मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्ये देवगण "सींघम" आहे ना? मग त्याची बाईल त्याला "टायगर" काय म्हणते??? <<< 'टायगरम' असे नाव दिले असते चित्रपटाला तर आपल्याला 'चाय गरम' वाटले असते ना.. Proud

खतरा खतरा मिलती है खतरा खतरा जीने दो
जिंदगी है!!!!

(शेजारची मुलगी. यंदाच्या कॉलेज डेला तिला हिंदीच गाणं म्हणायचं आहे!)

अरेरेरे
>>खतरा खतरा मिलती है खतरा खतरा जीने दो
जिंदगी है!!!!<< गुलजार साहेबांना 440V चा झटका लागेल हे ऐकुन Lol

धुंडो धुंडो रे बालमा, धुंडो रे साजना,
मोरे कान का बाला.
इथंपर्यंत ठीक ऐकु येतं पण पुढे-

मोरा बाला चंदा का जैसे लाला रे (?)
उसके लाले लाले बाल लाले लाले गाल
मोतियन की माला?

काहीही अर्थ लागत नाही. म्हणजे मी असं लॉजिक लावलं की नटीच्या कानातल्या डुल म्हणजे मोती आहे आणि त्याला चंद्राचा मुलगा (चंदा का लाला?) असं म्हटंलय. पण मग त्याचे बाल आणि गाल लाल कसे? आणि त्याने मोतीयन की माल घातली, नटीचा कान दुखत नसेल लांबडी मोत्यांची माळ कानात घालुन Uhoh

नंतर जालावर ओरिजिनल शब्द बघितले Proud

खतरा खतरा मिलती है खतरा खतरा जीने दो
जिंदगी है!!!! >>>> अय्ययो!!!

अर्थ विचार ना तिला या गाण्याचा. धम्माल येईल. कदाचित २ बहिणींच्या २ जीन्स सापडतील.

उसके लाले लाले बाल लाले लाले गाल

>>> ते असं आहे

मोरा बाला चंदा का जैसे हाला रे
जामे लाले लाले मोतियन की लटके माला

जाम = वारुणी सारख्या लालम लाल रंगाच्या खड्यांची (मोती?) माळ लटकत आहे.
हाला म्हणजे काय दे.जा.

जाम = वारुणी सारख्या लालम लाल रंगाच्या खड्यांची (मोती?) माळ लटकत आहे>>>>>
Lol

जामे = जिसमे = ज्यात.. असं आहे ते! (आठवा, 'माता जाकी (जिसकी) पारवती पिता महादेवा. तसंच 'जामे') हाला म्हणजे गोल.

माझं कानातलं चंद्राचा जणू गोल तुकडा ज्यात लाले लाले (हे छोट्या छोट्या अर्थाने असावे, लाल लाल नाही. बघायला हवे शोधून)मोत्यांची माळ लटकते आहे.

अहो ते असे आहे ... जा मेला , ला ले .. म्हंजी जत्रेत जाउन मोत्याची तशी म्याचिंग माळ घेउन ये. (ला ले )

हाला म्हणजे काय दे.जा.>> हाला म्हणजे तुकडा. पण हाला (हरिवंशरायबच्चन कृपेने) वारूणी या अर्थाने जास्त वेळा ऐकलेला आहे.

https://www.youtube.com/watch?v=FJFq5znkbSo

गाणं बघितल्यास मोतियन्की लटके माला दिसेल.

अहो ते असे आहे ... जा मेला , ला ले .. म्हंजी जत्रेत जाउन मोत्याची तशी म्याचिंग माळ घेउन ये. (ला ले ) >>>>>> कै च्य कै Rofl Rofl Rofl

जाम = वारुणी सारख्या लालम लाल रंगाच्या खड्यांची (मोती?) माळ लटकत आहे>>>>>
हाहा

जामे = जिसमे = ज्यात.. असं आहे ते! (आठवा, 'माता जाकी (जिसकी) पारवती पिता महादेवा. तसंच 'जामे') हाला म्हणजे गोल.

>>>> अरे देवा! असंच आहे का? ही म्हणजे अगदी कडीच झाली. इतकी वर्षं लाल रंगाचे मोती कसे असतील या विचारात फुकट गेली की! Lol

इतकी वर्षं लाल रंगाचे मोती कसे असतील या विचारात फुकट गेली की! >>> अगदी अगदी सेम पिंच Lol मला तर हाला म्हणजे पण 'हलणारा' या अर्थाने वापरलं आहे असं वाटायचं तेव्हा Proud

तेवर च " सुपरमॅन " ऐकल क , अर्जुन कपूरच .

" ले ले कोइ पन्गा , तो कर दू मैं बॅन " मला अस ऐकायला यायचं , पण संगती लागत नव्हती .

परवा नीट ऐकल Sad

आमच्या शेजारी एक सागर नावाच अवलिया रहायचा लहानपणी.

त्याने ऐकलेल्या ads -

१. थम्सप तुपाने भरला !! ( "थम्सअप! taste the thunder")

lol

अजून एक मज्जा

आमची client इकडे visit साठी आली होती.. women's day होता, HR ने healing harmony ( program for brest cancer awareness) ठेवला होता..

एक गाणं म्हटलं गेलं

सवार लू सवार लू ( लूटेरा मधलं)

ती म्हणाली.. "what a funny song.. "

नंतर समजलं, तिला फक्त "लू" हाच शब्द समजला होता...:))))))))))))

Pages