Submitted by प्राजक्ता_शिरीन on 8 December, 2014 - 02:21
जुन्या मालिका ( फार जुन्या नाहीत ) उदा. शांती, स्वाभिमान, कोरा कागझं ह्या बद्दल काही गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत, कोणाला आठवत असेल तर सांगा
१. शांती मधे एक माणूस दाखवत ज्याचे फक्त दोन्ही हात आणि प्रत्येक बोटात अंगठ्या असतं, तो कोण होता ?
२. कोरा कागझ चा शेवट काय झाला ? रेणुका शहाणे, सलील अंकोला होते त्यातं.
अजून आठवतील तसे प्रश्ण लिहिन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती सिरीयल स्पेस सिटी सिग्मा
ती सिरीयल स्पेस सिटी सिग्मा होती. पीव्हीसी पाईपाचे असल्यासारखे टनेल. होज पाईपातले वायरिंग. सरकती दारे असा त्या स्पेस सिटीचा तामझाम होता.>>>>>>>>>>> येस्स बरोबर... तो चकचकता सूट पण आठवला पण तेव्हा ते सगळं भारी वाटायचं.
सकाळच्या मालिका किंवा रंगोली वगैरे चुकले तर फार वाईट वाटायचे.
कोणी मोठा व्यक्ती, राजकारणी गेले तर ३ दिवस टीव्हीवर काहीही प्रॉग्रॅम नाही. फक्त सुगम संगीत.
कच्ची धूप आठवते का कोणाला ?
कच्ची धूप आठवते का कोणाला ? भाग्यश्री (मैने प्यार किया वाली ) तिची धाकटी बहीण आणि अमोल पालेकरांची मुलगी शाल्मली होती. आशुतोष गोवारीकर पण होता. मला खूप आवडलेली सिरीयल.
पण आता ह्या जुन्या मालिका खूप स्लो, बोर वाटतात. production design खूप बेसिक असायचे. मी आता बघूच शकत नाही ५ मिनिटावर
छोटी बडी बातें >> हो आठवतोय ,
छोटी बडी बातें >> हो आठवतोय , त्यात अरविंद देशपांडे होते बहुधा >>> हो. आणि अशोक सराफ. ही मालिका कोणालातरी आठवतेय हे ऐकूनच भारी वाटलंय.
ऐसा भी होता हैचे काही एपिसोड आहेत यूट्यूब वर >>> हो का? चेक करते. थँक्यू तेजो.
किल्ले का रहस्य आठवते का? >>> हो. पण शेवट आठवत नाहीये. >>> शेवटी काहीतरी तस्करी वगैरे उघड होते बहुधा. पण नीट आठवत नाही.
हसत खेळत >>> अरे! थँक्स मी_अनु. मी विसरलेच होते हे नाव. त्याचं टायटल पण मस्त होतं. "सारे हसत खेळत..."
दूरचे दिवे >>> ही मालिका पण कोणाला तरी आठवतेय हे बघून टडोपा झालं अगदी
या सगळ्यात मुख्य स्पॉन्सर असलेल्या विको वज्रदंती आणि हलदी चंदन चे गुण वाली जाहिरात ही त्या सिरियल इतक्याच प्रेमाने बघण्याची गोष्ट होती. >>> अगदी अगदी
चीकू, अश्वीनी ची पहीली साय
चीकू, अश्वीनी ची पहीली साय फाय सिरियल 'अंतरिक्ष' होती.
किल्ले का रहस्य आठवते का? >>>
किल्ले का रहस्य आठवते का? >>> हो. पण शेवट आठवत नाहीये. >>> शेवटी काहीतरी तस्करी वगैरे उघड होते बहुधा. पण नीट आठवत नाही.
>> नाही. बहुतेक ते मालिका बनवत असतात असे उघड होते. त्यात विरेंद्र सक्सेना होते.
कच्ची धूप आठवते का कोणाला ? >
कच्ची धूप आठवते का कोणाला ? >>>> yesssssss. कच्ची धूप. कालपासून नाव आठवायचा प्रयत्न करत होते
सुरेश खरे आणि अशोक शेवडे >>>
सुरेश खरे आणि अशोक शेवडे >>> बरोबर.
सुरेश खरे एकदा आम्ही दिल्लीला जाताना भेटलेले. ते, विजय कदम, इला भाटे आणि सुनिला प्रधान हे सर्व होते. गणपतीत महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम करायला चाललेले. तेव्हा स्टेशनवर सुरेख खरे यांच्याशी गप्पा झालेल्या आठवतायेत. आधी ते एकटे होते नंतर सुनीला प्रधान आलेल्या पण तोपर्यंत गाडी लागली मग आम्ही आमच्या डब्यात गेलो. नंतर डब्यात इला भाटे, विजय कदम भेटले. इला यांचा बोलताना टोन सेम आहे जसा सिरियल्स किंवा नाटकात असतो तसाच, म्हणजे ते natural आहे.
अशोक शेवडे डोंबिवलीचे प्लस नवऱ्याच्या बँकेत होते, नंतर VRS घेतली. हि माणसे प्रत्यक्ष भेटली की लहानपणीच्या आठवणी जागृत होतात, tv वर ओळख झालेली, प्रत्यक्षात भेटली की काय बोलावं ते पटकन सुचत नाही
कच्ची धूप आठवते का कोणाला ? >>> क्या याद दिलाई. टीनेज फेवरेट सिरीयल. आशुतोष गोवारीकर कसला आवडायचा, अजुनही आवडतो. त्याचा होली, सरकारनामा पण बघितलेला. भाग्यश्री पटवर्धन, तिची बहिण आणि अमोल पालेकरची मुलगी शाल्मली पालेकर होते.
शाल्मली नाव खूप आवडलेलं, तिचंच पहीलं ऐकलं, मग अनेकवेळा ऐकलं. अगदी मखमली वाटलेलं आणि प्रत्यक्षात काटेसावर फुलांना शाल्मली म्हणतात हे नंतर समजलं, ती फुलं खरंच मखमली असतात.
कच्ची धूप यूट्यूबवर आहे पण
कच्ची धूप यूट्यूबवर आहे पण क्वालिटी चांगली नाहीये.
विनिता-झक्कास: अर्रे वा!!
विनिता-झक्कास: अर्रे वा!! ocean नव्हते Oshin होतं म्हणजे नाव! धन्यवाद, आता बघते!
यु ट्यूबवर रानजाई चे भाग आलेत
यु ट्यूबवर रानजाई चे भाग आलेत. कोणाला आठवत आहे का? त्याचं टायटल साँग आणि शांताबाई आणि सरोजिनीबाई. एकदम म्हणजे एकदम नॉस्टॅलजीक .. दऱ्या खोऱ्यात फुलते तू ग रानजाई..
फार आवडायचे ते , गाणं आणि
फार आवडायचे ते , गाणं आणि सगळंच खूप आभार लंपन
भोळा शंकर भुलोबा त्याची भुलाबाई... अजून आठवते.
Nostalgic !!
हो अस्मिता आत्ता एक भाग परत
हो अस्मिता आत्ता एक भाग परत बघितला.. घरातल्या आज्या बोलत आहेत असं वाटतं एकदम. ह्याच्या 11 व्या भागात ज्योत्स्नाबाई भोळे, इंदिरा संत आहेत , अजून काय हवे
युट्युबवर वागले की दुनिया चे
युट्युबवर वागले की दुनिया चे एपिसोड्स दिसले. सुमीत राघवन दिसतोय. चांगलं आहे का हे नवीन वर्जन? कुणी पाहिले का
ठीक ठाक आहे. खूपच प्रीची
ठीक ठाक आहे. खूपच प्रीची/उपदेशात्मक वाटली मला. काही प्रासंगिक विनोद आहेत; पण ते सगळे तेच तेच, जुन्या पद्धतीचे, माहीत झालेले वाटतात.
वागलेंचा छोटा मुलगा दाखवायला
वागलेंचा छोटा मुलगा दाखवायला पाहिजे.
चांगलं आहे.
चांगलं आहे.
जरा बाळबोध आहे. शेवटी एक मेसेज द्यायचा प्रयत्न करतात. पण अंजान श्रीवास्तव, भारती आचरेकर, सुमीत राघवन च्या अभिनयासाठी पाहायला आवडते. मुलगी आवडीने बघते. त्यावेळी छान वाटतं की लहानपणी आपल्याला आवडणारी एक मालिका तिला पण क्लिक झाली. साराभाई चे पण सर्व एपिसोड बघून झाले हॉट स्टार वर. जबान संभालके चे पण.. देख भाई देख ची मात्र गोडी लागली नाही.
जुने सुमित राघवन लहान असतानाचे फाफे एपिसोड कुठेच नाहीत युट्यूब वर. नाहीतर दाखवले असते.
आम्ही बाकरवडी पण बघायचो, ते डिस कंटिन्यू होण्या पूर्वी. थोडं ओव्हर अॅक्टिंग होतं पण देवेन भोजानी बेस्ट.
रुद्रम, फ्रेशर्स आणि लव्ह
रुद्रम, फ्रेशर्स आणि लव्ह लग्न लोचा परत सुरु झाल्या आहेत. Lokdown पंधरा दिवसाचा आहे, तेव्हड्यात किती भाग दाखवणार काय माहिती.
Oshin होतं म्हणजे नाव
Oshin होतं म्हणजे नाव
>>>> ती जापानीज डब सिरिअल ना.
मस्त होती.. बर्फाळ प्रदेश आठवतोय त्यातला .
बाकरवडी पण बघायचो, ते डिस
बाकरवडी पण बघायचो, ते डिस कंटिन्यू होण्या पूर्वी. थोडं ओव्हर अॅक्टिंग होतं पण देवेन भोजानी बेस्ट.>>+१
हरचंद, अनु धन्यवाद.
हरचंद, अनु धन्यवाद.
ओशीन खूपच मस्त जपानी सिरियल
ओशीन खूपच मस्त जपानी सिरियल होती ती छोटी ओशीन तर फारच गोड होती.
नो प्रॉब्लेम नावाची मराठी
नो प्रॉब्लेम नावाची मराठी सिरीयल होती. व पु काळेंच्या पार्टनर कादंबरीवर आधारित होती. प्रमोद पवार लीड रोल मध्ये. शीर्षकगीत छान होता. खालील शब्दरचना होती
एवढ्या तेवढ्या गोष्टींवर करा तुम्ही प्रेम
संकटाशी झुंजा आणि खेळा नवा गेम
मंत्र अगदी सोपा आनंदने जपा
"नो प्रॉब्लेम" "नो प्रॉब्लेम"
आंतरजालवर काही मिळाली नाही. कोणाला आठवते का
मालिका आठवत नाहीये. शीर्षकगीत
मालिका आठवत नाहीये. शीर्षकगीत आठवतंय.
Pages