रेहान - कव्हर पेज

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

रेहान : कादंबरी.

लेखिका: नंदिनी देसाई.

छायाचित्रः जिप्सी (योगेश जगताप) आणि नदीम शेख.

कव्हर पेज डीझाईनः प्राजक्ता पटवे-पाटील.

मायबोलीवर मी लिहिलेली मोरपिसे ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आठवत असेल. तब्बल चार वर्षे लावली होती ती कादंबरी पूर्ण करायला. मात्र, इतक्या तुकड्या तुकड्यांतून लिहिताना कथानक भरकटलं होतं, परिणामी तेच कथानक व्यवस्थित मोट बांधून विस्तारित स्वरूपामध्ये लवकरच पुस्तकरूपाने प्रकाशित करत आहे.

मायबोलीकरांनी कायमच माझ्या लेखनाला उत्तम प्रोत्साहन दिलेले आहे, आता या नवीन प्रकल्पासाठीदेखील असेच प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा.

[मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर संपादित केला आहे : वेबमास्तर]

विषय: 
प्रकार: 

नन्दिनी मला आपले लिखाण नेहमीच भावते....
तुमचे लिखाण हे मला कायमच आयुष्यशी निगडीत वाटते....तुम्हाला मनापासून शुभेच्छा...

वेळोवेळी अथवा प्रासंगिक निमित्ताने केलेले लिखाण ज्यावेळी पुस्तक रुपाने समोर येते त्यावेळी लेखक/लेखिका आणि हितचिंतकांना होणारा आनंद अवर्णनीय असाच असतो. प्राजक्ता/जिप्सी यांच्या सहकार्याने तयार झालेले कव्हर पेज अतिशय देखणे झाले आहे....कादंबरीही तशीच असणार यात शंका नाही.

नंदिनी देसाई यांचे अभिनंदन.

अभिनंदन नंदिनी!
खरं सांगु. तुझ्या लेखनातुन जसा रेहान डोळ्यासमोर उभा रहायचा ना अगदी तस्साच हा पाठमोरा रेहान आहे. Happy
आवडलं कव्हर पेज.

Pages

Back to top