Submitted by प्राजक्ता_शिरीन on 8 December, 2014 - 02:21
जुन्या मालिका ( फार जुन्या नाहीत ) उदा. शांती, स्वाभिमान, कोरा कागझं ह्या बद्दल काही गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत, कोणाला आठवत असेल तर सांगा
१. शांती मधे एक माणूस दाखवत ज्याचे फक्त दोन्ही हात आणि प्रत्येक बोटात अंगठ्या असतं, तो कोण होता ?
२. कोरा कागझ चा शेवट काय झाला ? रेणुका शहाणे, सलील अंकोला होते त्यातं.
अजून आठवतील तसे प्रश्ण लिहिन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विक्रम गोखले न ची एक मालिका
विक्रम गोखले न ची एक मालिका होती दुहेरी भूमिका वाली, कोणाला आठवते का?
विक्रम गोखल्यांची प्रतिबिंब
विक्रम गोखल्यांची प्रतिबिंब ही मालिका होती
विक्रम गोखल्यांची दुहेरी
विक्रम गोखल्यांची दुहेरी भूमिका असलेली मालिका म्हणजे द्विधाता. स्मिता तळवलकरही होत्या त्यात.
एक जुनी मराठी मालिका होति
एक जुनी मराठी मालिका होति त्यात श्रेयस तळपदे आणि पल्लवी सुभाष होते. जुनी पेशवेकालीन सिरीयल होती. अजुन एक स्टार होती. नाव माहित नाही. त्यात जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रेयसला पल्लवीला सोडून एका शेजारच्या राज्याच्या अडाणी राजकुमारीशी लग्न करावे लागते. असे काहीसे कथानक आहे. कोणाला आठवतेय का ही मालिका? त्याचे Title song सुद्धा खुप सुंदर होते.
जुनून बघायचं का कोणी ? >>>
जुनून बघायचं का कोणी ? >>> आमच्याकडे जितक्या भक्तिभावाने महाभारत बघितल जायच त्याच उत्साहाने जुनून बघितल जायच .
पूनम, दुहेरी भूमिका नव्हती
पूनम, दुहेरी भूमिका नव्हती 'द्विधता' मध्ये. एकाच व्यक्तीची दोन रूपे होती. विक्रम गोखले यांनी तो रोल केला होता. स्मिता तळवळकर बायको होती.
पूर्ण सिरीयलभर एका सारखे दिसणारे दोन असावेत वाटतं पण शेवटी उलगडा होतो, एकच माणूस तो दोन रुपात वावरतो.
झोका मालिकेतील सर्व पात्रे
झोका मालिकेतील सर्व पात्रे मस्त होती पण अमृता सुभाष च आणि तो जो नौकर असतो कान्हा. ......ह्या दोन भुमिका मला खुप आवडायचा
अमृता सुभाष ही माझी फेव्हरेट अभिनेत्री झाली. ......
नंतर तीची झी वर आवघाची संसार यायची प्रसाद ओक होता यात
ही पण सुंदर मालिका होती.
झोका मस्तच. मला अमृता सुभाष
झोका मस्तच. मला अमृता सुभाष तिथेच जास्त आवडली आणि सुनील बर्वे आवडतोच. अमिता खोपकरची 'मम्मा' पण आवडली होती.
सर्वांचा अभिनय सहज होता.
अवघाची संसार, नाही आवडली.
>>एक जुनी मराठी मालिका होति
>>एक जुनी मराठी मालिका होति त्यात श्रेयस तळपदे आणि पल्लवी सुभाष होते. जुनी पेशवेकालीन सिरीयल होती. अजुन एक स्टार होती. नाव माहित नाही. त्यात जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रेयसला पल्लवीला सोडून एका शेजारच्या राज्याच्या अडाणी राजकुमारीशी लग्न करावे लागते. असे काहीसे कथानक आहे. कोणाला आठवतेय का ही मालिका? त्याचे Title song सुद्धा खुप सुंदर होते>>>> माहितेय मला ही सिरियल. ती सुद्धा काही भाग झाल्यावर मध्येच बंद झाली बहुतेल ई टीव्ही नाविन सुरु झाला तेव्हा सुरु झाली होती. खरंच खुप छान सिरियल होती. ती अडाणि राजकुमारीचं काम करणारी अभिनेत्री खुप गोड होती .
दुरदर्शनवर मनाचिये गुंती
दुरदर्शनवर मनाचिये गुंती म्हणुन एक मालिका होती, रविवारीच लागायची. त्यात सुबोध भावे, मीरा वेलणकर, प्रदिप वेलणकर होते. त्याचे शीर्षकगीत खुपच सुंदर होते.
माहितेय मला ही सिरियल. ती
माहितेय मला ही सिरियल. ती सुद्धा काही भाग झाल्यावर मध्येच बंद झाली बहुतेल ई टीव्ही नाविन सुरु झाला तेव्हा सुरु झाली होती. खरंच खुप छान सिरियल होती. ती अडाणि राजकुमारीचं काम करणारी अभिनेत्री खुप गोड होती .>>> अगदी बरोबर मी अमि. त्या सिरीयलचे नाव आठव्तेय का?
स्नेहनिल आणि मी मी अमी "एक
स्नेहनिल आणि मी मी अमी
"एक होता राजा" ही ती मालिका. गिरिश ओक त्यात श्रेयस तळपदेचे बाबा होते आणि त्या अडाणी राजकुमारीचे काम करणारी अभिनेत्री बहुदा हिमानी निलेश होती. छान होती मालिका. पण मधेच अचानकच बंद केली.ईटीव्हीवर होती.shreyas taLapade kuThunataree paradeshaatUna shikuna aalelaa asato.
आणखी एक छान शीर्षकगीत असलेली छान मालिका म्हणजे ईटीव्हीवर लागायची ती "सोनियाचा उंबरा"
हम्म आठवलं. स्मिता सरवदे
हम्म आठवलं. स्मिता सरवदे श्रेयसची सावत्र आई होती.
दूरदर्शनवर (किंवा अल्फा
दूरदर्शनवर (किंवा अल्फा मराठीवर) मालिका लागायची 'संस्कार' (नाव हेच होतं का?). त्याचं टायटल song मस्त होतं. शाळेवर होती. मोहन जोशी आणि बरेच जण होते.
मना घडवी संस्कार,
मना तेजवी संस्कार,
मना उद्धरी संस्कार.
अन्जु दुरदर्शनवर लागायची..
अन्जु दुरदर्शनवर लागायची.. मोहन जोशी होते त्यात.. शाळा दाखवली होती... सुंदर होती ती मालिका....
एकत्र कुटुंब काय असत व ते
एकत्र कुटुंब काय असत व ते किती छान असु शकते हे पाहायचे असेल तर प्रपंच सारखी दुसरी मालिका नाही. .........सर्वाच्या भुमिका सहज, सरळ,
साध्या आणि सुंदर. .भरत,रसिका, सुनिल बर्वे, आनंद ईगंळे(मंग्या) ,शरद जोशी, ई..नंबर वन कास्टिंग
एक तर मला त्या घराचा खुप हेवा वाटायचा समुद्रा काठी समोर मस्त मोठ्ठ अंगण असलेल..आणि यात राहणारी छान माणसे. ....
एकदम आपली वाट्याची ही मालिका.
अरे हे प्रपंच ऑनलाईन कुठेच
अरे हे प्रपंच ऑनलाईन कुठेच सापडत नाहीये कोणाकडे लिंक असेल तर द्या प्लीज.
प्रपंच बरेच लोक्स ऑनलाईन
प्रपंच बरेच लोक्स ऑनलाईन शोधताहेत बरेच वर्ष.
फेबुवर 'प्रपंच' चे एक फॅनपेज आहे तिथेही खुप लोक्स शोधत आहेत.
मी "झी मराठी"ला एक मेल केलीये. पण काही उत्तर नाही.
प्रपंचचे मध्ये रिपिट एपिसोड
प्रपंचचे मध्ये रिपिट एपिसोड दाखवत होते झी वाले.
पण मनमानी कारभार होता.
नंतर त्या स्लॉट मध्ये रेग्युलर मालिक सुरु झाल्यावर रिपिट एपिसोड बंद झाले.
मी जितके एपिसोड पाहिले ते आवडले.
रसिका रॉक्स.
मी मागे लिहिलं होतं का आठवत
मी मागे लिहिलं होतं का आठवत नाही, प्रपंचचे काही भाग मला २०१२ साली मिळाले होते युट्युबवर, आता नाही दिसत आहेत
४०५ आनंदवनचा शेवट अॅब्रप्ट होता बहुतेक, झोकाचं पण तसचं होतं ना, सुनिल- अ. सुभाषचं लग्न होऊन काही का एक वर्षं होऊन गेल्येत असा एक भाग होता बहुतेक शेवट.
अशीच एक मधेच बंद पडलेली
अशीच एक मधेच बंद पडलेली मालिका 'घुटन'. मला टायटल सॉन्ग खूप आवडायचे,
रवा है कश्ती मगर हर तरफ अंधेरा है
किसी का दोष नही ये कसूर मेरा है
बुझा है मेरे ही हातो चराग साहिल का.....
कही सफर तो कही रास्ता है मन्झील का
ये रात दिन कि घुटन क्यो अझाब है दिल का
घुटन मधे स्मिता जयकर आणि किरण
घुटन मधे स्मिता जयकर आणि किरण कुमार होते ना?
हो ....किरण कुमार छान दिसत
हो ....किरण कुमार छान दिसत होता त्यात
झोकाचा शेवट नाही बघितला
झोकाचा शेवट नाही बघितला मी.
४०५ आनंदवन पण काही एपिसोड बघितले. आनंद इंगळे आणि मधुरा देव यांनी मस्त काम केलं होतं. मधुरा देवने खूप कमी काम केलंय पण मला तिचा अभिनय आवडतो. कधी कधी मृणालपेक्षा उजवा वाटतो मला.
यॅस, घुटन - रेणुका शहाणे होती
यॅस, घुटन - रेणुका शहाणे होती ना त्यातं.
झोका व प्रपंच या दोन्ही
झोका व प्रपंच या दोन्ही सिरियल च लेखन-दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केल होत. या नंतर त्यांची दुसरी कुठली सिरियल आली होती का? कुणाला माहिती आहे का? ....
झोकाचा शेवटचा एपिसोडही चांगला
झोकाचा शेवटचा एपिसोडही चांगला होता.
सुनिल बर्वे आणि अमृता सुभाषचं लग्न होऊन दोन वर्ष झालेली आहेत. ऑफीसमधले बहुतेक सर्वजण (शरद पोंक्षे, परिक्षीत भातखंडे, गिरीजा काटदरे) अद्यापही त्याच कंपनीत काम करत आहेत. कान्हा (शेखर फडके) च्या स्वत:च्या बिझनेसचं उद्घाटन होतं आहे असा सिक्वेन्स होता. शेवटच्या दृष्यात सुनिल आणि अमृता कारमधून लाँग ड्राईव्हला जातात आणि सिरीयल संपते.
१०० मालिकेचे भाग कुठे उपलब्ध
१०० मालिकेचे भाग कुठे उपलब्ध आहेत का?
शिवाजी साटम यांची पोलिस अधिकार्याची ती पहिली भूमिका होती. गौतम आणि मार्कंड अधिकारींची मालिका होती. साटमांच्या जोडीला अजय फणसेकर आणि दीपक शिर्के होते त्यात. अगदी सुरवातीच्या दोन-तीन भागांत पोलिस अधिकार्याच्या भूमिकेत नाना पाटेकर होता.
आणखीन एक खूप जुनी मालिका म्हणजे चाळ नावाची वाचाळ वस्ती. याचेही भाग कुठे सापडले नाहीत मला.
४०५ चा शेवट कुणी सांगु शकेल
४०५ चा शेवट कुणी सांगु शकेल का? त्यातले बरेचसे कलाकार नंतर कुठे कुठे दिसले, पण प्रतिमा कुलकर्णी आणि मोहन जोशीचा मुलगा दाखवलाय तो नाही दिसला कुठे..
टिकेल ते पाॅलिटिकल ही एक
टिकेल ते पाॅलिटिकल ही एक सिरीयल मस्त होती. यात मकरंद आनासपुरे, भारत गणेशपुरे होते धमाल मालिका होती ही.
Pages