाठी आहे असे ठसवून, हे सार्वजनिक ठिकाणी ऐकण्याची हिम्मत वाढवण्याची संधी आहे असे बिंबवून पैसे लावून करायचे का?
पण त्यापुढे विरोध करायचा तर
पण त्यापुढे विरोध करायचा तर कायदेशीर मार्गाने करा, एवढेच.
>>
मायबोलीवर धागा काढणे हा नक्कीच बेकायदेशीर मार्ग नाही
तमाशा<<< एरवी समाजात
तमाशा<<<
एरवी समाजात उच्चभ्रू, अत्यंत महान कलाकार व क्रीम ऑफ सोसायटी म्हणून वावरणार्या बायकांना स्टेजवर नाचवून, त्यांच्यावर पैसे उधळत, शिट्ट्या मारत अश्लील बोलून पाहणार का काय होते ते?
तमासगिरांचा तो एकमेव व्यवसाय असतो.
जे एरवी दर्जेदार अभिनयाद्वारे खिळवून ठेवतात त्यांनी मुद्दाम बीभत्स वागून मनोरंजन करून पैसे कमावणे आणि पिढीजात तमाशाचाच व्यवसाय असलेल्या स्त्रीने अश्लील हावभाव करणे ही तुलना भयंकर आहे.
ज्यांना साध्या विनोदाच्या
ज्यांना साध्या विनोदाच्या धाग्यावरचे विनोद कळत नाही अश्या महाभागांना काही समजावुन सांगणे हे अत्यंत कठिणतम काम आहे. आणि हे काम करणार्यांबद्दल मनात आदर द्विगुणित झाला आहे.
हो जबरी हसलो ते वाचून >>>
हो जबरी हसलो ते वाचून >>> पाहिलं नाहीस का? त्यानंतर संजयनं उठून लोकांना अभिवादन केलं. दॅट वॉज हिलेरीअस.
तमासगिरांचा तो एकमेव व्यवसाय
तमासगिरांचा तो एकमेव व्यवसाय असतो. >>>
ओके बेफी - जर एकमेव व्यवसाय असेल तर कितीही खालच्या पातळीवरचे विनोद केले तर चालतात तुम्हाला.
जर एकमेव व्यवसाय असणार्यांनी खालच्या पातळीवरचे विनोद केले आणि युट्युब वर टाकले तर मुलांवर वाईट परीणाम होत नाही आणि भारतीय महान संस्क्रूती महानच रहाते.
>>>> इथल्या बहुतेकांनी कधी
>>>> इथल्या बहुतेकांनी कधी तमाशा पाहिला नाही का? <<<<
तमाशाच काय, डान्सबार देखिल लांबून पाहिलाय...
पण मूळचा तमाशा/लावणी/वग हे जाऊन केवळ काही मुठभर पुरुषी बुभुक्षितान्ना आवडते म्हणुन स्टेजवर उत्तान लैन्गिक हावभाव करीत बाया नाचविण्याचि परंपरा ज्याला "तमाशा' म्हणताय तो अन डान्सबारमधे काही फरक नाहीये. त्यालाही विरोधच आहे, इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या गृहमन्त्र्यांनी आबा पाटीलांनी डान्सबारवर बंदी आणली त्याचे समर्थनच केले होते.
खरे तर सध्याच्या विकृतीकडे झुकलेल्या "तमाशावरही" बंदी आणली पाहिजे, पण ते माझ्यासारख्याने म्हणणे म्हणजे बहुजनांच्या लोककलेचा खून वगैरे स्वरुपाचा "ब्राह्मणी" कावा ठरविला जाईल, म्हणून नाही म्हणत.
हे पटत नसेल, तर मराठी भाषेत देखिल कोणत्याही गैरकृत्याला/नियमबाह्य कृत्याला "काय तमाशा लावलाय" असे हीणकस उच्चारणच/संबोधनच होते हे तमाशाबाबतीतील सत्य असे विसरू नका.
तसेच तमाशे त्या कार्यक्रमात झाले असतील याची खात्री आहे. अन त्यालाच विरोध करताहेत लोक.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/salman-khan-un...
हि अजून एक न्यूज
फरीदा जलाल वर पण खूप खालच्या
फरीदा जलाल वर पण खूप खालच्या पातळीवर जोक मारण्यात आला. ह्यांची परवानगी घेतली होती का AIB ने?
http://indianexpress.com/article/entertainment/bollywood/farida-jalal-on...
>>>> पण तमाशाला देखील भयानक
>>>> पण तमाशाला देखील भयानक विरोध झाला होताच समाजात. त्यातुनच अभिजन आणि बहुजन वर्ग निर्माण झाले होते हे विसरलात काय <<<<
तीच गत दारुच्या गुत्त्यावर जाऊन पैसे उडविणार्यांची.
अगदी अगदी महेश. अन आजही, तमाशाच्या फडावर वा डान्सबारमधिल आधुनिक तमाशाकरता जाऊन तिथे दौलतजादा करणार्यांच्या बायकोपोरेपोरी या "शिश्टिमला" कशा शिव्या घालतात ते मात्र तुम्ही ऐकले नसेलच, नै का?
फक्त आपल्याला काय करायचय? हा ज्याचा त्याचा निर्णय असतो व तो तो ते भोगतो अशी पलायनवादी वृत्ती असणारे या बाबीन्ना होत असलेला विरोधासही विरोध करु धजले तर नवल नाहि, नव्हे, तसा विरोध डान्सबारवरील बंदीच्या वेळेस झालाच होता.
अभिजन, बहुजन यांपलिकडे नेटिझन
अभिजन, बहुजन यांपलिकडे नेटिझन म्हणून एक नवाच सेगमेंट आहे. नेट वर काय ट्रेंड होईल ते प्रत्यक्ष जीवनात होईलच असे नाही. वरील कार्यक्रम १८ वर्षापुढील नेटिझन्स साठी होता. मिळालेले पैसे हॉल खर्च व इतर खर्च वजा जाता चॅरिटीला दिले गेले आहेत.
>>>> All India Bakchod (AIB)
>>>> All India Bakchod (AIB) <<<< एआयबी एआयबी करीत बोलता त्याचा लॉन्गफॉर्म हा असा आहे. ज्यातिल शेवटच्या शब्दाचा नेमका अर्थ गुगलची डिक्शनरी/ट्रान्सलेशन युनिटही सांगू शकत नाही, जेव्हा दोन भाषातिल दोन निरनिराळ्या शब्दांना जुळवुन तयार केलेल्या या शब्दाला "साहित्यिक/विनोदाचा दर्जा" वगैरे कुणाला द्यायचा असेल तर द्या बोवा. !
अभिव्यक्ती वगैरे मला मान्य
अभिव्यक्ती वगैरे मला मान्य आहे . कुणाला स्वतःची लाज काढून घ्यायची असेल तर त्याला इतर लोक विरोध करू शकत नाहीत हेही मी समजू शकतो .
" he is the only guy who can j**k off to Farida Jalal.”
हे काय आहे ? फरिदा जलाल ची याला संमती नसेल तर हे तिला किती वाईट वाटल असेल याच कुणालाच काही नाही ?
१८ वर्षापुढील नेटिझन्स
१८ वर्षापुढील नेटिझन्स ???
थिएटरात सिनेमा लागतो तेव्हा १८ वर्षाखालील मुलांना अडवता येते.
१८ वर्षाखालील नेटीझन्सना कसे अडवणार?
केदार भाऊ, अहो कशाला ते **
केदार भाऊ, अहो कशाला ते ** तरी दिलेत या "j**k off"" शब्दांमधे?
इथल्या लोकान्ना चालेल की तो शब्द, नुस्ता टाईपच तर केलाय, प्रत्यक्ष कर्तोय का समोर असेही युक्तिवाद विचारू धजतील.... बहुसंख्य सुविद्य/सूज्ञ/विचारी/प्रसिद्ध सभासदांचे इथले मत पहाता मायबोलिवरही बिनधास्त शिव्यांचा वापर सुरू व्हावा, नै का?
कोणी सांगितलं असले कार्यक्रम
कोणी सांगितलं असले कार्यक्रम इथे भारतात होत नाहीत. मी स्वतः कल्याणला याचा ओरिजीनल भारतीय अवतार पाहिलेला आहे. सवाल/जवाब असलेला अश्लील? शेरेबाजीयुक्त कार्यक्रमात एका बाजूला स्त्री आणि दुसऱ्या बाजूला पुरुष यांची जुगलबंदी. एकमेकांच्या झाकलेल्या अवयवांची गाण्याच्या रुपात यथेछ टिंगलटवाळी केली जाते. प्रेक्षक स्त्री-पुरुष दोन्हीही, कदाचित तिसरेही असतील. पुरुष ओळखीचा चेहरा शिंदे कंपनी. हो पंढरपूर फेम प्रल्हाद शिंदेच कुटुंब. पोपटवाले.
बाकी ज्यांना पाहायचा आहे त्यांनी पाहावा. ज्यांना नको आहे त्यांनी दुर्लक्ष करा.
अवांतर: आठवड्यापूर्वी बायकोबरोबर बागेत बसलेलो, आमच्या बाजूलाच शाळेत जाण्याऱ्या चार विद्यार्थिनी बसलेल्या. ७-८ वि च्या असतील. विषय मुलांचा म्हणजेच बॉयफ्रेंड्सचा. त्यांच्या तोंडातील मंत्रांजली ऐकून आम्ही दोघंही गार. त्याच्या आयची Xण्ड, मकार/भकार वगैरे.
जेव्हा आपण समाजात राहतो
जेव्हा आपण समाजात राहतो ,तेव्हा काही सामाजिक नियम पाळलेच पाहिजेत
म्हणजे काही निर्लज्ज लोकांनी त्यांना वाटेल तसा नंगानाच करायचा आणि सोशल साइट्सवर त्याचे व्हिडिओ टाकायचे आणि परत हे सो कॉल्ड अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते म्हणणार तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही बघु नका ,
म्हणजे सुसंस्कृत लोकांनी त्यांना त्रास होणाऱ्या गोष्टीला विरोध करायचा नाही
निर्लज्ज लोकांना व्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल त्या गोष्टी करण्याची मुभा
पण ज्यांना त्याचा त्रास होतो त्यांना चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याची मुभा नाही
तस झाल की ह्या व्यक्ति स्वातंत्र्य पुरस्कर्त्यांना मिरच्या झोंबतात
ज्यांना आवडला त्याना जर त्या शो च समर्थन करण्याचा अधिकार आहे ,तर ज्यांना शो आवडला नाही त्याना विरोध करण्याचा अधिकार ही आहे
आणि हे तुम्ही बघु नका ,तुम्हाला कोणी जबरदस्ती केलीये का ? असली विधान करून विरोध करणाऱ्यांना गप्प बसवायला बघायच
पण निर्लज्जांना काहीही करायची मोकळीक त्यांच्या वर कसली नैतिक बंधन नाहीत ,काही सामाजिक नियम नाहीत,.......
आणि मुलां वर संस्कार करण्याची जबाबदारी पालकांची असतेच पण आपल्या पुढची पीढ़ी सुसंस्कृत बनवण्याची जबाबदारी सगळ्या समाजाचीच असली पाहिजे
(No subject)
नंदिनी, तुमचा इथला प्रतिसाद
नंदिनी,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.
१.
>> अश्लील का बोलावे असा एक टणाटण प्रभातमध्ये लेखदेखील आहे.
तुम्हाला सनातन प्रभात म्हणायचंय असं गृहीत धरतो. कारण की टणाटण प्रभात ही पूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे.
२.
>> कुणीतरी त्याची इथं लिंक द्याल का प्लीज?
मृण्मयी यांनी नंतरच्या संदेशात दुवा दिला आहे : http://www.sanatan.org/mr/a/574.html
३.
>> संस्कृती वाचवायला निघालेत!!!! कु ठ ली संस्कृती वाचवतात तेतरी माहित आहे का?
हो. ज्याला तुम्ही संस्कृती म्हणता त्याला धर्म असं पूर्वापार नाव आहे.
४.
>> देवीला "भगवती" हा म्हणतात हे माहित आहे का?
हो. भगवान कोणाला म्हणतात तेही माहितीये.
५.
>> शंकराची पूजा याच संस्कृतीत करतात ना?
मग काय झालं?
६.
>> होळीला आईबहिणीवरून शिव्या देत बोंब मारणारे हेच संस्कृतीरक्षक आहेत ना?
सनातनच्या उपरोक्त लेखात होळीच्या वेळेस वैयक्तिक कारणावरून बोंब मारण्याचा निषेध केला आहे.
७.
>> स्वतःचं लग्न लावून घेत असताना भटजी काय मंत्र उच्चारतो त्याचा अर्थ यांना माहित आहे का? यांच्या देवाचे
>> अर्थ यांना माहित आहेत का? निघालेत संस्कृती वाचवायला. दांभिक!!!!
तुम्ही राजवाड्यांचं भाविइ पुस्तक वाचून ही विधाने करीत आहात हे आम्हाला माहितीये. हे जे मंत्र आणि अर्थ आहेत ते कृतयुगात प्रस्थापित झालेले आहेत. ते चालू कलियुगात शब्दश: घ्यायचे नसून केवळ प्रतीकात्मक रीत्या घ्यायचे असतात. कलियुगात आचार पार भिन्न आहे.
असो.
कामसौख्य, प्रजोत्पत्ती व आरोग्य ही कृत्ये वगळता बाकी कारणासाठी मानवी गुह्यांगांचा उल्लेख करायचं प्रयोजन मलातरी दिसत नाही. रोस्ट कार्यक्रमामुळे समाजात या तिघांविषयी जागृती होणार आहे का?
आ.न.,
-गा.पै.
बास आता अति झाले फारच
बास आता अति झाले फारच रसातळाला गेले
रामराज्य लवकरात लवकर आणावे हीच इश्वरचरणी इच्छा
ऋन्मेऽऽष आणि बेफ़िकीर तुमचे
ऋन्मेऽऽष आणि बेफ़िकीर
तुमचे सगळे प्रतिसाद आवडले
>>>> ऋन्मेऽऽष आणि बेफ़िकीर
>>>> ऋन्मेऽऽष आणि बेफ़िकीर >>> तुमचे सगळे प्रतिसाद आवडले <<<<
) काय हो मनरंग, माझे प्रतिसाद नै का आवडले? का नै आवडले? 
(रोस्टेड कार्यक्रमावरुन स्फुर्ती घेऊन दोस्तीखातर/ भावनिक जवळीक दाखविण्याकरता एक प्रतिकात्मक शिवी मनातल्या मनात हासडून मगच विचारतोय
limbutimbu तुमचे ही सगळे
limbutimbu तुमचे ही सगळे प्रतिसाद आवडले
सल्लुभायने, त्याच्या बहिणीचा,
सल्लुभायने, त्याच्या बहिणीचा, अर्पिताचा उल्लेख आल्याने रागवुन तो व्हिडीओच हटावयला लावला म्हणे.
किती दंगा करताय लोक्स...ज्या
किती दंगा करताय लोक्स...ज्या भावी पिढीवर चांगले संस्कार व्हावेत अशी ज्यांना कळकळीची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही भावी पिढी तुम्हाला वाटते त्यापेक्षा खूपच पुढारलेली आहे. त्यांच्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे अगदीच पानी कम असा वाटत असेल. सो चिल.
काही म्हणताहेत की आवडेल किंवा
काही म्हणताहेत की आवडेल किंवा न आवडेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे ठीकच.
पण काही आयडी तर अगदी कार्यक्रमाची भलावण करताना दुसर्याला ज्य्ला कार्यक्रम आवडला नाही वा पटला नाही त्याला अगदी बॅकवर्ड ठरवु पहात आहेत. अगदी होळी , हिंदु देवता ह्यांची उदाहरणे??? असल्या भिक्कार आणि नीच्च्ड शो च सम्र्थन करणारं पब्लिक नक्कीच तशा शिव्यांचा वापर करत असेल / इतर कुणी त्याच्यासाठी त्या शिव्या वापरल्या तरी त्यात त्यांना काही वावगं वाटत नसेल आणि त्यांच्या १८+ मुलांनी ही तसे शब्द वापरल्यास त्यांची हरकत नसेलच.
आपल्या किंवा कुणाच्याही
आपल्या किंवा कुणाच्याही आयाबहीणींचा तसा उल्लेख होणं किंवा स्वतःची चव्हाट्यावर येतेय तरी दात विचकुन सहन करणं म्हणजे हिम्मत???
पैसे घेतलेत त्यांनी त्याचे.
तरीही कुणाचा सणसणीत इन्सल्ट झाल्यास 'आवडलं ब्वा' म्हणणं अणि बेक्कार हसण्ं म्हणजे खरंच कीव आली. हे नक्कीच विनोदी नाही. गेट वेल सुन.
बापरे..ईतके प्रतिसाद... बाकी
बापरे..ईतके प्रतिसाद...
बाकी काहीही असो..पण विरोध केल्यामुळे हा कार्यक्रम जास्त हिट झाला हे मात्र नक्की....
अन्यथा मुद्दामुन ईतक्या लोकांनी जाउन पाहिला ही नसता कार्यक्रम काळा की गोरा ते...
new way of publicity....
असो...
बाकी कार्यक्रमाबद्दल मला काहीच मत व्यक्त करायचं नाहीये...असोच...
Pages