अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I am not able to write Marathi at all due to technical reason. Sorry. > तुम्ही विचारायला हवे की मोबाईल वरुन मराठी कसे टाईप करायचे. इथले बरेच लोक तुम्हाला मदत करतील. त्यात कसला संकोच बाळगु नये.
हिंदी चालत नाही मग इंग्लिश देखील चालु नये अर्थात हे मराठी वेबसाईट आहे आणि यावर मराठी प्रतिसाद द्यावा इतकीच रास्त अपेक्षा आहे.

हिंदीत काही कमेंट्स वगैरे चालतात तो भाग वेगळा

'तुम्ही आमच्या बरोबर नाही म्हणजे आमच्या विरुद्धं आहात ' असा एक गैरसमज त्यांनी करून घेतलाय.
भाजपाविरुद्ध म्हणजे काँग्रेसच्या बाजूने असे स्वतःच ठरवून काही लोक मोकळे होतात.

आत्ता कसं, वाटायला लागलं की भाजपाची "खरीखुरी तज्ञ मंडळी"प्रचारात उतरली आहेत ! Lol Sad

EC raids AAP candidate Naresh Balyan's residence, recovers over 5000 liquor bottles

आज आप चा मॅनिफेस्टो प्रसिद्ध होणार होता, मग त्यावरून लक्ष हटवायला काहीतरी पाहिजे की.
भाजपा ह्यावेळी स्वतःचा मॅनिफेस्टोच देणार नाहीये. किती खात्री हरण्याची ! Wink

भाजपा ह्यावेळी स्वतःचा मॅनिफेस्टोच देणार नाहीये. किती खात्री हरण्याची !
----- मॅनिफेस्टो मधे आश्वासन द्यायचे आणि निवडुन आल्यावर पुर्ण करता नाही आले तर ?

मॅनिफेस्टो मधे आश्वासन द्यायचे आणि निवडुन आल्यावर पुर्ण करता नाही आले तर ?>>>>>

उदय, थोडा धीर धरा लवकरच दिल्लीत आआपचे सरकार पुर्ण बहुमताने निवडून येणार आहे. मॅनिफेस्टो मधे दिलेल्या प्रत्येक वचनाची पुर्तता करण्यास कटिबंध असणारे. आम्हाला तर भारी उत्सुकत लागली आहे.

मिर्चीताई, जरा आआपच्या निवडणुकपुर्व वचननाम्याची लिंक द्या वाचावाच म्हणतो.

मॅनिफेस्टो मधे आश्वासन द्यायचे आणि निवडुन आल्यावर पुर्ण करता नाही आले तर ? >> हा प्रश्न प्र्त्येक राजकीय पक्षाला विचारला पाहिजे. सत्तेवर येण्यासाठी असे जाहिरनामे/वचननामे जनतेसमोर मांडावेच लागतांत आणि कुठलाही पक्ष याला अपवाद नाही. अगदी नगरसेवक सुद्धा आपला जाहिरनामा प्रसिद्ध करत अस्तो

दिल्लीत भाजपाचा दारुण पराभव झाला तरी चालेल एकवेळ. मात्र त्या मद्य प्यायलेल्या मर्कटासारखे चाळे करणार्‍या केजरीवालचे सरकार परत येऊ नये दिल्लीत, त्याऐवजी कॉंग्रेज परवडली.

विदुषक, ह्या धाग्यावर आतापर्यंत झालेल्या चर्चेत दिल्लीत एकतर आआप अथवा भाजपा यांचेच सरकार येईल अशीच चर्चा चालू आहे. काँग्रेसला कोणी खिजगणतीतही धरलेले नाही आणि तुम्ही म्हणता काँग्रेसचे सरकार चालेल. तुमची ही पोस्ट वाचुन अनेक काँग्रेस जनांना आधार मिळाला बघा.

आणि हो मी कट्टर काँग्रेसविरोधी आहे.

<< मॅनिफेस्टो मधे आश्वासन द्यायचे आणि निवडुन आल्यावर पुर्ण करता नाही आले तर ?>>

पूर्ण करता येतील अशीच आश्वासने द्यायची ना. ३०% वीजदर कमी करतो म्हणायचं आणि निवडून आल्यावर १५% ने दर वाढवायचे असला प्रकार काय कामाचा? आणि मॅनिफेस्टोच नाही तर लोकांनी मतं कुठल्या मुद्द्यांवर द्यायची? "केजरीवाल से ५ सवाल" ह्या मुद्द्यावर ? Wink

नरेश माने,
मॅनिफेस्टो आज प्रसिद्ध होणार होता. दिल्ली-डायलॉग मधून त्याची ब्लूप्रिंट आधीच दिली आहे. पीडीएफ मिळाला की लिंक देईन. तोवर आप च्या ट्वीटर पेजवर पाहू शकाल.

विदूषक, ठण्ड रख्खो Lol

सुरेख,
बेदीतैंनी सामान-सुमान गुंडाळून ठेवलंय आधीच. हरले तर ऑक्सफर्ड, हावर्ड मध्ये भाषणं द्यायला जाणार असं कालच त्यांनी टाइम्सशी बोलताना सांगितलंय.
हे पण बघून घ्या. बेदी पहिल्या महिला आयपीएस ऑफिसरसुद्धा नाहीत असं समोर येतंय.

उदय, थोडा धीर धरा लवकरच दिल्लीत आआपचे सरकार पुर्ण बहुमताने निवडून येणार आहे. मॅनिफेस्टो मधे दिलेल्या प्रत्येक वचनाची पुर्तता करण्यास कटिबंध असणारे. आम्हाला तर भारी उत्सुकत लागली आहे.
------ मी अधिर झालेलो नाही आहे.... पण मॅनिफेस्टो मधे ज्या गोष्टी, कामे, मागण्या पुर्ण करताही येणार नाही त्याचेच खोटे आश्वासन दिले जाते.... याला भाजपा, कॉन्ग्रेस (तसेच अनेक लहान मोठ्या पक्षान्ची अकाली दल, सेना... सपा) कुणी अपवाद नाही.

केजरीवाल यान्च्या कडुन काही थोड्या अपेक्षा होत्या पण त्यान्नी जे काही आश्वासने मागच्या निवडणुकात दिली होती त्याची पुर्तता केली नाही..., प्रयत्नही (दिक्षित यान्च्यावर खटला) केला नाही. केले काय तर निव्वळ तमाशा आणि नाटके. त्यान्ना तसे करणे अपरिहार्य असेल.

माझ्यासाठी केजरीवालान्चा आप, भाजपा, कॉन्ग्रेस... सब मिले हुए है Happy

सर्व पक्षाच्या सर्व उमेदवारान्ना शुभेच्छा... हा बाफ वाचत रहाणार...

केले काय तर निव्वळ तमाशा आणि नाटके. त्यान्ना तसे करणे अपरिहार्य असेल. >>> हो बरोबर आहे तेव्हा त्यांच्याकडे पुर्ण बहुमत नव्हते आणि काँग्रेस आणि भाजपा त्यांच्या सरकारला काम करू देत नव्हते म्हणुन तर त्यांनी राजीनामा दिला.

त्यामुळेच आआपला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत संपुर्ण बहुमत मिळो. नंतरच त्यांनी दिलेल्या वचनांची पुर्तता ते कशी करतात हे पहावे लागेल. मिर्चीताईंनी दिलेल्या लिंकमध्ये एकुण ७० आश्वासने दिलेली दिसली सर्व वाचता आली नाहीत पण पीडीएफ लिंक संपुर्ण वाचल्यावर समजेल.

<<केजरीवाल यान्च्या कडुन काही थोड्या अपेक्षा होत्या पण त्यान्नी जे काही आश्वासने मागच्या निवडणुकात दिली होती त्याची पुर्तता केली नाही..., प्रयत्नही (दिक्षित यान्च्यावर खटला) केला नाही.>>

उदय,
चुकीची माहिती. शीला दीक्षितांवर खटला केलाय, वीजदर कमी केलेत, ७०० लीटर पाणी मोफत केलंय, दिल्लीतील वीजकंपन्यांचं ऑडिट करवून घेण्याच्या ऑर्डर्द दिल्या आहेत, स्वराज बिल मंजूर केलंय.
१८ पैकी १६ की १७ गोष्टी पूर्ण झाल्या होत्या. जनलोकपालबिलाचं आश्वासन पूर्ण का होऊ शकलं नाही हे आता नव्याने सांगायला नको.

आत्ताची आश्वासने पाहून मीसुद्धा जरा बिचकले. पण ते म्हणत आहेत की तज्ञसमित्यांनी अभ्यास करून, खर्चाचा ताळमेळ बसवून प्लॅन बनवला आहे. तर बघूया काय करतात.
नाहीतर आहेच की काँग्रेस आणि भाजपा आलटून-पालटून. सत्ता बदलवल्याने मतदारराजाच्या मनाचं समाधान तरी होतं !

"कशी जिरतेय ते तरी बघूया" ह्या विचाराने का होईना विरोधकांकडून आप ला जिंकण्याच्या शुभेच्छा मिळत आहेत. हेही नसे थोडके. Wink

मागे एकदा केजरीवाल ह्यांची भेट घेण्याची संधी मिळाली होती अत्यंत हुशार नि प्रामाणिक व्यक्तिमत्व वाटले. देशाची सत्ता कॉंग्रेसच्या हातात असावी असे जरी माझे मत असले तरी एखाधा पक्ष हा सर्वशक्तिमान असू नये. प्रादेशिक पक्ष हे जर केजरीवाल ह्या सारख्या प्रामाणिक व्यक्तीन्सारख्या हातात असतील तर ते योग्यच ठरेल.आप हा पक्ष दिल्लीत बहुमताने निवडून यावा असे वाटते. भाजपने दिल्ली महापालिकेत जी भ्रष्टाचाराची बजबजपुरी निर्माण केलीय ती केजरीवाल उत्तमरीतीने चव्हाट्यावर आणत आहेत. केजरीवाल नि त्यांचा पक्ष आप ह्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा.

आ आ प च्या ह्या वर्षीच्या अजेंड्यात २०,००० लि टर पाणी फु़कट मिळेल अशी घोषणा केजरीवाल यांनी केली आहे.

कुठुन आणणार ईतक पाणी ? आणी ते ही फुकट ? पाणी मिळत असेल ही फुकट पण ते घरा घरात पोहोचवायला तर पैसे पडणारच ना ? मग ते पैसे कोण देणार ?

मिर्ची ताई

"कशी जिरतेय ते तरी बघूया" ह्या विचाराने का होईना विरोधकांकडून आप ला जिंकण्याच्या शुभेच्छा मिळत आहेत. हेही नसे थोडके. डोळा मारा

या तुम्हाला सुभेच्छा वाटत आहेत पण ही निराशा आहे.

आआप ने दिलेली आश्वासन आणि बाकी राज्यां मधे फ़ुकट विज ,फ़ुकट पाणी , कर्ज मफ़ी , २ रुपये किलो रुपये धान्य आण्खीन बरेच काही. शेवटी सगळ यावरच आलेल आहे. हे सगळ आर्थिक बेशिस्तीकडे आणि आर्थिक र्‍हासा कडेच घेवुन जाणारे आहे.

तुम्ही लिहीता आआपने दिलेली अश्वासनं तज्ञाना दाखवुन प्लान केलेली आहेत. "सम थिग्ज आर टु गुड टु बी ट्रु".

असो दिल्ली करांना हेच हव असेल तर तसच होवु दे. आमेन!

मागच्या एका पानावर वाचले की दोन मतदारसंघात नाव असणे गुन्हा आहे.

मग लोक एका वेळी दोन ठिकाणांहुन कसे काय निवडणुका लढवतात? मोठे नेते मंडळी कायम अशी दोन दोन ठिकाणाहुन उभी असतात ते कसे? की एखाद्या ठिकाणाहुन उभे राहण्यासाठी तिथला मतदार असणे आवश्यक नाही?

मगच्या पानावर कोणीतरी विचारलेय म्हणून सांगते, मी आपची समर्थक आहे. पण मिर्ची ताईंप्रमाणे लोकांना पटवत बसण्याचा पेशन्स माझ्याकडे नसल्याने फक्त हा धागा वाचत बसते.

डेलिया Happy

<<मिर्ची, आपची काँग्रेसबद्दल काय भूमिका आहे? >>

वेदिका,
भाजपा असो की काँग्रेस, ३ 'C'---corruption, criminalisation, character ह्या गोष्टींसोबत आप तडजोड करणार नाही. (म्हणजे जोपर्यंत करणार नाहीत, तोपर्यंतच मी आप-समर्थक आहे :))

<<आपला अ‍ॅब्सोलुट मेजॉरिटी मिळणे अशक्य, आणि यदाकदाचित सरकार बनवावं लागलं तर कोणाशीतरी हातमिळवणी कराविच लागणार. काँग्रेस आता आपच्या गुड बुक्स मध्ये आले का?
पुन्हा गेल्यावेळेसारखा ड्रामा बघायची वेळ येउ नये...>>

राज, कसला ड्रामा ? भाजपाने महाराष्ट्रात केला तसला की सध्या जम्मूमध्ये करत आहेत तसला?? Wink

j&k bjp.jpg

<<काँग्रेस / आपचे कोणी समर्थक आहेत का इथे? का सगळेच फक्त 'भाजपा विरोधक' आहेत?मिर्चीमॅम? एनिवन एल्स? >>

अर्थातच मी आपसमर्थक. माझ्यासाठी काँग्रेस-भाजपा अशक्य.
"आंखों में हमने आप के सपने सजाए हैं, बस आप आप आप ही दिल में समाए हैं !!" Lol

खासकरून केजरीवाल, कुमार विश्वास, मनिष सिसोदिया, प्रशांत भूषण, अलका लांबा आवडतात.
केजरीवालांचं तर प्रचंड कौतुक वाटतं. इतकं ह्युमिलिएशन सहन करूनही अजून टिकून आहेत, फिनिक्स पक्ष्यासारखे राखेतून जन्म घेऊन आख्ख्या भारत सरकारला--पंप्र,३ राज्याचे मुख्यमंत्री,१२० खासदार सगळ्यांना दिल्लीत उतरायला लावण्याइतके सक्षम झाले आहेत. गेल्या वर्षी आप ला लोक "वोट कटुआ" पक्ष म्हणून हिणवत होते, आज काँग्रेस जिंकलं नाही तरी चालेल, निदान आप ची मतं तरी काटावीत म्हणून प्रयत्न चाललेत.

महाराष्ट्र, झारखंड, जम्मू कुठेही भाजपाने मुमं पदाचा उमेदवार डिक्लेअर केला नव्हता, सासर्‍याचं तोंड पाहून मुलगी द्या, नवरामुलगा कोण ते नंतर सांगू ह्यातली गत. दिल्लीत त्यांना करावा लागला. तेही टीम-अण्णातूनच आयात करून एक इमानदार (???) चेहरा दाखवावा लागला.
महिन्यावर आलेल्या अर्थसंकल्पाची जबाबदारी टाकून वित्तमंत्री दिल्लीप्रचाराची धुरा सांभाळत आहेत, खासदार रस्त्यावर कर्णा वाजवत 'ऐका हो ऐका' करत फिरत आहेत.

aapvsbjp.jpg

निवडणूक हरलात तर काय कराल ह्यावरची तीन लोकांची तीन उत्तरे पुरेशी बोलकी आहेत --
१. नरेंद्र मोदी -- "वापस चाय की केटली उठाऊंगा और चाय बेचूंगा"
२. किरण बेदी -- "ऑक्सफर्ड, हावर्ड में जाके अपने भाषण दूंगी"
३. केजरीवाल -- "फिर से भ्रष्टाचार के खिलाफ लडाई में जुड जाऊंगा"

३. केजरीवाल -- "फिर से भ्रष्टाचार के खिलाफ लडाई में जुड जाऊंगा">>>>+१११११

सस्ता बिजली पानी ची घोषणा भाजपाच्या पोस्टरवर पण दिसतेय. काँग्रेस पण स्वस्त पाणी आणि वीज देणार आहे. मेट्रोमध्ये विद्यार्थी आणि वृद्धांना सवलत देणार आहे.
म्हणजे कोणीही आलं तरी आमचा फायदाच होणार आहे तर..

या केजरीवालने म्हणे ७० आश्वासने दिलेत त्यांच्या वचननाम्यात दिल्लीकरांना. Proud
मज्जाच मज्जा आहे दिल्लीकरांची, म्हणे सगळेच्या सगळ फुक्कट देणार है. विज, पाणि, अन्न आणि हवा.

Pages