मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्लीशमध्ये लिहिणाऱ्या भारतीय लेखकांबद्दल - भाषेइतकाच महत्वाचा कंटेंट आणि तो खूपदा फार खोलवर भिडत नाही एक भारतीय वाचक,insider म्हणून ..चे.भ. वगैरे टाईमपास म्हणून ठीकच वाटलेत, म्हणून तर mainstream हिंदी सिनेमाला इतके जवळचे वाटतात. अमिषबद्दल तेच.

या निमित्ताने एकच , विक्रम सेठची गोल्डन गेट मला अत्यंत आवडते, क्लासिक उंचीवर वाचनीयता अजिबात न गमावलेली लिरिकल कादंबरी. कुठलाही आव न आणता, पोजिंग न करता केलेलं प्रवाही लेखन. महान माझ्यासाठी तरी.मी फिदा.
अगदी त्या पहिल्या ओळीतच थरारून जाणारी त्याची चाहती आहे मी.
To make a start more swift than weighty,
Hail Muse.
!!!

हंगर गेम्सचा तिसरा आणि शेवटचा भाग 'मॉकिंगजे' वाचला. फर्स्ट पर्सन नॅरेटीव्हमुळे जी मजा पहिल्या दोन भागात येते तीच शैली या तिसर्‍या भागाला मारक झाली आहे. सत्ता आणि त्यासाठीचा संघर्ष यावर जास्त वरच्या दर्जाचे विवेचन मी अपेक्षिले होते पण तसे काही मिळाले नाही.
आता या भागावरच्या सिनेमाची (दोन भागातल्या) आतुरतेने वाट पहात आहे!

फर्स्ट पर्सन नॅरेटीव्हमुळे जी मजा पहिल्या दोन भागात येते तीच शैली या तिसर्‍या भागाला मारक झाली आहे.
मलाही हेच वाटले आणि मॉकिंगजे मुद्दाम कसतरी करून एका भागात बसवलेलं वाटलं. पण छान आहे ती मालिका. २ दिवसात तिन्ही पुस्तकं वाचून काढली मी एप्रिल मध्ये.

इथे कोणी स्टार वॉर्सची पुस्तकं वाचली आहेत का [Daniel Wallace]? मला जेडी पाथ, बुक ऑफ सिथ आणि बाउंटी हंटर कोड वाचायचे आहे. पण सुरुवात कुठून करावी ते सुचत नाहीये. Sad

द मोनोग्राम मर्डर्स वाचलं. अ‍ॅगाथा ख्रिस्तीनं न लिहिलेलं हरक्युल पायरोचं नवं कथानक. लेखिका आहेत सोफी हॅनाह.

लेखिकेचा हा प्रयत्न अ‍ॅगाथाच्या शैलीला पूर्ण न्याय देतो. अगदी थेट अ‍ॅगाथानं लिहिलं असावं अशी भाषा, शैली, १९२०च्या आसपास लंडनमध्ये घडणारं कथानक सर्वकाही उल्लेखनीय. कथेचा प्लॉटही कॉम्प्लिकेटेड, प्रत्येक क्लूची अनेक स्पष्टीकरणं. सोफीबाईंनी अ‍ॅगाथाच्या सुप्रसिद्ध मानसपुत्राची सगळी वैशिष्ट्य तंतोतंत उतरवली आहेत. प्रत्येक कॅरॅक्टर सहीसही उतरलं आहे. सगळे धागेदोरेही व्यवस्थित जुळले आहेत. संशयाची सुई एकदा इथे तर एकदा तिथे अशी झुलवत ठेवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

मात्र त्याचबरोबर काही ठिकाणी पुस्तक थोडं रटाळ होतं. तेच तेच संदर्भ पुन्हा पुन्हा येत राहतात. प्लॉटची गती संथ होते.

तरीही सोफीबाईंनी एक उत्तम प्रयत्न केला आहे यात शंकाच नाहे.

पुन्हा एकवार नॉस्टॅल्जिक होण्यासाठी वाचायलाच हवे असे पुस्तक.

आज ही लिस्ट हाती लागली आहे(NPR radio चे आभार). मी यातलं एकही पुस्तक वाचलं नाही पण नॅशनल बुक अवॉर्डसाठी यांना नॉमिनेशन्स मिळाली आहेत.
फिक्षन, नॉन फिक्षन, यंग अडल्ट, पोएट्री अशा वेगवेगळ्या कॅतेगरीज आहेत.

http://www.npr.org/2014/10/15/354568850/get-to-know-the-finalists-for-th...

आयन रैडच फाउंटेन हेड वाचल . हावर्ड रॉकची व्यक्तिरेखा प्रचंड आवडली . शेवटचा कोर्टातिल प्रसंग सही जमलाय .एकदा तरी वाचावच केटेगरी मध्ये येचित्रपट त हे पुस्तक .

कविता महाजन यांच नविन ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम वाचल .पुस्तकाचा आवाका मोठा आहे . स्क्रिझोफ्रेनिया, मानवी नातेसंबंध , चित्रपट सृष्टी अशा विविधनेक विषयाना स्पर्श केलेला आहे . पण मला स्वताला त्यांच्या ब्र आणि भिन्न या पुस्तकांच्या तुलनेत ठकी फिक वाटल . ठीक ठाक आहे .

बाकीच्यांचा काय अनुभव

बिल ब्रायसनचे 'मदर टंग'- The English Language (English and how it got that way) वाचते आहे. मजा येते आहे वाचायला. मस्त भाषिक गमती सांगीतल्या आहेत त्याने.
फक्त, जरासे कठिण वाटले वाचायला. इंग्रजी भाषा ज्यांना मनापासून आवडते आणि ज्यांना ती वाचायचा सराव आहे, अनेकदा शब्दकोशात पहावे लागले तरी जे कंटाळत नाहीत अशांना मजा येईल वाचताना. (हे मुद्दाम नमुद केले, जेणेकरुन वाचायचे की नाही ते ठरवता येईल).

'द मदर टंग' वाचायच्या यादीत टाकले आहे. [अलीकडेच बिल ब्रायसनची 'द लॉस्ट कॉन्टिनेन्ट' आणि 'शेक्सपिअर' ही पुस्तकं वाचली. वेगवेगळ्या विषयांवरची/प्रकारातली आहेत; दोन्ही आवडली.]

मदरटंग ब्रायसनच्या इतर पुस्तकांइतके बांधून ठेवणारे वाटले नाही. माझ्या इंग्रजी शिक्षक सहकार्‍याच्या मते त्यात तपशिलाच्या बर्‍याच चुका आहेत आणि त्याचे भाषातज्ञ नसणे उघडे पडते.
तरीही भाषा एखाद्या जिवंत स्पेशिजप्रमाणे कशी जगते आणि उत्क्रांत होते या अँगलने पाहिले तर उत्तमच पुस्तक आहे.

काल Hickory Daiquiri Dock: Cocktails with a Nursery Rhyme Twist या पुस्तकाविषयी ऐकले. नर्सरी र्‍हाइम्सचं विडंबन आणि जोडीला कॉकटेल रेसिपीज आहेत. नर्सरी र्‍हाइम्स फार खुसखुशीत आहेत. मला अशी मिश्किल पुस्तकं संग्रही ठेवायला आवडतात आणि वेगवेगळ्या पेयांच्या रेसिपीज वाचायला आवडतात त्यामुळे नक्कीच विकत घेणार.

http://www.amazon.com/Hickory-Daiquiri-Dock-Cocktails-Nursery/dp/0762455055

हे पुस्तक लहान मुलांसाठी अजिबात नाही, मोठ्यांसाठी आहे Happy

त्याच लेखकाचं Tequila Mockingbird: Cocktails with a Literary Twist पण इंटरेस्टिंग वाटत॑ आहे.

सहकार्‍याच्या मते त्यात तपशिलाच्या बर्‍याच चुका आहेत >> हो हे मीही वाचले कुठेतरी.

असाम्याला हाणा. त्याची पोस्ट वाचून 'गेम ऑफ थ्रोन्स' सुरु केले, काही सुधरेना. कोण, कोणाचा काय वगैरे.. तिनशे पानं वाचून सोडून द्यावे असे खुषीत ठरवले, आणि हाय रे दैवा !! कधी पहिला भाग संपत आला कळले नाही. आता उरलेले ४ भाग वाचावे लागणार. Sad Proud
अक्षरशः धडधडत्या हृदयाने वाचले. त्यातला पुढला ट्विस्ट समजून घेताना माझं डोकं जाम बधीर होतं. धड आधीच्या पात्राचा मृत्यु पचवतो न पचवतो, तोच दुसरा खल्लास ! अगागा !! एकीकडे त्यातील हिंसेने अगदी नकोसे होते, तरीही माणूस खुळावल्यासारखा पुढे वाचतच राहतो.
रोलर कोस्टर मध्ये बसवल्यासारखे, पानापानावरुन बाकबुक होईंग. जबर्‍या क्रियेटीव्ह आहे ! कसे काय हे लेखक एवढी प्रतिसृष्टी निर्माण करु शकतात देव जाणे. तो चॅप्टर एंडिंग जसे संपवतो ना, दिग्दर्शकाने 'कट' ओरडावे तसे डोळ्यासमोर येते माझ्या.

सध्या हिवाळ्यात गारठलेल्या पब्लिकने सुरु करायला हरकत नाही. डोळे (आणि डोकं) दुखेस्तोवर वाचणे. Proud
त्या आधी असाम्याने पान क्र १९ वर लिहीलेला पुस्तक परिचय वाचा !
http://www.maayboli.com/node/41038?page=19

मला रिव्हर्स पेरेंटल गायडन्स मुळे ते गेम ऑफ थ्रोन्स अलाउड नाही. Wink आप मत पढो उसमे बहुत सेक्स और व्हायलन्स है असे सांगितले गेले आहे म्हणून मी फक्त पुस्तक झटकून नीट ठेवते. सीरीअल बिंज वॉच करायचा कधीतरी प्लॅन आहे.

रिव्हर्स पेरेंटल गायडन्स >> Lol अरे देवा ! बरयं म्हणजे आमचं भूत थोडं मोठं व्हायच्या आत वाचून घ्यावे.
बापरे सिरीयल पहायची अपुनको हिम्मत नाही. ते पुस्तकाच्या पानावरच इतकं त्रिमीत दिसायला लागतं..
झोपेचं खोबरं होतं पार.

जाई- वाच आणि ठपका ठेवायचाच तर तो असाम्यावर ठेवायला विसरु नकोस. Proud

जाई- वाच आणि ठपका ठेवायचाच तर तो असाम्यावर ठेवायला विसरु नकोस. >>>>> Proud , Lol नक्किच . रैना . असामी आणि तुझ्या पोस्टीमुळे उत्सुकता ताणली गेलिये वाचायची

रिव्हर्स पेरेंटल गायडन्स>>>> हे काय असत नक्की अमा Uhoh

@ रैना- मस्त पोस्ट गेम ऑफ थ्रोन्सवरची! असामीनी पण खूपच छान लिहिलाय परिचय. मजा आली वाचायला.
हा शो बघ बघ असं काही फ्रेन्ड्सनी आधी सांगितलं होतंच. आता तुमची व असामींची पोस्ट वाचल्यावर पुस्तकही लिस्टमध्ये घालून ठेवते. शोज इतके राहिले आहेत बघायचे की बहुतेक पुस्तकाचाच नंबर आधी लागेल Happy

मी नुकतेच Infinitesimal: How a Dangerous Mathematical Theory Shaped the Modern World हे आमिर अलेक्झाण्डरने लिहिलेले पुस्तक वाचले. फारच मस्त आहे. इन्फानायटेझिमल ही संकल्पना, तिला असलेला जेझुइट ख्रिस्चनांचा कडवा विरोध (जेझुइट म्हणजे कॉन्वेन्ट शाळा चालवणारे मुख्यत्वे करून), प्रोटेस्टंट / लिबरल इंग्लंडमध्ये मिळालेला आश्रय असा मस्त इतिहासपट उभा केला आहे.
वॉल्टर इसॅक्सन लिखीत आइन्स्टाइनचे चरीत्र देखील उत्तम चरीत्रलेखनाचा पाठ आहे. आइन्स्टाइन: थेअरीस्ट, माणुस, शांततावादी कार्यकर्ता, पालक, नवरा, रोमँटिक, वायोलनिस्ट अश्या विविध पैलूंना पूर्ण वाव दिला आहे चरित्रकाराने.

आमिर अक्झेलचे Finding Zero: A Mathematician's Odyssey to Uncover the Origins of Numbers हे ओके ओके आहे. फार नाही आवडले.

Cycle of Lies: The Fall of Lance ArmstrongMar by Juliet Macur हे नक्की वाचण्यासारखे आहे.

सध्या बिल पोर्टरचे येलो रिव्हर ओडिसी आणि जान जिन सुंगचे 'डिअर लीडर' हे नॉर्थ कोरियातून पलायन + किम सुंग इल कल्टवर व तिथल्या राज्यकारभारावरचे इन्सायडर अकाउंट अशी दोन पुस्तके वाचतोय.

Finding Zero हे कालच घेऊन आलेलो Stiff बरोबर नि कुठल्याला हात घालू असा विचार करत होतो. टण्या युझ्या पोस्ट्मूळे काम सोपे झाले Happy

रिव्हर्स पेरेंटल गायडन्स > Happy

रैना अग किती दिवस वाचते आहेस ? अस राहवते कसे तुला ? Wink

नाही टण्या. ते Mary Roach चे आहे. ते interesting आहे. She is one of my favorite technical (?) writer. फक्त पाल्हाळ थोड जास्त असते. पण Topics एकदम जबरी असतात -
Bonk : the curious coupling of science and sex
Packing for Mars : the curious science of life in the void
Gulp : adventures on the alimentary canal
हे आवडलेली मला.

मी वाचणार म्हणतोय ते Working stiff : two years, 262 bodies, and the making of a medical examiner - Judy Melinek.

Pages