जुन्या मालिका - काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 8 December, 2014 - 02:21

जुन्या मालिका ( फार जुन्या नाहीत ) उदा. शांती, स्वाभिमान, कोरा कागझं ह्या बद्दल काही गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत, कोणाला आठवत असेल तर सांगा Happy

१. शांती मधे एक माणूस दाखवत ज्याचे फक्त दोन्ही हात आणि प्रत्येक बोटात अंगठ्या असतं, तो कोण होता ?

२. कोरा कागझ चा शेवट काय झाला ? रेणुका शहाणे, सलील अंकोला होते त्यातं.

अजून आठवतील तसे प्रश्ण लिहिन Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. शांती मधे एक माणूस दाखवत ज्याचे फक्त दोन्ही हात आणि प्रत्येक बोटात अंगठ्या असतं, तो कोण होता ?
>>
तो बहुतेक सुनील शेण्डे होता असे वाटते. बरीच वर्षे झाल्यामुळे नक्की आठवत नाहिये.

हो, सुनिल शेन्डे होता तो. तो डॉन असतो आणी यतीन कार्येकरचा उजवा हात. त्याची दोन मुले असतात ज्यापैकी एक शेफ असतो व दुसरा येडचॅप. त्या शेफला माहीत असते बाप कोण आहे ते. पण येडचॅप नुसताच डिटेक्टिव्हगिरी करत असतो.

"प्रपंच" या झी मराठीवरील मालिकेचे (पुर्वी अल्फा मराठी) भाग आता ऑनलाईन पाहायला मिळतील का?>> नाही .तुनळीवर केवळ Title song आणि एक दोन मिनिटांचा भागच उपलब्ध आहे. (रसिका जोशी यांचा).पुर्ण सिरीयल नाही.

वादळ वाट चेही भाग नाहीत तुनळीवर कुणाला अधिक माहीती आहे का?

श्रीयुत गंगाधर टिपरे या सीरियलचे १६३ भाग आहेत तुनळीवर .कुणाला परत पाहायचे असल्यास.फारच सुंदर आहे ही सीरियल आणि सगळ्यांचे अभिनय ही एकदम भारी. Happy माझ्यामते रात्री आठला परत टेलिकास्ट करावी ही मालिका Proud Happy

पूर्वी दूरदर्शनवर एक हिन्दी मलिका लागायची त्यात तुषार दळवी आणि सुप्रिया पिळगावकर होते. कोणाला नाव आठवतेय का त्या मालिकेचे ?

यॅस, डॉन, आठवलं.

अजून एक - अंचित कौर , आर माधवनची मालिका कोणती ?

पूर्वी दूरदर्शनवर एक हिन्दी मलिका लागायची त्यात तुषार दळवी आणि सुप्रिया पिळगावकर होते. कोणाला नाव आठवतेय का त्या मालिकेचे ? >> त्यात विक्रम गोखले होते आणि ते सुप्रियाचं दुसरं लग्न लावून देतात तीचं ना ?

पूर्वी दूरदर्शनवर एक हिन्दी मलिका लागायची त्यात तुषार दळवी आणि सुप्रिया पिळगावकर होते. कोणाला नाव आठवतेय का त्या मालिकेचे ?>> ती मालिका क्षितीज
अजून एक - अंचित कौर , आर माधवनची मालिका कोणती ? >> साया

.

खूप पुर्वी ८५ साल असेल बहुदा. निशिगंधा वाडची आव्हान ही एक मालिका होती. ह्याच दरम्यान तिची आणखी एक मालिका होती. नव्हे अजून दोन मराठी मालिका होत्या. नावे आठवतात का कुणाला?

आणि त्याच दरम्यान पहाटी डीडीवर रिमा लागू आणि विक्रम गोखले ह्यांची मालिका लागायची. त्यात रिमा लागू पायानी अपंग असतात.

कोरा कागझ चा शेवट काय झाला >>> रेणुका सलीलशी लग्न करते

प्रपंचचे दुसर्‍याच कुठल्यातरी साईटवर भाग मिळाले होते मला. पण ते ५ मिनीटांचे कॉम्पॅक्ट एपिसोड्स आहेत. प्रपंच आणि झोका मी ही शोधते आहे.

जुनून बघायचं का कोणी ? शेवट आठवतो आहे का ?

तस तर जुनून, शांती, स्वाभिमान, रेणुकाची अजून एक सिरियल होती पहाडी भागात रहात अस्ते ती, स्मिता जयकर पण होती त्यात , ह्या कोणत्याचं मालिकांचे शेवट नाही आठवत Sad

त्यात विक्रम गोखले होते आणि ते सुप्रियाचं दुसरं लग्न लावून देतात तीचं ना ? >>
त्या सुप्रिया, तुषार दळवीच्या मालिकेचे नाव क्षितीज ये नही होत बहुतेक! >>
..... येस्स...... क्षितिज ये नही. धन्यवाद.

प्राजक्ता शिरीन, ती सिरीयल घुटन. आधीचे काही भाग दूरदर्शन वर लागाय्चे मग स्टार प्लस वर लागायची पण नाव बदलून.
अजून एक मालिका सोनी वर लागायची पल्लवी जोशी -आमीर बशीर होते. अल्पविराम. पल्लवी कोमात असताना रेप होतो त्यवर होती.

झोका अप्रतिम जमून आलेली सिरीयल होती.
सुनिल बर्वे, अमृता सुभाष, अमिता खोपकर, श्रीरंग गोडबोले होते त्यात.
त्याचं फक्तं टायटल साँग आहे यूट्यूबवर.

https://www.youtube.com/watch?v=eLcwEL_jA-c

झोका, प्रपंच ,गोट्या,फास्टर फेणे, पळसाला पाने पाच ( ई टिव्ही वर यायची) श्रीयुत गंगाधर टिपरे या मराठीतील सुंदर मालिका होत्या तसेच हिंदी त इरफान खान ची स्पर्श, वाघळे की दुनिया, सर्कस, मालगुडी डेज ईत्यादी
त्यावेळेस या सर्व मालिका आपल्या वाट्याचा एक वेगळाच आपलेपणा होता तो हल्लीच्या मालिका मध्ये दिसत नाही त्यामुळे त्या पाहव सुद्धा वाटत नाही.

Pages