रेहान - कव्हर पेज

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

रेहान : कादंबरी.

लेखिका: नंदिनी देसाई.

छायाचित्रः जिप्सी (योगेश जगताप) आणि नदीम शेख.

कव्हर पेज डीझाईनः प्राजक्ता पटवे-पाटील.

मायबोलीवर मी लिहिलेली मोरपिसे ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आठवत असेल. तब्बल चार वर्षे लावली होती ती कादंबरी पूर्ण करायला. मात्र, इतक्या तुकड्या तुकड्यांतून लिहिताना कथानक भरकटलं होतं, परिणामी तेच कथानक व्यवस्थित मोट बांधून विस्तारित स्वरूपामध्ये लवकरच पुस्तकरूपाने प्रकाशित करत आहे.

मायबोलीकरांनी कायमच माझ्या लेखनाला उत्तम प्रोत्साहन दिलेले आहे, आता या नवीन प्रकल्पासाठीदेखील असेच प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा.

[मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर संपादित केला आहे : वेबमास्तर]

विषय: 
प्रकार: 

वेबमास्तर, हा मजकूर योग्य आहे का? हे विचारणारे मेल आपणाला तीन दिवसांपूर्वी पाठवले होते. असो!!

इतर सर्वांना मनापासून धन्यवाद.

नंदिनी : अभिनंदन आणि शुभेच्छा!
प्राजक्ता : कव्हरपेज फार सुंदर झालंय.
जिप्सी : नेहमी प्रमाणे अप्रतिम!

अभिनंदन नंदिनी!

मोरपिसेचा एक भाग वाचून खूप आवडली होती. मग शोधून शोधून पूर्ण वाचली. आता पुस्तकरूपाने प्रकाशनाकरिता शुभेच्छा.

छान बातमी. अभिनंदन, नंदिनी
कव्हर पेज देखणे झाले आहे. प्राजक्ता व जिप्सी यांचे खास कौतुक.

अभिनंदन नंदिनी. रेहान खूपच इंटरेस्टिंग दिसतोय Happy हे कॅरॅक्टर प्रत्यक्षात कसं असेल दिसायला असा खूपदा विचार करून झालाय Proud

Pages