Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाजप कसेही असले तरी भाजपची
भाजप कसेही असले तरी भाजपची नियत कधीच खराब नव्हती आणि नसणार आहे
तो म्हणजे हिंदू संस्कृतीला मान देणे, त्याबरोबरच देशाच्या विकासाचा वेग पण राखणे आणि अन्य देशांमधे भारताची इमेज उंचावणे ही महत्वाची कामे भाजप सरकार फार चांगल्या रितीने करत आहे..>> संदर्भासह स्पष्टीकरण द्यावे.
मंदार डी म्हणताहेत : गेल्या
मंदार डी म्हणताहेत : गेल्या ७-८ महिन्यांत भाजपने भ्रष्ट्राचार कमी करण्यासाठी काहीच केलेले नाही. रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक, नागरी अणुकरार यासारख्या अनेक धोरणांबाबत घुमजाव केले. पेट्रोल-डिझेलच्या कमी झालेल्या किंमती हे मोदींचे निव्वळ सुदैव आहे, जे त्यांनी कालच्या सभेत स्वतःच कबूल केले. (स्मित) मोदींनी साध्य केलेले एकमेव काम म्हणजे परदेशातील भारताची प्रतिमा बदलणे. पण याचा आम्हा भारतात राहणार्यांना उपयोग नाही. स्पष्ट सांगायचे तर मला भाववाढ कमी झालेली दिसत नाही. माझे वाणसामानाचे देयक महिन्यागणिक वाढतेच आहे.
तरी मला आशा आहे की येणार्या काळात मोदी सरकार (ते भाजप सरकार नाही) यावर कृती करेल आणि युपीएची री ओढण्यापेक्षा स्वतःची अशी धोरणे राबवेल. युपीएची धोरणे राबवण्यासाठी मी नक्कीच लोकसभा (निवडणुकीं)त मोदींना मत दिलेले नाही.
मोदींच्या सभा पाहून दिसते की भाजप आपल्या ध्येयापासून भरकटला आहे. आपच्या घोषणापत्रावर भाजपकडून उत्तर (आलेले) नाही. मला आशा होती की किरण बेदींचा भाजपमध्ये समावेश ही एक चांगली गोष्ट असेल पण त्याही भरकटलेल्या दिसतात.
(चुभूद्याघ्या)
..>> संदर्भासह स्पष्टीकरण
..>> संदर्भासह स्पष्टीकरण द्यावे.
सद्ध्या फक्त जोड्या लावा, गाळलेल्या जागा भरा एवढाच अभ्यास झालाय,
हे असले प्रश्न अजुन ४ वर्षांनंतर सोडविण्यात येतील.
संघटित विचारी सुबुद्ध :
संघटित विचारी सुबुद्ध : साध्वी उमा भारती, साध्वी निरंजन ज्योती, गिरिराज सिंग, साक्षी महाराज, स्मृती इराणी, रमेश पोखरियाल, मनोहर पर्रिकर (मला वाटते बोटीवरील खलाशांनी सायनाइड खाऊन आत्महत्या केली असावी, मला वाटते ते पाक नौसेनेच्या संपर्कात होते), ..............................
Thanks Bharatji
Thanks Bharatji
८ महिने उलटूनही मोदी व
८ महिने उलटूनही मोदी व मंत्र्यांच्या मतदारसंघात विकासकामांवर एक रुपायाही खर्च झाला नाही.
हे धक्कादायक वास्तव मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अॅण्ड प्रोग्राम इम्प्लीमेटेशनने जाहीर केलेल्या आकडेवारीतून उघड झाले आहे.
८ महिने उलटूनही मोदी व
८ महिने उलटूनही मोदी व मंत्र्यांच्या मतदारसंघात विकासकामांवर एक रुपायाही खर्च झाला नाही.>> नऊ महिने नऊ दिवस झाल्यावरच विकासचा जन्म होईल.
काँग्रेसला कंटाळलेले,
काँग्रेसला कंटाळलेले, वैतागलेले, फ्रस्ट्रेट झालेले पण तरीही नाईलाज असलेले आणि एरवी आपला शिव्या घाळणारे काँग्रेससमर्थक आता निव्वळ भाजपला बडवायला मिळत आहे हे पाहून आपची हिरीरीने बाजू घेत आहेत हे बघून लैच्च करमणूक होत आहे.
मुझे मोदीका आशिर्वाद मिला आज
मुझे मोदीका आशिर्वाद मिला आज से मेरा नाम "विकास बेदी" है
सत्यवादी सापडला का विकास ?
पंतप्रधान्,मंत्रीगण, खासदार
पंतप्रधान्,मंत्रीगण, खासदार ई.ई. दिल्लीत फिरवणारे भाजपच फ्रस्ट्रेट झालंय.
सत्यवादी सापडला का विकास ?>>>
सत्यवादी सापडला का विकास ?>>> नऊ महिने नऊ दिवस झाल्यावरच विकासचा जन्म होईल.>>>>
वाट बघावी.
http://aajtak.intoday.in/stor
http://aajtak.intoday.in/story/delhi-narendra-tandon-resigned-from-bjp-s...
कालच झी न्युजच्या मुलाखती मधे शहा म्हणाले होते की एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की त्यानंतर सगळे नेते कार्यकर्त्यांच्या मनात बंडाची भाषा येत नाही.
त्या पार्श्वभुमीवर अचुक वेळेवर हे प्रकरण बाहेर पडले
आता दिल्ली बीजेपीवर नरेंद्र टंडन बॉम्ब पडला
सुरेख, 65 वर्षे पाहिली अजुन
सुरेख, 65 वर्षे पाहिली अजुन 4 वर्षे पाहु तुम्ही का इतके उतावीळ झालेले आहात.
नरेश +१०१
नरेश +१०१
चमचा
चमचा
४९ < १४६०
४९ < १४६०
नटराजन.
नटराजन.
हम इंतज़ार करेंगे तेरा कयामत
हम इंतज़ार करेंगे तेरा कयामत तक
खुदा करे के कयामत हो और विकास आ जाये.
<<मिर्ची ताई, आजपर्यंत १५
<<मिर्ची ताई,
आजपर्यंत १५ सवाल भाजपा कडुन आलेले आहेत, त्या पैकी काही उत्तर आआपने आपल्या अधिकृत प्रवक्त्या कडुन दिल आहे का ?>>
शांका, अहो आजवर किमान शंभर वेळा तरी उत्तरं देऊन झाली आहेत. काही प्रश्न तर मूळातच खोटे आहेत.
उदा.- तुम्ही वर जी यादी दिली आहे त्यात "Why did Kejriwal not regularize contractual labour?"
जरा मागची पानं चाळून बघा. ३६,००० अनियमित पदं नियमित केली होती. हे करणं योग्य की अयोग्य ह्यावर चर्चाही झाली आहे.
भाजपाला प्रश्नं विचारायचे आहेत तर एक खुली चर्चा होऊन जाऊ दे ना मग. ५ काय ५०० प्रश्न विचारा. बुरख्याआडून काय प्रश्न विचारत बसलेत.
हे घ्या तुमच्यासाठी - आम आदमी वाले उत्तर दो !
<<जर वर तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ते जर "चीप" होते मग दिल्लीतल्या प्रत्येक रिक्षाच्या मागे हे लिहीलेल काय होत ? ते "चीप" नव्हत का ? जरा स्पष्ट कराल ?>>
शांका, एखाद्याच्या अधिकृत पेजवरून त्याच्या परस्पर खोटी विधाने करून ती प्रसिद्ध करणं ह्या गोष्टीची आणि राजकीय विरोधकाचं चित्र लावून त्याला 'संधीसाधू' म्हणणं (जे खरं आहे) त्याची तुलना कशी होऊ शकते???
शिवाय ते पोस्टर असं होतं का?
<<थोड्या थोड्या वेळाने एकच
<<थोड्या थोड्या वेळाने एकच पालुपद, हमने ४९ दिनमे भ्रष्टाचार कम कर दिया, इन्होने ७ महिने मे क्या किया ?
इनको कुछ करना ही नही हैं.>>
महेश, ४९ दिवस काम केलं तर छातीठोकपणे सांगू शकत आहेत. आणि एवढ्या कट्टर विरोधकांनाही ते दावे खोडून काढता येत नाहीयेत.
भाजपा का नाही देऊ शकत त्यांनी केलेल्या कामाची उदाहरणे??? ७ वर्षे नगरनिगम + ७ महिने केंद्रात सत्ता म्हणजे अप्रत्यक्षपणे दिल्लीत सत्ता.
<<भाजप कसेही असले तरी भाजपची नियत कधीच खराब नव्हती आणि नसणार आहे.>> हहपुवा वाक्य !
<<घोटाळ्यांबद्दल बोलायच तर भाजप सोडून अन्य पक्ष (कॉन्ग्रेस आणि अन्य लोकल पक्ष) हे जास्त करप्ट आहेत.
आप अजुन तरी यामधे मोडत नाही, कारण त्यांना तेवढी संधीच मिळालेली नाहीये. >>
महेश,
केजरीवालांनी लोकांना स्वतःच्या उमेदवारांवरही स्टिंग करायला जाहीरपणे सांगितलं आहे. "कुणीही उमेदवार पैसे, दारू किंवा तत्सम वस्तू वाटून मत मागत असेल तर व्हिडिओ रेकॉर्ड करा, माझ्याकडे पाठवा. निवडणूकीच्या एक दिवस आधीसुद्धा आम्ही त्याचं तिकीट रद्द करू, जागा रिकामी सोडू."
असं सांगणार्या दुसर्या नेत्याचं फक्त एक उदाहरण देऊ शकाल का??
<<मला एक फरक फार मोठ्या प्रमाणावर जाणवतो. तो म्हणजे हिंदू संस्कृतीला मान देणे, त्याबरोबरच देशाच्या विकासाचा वेग पण राखणे आणि अन्य देशांमधे भारताची इमेज उंचावणे ही महत्वाची कामे भाजप सरकार फार चांगल्या रितीने करत आहे. जे आजवर एवढ्या व्यापक प्रमाणावर अन्य कोणत्या पक्षाने केलेले नाही.>>
हरामजादे, हरामखोर, बदनसीब, बंदर असे शब्द वापरणारी संस्कृती का?? की मुलींनी मोबाइल्स वापरू नयेत, जीन्स वापरू नयेत, ५ मुले जन्माला घालावीत हे सांगणारी संस्कृती??
की "4 बच्चे पैदा करने को कहा, 35-40 पिल्ले तो नहींः साध्वी प्राची" असली भाषा शिकवणारी संस्कृती??
<<पंतप्रधान्,मंत्रीगण, खासदार ई.ई. दिल्लीत फिरवणारे भाजपच फ्रस्ट्रेट झालंय>>
आता दिल्लीत फक्त नौदल, वायुदल उतरवायचं शिल्लक राहिलंय !
किरण बेदींचे प्रचारसचिव - नरेंद्र टंडन ह्यांनी बाहेर पडताना बेदीदिदींवर 'हुकुमशहा' असल्याचा आरोप लावला आहे. मला तर बै शाझियातैंची फार्फार काळजी वाटतेय. आप मध्ये लोकशाकी नाही म्हणून बाहेर पडल्या आणि कुठे जाऊन पोहोचल्या !
"दिदी नहीं ये दादी है, मोदी की बर्बादी है!" - ट्वी.साभार.
सही जवाब मिर्ची.. मी आपचा
सही जवाब मिर्ची.. मी आपचा अजूनही सपोर्टर नाहिये, पण तुम्ही ज्या पद्धतीनं उत्तरं देताय ते मस्तंय
मंदारडी.. मानलं तुम्हाला पण. खुलेआम मत बदलेलं सांगणं हे मत बदलेलं असूनही बर्याच जणांना जमत नाही
मनीष > +१
मनीष > +१
मंदारडी.. मानलं तुम्हाला पण.
मंदारडी.. मानलं तुम्हाला पण. खुलेआम मत बदलेलं सांगणं हे मत बदलेलं असूनही बर्याच जणांना जमत नाही >> Yes I was expecting some thing positive from Bedi. But her behaviour is very childiesh. Kejriwal is fine except his Dharana etc.(as it results in too much traffic jams in Delhi and some time I stuck in traffic for 2/3 hrs last year so this is more personal) I think this time he will not do that drama. I am impressed by the Manifesto even though it is difficult to implement. No party has thought about women safety so much. Hope central govt will support him on some issues as Delhi govt has limited powers compared to other state govts.
आम्ही दिल्लीकरांनी मनपा मध्ये
आम्ही दिल्लीकरांनी मनपा मध्ये भाजपाचा कारभार गेली ७ वर्ष बघितलाय हो.
काँग्रेस इतकाच भ्रष्ट कारभार आहे. काही भाजपा नेते (नगरसेवक आणि एमपी/एमएलए) यांना व्यवसायानिमित्ताने अगदी जवळून ओळखते. एकापेक्षा एक भ्रष्ट आहेत ते पण. भ्रष्टाचाराबाबत तरी काँग्रेस आणि भाजपा सारखेच.
धन्यवाद मनिष, सुनटून्या
धन्यवाद मनिष, सुनटून्या
<<मंदारडी.. मानलं तुम्हाला पण. खुलेआम मत बदलेलं सांगणं हे मत बदलेलं असूनही बर्याच जणांना जमत नाही>> +१
भाजपाचा अजून एक सेल्फ-गोल.
आज पत्रकार परिषद घेऊन आप च्या देणग्यांबद्दल दंगा चालवला आहे. पण त्यामुळे पुन्हा एकदा आपचं फंडिंग पारदर्शक असल्याचा मुद्दा अधोरेखित होणार आहे.
आणि भाजपा-कॉंग्रेसला दिल्ली उच्चन्यायालयाने विदेशी देणग्या आणि 'अनएक्स्प्लेन्ड' देणग्यांसाठी दोषी ठरवलंय ही वस्तुस्थिती सुद्धा लोकांसमोर येणार आहे.
ADR says BJP yet to furnish funding details to Election Commission
भाजपाला दिल्ली-निवडणुकीसाठीचा सल्लागार हा छुपाआप-समर्थक आहे की काय अशी शंका यायला लागली आहे
योगेंद्र यादव म्हणाले तसं -"केजरीवालची बदनामी करणारी भाजपाची एक जाहिरात आणि किरण बेदींची दिवसाला एक मुलाखत येत राहिली तर आमचं प्रचाराचं काम निम्म्याने कमी होईल "
महेश, हे पहा - हिंदू
महेश, हे पहा - हिंदू संस्कृतीचं रक्षण करणारे तुमचे भाजपा नेते.
बरं लोक्स, ते सगळं जौद्या. जोक ऑफ द डे ऐका. हसू येण्याची हमी.
मिर्ची, तुम्ही कितीही जीव
मिर्ची, तुम्ही कितीही जीव तोडून सांगितलेत तरी देखील केजरीवाल हा माणूस मला सुरूवातीला वाटला तेवढा चांगला नाहीये असेच सारखे वाटत आहे. का ते सांगू शकत नाही. पण कोणीही एवढा चांगले आणि बरोबर असण्याचा दावा करूच शकत नाही. केजरीवाल आणि आप जर एवढे चांगले आहेत तर मग त्यांची केंद्रीय निवडणूकीत एवढी वाताहात का व्हावी ? तसेच अन्य राज्यांमधे त्यांनी निवडणूका का लढविल्या नाहीत. त्यांचे बिनीचे उमेदवार त्यांना सोडून का गेले ?
भाजप कसाही असला तरी सद्ध्याच्या केंद्र सरकारला एक पुर्ण टर्म मिळालीच पाहिजे मग आणि मगच त्यांचे मुल्यांकन केले जावे. तसेच एकतर दिल्लीत भाजपला पुर्ण बहुमत मिळावे (नव्हे मिळेल) असे वाटत आहे. आणि समजा नाही मिळाले आणि ते आपला मिळाले तरी हरकत नाही. मग त्यांनी एक टर्म पुर्ण करावी आणि मगच त्यांचे मुल्यांकन केले जावे.
भाजपमधे काही लोक ताळतंत्र सोडून बोलतात म्हणुन सर्व पक्ष खराब होऊ शकत नाही.
मला वैयक्तिकरीत्या योगीची भाषणे, इ. अजिबात आवडले नव्हते. अत्यंत चुकीचे आहे ते.
तसेच मोदींचे ते तुम्हाला जोकसदृष वाटणारे वाक्य ज्या मुलाखतीत आहे ती केव्हा घेतली गेली आहे ते सांगाल का ? पंप्र होण्याआधीची असणार नक्कीच.
मोदींच्या ड्रेसकोडवर लोकांना एवढा काय प्रोब्लेम आहे तेच कळत नाही. खरेतर इतर देशांमधल्या पंप्रपेक्षा कमीच असेल आपल्याकडे हा खर्च.
महेश, तो म्हणजे हिंदू
महेश,
तो म्हणजे हिंदू संस्कृतीला मान देणे, >> ह्ल्ली मान शर्मेने खाली घालायला लागत आहे....Niranjan, sadhvi prachi etc...
देशांमधे भारताची इमेज उंचावणे ही महत्वाची कामे भाजप सरकार फार चांगल्या रितीने करत आहे
>> अस काय केल? विमानतळावर जाउन Barakla मीठी मारली म्हणुन??
मिर्ची : तुम्हि खूपच सुन्दर लिहित आहात +१०१
Mandard:
मंदारडी.. मानलं तुम्हाला पण. खुलेआम मत बदलेलं सांगणं हे मत बदलेलं असूनही बर्याच जणांना जमत नाही >>> +१
भरत मयेकर >>> +१
सुरेख, 65 वर्षे पाहिली अजुन 4 वर्षे पाहु तुम्ही का इतके उतावीळ झालेले आहात.>>> भारत हा तरूण लोकांचा देश आहे... अस प्रत्येक गोष्टीत वेळ घालवुन चालनार नाही...
<<मिर्ची, तुम्ही कितीही जीव
<<मिर्ची, तुम्ही कितीही जीव तोडून सांगितलेत तरी देखील केजरीवाल हा माणूस मला सुरूवातीला वाटला तेवढा चांगला नाहीये असेच सारखे वाटत आहे. का ते सांगू शकत नाही. पण कोणीही एवढा चांगले आणि बरोबर असण्याचा दावा करूच शकत नाही.>>
केजरीवालला सगळ्यांनी चांगलं समजावं म्हणून नाही करत मी हा प्रपंच. मिडिया पूर्ण रसातळाला गेला आहे. त्यांनी सत्यपरिस्थिती दाखवावी ही अपेक्षा करणं म्हणजेच मूर्खपणा ठरेल.
आपच्या माध्यमाने काहीतरी वेगळं, नवीन घडतंय. मी ह्याआधी कधीही कुठल्या पक्षाच्या प्रचारासाठी दारू-पैसे कसल्याही आमिषाशिवाय तरूणाई रस्त्यावर उतरून जीव तोडून आपलं म्हणणं मांडताना पाहिलेली नाही. डान्स फॉर डेमोक्रसी आणि प्ले फॉर चेंज ह्या उपक्रमांमार्फत एक संपूर्ण वेगळ्या पद्धतीने प्रचार चालू आहे. इट्स टोटली डिफरण्ट...आय एम इम्प्रेस्ड विथ इट.
आपवाले नेमकं काय म्हणत आहेत, काय करत आहेत हे माझ्यापरीने लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे. असो.
<< केजरीवाल आणि आप जर एवढे चांगले आहेत तर मग त्यांची केंद्रीय निवडणूकीत एवढी वाताहात का व्हावी ? तसेच अन्य राज्यांमधे त्यांनी निवडणूका का लढविल्या नाहीत. त्यांचे बिनीचे उमेदवार त्यांना सोडून का गेले ?>>
ह्यावर खूपदा लिहून झालंय. नॉट अगेन.
<<भाजपमधे काही लोक ताळतंत्र सोडून बोलतात म्हणुन सर्व पक्ष खराब होऊ शकत नाही.
मला वैयक्तिकरीत्या योगीची भाषणे, इ. अजिबात आवडले नव्हते. अत्यंत चुकीचे आहे ते.>>
ताळतंत्र सोडून बोलणार्या स्वतःच्या पक्षाच्या लोकांवर मोदी ताबा ठेवू शकत नाहीत, जरब बसवू शकत नाहीत, मग कसल्या कणखर नेतृत्वाचा डंका चालू होता ???
आणि दस्तुरखुद्द मोदींचं भाषण एकलं आहे ज्यात त्यांनी हाच सद्विचार मांडलाय - हम पांच, हमारे पच्चीस वगैरे.
ह्यावर माझा मुळीच विश्वास नाही की हे साधू-साध्वी जे काही गरळ ओकतात त्याला 'वरून' संमती नाही ! पद्धतशीरपणे केलेलं पोलरायझेशन आहे हे. डिवाइड अॅण्ड रूल. दुसरा काही अजेण्डाच नाहीये. इकडे लोकांना ह्यात झुंजवत बसायचं आणि तिकडे कुणालातरी दुसर्या देशात चालू होणार्या प्रकल्पासाठी लाखो डॉलर्सचं कर्ज द्यायचं, शेकडो एकर जमिनी वाटायच्या.
<<तसेच मोदींचे ते तुम्हाला जोकसदृष वाटणारे वाक्य ज्या मुलाखतीत आहे ती केव्हा घेतली गेली आहे ते सांगाल का ? पंप्र होण्याआधीची असणार नक्कीच.
मोदींच्या ड्रेसकोडवर लोकांना एवढा काय प्रोब्लेम आहे तेच कळत नाही. खरेतर इतर देशांमधल्या पंप्रपेक्षा कमीच असेल आपल्याकडे हा खर्च.>>
की फर्क पैंदा ?? कथनी आणि करणीमधला विरोधाभास इतका मोठ्ठा आहे की कधी बोललंय ह्याला काही अर्थ रहात नाही.
आणि प्रश्न त्यांच्या ड्रेसच्या किंमतीचा नाही, ते येतात कुठून ह्याचा आहे. माझी महिन्याची कमाई मोदींच्या (अधिकृत) कमाईपेक्षा कितीतरी जास्त आहे, पण मी नाही घेऊ शकत १० लाखाची साडी. घेतली तर इन्कमटॅक्सवाले धाड टाकतील मोदींवर का नाही घालत?
आणि दुसर्या देशांची तुलना करायची असेल तर बाकीचे पॅरामीटर्स पण जुळतात का ते पहा.
अरे आम्हाला देश चालवणारा पंतप्रधान हवा होता, मॉडेलिंग बघायचं असतं तर फॅशन टीव्हीसमोर बसणं जास्त सोप्पं नव्हतं का?
अरे आम्हाला देश चालवणारा
अरे आम्हाला देश चालवणारा पंतप्रधान हवा होता, मॉडेलिंग बघायचं असतं तर फॅशन टीव्हीसमोर बसणं जास्त सोप्पं नव्हतं का?>>>+१.. 9 lakh rs Gazani shirt
Pages