Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रॉहु, लिंकबद्दल धन्यवाद.
रॉहु, लिंकबद्दल धन्यवाद.
मुलाखत सुरेखच आहे रॉहू,
मुलाखत सुरेखच आहे रॉहू, धन्यवाद!
अरे व्वा ह्या लिंकबद्दल
अरे व्वा ह्या लिंकबद्दल माहिती नव्हती, धन्यवाद!
अशातच Paulo Coelho चं By the
अशातच Paulo Coelho चं By the river Piedra I sat down and wept वाचलं .
प्रेम आणि धर्मविषयक कल्पनांचा बराच गुंता मांडलाय .
पण जेवढं ऐकून आहे त्यावरून The Alchemist यापेक्षा नक्कीच उत्तम असेल असं वाटतंय .
कुणी वाचलंय का ?
शिवाय जी.एं. चं 'पिंगळावेळ' चालूच आहे वाचणं .
आधी 'श्यामिनी' वर झालेली
आधी 'श्यामिनी' वर झालेली चर्चा वाचली. त्याच प्रमाणे "लंकेचा राम आणि अयोध्येचा रावण" ही एक पुस्तक आहे. मूळ गुजराती पुस्तकाचा अनुवाद आहे.
अल्केमिस्ट मी वाचलंय. मला
अल्केमिस्ट मी वाचलंय. मला नंतर नंतर पाऊलो रीपीटेटीव्ह वाटायला लागलाय. त्याचं एक कॉलम्सचं कलेक्शन आहे, ते त्या मानानं बरंच चांगलं आहे.
दर्रा दर्रा हिमालय ही कथा आहे
दर्रा दर्रा हिमालय ही कथा आहे एका मध्यमवयीन जोडप्याची. गिर्यारोहणाचे कुठलेही प्रशिक्षण नसताना केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पांडवांचा हिमालयातला प्रवासमार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. दर वर्षी एक महिना असा हा तेरा वर्षांचा खडतर मार्गाक्रमणेचा अनुभव आहे.. दर्रा दर्रा हिमालय मध्ये त्यांच्या दोन मोहिमांची चित्तरकथा आहे, हृदयस्पर्शी अनुभव आणि तोंडात बोटं घालायला लावणार्या फोटोंसकट.
Paulo Coelho च अलकेमिस्ट बरं
Paulo Coelho च अलकेमिस्ट बरं आहे. पण त्यांच आणखी एक वेगळं पुस्तक म्हणजे इलेवन मिनिटस. त्यांच्या नेहमीच्या पुस्तकांपेक्षा खूप वेगळं आहे. सेक्स, वेश्या व्यवसाय आणि त्याची आवडती फिलॉसॉफी अशी मांडणी आहे.
हुमान - संगीता धायगुडे, कुणी
हुमान - संगीता धायगुडे, कुणी वाचलंय का?
ओके केदार ...थॅंक्स .
ओके केदार ...थॅंक्स .
व्यावहारीक मराठी शब्दकोश अशा
व्यावहारीक मराठी शब्दकोश अशा नावाचे एक पुस्तक पूर्वी माझ्याकडे होते. आता सापडत नाहीये.
जोशी नावाच्या प्राध्यापकांनी लिहिलेलं पुस्तक होतं ते. कुणी मला या पुस्तकाचे प्रकाशक कोण ते सांगू शकेल का?
बरेच दिवसाने वपुंच '
बरेच दिवसाने वपुंच ' प्रेममयी' हे पुस्तक हाती आलं. ते वाचावयास घेतले आहे . ...
(No subject)
steffan howkings चे A brief
steffan howkings चे A brief history of time काल 7-8 वर्षांनंतर परत वाचले. खुपच छान पुस्तक आहे. वाचता वाचता काही कोडी सुटत जातात, काही मनात नव्याने उभी राहतात.
हुमान - संगीता धायगुडे >>>
हुमान - संगीता धायगुडे >>> नुकताच ’ललित’मधे याचा रिव्ह्यू वाचला. त्यावरून पुस्तक चांगलं असावं असं वाटतंय.
लेटेस्ट :- Endurance:
लेटेस्ट :-
Endurance: Shackleton's Incredible Voyage - आल्फ्रेड लॅन्सींग
कितव्यांदा आठवत नाही.
नुकतेच हे पुस्तक वाचले.
नुकतेच हे पुस्तक वाचले. बर्याच गोष्टी माहित असल्या तरी अनेक बाबी नव्याने समजल्या.
लव्ह जिहाद
लेखिका: डॉक्टर सुनिला सोवनी.
प्रकाशक: भारतीय विचार साधना
बुकगंगा.कॉम वर उपलब्ध आहे.
हो ललिता. मी पुस्तकाचे
हो ललिता. मी पुस्तकाचे रिव्ह्यू वाचूनच विकत घ्यावे की नाही,असा विचार केला होता. पण सध्याच्या आमच्या घराच्या पुस्तके विकत घेण्याच्या (सर्वमताने घातलेल्या )नियमामुळे अडलेय. पण त्याविषयी विचारल्यावाचून राहावेना, तेव्हा इथे विचारले.
नीधपच्या कोणत्यातरी लिस्ट मधे
नीधपच्या कोणत्यातरी लिस्ट मधे प्रिया तेंडुलकर चा उल्लेख वाचून आठवले की मी यावेळेस तिची पुस्तके माहीत करून घेण्याकरिता एक आणायचे म्हणून 'जावे तिच्या वंशा' आणले आहे. ते वाचले. आवडले. साध्या सोप्या भाषेत कसलाही आविर्भाव न आणता लिहीलेल्या कथा/प्रसंग आहेत. आता बाकीची वाचणार.
फा, पंचतारांकित वाच
फा, पंचतारांकित वाच तिचे.
असाम्याकडे बहुतेक सगळे कलेक्शन असेल तिचे. तो पण माझ्यासारखाच प्रि तें फॅन आहे.
Ashwin Sanghi's 'The Krishna
Ashwin Sanghi's 'The Krishna Key' - सुंदर पुस्तक.
खुप catchy आहे. वाचताना त्याचे बरेचसे logic अतर्क्य वाटतात, पण तरीसुद्धा पुस्तक हातातुन सोडवत नाही.
Ashwin Sanghi's 'The Krishna
Ashwin Sanghi's 'The Krishna Key' - सुंदर पुस्तक.<<<< हिंदू लिट फेस्टमध्ये अश्विन संघीचं बोलणं ऐकून फार प्रभावित वगैरे झाले, आणि ताबडतोब पुस्तक विकत घेतलं. पंचवीसेक पानांच्यपुढे वाचू शकले नाही. समहाऊ. ते अजून आवडतच नाहिये.
गॉन गर्ल फॅन्स आहेत का इथे
गॉन गर्ल फॅन्स आहेत का इथे कोणी?
लवकरच त्याचा मुव्हीही येतोय.
गॉन गर्ल फॅन्स आहेत का इथे
गॉन गर्ल फॅन्स आहेत का इथे कोणी?
लवकरच त्याचा मुव्हीही येतोय.
दक्षिणेतले हे राजवंश खऱ्या
दक्षिणेतले हे राजवंश खऱ्या अर्थाने दाक्षिण्य आणि स्त्रीदाक्षिण्य म्हणजे काय
<<
म्हणून स्त्रीदाक्षिण्यात तो दक्षिण शब्द असावा काय?
इब्लिस, तारा वनारसे यांचं
इब्लिस, तारा वनारसे यांचं म्हणणं होतं खरं
विचारार्ह वाटलं.
मी अलिकडे महाभारत वाचलं कमला सुब्रह्मण्यमचं, मंगेश पाडगावकरांनी अनुवादलेलं .आमच्या क्यूट लायब्ररीत मूळ पुस्तकांपेक्षा अनुवाद जास्त सहजपणे मिळतात
असो. लहानपणी मूळ वाचलं होतं, आता दोन भागांपैकी दुसरा आधी मिळाला आहे.
महाभारत revise करणंही आवश्यक होतं आणि काय आश्चर्य, मंगेशबाबांचं लेखन थेट हृदयाला स्पर्शून जातं आहे. कालातीत कथा , प्रत्येक आणि असंख्य संध्याकाळींचे रंग.तऱ्हेतऱ्हेने उदास करणारी तीच तऱ्हा.
मन अगदी ओतप्रोत भरून गेलं, विषण्णता ,तत्वभ्रम, महाशोक, ज्ञान.
अवांतर पोस्ट
अवांतर पोस्ट -
स्त्रीदाक्षिण्य हा पारंपरिक मराठीत शब्द आहे??? का कलोनियल काळात ज्या शब्दांची इंग्लिशमधून अनुवादित, प्रतिशब्दात्मक आयात झाली त्यातील एक आहे? जसा मायबोली हा शब्द माधव ज्युलियनांच्या आधी वापरलेला निदान मला तरी दिसून आलेला नाही (मदरटन्गचा जसाच्यातसा अनुवाद).....
भारतीय संस्कृतीत स्त्रीदाक्षिण्याची (शिव्हॅलरी या अर्थाने) परंपरा कधी होती? तो खास युरोपीअन प्रकार आहे.
सुझॅन कॉलिन्सच्या हंगर गेम्स
सुझॅन कॉलिन्सच्या हंगर गेम्स सेरिजचे पहिले दोन भाग वाचले. पहिल्यांदाच सिनेमा पाहिल्यावर मूळ पुस्तक वाचणे हा वेगळा अनुभव होता. सिनेमा कितीही उत्तम असला तरी पुस्तकाची मजा और आहे कारण त्या सगळ्या फर्स्ट पर्सन नॅरेटीव्हला सिनेमात आणणे शक्य नाही. कॅटनिसच्या भूमिकेत जेनिफर लॉरेन्स हे महान कास्टींग आहे, दुसरे कोणी असूच शकत नाही तिथे.
एकाच कादंबरीत डिस्टोपिअन, रिअॅलिटी टेलिव्हिजन आणि सायन्स फिक्शन अशा अनेक थीम्स समर्थपणे पेललेल्या आहेत.
आता सिनेमा पहायच्या आधी तिसरा भाग वाचेन.
इथे 'हंगर गेम्स'चे कोणी फॅन्स आहेत का?
अनुमोदन आगाऊ!! अमिष
अनुमोदन आगाऊ!!
अमिष त्रिपाठीची शिवा ट्रिलॉजी कोणी वाचली आहे का? भारतीय पुस्तक विक्रीचे सगळे ऊच्चांक मोडले आहेत ह्या सिरिजने. त्रिपाठी आणि त्याच्या पुस्तकांबद्दल बरेच ऐकले पण अजून वाचणे जमले नव्हते.
ह्यावर्षीच्या भारत भेटीत ही सिरीज हातात पडणार आहे त्यापूर्वी जरा माहिती असावी म्हणून विचारत आहे.
मी हंगर गेम्स फॅन. पहिलं
मी हंगर गेम्स फॅन. पहिलं पुस्तक वाचायला सुरुवात केली अन नंतर अक्षरशः सतत वाचत राहून फडशा पाडला तिन्ही भागांचा. सिनेमाबदल बोलायचे तर पहिल्या भागात बर्यापैकी निराशाच झाली. कॅटनिस चे कास्टिंग मात्र बेस्ट ! पण पुस्तकातली इन्टेन्सिटी येत नाही सिनेमात . पुस्तकात अगदी प्रत्येक डेथ सुन्न करून जाते तसे सिनेमात होत नाही. कॅचिंग फायर(पुस्तक) मस्त आहे. त्यातली कॅरेक्टर्स खूप आहेत आणि सगळी सही डेवेलप केली आहेत पुस्तकात, त्यामुळे सिनेमात कोण कोण घेतली आहेत याची फार फार उत्सुकता होती. अजूनही काही कारणाने सिनेमा पाहिलाच नाहिये!! मला भाग ३ शेवटी फारच लांबल्यासारखा वाटला मात्र.
शिवा ट्रिलजी मधले पहिलेच - मेलुहा वाचायला सुरुवात केली होती पण फार अपील झाले नाही , त्यामुळे सोडून दिले. मला ते रियालिस्टिक करण्याचे प्रयत्न फार ओढून ताणून वाटले. परत वाचायचा प्रयत्न करून बघेनही कधीतरी
Pages