Submitted by प्राजक्ता_शिरीन on 8 December, 2014 - 02:21
जुन्या मालिका ( फार जुन्या नाहीत ) उदा. शांती, स्वाभिमान, कोरा कागझं ह्या बद्दल काही गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत, कोणाला आठवत असेल तर सांगा
१. शांती मधे एक माणूस दाखवत ज्याचे फक्त दोन्ही हात आणि प्रत्येक बोटात अंगठ्या असतं, तो कोण होता ?
२. कोरा कागझ चा शेवट काय झाला ? रेणुका शहाणे, सलील अंकोला होते त्यातं.
अजून आठवतील तसे प्रश्ण लिहिन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चंपा, ती मालिका ‘गणदेवता’
चंपा, ती मालिका ‘गणदेवता’ होती का? तीच असेल तर ती तेव्हाही संथ होती. मी आणि माझ्या भावाने त्या कादंबरीचे मराठी भाषांतर वाचलेलं होतं. गोष्ट माहिती असल्यामुळे आम्ही मालिका आवडीने बघायचो. बहुतेक मूठभर लोकं बघत असतील, त्यातले आम्ही दोघं असू!
तेव्हा प्रथम प्रतीश्रुती, श्रीकांत, चरित्रहीन अशा बंगाली कादंबऱ्यांवर आधारित मालिका होत्या. त्या बघून मला बंगाली साहित्याची आवड निर्माण झाली. जमतील तशी मराठी/ इंग्रजीत भाषांतरित पुस्तके वाचली.
वाह छान आठवणी. आम्ही तेंव्हा
वाह छान आठवणी. आम्ही तेंव्हा आणि अजूनही सुदेश बेरी चे फॅन होतो/आहे. सुराग (the clue) हि मालिका आणि नंतर CID Officer vidhan हि मालिका आम्ही खूप बघायचो. आठवत असेलच तुम्हाला . त्याचे संवाद मस्त असायचे जसे कि "आप १० से २ बजे तक कहा थे", "इसके मायने क्या हुवे श्रीवास्तव " , "CID ऑफिसर विधान , कानून काही दुसरा नाम"
ती हूनहुनारे हून्हुना एक
ती हूनहुनारे हून्हुना एक होतीना बंगाली कादंबरीवर, नूतन होती. त्यात मोहन भंडारी त्या नायिकेचा दुसरा नवरा होता. ते नायक नायिका वेगळे झाल्यावर मी सोडून दिलेली.
श्रीकांत बरेच महिने बघितली, त्यात मृणाल कुलकर्णीची बहिण, मधुरा देव जास्त आवडली होती, तिच्यापेक्षा. मी बरेचदा इथे तिथे लिहिलंय, अभिनयात ती उजवी होती जास्त पण तिने फार कमी काम केलं.
"इसके मायने क्या हुवे
"इसके मायने क्या हुवे श्रीवास्तव " ह्या डायलॉगमुळे श्रीवास्ताव अजून पण लक्षात राहीलाय.
माझ्या एका कथेत मी वापरलेय त्याचे कॅरेक्टर
सुराग आमची फेव होती . CID
सुराग आमची फेव होती . CID Officer vidhan आठवत नाही .
>>ती हूनहुनारे हून्हुना एक
>>ती हूनहुनारे हून्हुना एक होतीना बंगाली कादंबरीवर, नूतन होती. त्यात मोहन भंडारी त्या नायिकेचा दुसरा नवरा होता.
ती नूतन कालीगंजकी बहू असते. सिरियलचं नाव आता आठवत नाही. 'प्रथम प्रतिश्रुती' का?
फारुख शेखची एक होती श्रीकांत म्हणून. आणखी एक 'काला जल' म्हणून होती. त्याच्या टायटल साँगमध्ये 'काले जलमे सुख रहा है सगरा जीवनकाल. सदियोंकी दुर्गंधसे बोझल सासोंका जंजाल' अश्या काहीतरी डिप्रेसिंग ओळी होत्या.
>>आरिफ खान होते तिथे मला
>>आरिफ खान होते तिथे मला चन्ना जास्त आवडायची. >> चुनौती
मन एक सीपी है आशा मोती है
हर पल जीवनका एक चुनौती है
सोने न दे आग सिनेकी
कर ले लगनसे तू प्यार (ह्याचा अर्थ मन लावून प्रेम कर का जीव ओतून काम करण्यावर विश्वास ठेव हे अजूनही ठाऊक नाही)
आवाज देके बुला ले तू
तेरे लिये है बहार
जो बन जाता है धूल राहोंकी
उसकी दिवानी मंजिल होती है
ह्या ओळींचा अर्थ कळायचं वय नव्हतं तेव्हा. आता कळतोय.
ती नूतन कालीगंजकी बहू असते.
ती नूतन कालीगंजकी बहू असते. सिरियलचं नाव आता आठवत नाही. 'प्रथम प्रतिश्रुती' का?>>> नाही स्वप्ना, ती बहुतेक मुजरीम हाजिर हो होती. त्यात गोलमाल मधले अमोल पालेकरचे बॉस ( नाव आठवेना
) व्हिलन होते. दुसरी नायिका नवनी परीहार होती.
कोणाला 'सुबह' सिरियल आठवतेय
कोणाला 'सुबह' सिरियल आठवतेय का? ऐ जमाने तेरे सामने आ गये, आजके दौरके नौजवा आ गये अश्या ओळी होत्या.
रश्मी.. , बरोबर. ह्या मूळ कथा
रश्मी.. , बरोबर. ह्या कथा मूळ बंगालीत वाचायचा निश्चय अजून पुरा व्हायचाय. हजारो ख्वाहिशे ऐसी.....
सुबह...मस्त होती ही पण!
सुबह...मस्त होती ही पण! ड्र्ग्ज वर होती बरीचशी
ती बहुतेक मुजरीम हाजिर हो होती. त्यात गोलमाल मधले अमोल पालेकरचे बॉस ( नाव आठवेना Sad ) व्हिलन होते. दुसरी नायिका नवनी परीहार होती. >> उत्पल दत्त. नवनी परिहार मस्त होती
कोणाला 'सुबह' सिरियल आठवतेय
कोणाला 'सुबह' सिरियल आठवतेय का? ऐ जमाने तेरे सामने आ गये, आजके दौरके नौजवा आ गये अश्या ओळी होत्या....>
ए ज़माने तेरे सामने आ गए,
आज के दौर के नौजवा आ गए
दर पे तेरे बन के सूरज ले के सुबह आ गए
मौत और ज़िन्दगी दोनों हैरान हैं ..
वक्त को रोक दें , हम वो तूफ़ान हैं ...
चुनौती नंतर हि सिरीयल लागायची. स्टोरी लक्षात नाही कारण लहान होते पण तेव्हा च्या बहुतेक सिरियल्स ची टायटल सॉंग्स लक्षात आहेत.
घुटन -
घुटन - (किरण कुमार आणि स्मिता जयकर होती )
कही सफर है कही रास्ता है मंझिलका
ये रात दिन कि घुटन क्यू अजाब है दिल का
रवा है कष्ती मगर हर तरफ अंधेरा है
किसी का दोष नाही ये कसूर मेरा है
बुझा है मेरे हि हातों चिराग साहिल का (not sure about this line :-))
सुबह आठवतेय , त्यावर मधेच
सुबह आठवतेय , त्यावर मधेच बंदी अली होती ( विषया साठी ) पण नंतर परत चालू झाली , title खूप छान होते , त्या वेळेस च्या मानाने खूप मॉडर्न वाटायचे
पूर्वी दूरदर्शनवर एक हिन्दी
पूर्वी दूरदर्शनवर एक हिन्दी मलिका लागायची त्यात तुषार दळवी आणि सुप्रिया पिळगावकर होते. कोणाला नाव आठवतेय का त्या मालिकेचे ?>>
क्षितिज ये नही
खूपच छान होती , मला फार आवडायची त्यात विक्रम गोखले सुद्धा होते
रवींद्र मंकणी ची "अश्वमेघ"
रवींद्र मंकणी ची "अश्वमेघ" आठवतीये का कोणाला ?
गोलमाल मधले अमोल पालेकरचे बॉस
गोलमाल मधले अमोल पालेकरचे बॉस >> उत्पल दत्त
धन्यवाद विनीता आणी शोधक.
धन्यवाद विनीता आणी शोधक. चेहेरा नजरेसमोर होता पण नाव आठवेना. पण त्या सिरीयल मध्ये नूतन व उत्पल दत्त या कसलेल्या कलाकारांची जुगलबंदी भारी होती.
मुजरीम हाजिर, बरोबर.
मुजरीम हाजिर, बरोबर.
सुबह मधे राकेश अस्थाना आणि तो गौस आडनावाचा होताना. तो ड्रग्जच्या आहारी जातो. राकेश सोडून बाकीचे जातात. तेव्हा ड्र्ग्जचं खूप ऐकायला यायचं, ज्युनियर कॉलेजमधे होतो आम्ही. नंतर ड्रग्ज वगैरे वर आपण मात केली असं उगाच वाटत होतं काही वर्ष. पण आता तर अतिच झालंय, जणू गल्लोगल्ली झालंय की काय इतपत ऐकायला येतं.
घुटनमध्ये रझा मुराद आणि
घुटनमध्ये रझा मुराद आणि स्मिता जयकर होते ना? किरणकुमार पण होता का? किरणकुमार 'साहिल' नावाच्या मालिकेत असल्याचं आठवतंय.
क्षितिज यह नही मलाही आवडायची. त्यात टायटल सॉंगमध्ये सुप्रियाचं स्केच तयार होताना दाखवायचे. मस्त वाटायचं ते बघायला
कविता चौधरीची उडान पण मस्त
कविता चौधरीची उडान पण मस्त होती.सध्या डीडी नँशनलवर जूनपासून चालू आहे.आता संपली असेल ही कदाचित कारण 30एपिसोड्स होते.
उडान मस्तच. शेखर कपूर पण
उडान मस्तच. शेखर कपूर पण होता.
क्षितिज ये नही मस्त होती.
क्षितिज ये नही मस्त होती. त्यात रजत कपूर पण होता बहुतेक. सुप्रियाचा (गेलेला) नवरा.
मला सई परांजपेच्या पण
मला सई परांजपेच्या पण आवडायच्या अडोस पडोस, पंछी वगैरे.
तो काळ असा होता घरी tv आल्यावर अगदी संताकुकडी वगैरे पण बघायचो, आई गुजराथमधे वाढली असल्याने ती लावायची. रात्री उशिरा ओल्ड फॉक्स असायची, चाळीतले बरेच जण आमच्याकडे यायचे tv बघायला. त्याआधी आम्ही भावंडे हि दुसरीकडे जायचो बघायला, अर्थात लिमिटेड prgms.
१९८९-९० मध्ये दूरदर्शनवर एक
१९८९-९० मध्ये दूरदर्शनवर एक सिरीयल होती. जपानी छोट्यामुलीची. बहुतेक डब केली होती. कोणाला आठवतंय? त्या मुलीचं नाव ओशन (ocean) असतं. सिरीयलचं नाव नक्की काय होतं आठवत नाही. बहुतेक ओशनच होतं
जपानी मुलीची का? आठवतेय.
जपानी मुलीची का? आठवतेय.
१९८९-९० मध्ये दूरदर्शनवर एक
१९८९-९० मध्ये दूरदर्शनवर एक सिरीयल होती. जपानी छोट्यामुलीची. >> हा आठवतेय . नाव नक्की आठवत नाही .
१९८९-९० मध्ये दूरदर्शनवर एक
१९८९-९० मध्ये दूरदर्शनवर एक सिरीयल होती. जपानी छोट्यामुलीची. >> हो आठवतेय , मला हि त्याचे नाव ओशन असेच आठवतंय
मला वाटते कि गेल्या काही वर्षात रिपीट केली होती
संताकुकुडी !! अवो मारी साथे असा पण एक कार्यक्रम असायचा , गुजराथी समजून घ्यायचा प्रयत्न करायचो
"ज्ञानदीप" नावाचा एक छान कार्यक्रम असायचा , त्यावरून बऱ्याच ठिकाणी ज्ञानदीप मंडळ स्थापन झाली होती ते समाजोपयोगी कामे करायचे
"गप्पागोष्टी" नावाचा एक छान कार्यक्रम असायचा त्यात रवी पटवर्धन होते (बबडया च्या सिरीयल मधले आजोबा) , मानसिंग पवार लेखक होते खूप छान संवाद असायचे
ओशीन होती ती!!
ओशीन होती ती!!
नंतर अजून एक कोरीयन लागायची. अशीच लहान मुलगी ते आजी असा प्रवास होता. जग्मा नाव असते, ती राजाला आव्डते पण ती एका सैनिकाबरोबर लग्न करते. त्यात रेसिपी फार मस्त दाखवायचे. कुठल्या हर्बने काय त्रास होतो किंवा नाहीसा होतो. पदार्थ कसे शिजवावे? फारच सुरेख वाटायचे ते....लिझीकी टाईपच
पतीसमवेत...


हा पती एकदम किम्स
हा पती एकदम किम्स कंव्हीनियन्स मधल्या जंग सारखा दिसतोय
ऍक्टर जंग चाच बाप असेल
Pages