युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोणच्याच्या बरण्यांना>>>>>>>>> वर आधी कुणीतरी लोणच्याच्या बरण्या म्हणल्यावर मला पुर्वीच्या चिनीमातीच्या लो च्या ब आठवल्या होत्या. ज्यात आम्ही लोणची, वर्षभराचे मसाले वै भरुन ठेवायचो.

Lol
बघ अरुंधती, किती किंमती माल तू असाच देऊन टाकलास Wink

पण सस्मित, वर कुणीतरी लोणच्याच्या 'काचेच्या' बरण्या म्हणालं होतं, चिनीमातीच्या बरण्या कश्या आठवल्या? Wink

बघ अरुंधती, किती किंमती माल तू असाच देऊन टाकलास >>>> वरच्या लिंक मधल्या किंमती कायच्याकाय आहेत.माझ्या आईने मोठाल्या बरण्या कामवालीला देऊन टाकल्या.

इथे मेसन जार कॅनिंगसाठी वापरले जातात. पारंपारिक प्रकार. बॉलचे मेसन जार आणि ब्लू बुक. १२ ची केस असते. रिंग्ज पुन्हा वापरता येतात. लिड्स नवी घ्यायची. मेसन जारमधे ड्रिंक्सची फॅशनलाट बघून गंमत वाटली होती पण आता ही लाट जरा ओसरायला लागलेय. मॉस्को म्युल मग लेटेस्ट आहे. बघू किती काळ टिकतेय. रच्याकने एकेकाळी आमच्या मिडवेस्टमधे व्लासिक पिकल्सच्या जारमधे पब्लिक लंचसाठी चिकन नुडल सूप न्यायचे. Happy

ब्राउन राइस चे काय करता येइल? मी डोसा पीठ भिजवताना वापरुन संपवण्याचा प्रयत्न करते आहे पण त्याने डोसे जाड होतात. अजुन २ किलो आहेत. सो युक्ती सुचवा. Happy

नेहेमीसारखा भात करून संपेल की! माझ्या माहीतीप्रमाणे ब्राऊन राईस शिजायला बर्यापैकी वेळ लागतो मात्र...

दोसा, आंबोळी व तेडे हा प्रकारही चांगला होतो. मीही असेच संपवले कारण दोन तीन तास आठवणीने भिजवून ठेवावा लागतो.

नेहमीच्या भातात रोज थोड़ा थोड़ा ब्राऊन राइस टाकून संपव.

सध्या दुधाच्या बाटल्यांसारख्या छोट्या बाटल्या खुप दिसताहेत market मध्ये. जूस, मसाला दूध, सरबत असं काहीबाही serve करायला छान वाटते त्यात. जगात सगलीकडेच आहेत या बोटल्स की फक्त इथे उन्हाळा असल्याने दिसताहेत?

नेहमीच्या भातात रोज थोड़ा थोड़ा ब्राऊन राइस टाकून संपव.

सध्या दुधाच्या बाटल्यांसारख्या छोट्या बाटल्या खुप दिसताहेत market मध्ये. जूस, मसाला दूध, सरबत असं काहीबाही serve करायला छान वाटते त्यात. जगात सगलीकडेच आहेत या बोटल्स की फक्त इथे उन्हाळा असल्याने दिसताहेत?

वत्सला, तुम्हाला मेसन जार्स (mason jars) तर नाही म्हणायचं होतं ?

जरा हॉट ट्रेन्ड आहे खरा हा!
अमेझॉन वर आहेत अवेलेबल, पण फार महाग आहेत. मागे कधीतरी अमांनी सांगीतल्याप्रमाणे आपले साधे जॅम चे जार्सही मेसन जार म्हणून वापरता येतील.
याच्या/यामध्ये करायच्या रेसीपीज पिन्ट्रेस्ट, गूगल वर नक्की मिळतील Happy

आपल्या देशी रेसीपी मधील काही मेसन जार मध्ये सर्व करायला सोप्या व छान वाटतात.

१) खिचडी एक लेयर अर्धा जार भरून व वर कढी. शोभेला पापड.
२) कैरी पन्हे
३) साबुदाणा खिचडी खालचा लेयर व वर काकडी दही.
४) दहीभात बिसीबेले भात. सांबार भात. सिंगल सर्व.
५) बटन इडली व वडा रसम मध्ये.
६) फ्रूट सलाड/ क स्टर्ड.
७) आम्रखंड व वर हापुसचे तुकडे व क्रीम.
प्रसादाचा शिरा . व वरून शेवयाची खीर, गुलाब पाक ळ्या.
चिल्ड सोल कढी, किंवा गरम टोमाटो सार.
फलुदा,

ब्राउन राइस चे काय करता येइल? >>>> इडली करता येईल.किंवा फोडणीच्या भाताचे प्रकार.

http://www.eatingwell.com/recipes_menus/recipe_slideshows/healthy_brown_...

http://allrecipes.com/Recipe/Home-Style-Brown-Rice-Pilaf/Detail.aspx?evt...

http://allrecipes.com/Recipe/Brown-Rice-and-Vegetable-Risotto/Detail.asp...

http://www.foodchannel.com/recipes/recipe/over-rainbrow-brown-rice/

https://www.youtube.com/watch?v=uo2lvikexvM ही संजीव कपुर यांची रेसीपी फिरनीची Happy

योकु, मंजू, वत्सला, सिनि सगळ्यांना धन्यवाद!
सिनि ट्राय करते ह्या लिंकस Happy
मंजू तेडे म्हणजे काय?

योकु, नाही रे... मी म्हणतेय त्या बाटल्या खुप पूर्वी (तू कदाचित बालवाड़ी/प्रा शाळेत असशील) दुधाच्या बाटल्या यायच्या बघ दूध केंद्रावर तशाच पण त्या बाटलीच्या १/४ आकाराच्या आहेत. सध्या इथे खुपच दिसताहेत. त्यांनाही मेसन जार म्हणत असतील तर कल्पना नाही.

दुधाच्या बाटल्यांचीही विंटेज लूक म्हणून फॅशन आहे. त्यात रिसायकल्ड ग्लास म्हटले की पब्लीकला अर्थ फ्रेंडली वस्तू म्हणून अधिक आवडते. दिसतात छान आणि सुपर साईज डिस्पोजेबल पेक्षा हातात धरायला फिलही छान वाटतो.

आपल्याकडे अमूल फ्लेवर्ड दूध अशाच बाटल्यांमध्ये मिळतं ना? ते एक कुठलं एनर्जी ड्रिंक पण अशाच बाटल्यांमध्ये मिळतं.

युप! मुंबईत सिएस्टी स्टेशन, चर्चगेट स्टेशन जवळ अजूनही आरे दूध केंद्रांवर एनर्जी, काजू मिल्क, बदाम मिल्क मिळतं. अजून दुसरीकडेही मिळत असेलच म्हणा. मस्त वाटतं ते प्यायला. Wink

मेसन जारमधे ड्रिंक्सची फॅशनलाट बघून गंमत वाटली होती>>>>>>>>>>>>>> हो स्वाती२ मलाही. पण मला ते जार आवडतात. जरा ओल्ड फॅशन आणि थोडे क्लासीही वाटतात. त्यात सॅलड ड्रेसिन्ग करून छान हलवता येतं.

मुंबईत दूध केंद्रांवर एनर्जी अजुनही मिळते :स्मित:. रत्नागिरी पावसमधे एका मंदिराच्या (सदगुरु स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर बहुतेक)परीसरातील भागातल्या दुकानांत अश्याच लहान काचेच्या बाटल्यांमधुन कोकम सरबत आणि आंब्याचा खरा ज्युस मिळतो .दोन्ही मस्त लागतात.

टॉन्सिल्स काढल्यावर खायला काय द्यावे. तिखट आणि घशाला बसतील असे पदार्थ टाळावे लागतील. आईसक्रीम आणि पेयांचा खुराक असेलच. पण गाडी रुळावर आणायला रोजच्या जेवणातून काय देता येइल? काही टिप्स?

@ चि न्नू: चांगल्या तां दुळाची भरड कणी काढून त्याचा गरम भात व वरण, ह्या वरणातच भाज्या वगैरे घालता येतील. हे पोटभरीचे. मुग डाळ खिचडी, गरम शिरा उपमा इत्यादि. फारसे घश्याला टोचणार नाही असे दिले पाहिजे. गाजर मटार सूप, व्हेज सूप.

वत्सला तशा बाटल्या- पुर्वीच्या दुध बाटल्यांसारख्या- इथेही आल्यात. कलरफुल आहेत. मस्त वाटतात. माझ्याकडे एक आहे सि़क्रेट सांता गिफ्ट मिळालेली. Happy फोटो टाकते.

.

Pages