जुन्या मालिका - काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 8 December, 2014 - 02:21

जुन्या मालिका ( फार जुन्या नाहीत ) उदा. शांती, स्वाभिमान, कोरा कागझं ह्या बद्दल काही गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत, कोणाला आठवत असेल तर सांगा Happy

१. शांती मधे एक माणूस दाखवत ज्याचे फक्त दोन्ही हात आणि प्रत्येक बोटात अंगठ्या असतं, तो कोण होता ?

२. कोरा कागझ चा शेवट काय झाला ? रेणुका शहाणे, सलील अंकोला होते त्यातं.

अजून आठवतील तसे प्रश्ण लिहिन Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिकल ते पोलिटिकल मस्तच होती ..

आणि एक घडलयं बिघडलयं पण होती .. मस्तच.. त्याच टायटल साँग पन मस्तच होत.. mp3 अजुनहि ऐकते मी Happy

एक होता राजा मालिकेचं शीर्षकगीत पन आवडायचं आहे का mp3 कुणाकडे ? .. एकच भाग बघीतला होता त्या शिरेलीचा श्रेयस तळपदे होता म्हणुन Lol .. तो दामिनी आणि बेधुंद मनाच्या लहरी मधे छान वाटायचा .. बाकी शिरेली कुठल्याच नेमाने पाहता आल्या नै ते आजतोवर...

स्मॉल वंडर आठवणीने पाहायची पण मी. त्यानंतर लागणार wwf मी आणि आई न चुकता Proud

आठवल्या तश्या लिहिते अजुन Happy

हो कारण तिचा मुळात स्वभाव जास्त मोकळा आहे मृणालपेक्षा... आता आपण मालिकांविषयी बोलु.. या दोन बहीणींविषयी दुसरीकडे बोलु.

खुप पुर्वी दुरदर्शनवर एक "नींव" नावाची सिरीअल होती..... रविवारी दुपारी लागायची..... बोर्डिन्ग स्कूलवर होती..... फार आवडली होती ती त्यावेळी..... कुणाला आठवतीय का ती?

"देख भाई देख" पण प्रचंड आवडायची..... शुक्रवारी दुपारी लागायची..... शाळा बुडवुन यायचो कित्येकदा ती बघायला लवकर!

इथं कुणाला मिट्टी के रंग मालिका आठवते का ?
काही कल्पना काय झालं त्यात याची ?
मला त्याच टायटल साँग आवडायच Happy

आणखी एक जासुस विजय ..
स्कुल डेज तर खुप खुप जास्त आवडायची Happy

नींव, शाळेतल्या मुलांवर होती ना? हे त्याचं टायटल साँग सापडलं - https://www.youtube.com/watch?v=ehe-c4GsrfE

कोणाला इधर उधर नावाची सिरिअल आठवतेय का? त्याचा १ भाग सापडला यूट्यूबवर - https://www.youtube.com/watch?v=oBgfrm8Ro7w

बॉडीलाईन आठवते का कोणाला. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट. मला खूप आवडायची, इंग्रजी विशेष कळायचं नाही तरी आवडायची. तसंच ओल्ड फॉक्स पण आवडायची.

खरच काय सुंदर मालिका लागायचा पूर्वी..आत्ताचे प्रतिसाद वाचून एकदम तो भाग आठवला..
पिंपळपान मालिकेचे टायटल song सुध्धा असच गूढ होत..
अंधाराचा पारंब्या अगदी जुन्या काळात नेणारी कथा होती..
भक्ती कुलकर्णी ने साकारली होती न त्यात मावशीची व्यक्तिरेखा?
खरच परत बघता यायला हवेत हे भाग..

दुरदर्शन अर्चिव्हर सर्च करा. जुन्या भरपूर मालिका आहेत तिथे.
आत्ता दिप्ती नवलची 'थोडा सा आसमान' बघुन संपवली.

प्रतिमा कुळकर्णींची lifeline म्हणून एक हिंदी सिरीयल होती दूरदर्शनवर...माझी अतिशय आवडती सिरीयल.. त्याच title music फार सुंदर होत... कुठे पाहायला मिळू शकेल ती?

होनी अनहोनी या दूरदर्शन च्या १९८८ साली दाखवलेल्या सिरियल चे लेखक कोण माहिती आहे का? तेंडुलकर तर नाहीत ना
होनी अनहोनी ही सिरियल आता कुठे पहाता येइल ?

>>एक जुनी मराठी मालिका होति त्यात श्रेयस तळपदे आणि पल्लवी सुभाष होते. जुनी पेशवेकालीन सिरीयल होती. अजुन एक स्टार होती. नाव माहित नाही. त्यात जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रेयसला पल्लवीला सोडून एका शेजारच्या राज्याच्या अडाणी राजकुमारीशी लग्न करावे लागते. असे काहीसे कथानक आहे. कोणाला आठवतेय का ही मालिका? त्याचे Title song सुद्धा खुप सुंदर होते.>> एक होता राजा - मालिकेचे नाव, शीर्षक गीत खरच खूप छान होते.

अमरावती की कथाऐं (काही गोष्टी फार आवडतात)

https://m.youtube.com/watch?v=9XPyIiFSbMs

Chekhov की दुनिया Anton Chekhov यांच्या उत्तम कथा आणि तगडे कलाकार (काही गोष्टींंची सुरवात साधारण होते पण अश्या उंचीला जातात त्या की बस् )
https://m.youtube.com/watch?v=hYGfb-J3w2c

कथा उत्तम कलाकार तगडे , कुणाला आवडेल म्हणून शेअर केले.

Youtube वर त्ऋष्णा , इन्द्रधनुष्य , कशिश अशा काही जून्या मालिका दिसतायत.
School time nostalgia (पापण्यांची पिटपिट करणारी बाहुली ...)
ती एक " पचपन खंबे , लाल दीवार" पण मिळाली की टडोपा होईल .

Pages