.
AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.
असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.
या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.
आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.
हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.
खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,
पण आज मात्र धागा काढला याची कारणे -
१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.
तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !
खालील लिंकवर पोल सापडेल -
http://www.maayboli.com/node/52621
वाटलंच होतं !! अजून इकडे सुरु
वाटलंच होतं !! अजून इकडे सुरु कसे नाही झाले काही एआयबी बाफ
४) आज ट्रेनमध्ये एका
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.>>
मुलगी मराठी असण्याचा काय संबंध?
आणि आक्षेप नक्की कशाबद्दल आहे? एका मुलीला हा कार्यक्रम बघावासा यबद्दल की एका मराठी मुलीला हा कार्यक्रम बघावासा वाटतो यावर?
मुली ऐवजी मुलगा असता तर धक्का
मुली ऐवजी मुलगा असता तर धक्का बसला नसता का?
तुम्ही लेडीज
तुम्ही लेडीज कंपार्ट्मेंटमद्ये होता का?
तुम्ही लेडीज
तुम्ही लेडीज कंपार्ट्मेंटमद्ये होता का?
>>
पॉपकॉर्न
पॉपकॉर्न
पुढील भागात शाका आणि
पुढील भागात शाका आणि ताम्हणातलं बाळ असेल तर
ऋन्म्या, आज तुझी चंपी होणार
ऋन्म्या, आज तुझी चंपी होणार बघ!!!:P
आन्देव.
आन्देव.
ऋन्म्या च्या ऐवजी रुमण्या
ऋन्म्या च्या ऐवजी रुमण्या कसय?
याच पातळीवरचे विनोद शाहरूख
याच पातळीवरचे विनोद शाहरूख खान गेली कित्येक वर्षं त्याच्या सिनेमांमध्ये करतोच आहे की, तेव्हा धक्के बसले नाहीत का?
कार्यक्रम मस्त होता. ज्याची त्याची विनोदाची पातळी वेगवेगळी असू शकते. पण काही विनोद खरंच उच्च होते.
बेसिकली यु प्लेड बोनी कपूर हा त्यामधला सर्वात महान जोक होता.
त्यामुळे अश्यांच्या पालकांना
त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले. >>>> घरी माहितेय ना तू बघीतालाय्स ते
येस्स नंदीनी आलियावरचे सगळेच
येस्स नंदीनी
आलियावरचे सगळेच
शोच्या सुरुवातीला करण जोहरने डेस्क्लेमर दिला होता की ! सहन होत नाही त्याने पहायचं नाही हाकानाका आणि तसेही शो १८ + साठीच होता.
याच पातळीवरचे विनोद शाहरूख
याच पातळीवरचे विनोद शाहरूख खान गेली कित्येक वर्षं त्याच्या सिनेमांमध्ये करतोच आहे की, तेव्हा धक्के बसले नाहीत का?
कार्यक्रम मस्त होता. ज्याची त्याची विनोदाची पातळी वेगवेगळी असू शकते. पण काही विनोद खरंच उच्च होते.
>>>>>>>
नंदिनीजी, आर यू शुअर तुम्ही हा पुर्ण कार्यक्रम पाहिला ?
याला 'इन्सल्ट कॉमेडी' किंवा
याला 'इन्सल्ट कॉमेडी' किंवा 'रोस्टींग' असे म्हणतात. हा विनोदाचा एक प्रकार आहे. कार्यक्रम पाहिला. काही विनोद उत्तम होते काही एकदम फालतू आणि रिपिटेटीव्ह.
तिथे येणार्या सर्वांनाच आपण अपमान करुन घ्यायला आलो आहे याची जाणिव असतेच. ते धैर्य म्ह्णा किंवा निलाजरेपणा अंगात असल्याशिवाय याचा सामना करणे शक्य नाही, त्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन. हे समाजमन कणखर होत असल्याचे प्रतिक आहे. उगाच हागल्या-पादल्याला भावना दुखावीत बसण्यापेक्षा हे परवडले.
जर लोकांना त्यांच्या तथाकथित स्टार्सचे धिंडवडे निघालेले पहायला आवडत असेल तर उद्या आपली काय गत होईल या भावनेने राजकारणी जनांची आत्ताच तारांबळ उडालेली दिसते. नाहीतर देशापुढचे सर्व महत्वाचे प्रश्न संपून हाच एक उरला आहे अशा प्रतिक्रिया आल्या नसत्या.
घरी माहितेय ना तू बघीतालाय्स
घरी माहितेय ना तू बघीतालाय्स ते
>>>
नाही!
आणि मी ते सांगूही शकत नाही यातच काय ते आले.
तसेच हा प्रकार एकदा समजल्यावर दुसर्यांदा नाही बघणार.
तरी बरं अजून भारतीय मनोरंजन
तरी बरं अजून भारतीय मनोरंजन विश्व अश्लीलतेच्या बाबतीत फारच बाल्यावस्थेत आहे. तुम्हाला एआयबी मुळे धक्का बसलाय तर मग भारतात "अ शॉट अॅट लव्ह" सारख्या मालिका येतील तेव्हा तर २५००० व्होल्टस नी तुमचा पार कोळसाच होईल की.
आणि मी ते सांगूही शकत नाही
आणि मी ते सांगूही शकत नाही यातच काय ते आले. >>> मग त्या माराठी मुलीच्या पालकांना कोण सांगणार ?
शोच्या सुरुवातीला करण जोहरने
शोच्या सुरुवातीला करण जोहरने डेस्क्लेमर दिला होता की ! सहन होत नाही त्याने पहायचं नाही हाकानाका
>>>>
सहन होत नाही त्याने पहायचं नाही हा युक्तीवाद नाही लागू होत.
मला नाही वाटत केवळ ऋन्मेष ने
मला नाही वाटत केवळ ऋन्मेष ने हा धागा काढला म्हणून त्याचे गांभिर्य कमी होते .
हाच धागा कोणत्या प्रतिष्ठित आयडी ने काढला असता तर लोकानी " हम तुम्हारे साथ है" वाले नारे देत भरभरून चर्चा केली असती .
मन्जुतै + १०००० , पण म्हनून हा धागा टवाळकीचा विषय होत नाही .
.
लोक आपल्या बहुतेक पोस्टीत नवर्याचा , बायकोचा ,मुलांचा उल्लेख करतात ते बरं चालतं ?
ऋ ने गफ्रे आणली की मोरल पोलिस उभे रहतात .
त्याला स्वजो आणि सई आवडते , लोकाना नाही आवडतं .
पण म्हणून लोकाना आवडेल असेच त्याने का लिहावं .
एक ब्रॅण्डेड रूमालाचा पाचकळ धागा सोडला तर त्याचे लिखाण टाकाउ नक्किच नसते .
बी ने कंपूबाजीचा एक धागा काढला होता . बी तुम्हाला अनुमोदन
माझी पोस्ट पडेपर्यन्त धागा बराच पुढे गेला
तिथे येणार्या सर्वांनाच आपण
तिथे येणार्या सर्वांनाच आपण अपमान करुन घ्यायला आलो आहे याची जाणिव असतेच. ते धैर्य म्ह्णा किंवा निलाजरेपणा अंगात असल्याशिवाय याचा सामना करणे शक्य नाही, त्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन. हे समाजमन कणखर होत असल्याचे प्रतिक आहे. उगाच हागल्या-पादल्याला भावना दुखावीत बसण्यापेक्षा हे परवडले.>>> सीरीयसली!!!
काही विनोद रीपीटेटीव्ह होते, हेही खरं. काहीवेळेला "शिव्या" वापरायची गरज नव्हती, पण तरी वापरायचा अट्टहास होता. पण ठिके!! पहिलाच प्रयत्न होता. नॉट बॅड.
आलियानं तो जीनीयस ऑफ द इयर व्हीडीओ केला तेव्हापासून मला ती फार आवडायला लागली. स्वतःवरती असे विनोद करवून हसणं इज अ गूड थिंग.
मग त्या माराठी मुलीच्या
मग त्या माराठी मुलीच्या पालकांना कोण सांगणार ?
>>>>>>
मुलीच्या पालकांनीच जागरूक असायला हवे, आणि त्यासाठी त्या मुलीच्या पालकांना मुळात एआयबी काय आहे हे समजले पाहिजे. याच विचारातून हा धागा काढला. आता कोणत्या पालकांनाच आपल्या मुलांनी हे बघितलेले गैर वाट्त नसेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला, पण त्याने माझ्या धाग्याच्या हेतूवर काही फरक पडत नाही.
सहन होत नाही त्याने पहायचं
सहन होत नाही त्याने पहायचं नाही हा युक्तीवाद नाही लागू होत.>> का लागू होत नाही? तुम्हाला पटत नाही तिकीट विकत घेऊ नका, तुम्हाला बघवत नाही. युट्युबवर व्हीडीओ प्ले करू नका. सिंपल.
ह्या शो संबंधित आजच्या
ह्या शो संबंधित आजच्या मटामधील अग्रलेख.
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/editorial/aib-knockout/artic...
घरी माहितेय ना तू बघीतालाय्स
घरी माहितेय ना तू बघीतालाय्स ते
>>>
नाही!>>> अर्र्र्र्र्र्र्र!! तुमच्या पालकांना तुम्ही काय बघताय हे समजणे गरजेचे वाटते.
मला नाही वाटत केवळ ऋन्मेष ने
मला नाही वाटत केवळ ऋन्मेष ने हा धागा काढला म्हणून त्याचे गांभिर्य कमी होते .
>>>>
मलाही असे नाही वाटत.
म्हणजे धागा माझा आहे म्हणून येथील लोक एआयबीला समर्थन देत आहेत असे वाटत नाहीत. बहुधा त्यांना स्वतालाच यात काही गैर वाटले नसावे.
बहुतेक माझा अंदाज चुकलाय. ईंडिया खूप फॉरवर्ड देश झाला आहे.
सहन होत नाही त्याने पहायचं
सहन होत नाही त्याने पहायचं नाही हा युक्तीवाद नाही लागू होत.>> का लागू होत नाही? तुम्हाला पटत नाही तिकीट विकत घेऊ नका, तुम्हाला बघवत नाही. युट्युबवर व्हीडीओ प्ले करू नका. सिंपल.
>>>>>
मग चित्रपटांना सेन्सॉर का असतो?
ते कोणवार बघायची जबाबदारी नसते.
मला नाही वाटत केवळ ऋन्मेष ने
मला नाही वाटत केवळ ऋन्मेष ने हा धागा काढला म्हणून त्याचे गांभिर्य कमी होते .
>>>>
मलाही असे नाही वाटत.
म्हणजे धागा माझा आहे म्हणून येथील लोक एआयबीला समर्थन देत आहेत असे वाटत नाहीत. >>>
नाही रे बाबा ! माझी पोस्ट खरतर सुर्वातीच्या काही पोस्ट नंतर पडायला पाहिजे होती .
पण ती पडेपर्यन्त नन्दिनी आणि आगाउ चे प्रतिसाद आलेले
मी हा शो पाहिला नाही त्या
मी हा शो पाहिला नाही त्या संबंधातील बातमी काल टिव्हीवर दाखवत होते तेव्हा कळले. बघायची इच्छासुध्दा नाही कारण जर अश्लिल विनोद आणि शिव्या बघायला मिळणार असतील तर कशाला आपला वेळ फुकट घालवा.
मुलगी मराठी असण्याचा काय
मुलगी मराठी असण्याचा काय संबंध?
आणि आक्षेप नक्की कशाबद्दल आहे? एका मुलीला हा कार्यक्रम बघावासा यबद्दल की एका मराठी मुलीला हा कार्यक्रम बघावासा वाटतो यावर?
>>>>
आक्षेप नाही, खेद.
मुलींनाही आकर्षित करणे या कार्यक्रमाने याबद्दल खेद.
त्यात ती मुलगी मराठी असल्याने साहजिकच जास्त खेद.
अर्थात याचा अर्थ मुलांनी बिनधास्त बघावा असेही नाहीये,
पण ते एक असते ना, म्हणजे उद्या रस्त्यावर एखादा मुलांचा ग्रूप शिवीगाळ करताना दिसला तर तितकासा धक्का बसत नाही, पण मुलींचा ग्रूप रस्त्याने शिवीगाळ करत चालला आहे तर धक्का बसतोच. निदान मला तरी.
Pages